भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
>> किर्या, यावेळी सुपर-सिक्स
>> किर्या, यावेळी सुपर-सिक्स नाही, एट आहेत
तो मागच्या वेळच्या स्पर्धेबद्दल बोलतोय, लले! जरा डिले आहे तिकडे, संभाळून घे.
हो लले. चुकून सिक्स लिहिले.
हो लले. चुकून सिक्स लिहिले.
बांग्लादेशचा सुपडा साफ..!!
आपला रविवारी होईल बहुदा.
चिमण्या
विक्रम्...वा वा..>> वा वा
विक्रम्...वा वा..>> वा वा नाही अश्विनि कावा आहे आमचा तो. आणि श्रद्धा नाही विश्वास.
किरू यांचे नाव लिहून घेण्यात आलेले आहे. :).
बांग्लादेशचा सुपडा
बांग्लादेशचा सुपडा साफ..!!
आपला रविवारी होईल बहुदा.
किरु,
असे झाले तर अति ऊत्तम, त्यामुळे खेळाडुंचा माज ऊतरेल व इतर खेळांना तरी चांगले दिवस येतिल.
आर्यंलडकडुन भारताचा दारुण पराभव झाला पाहीजे.
बेन [ वे.इंडीज], लेफ्ट-आर्म
बेन [ वे.इंडीज], लेफ्ट-आर्म स्पीनर - ५.५ षटक, १८ धावा, ४ विकेटस ! उपखंडातल्या खेळपट्ट्यानी आपला इंगा दाखवायला सुरवात केलीय !!!

तिकडे न्यूझीलंडचा आत्मविश्वासही वाढतोय . झिम्बाब्वेच्या विरुद्ध का असेना पण एकही विकेट न गमावता त्यानी १६६ धावा केल्यात !
आणि हो, बंगलादेशला आपण मोठ्या फरकाने कां नाही मारलं, माहित आहे ? आज ढाक्यात स्वतःच्या देशाची टीम समजून बांगलादेशी प्रेक्षकानी वे.इंडीयन टीमच्या बसवरही दगडांचा वर्षाव केला ! आपल्या इथल्यासारखे वेडे शेजारच्या देशातही आहेत हे उमजून होते आपले खेळाडू !!
<< आयर्लंडकडून भारताचा दारूण पराभव झाला पहिजे >> म्हटलं होतं ना मी - "पण कुणीतरी या बाहेर देशच्या लोकाना सांगायला नको का, कीं आम्हीच आमच्या संघाचं खच्चीकरण करायला पूर्ण समर्थ आहोत व त्यात कार्यमग्नही आहोत; कशाला तुम्ही ही तसदी घेताय !! " !!
बांग्लादेशचा सुपडा
बांग्लादेशचा सुपडा साफ..!!
आपला रविवारी होईल बहुदा.
किरु,
असे झाले तर अति ऊत्तम, त्यामुळे खेळाडुंचा माज ऊतरेल व इतर खेळांना तरी चांगले दिवस येतिल.
आर्यंलडकडुन भारताचा दारुण पराभव झाला पाहीजे.
---- मग खेळ खल्लास, तसे होणे कृषि मंत्र्यांना परवडणार नाही. भारताचे आव्हान जिवंत रहाणार आहे आणि तसे ते रहावे असे एक सच्चा क्रिकेट प्रेमी म्हणुन मला वाटते.
भारत - आयर्लंड बद्दल शेन वॉर्नचे ताजे मत काय आहे?
प्रवीणपा तुमच्यासारखे लोक
प्रवीणपा तुमच्यासारखे लोक आहेत म्हनुणच तर इतके पैसे लावले जातात आजकाल.!
परंतू एखाद्या संघातील ११ च्या ११ खेळाडूंना विकत घेऊन >>
अहो कोण म्हणते कि अकरा च्या अकरा विकत घ्यवे लागतात ?
कारणं भारत स्वतःहून तर हरणार नव्हता ? >> का बरे ?
तुम्हा आम्हासारख्यांचे काळजाचे ठोके मॅच बघताना चुकतात तर ती मॅच खेळणार्यांचे काय हाल होत असतील याचा जरासा विचार करा. >>>
ते दिसततेच कि त्यांच्या चेहेर्यावरुन.
पुराव्यांशिवाय गळा काढून ओरडून आमच्या सारख्या क्रिकेटवर नितांत श्रद्धा असलेल्या प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पाडू नये ही विनंती >>>>
तुम्च्या आनंदावर का बरे विरजण पडते ? तुम्हि पहा कि बिनधास्त ! नितांत श्रद्धा असेल तर कसे विरजण पडेल ?
मला तर गम्मत वाटते. सर्व समोर दिसत असुनही डोळेझाक कशी केली जाते ?. शेवटच्या चेडुवर रन घेण्यासाठी न पळणे, पहिल्या ओव्हरमध्ये ३ झेल देणे हा योगायोग असुच शकत नाहि.
आजचा निकाल म्हणजे अजुनच गम्मत
आजचा निकाल म्हणजे अजुनच गम्मत आहे!
शेवटी यावेळेस साहेबांनी सगळे हातात घेतलेले आहे म्हणा. मग काय मज्जाच मज्जा.! Rs 50,000 कोटी चीए betting deal आहे ह्यावेळेस.
सर्व समोर दिसत असुनही डोळेझाक
सर्व समोर दिसत असुनही डोळेझाक कशी केली जाते ?.
केल्यावर डोळेझाक करण्याचा प्रश्नच येत नाही...
--- छे डोळे बंद
मी तर शेन वॉर्न चे ट्विट वाचुन मॅच बघणार... म्हणजे विरझण पडणार नाही आणि खेळाचा आनंदही मिळेल.
http://sports.in.msn.com/cric
http://sports.in.msn.com/cricket/2011CricketWorldCup/article.aspx?cp-doc...
जिथे उघडपणे Tournament Director असे म्हणतो आहे तिथे लपुनछ्पुन काय काय होत असेल ? खालची R.K. datta ची comment हि interesting आहे.
http://indiatoday.intoday.in/site/Story/129499/cover-story/cricket-world...
भारत - आयर्लंड बद्दल शेन
भारत - आयर्लंड बद्दल शेन वॉर्नचे ताजे मत काय आहे? >> भारताकडून आयर्लंडचा दारूण पराभव अपेक्षित...मॅन ओॅफ़ द मॅच.... शेन वॉर्न for Twitting
>>जिथे उघडपणे Tournament
>>जिथे उघडपणे Tournament Director असे म्हणतो आहे तिथे लपुनछ्पुन काय काय होत असेल ? <<
अरेरे, कठीण आहे. इथेतर ICC/BCCI नेच फिक्सिंग केलं आहे. मला वाटतं भारताला विजेते आताच घोषीत करुन टाकावं; जेणेकरुन क्रिकेट्प्रेमींचं ब्लडप्रेशर यापुढ्च्या मॅचेस बघताना कमी-जास्त होणार नाही. WCC आणि WWE मध्ये काहीही फरक राहिलेला नाही.
सर्व समोर दिसत असुनही डोळेझाक
सर्व समोर दिसत असुनही डोळेझाक कशी केली जाते ?.>>गणू तुमच्या सारख्या तर्कनिष्ठ लिहिणार्यांकढून एव्हढ्या बाळबोध वाक्याची अपेक्षा नव्ह्ती. (हे अजिबात उपहासात्मक वगैरे नाहिये). जे fixing नाही असे मानतात त्यांना convince करण्याचा एव्हढा आटापीटा का ? कि तुम्ही स्वतःचा पवित्रा justify करता आहात नक्की ?
(No subject)
जे fixing नाही असे मानतात
जे fixing नाही असे मानतात त्यांना convince करण्याचा एव्हढा आटापीटा का ? कि तुम्ही स्वतःचा पवित्रा justify करता आहात नक्की ? >>>>
कसे आहे साहेब, पहावत नाहि हो शिकली सवरली माणसे मुर्ख बनताना पहाताना म्हणुन आटापिटा.
तसे आता क्रिकेटला धर्मच म्हणले जाते म्हणा भारतात. मग आलेच कि मुर्ख बनवणे धर्माच्या नावाखाली.
justify कशाला करायला हवे त्यात. स्वतः income tax commisioner आणी enforcement Directorate जे म्हणत आहे त्यात अजुन काय justify करायचे.!
जेणेकरुन क्रिकेट्प्रेमींचं
जेणेकरुन क्रिकेट्प्रेमींचं ब्लडप्रेशर यापुढ्च्या मॅचेस बघताना कमी-जास्त होणार नाही.
--- केवळ क्रिकेट प्रेमींच्या रक्तदाबाची तुम्हाला चिंता आहे :अरेरे:, पण जरा विचार करा ज्या बुकींनी या मधे पैसे गुंतवले आहे त्यांच्या रक्तदाबा बद्दल काय? ते पण तुमच्या सारखे मानवच आहे हो.
कृषिमंत्री काही समाजसेवा किंवा क्रिकेटची सेवा करायला मैदानात उतरले नाहीत... शेवटी पैसा बोलतो. ज्या प्रमाणे दुधात साखर कशी एकरुप होते त्याच प्रमाणे २०११ मधे क्रिकेट आणि मॅच / स्पॉट फिक्सींग या दोन गोष्टी वेगळ्या करता येत नाही... हा काही सर आयझॅक व्हिव्हियन अलेक्झांडर रिचर्ड्स किंवा सर रिचर्ड हॅडली यांचा जमाना नाही आहे...
?.>>गणू तुमच्या सारख्या
?.>>गणू तुमच्या सारख्या तर्कनिष्ठ लिहिणार्यांकढून एव्हढ्या बाळबोध वाक्याची अपेक्षा नव्ह्ती.
---- जर गणू तर्कनिष्ठ लिहीतात (सहमत, मान्य आहे !)... तर मग तर्कनिष्ठ लिहीणारा असे का बरे लिहीतो याचा विचार केला आहे का ? की ते मनाला पटत नाही म्हणुन बाळबोध?
पहावत नाहि हो शिकली सवरली माणसे मुर्ख बनताना पहाताना म्हणुन आटापिटा.
---- गणू जी याबाबत तुमच्याशी असहमत. (पुस्तकी) शिक्षणाचा आणि मुर्ख बनण्याचा संबंध नाही.
शिकली सवरली माणसे मुर्ख
शिकली सवरली माणसे मुर्ख बनताना पहाताना म्हणुन आटापिटा.>> पण परत माझा मूळ मुद्दा तसाच आहे, एव्हढे तर्काधिष्ठित विचार करणारे असूनही "You can't convince everyone" हे माहित असतानाही तुम्ही नेमके तेच करताय, अगदी रक्त ओकून करताय हे पटत नाही. justify करण्याचा प्रश्न त्यातूनच येतोय. Maybe you yourself are not yet completely convinced about it. बघा विचार करून.
तर मग तर्कनिष्ठ लिहीणारा असे का बरे लिहीतो याचा विचार केला आहे का ?
>> नाहि हो ते तर्कनिष्ठ लिहिणे फक्त इतरांच्या बाबतीमधे आहे कि स्वतःबाबत पण हे चाचपडून बघत होतो. तुम्हाला काय वाटते ?
लोकहो.. जाऊ द्या ना ! गणू
लोकहो.. जाऊ द्या ना ! गणू सारख्यांना जर फिक्सींगचा चष्मा काढायचाच नसेल तर तुम्ही कशाला पोस्टी टाकून आपली एनर्जी वाया घालवताय ? अनुल्लेख माडी.. !
बर्याच पोस्टी त्याच त्या टॉपिक वर पडत आहेत.. विषय बदला.. !
भारत दणदणीत जिंकणार परवा.
Maybe you yourself is not yet
Maybe you yourself is not yet completely convinced about it. बघा विचार करून.
--- असामीजी, मी पण गणू यांच्या सर्व पोस्ट वाचल्यात, अंतर्मुख व्हायला भाग पाडणार्या आहेत. विरोध पत्करुनही समाज प्रबोधनाचे अत्यंत पवित्र कार्य आज गणूजी करत आहे... त्याबद्दल त्यांचे मनापासुन अभिनंदन!
भारत दणदणीत जिंकणार परवा.
--- असे तुम्हाला तसेच एक सच्चा क्रिकेट प्रेमी म्हणुन मलाही वाटते.... पण बुकींच्या मनात काय आहे हे शेवटच्या चेंडू पर्यंत कळत नाही... आणि त्यातच खरी मजा आहे.
अनुल्लेख माडी.. !
--- त्याने परिस्थितीत काही फरक पडत नाही...
आज विंडीज ने बांगलाचं विमान
आज विंडीज ने बांगलाचं विमान छान जमिनीवर आणलं.. भारतावि. २९० झाल्याने ते अधिक ऊंच ऊडत होतं..
५८ धावसंख्या असतानाही, बांगलाच्या रोबेल गोलंदाजाने ऊगाचच चेंडू टाकताना गेल ला खुन्नस दिला.
त्याचे पुढचे सर्व चेंडू गेल ने मुद्दामून क्रीज च्या बाहेर येवून सीमापार धाडले. घरच्या पिच वर खेळतोय म्हणून काहीही माज? अरे त्या गेल ने निव्वळ कानाखाली चपाटी मराली तरी अर्धी बांगला टीम कोलमडेल अशी आवस्था आहे... असो.
भारत आयर्लंड वि. जिंकेल यात मला शंका नाहीच.. फक्त कशा प्रकारे/किती सहज आपण जिंकतो एव्हडेच बघायचे आहे. शिवाय संघात काय बदल होतात तेही पहायचे आहे. कोहली ला बसवून रैना? मुनाफ ला बसवून नेहरा ? चावला ला बसवायचा तर दुसरा लेग स्पिनर नाही.. त्यामूळे चावला ला पुनः संधी मिळेल असे वाटते. आयर्लंड वि. पाच गोलंदाज नक्कीच खेळवणार नाही..
गणू, त्या पोश्टी मध्ये आम्ही
गणू, त्या पोश्टी मध्ये आम्ही मॅच फिक्स केली असं कुठेही लिहिलं नाहीय. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सामने पहावेत यासाठी केली गेलेली ती तजवीज आहे आणि पूर्णतः कायदेशीर आहे. त्याच पोस्टी वरून हेही सिद्ध होते की हे सामने फिक्स नाहीत. कसे ते सांगतो. त्या पोस्टीनुसार बाद फेरीत सर्वोत्तम संघ यावेत अशी रचना केली गेली आहे. रँकिंगनुसार ब गटातून भारत, इंग्लंड, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ पुढे यावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आयर्लंड, नेदर्लंड आणि बांग्लादेश हे सारे देश या नामांकित संघाबरोबर सारे सामने हरावेत अशी फिक्सिंग केली गेली पाहिजे होती. पण तसे झालेले नाही. आयर्लंड एक सामना जिंकला, नेदर्लंड जवळ्पास एक सामना जिंकला होता, बांग्लावाल्यांनी सुद्धा जवळपास आपल्याला हरवले होते. थोडक्यात ब गटात बहुतेक चौथा संघ नेट रन रेटच्या आधारावर जाईल. सामने फिक्स केले असते तर फिक्सर्स नी इतकी मोठी रिस्क घेतली नसती.
मी सांगतोय कि मॅच फिक्स नाहीय कारण अजूनही कुठलेही पुरावे समोर आले नाहीत (तुम्ही ही ते दिले नाहीत अजून). मॅच फिक्सिंग पकडण्यासाठी आय सी सी ने एक्स्पर्ट्स नेमलेले आहेत. त्यांचा रिपोर्ट येऊ द्या
खालील पॅरा तुमच्या योगायोगाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा माझा शेवटचा प्रयत्न. यशस्स्वी झाला तर ठीक नाहीतर यापुढे तुम्ही मॅचेस फिक्स आहेत असं समजून पहा (पण फिक्स असतील तर पाहता का हे मला न सुटलेले कोडे) आणि आम्ही त्या फिक्स नाहीत असं समजून पाहू.
>>> तुम्च्या आनंदावर का बरे विरजण पडते ? तुम्हि पहा कि बिनधास्त ! नितांत श्रद्धा असेल तर कसे विरजण पडेल ?
त्याचं कसं आहे की तुमच्या आवडत्या गोष्टीबद्दल कोणी काही वाईट बोललं की वाईट हे वाटतच. खासकरून कोणतेही पुरावे न देता बोललं तर अजूनच वाईट वाटतं. पुरावे देऊन बोलला असता तरीही वाईट वाटलं असतं, पण कडू सत्य म्हणून ते स्वीकारलंही असतं
>>मला तर गम्मत वाटते. सर्व समोर दिसत असुनही डोळेझाक कशी केली जाते ?. शेवटच्या चेडुवर रन घेण्यासाठी न पळणे, पहिल्या ओव्हरमध्ये ३ झेल देणे हा योगायोग असुच शकत नाहि.
पहिल्या ओव्हरमध्ये झेल देणारा सेहवाग होता. त्याच्या बॅटिंगबद्दल नव्याने सांगण्यासारखे काहीच नाहीय. मनात आणलं तर ६ चेंडूवर ६ षटकार मारेल आणि पुढच्याच चेंडूवर बाद होईल.
त्या चेंडूवर २ रन नव्हतेच. त्या चेंडूवर दुसरा रन घेतला असता तर ९९% धावचित झाले असते. त्यांनी धावायला पाहिजे होते हे आपल्याला आपल्या दिवाणखान्यात बसून आरामात मॅच बघताना समजते पण शेवटच्या चेंडूवर रन घेण्यासाठी न पळणारे कसलेले बॅट्समन नव्हते तर ते इंग्लंडचं शेपूट होतं. त्या वातावरणामुळे असलेल्या दबावामुळे त्यांनी विचारच केला नसेल दुसरा रन घेण्याचा.
आता याला तुम्ही डोळेझाक म्हणत असाल तर मान्य आहे मला. माझ्यातर्फे मॅच फिक्सिंगवरची ही शेवटची पोस्ट. यापुढे केवळ मॅचबद्दल वा मॅचच्या पोस्ट अॅनालिसेस बद्दल पोस्टी येती.
प्रवीणपा तुमच्यासारखे लोक
प्रवीणपा तुमच्यासारखे लोक आहेत म्हनुणच तर इतके पैसे लावले जातात आजकाल.!
परंतू एखाद्या संघातील ११ च्या ११ खेळाडूंना विकत घेऊन >>
अहो कोण म्हणते कि अकरा च्या अकरा विकत घ्यवे लागतात ?
कारणं भारत स्वतःहून तर हरणार नव्हता ? >> का बरे ?
तुम्हा आम्हासारख्यांचे काळजाचे ठोके मॅच बघताना चुकतात तर ती मॅच खेळणार्यांचे काय हाल होत असतील याचा जरासा विचार करा. >>>
ते दिसततेच कि त्यांच्या चेहेर्यावरुन.
पुराव्यांशिवाय गळा काढून ओरडून आमच्या सारख्या क्रिकेटवर नितांत श्रद्धा असलेल्या प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पाडू नये ही विनंती >>>>
तुम्च्या आनंदावर का बरे विरजण पडते ? तुम्हि पहा कि बिनधास्त ! नितांत श्रद्धा असेल तर कसे विरजण पडेल ?
मला तर गम्मत वाटते. सर्व समोर दिसत असुनही डोळेझाक कशी केली जाते ?. शेवटच्या चेडुवर रन घेण्यासाठी न पळणे, पहिल्या ओव्हरमध्ये ३ झेल देणे हा योगायोग असुच शकत नाहि>>>
मी या पोस्टशी भयानक भीतीदायकरीत्या अचाट अतर्क्य बेफाम भयंकर आणि वाईट सहमत आहे.
रँकिंगनुसार ब गटातून भारत,
रँकिंगनुसार ब गटातून भारत, इंग्लंड, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ पुढे यावेत अशी अपेक्षा आहे>>किंवा दुसर्या शब्दांमधे ICC believes 2007 upsets were abrasion and given enough number of matches between same teams, results will be in favor of one team (without any external actor). हा common sense चा भाग आहे (रत्नाकर शेट्टी हे नाव त्या बद्दल फारसे नावाजालेले नाहिये हे कोणीही मान्य करेल)
शेवटच्या चेडुवर रन घेण्यासाठी न पळणे, पहिल्या ओव्हरमध्ये ३ झेल देणे हा योगायोग असुच शकत नाहि.>> योगायोग असू शकत नाहि हे बरोबर पण ह्या दोन्ही उदाहरणांमधे (किंवा मॅच tie करण्यामधे) दोन्ही संघ बसतात तेंव्हा २२ जणांचे fixing करणे कितपत शक्य आहे हा तारतम्याचा विचार ज्याने त्यानेच करावा.
admin ला विनंती....विश्वचषक
admin ला विनंती....विश्वचषक क्रिकेट - २०११ आणि मॅच फ़िक्सिंग असा दुसरा धागा सुरु करुन हे सगळे प्रतिसाद तिकडे हलवावेत. आणि इथे फ़क्त विश्वचषक क्रिकेट - २०११ मधल्या केवळ मॅचबद्दल वा मॅचच्या पोस्ट अॅनालिसेस बद्दल पोस्टी याव्यात....
<< २०११ आणि मॅच फ़िक्सिंग असा
<< २०११ आणि मॅच फ़िक्सिंग असा दुसरा धागा सुरु करुन हे सगळे प्रतिसाद तिकडे हलवावेत. >> अनुमोदन !
नाही तर असं केलं तर- बाद फेरीपूर्वी इथले फिक्सींगवाले वि. फिक्सींगनाकारू असा एक सामनाच होऊन जाउदे [फिक्सींग न करता !]; हरतील त्यानी इथून गायब व्हायचं !!!
बिचारे खेळाडू..! कशाला सराव
बिचारे खेळाडू..!
कशाला सराव करताहेत कोणजाणे..?
उन्हा-तान्हात किंवा लखलखत्या वीज प्रकाशात घाम गाळून, दुखापती करून घेण्यापेक्षा खरेतर निवृत्त होवून वातानुकूलीत बॉक्समध्ये बसून कोणी कसे खेळावे हे सांगणे अधिक सोयीस्कर नाही का?
admin ला विनंती....विश्वचषक
admin ला विनंती....विश्वचषक क्रिकेट - २०११ आणि मॅच फ़िक्सिंग असा दुसरा धागा सुरु करुन हे सगळे प्रतिसाद तिकडे हलवावेत >>>>
अजिबात सहमत नाहि. विश्वचषक क्रिकेट - २०११ = मॅच फ़िक्सिंग माझ्या मते.
आधी म्हणले आहेच मी - माझ्या पोस्ट पटत नस्तील तर वाचु नका. पण तुम्हाला त्या खुपत आहे ह्या वरुनच सर्व काहि आले.
मी सांगतोय कि मॅच फिक्स नाहीय कारण अजूनही कुठलेही पुरावे समोर आले नाहीत (तुम्ही ही ते दिले नाहीत अजून). मॅच फिक्सिंग पकडण्यासाठी आय सी सी ने एक्स्पर्ट्स नेमलेले आहेत. त्यांचा रिपोर्ट येऊ द्या >>>
प्रवीणपा तुम्हि फार मोठा विनोद करत आहात. अहो असे उघ्ड उघड पुरावे असतात का हो, चोरि, दरोडे यात ? मी देलिएली लिंक वाचा जरा आधी.
त्या चेंडूवर २ रन नव्हतेच. त्या चेंडूवर दुसरा रन घेतला असता तर ९९% धावचित झाले असते >>>
तुम्हि मैच पाहिली का नीट ? अहो आपल्या फलंदाजीच्या वेळेस गोलंदाजाच्या हातात चेंडु असताना पळुन आपले शेवटचे बहाद्दर पळाले होते - तेहि शेवेटची विकेट असताना आणी एक बोल शिल्लक असताना. आणी हे महाशय शेवेटच्या चेडुवर जि़कण्यासाठी देखील पळाले नाहित.म्हणुनच मी म्हणले ढळ्ढ्ळित सत्य समोर दिसत असुनही अंधश्र्द्धा !
बिचारे खेळाडू..! कशाला सराव
बिचारे खेळाडू..!
कशाला सराव करताहेत कोणजाणे..>>>
आणी हे महाशय शेवेटच्या चेडुवर जि़कण्यासाठी देखील पळाले नाहित>>> सहमत!
=========================================================
असो, मॅच फिक्सिंगच्या विषयाने हा धागा जर डायल्यूट किंवा अशुद्ध होणार असेल तर ही चर्चा थांबलेली बरी!
(तरी मला असे वाटते की फिक्सिंग हा सामन्यांबाबतच्या चर्चेचाच भाग असणार ना?)
मॅच फिक्सिंगच्या विषयाने हा
मॅच फिक्सिंगच्या विषयाने हा धागा जर डायल्यूट किंवा अशुद्ध होणार असेल तर ही चर्चा थांबलेली बरी! >>>
डायल्यूट होत आहे कारण चर्चा होत नाहिये. काहिच समजुन न घेता फक्त फिक्सिंग होत नाहि एवढेच धरुन बसायचे तर त्याला काय अर्थ ?
फुटबोल (worldcup) \, विंबल्डन मधेही आजकाल फिक्सिंग होते. तर इथे होणरच ना. फिक्सिंग हा सामन्यांबाबतच्या चर्चेचाच भाग असणार आणी असायला हवा. त्यात काय घाबरायचे चर्चा करायला.
अहो तिकडे मैच फिक्स होत आहेत तेव्हा अशुद्ध नाहि का होत ? धागा कसला अशुद्ध व्हायचा !
Pages