विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळू जोशी, मलाही नेहरूचे हसू आले होते. पण नंतर असे वाटले की खरच नेहरू असते तर नेहराला टाळून यांनी नेहरूंनाही घेतले असते.

समालोचनः

समालोचनासाठी रवी शास्त्री, अरुणलाल, टीव्हीवर्ल तिसरा पंच स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी सुनील वासन वगैरे पब्लिकला घेणे (सिद्धूही आलाच ) ही आपण आपल्याच संघाची उडवलेली थट्टा आहे असे वाटते.

मांजरेकर नावाच्या महान गृहस्थाने काहीतरी बरळून स्वतःची बुद्धीमत्ता दाखवली होती. याला जेव्हा खेळवले तेव्हा काही शतके ठोकण्याव्यतिरिक्त त्याने काहीही केले नाही. तो मॅचविनर तर नाहीच नाही.

रवी शास्त्री - या माणसाला ऑडी मिळाली तेव्हा त्याने अत्यंत सुमार फलंदाजी केलेली होती. व्हिव्ह रिचर्ड्सने तर याला इतक वाईट धुतलेला होता की तो गोलंदाज आहे असेही वाटत नव्ह्ते. आता ते बसून मोठमोठी वाक्ये टाकतात.

श्रीकांतल नेहमीच 'पहिल्या दहा ओव्हर्समध्ये फास्ट खेळण्याचा' ट्रेन्ड आणणारा फलंदाज म्हणून पाहिले जाते. ऑस्ट्रेलियातील रॉथमन्स चषक जिंकण्यात त्याचा मोठा वाटा होता हे खरे! पण नीट आठवून पाहिले तर श्रीकांत हा अत्यंत बेभरवशाचा फलंदाज होता. तो बाद झाला तर उगचच टेन्शन वगैरे यायचे.

ऑडी आणि रिचर्ड्सने शास्त्रीला बडवणे या भिन्न सामन्यंमधील बाबी आहेत.

४५ व्या ओव्हरपासुन कोहली व खालच्या सर्व लोकांनी फोर व सिक्सच मारायची जी चुकलेली धडपड केली फक्त त्यामुळे आपण कालची मॅच हारलो.

साहेब व स्ट्रॉस अप्रतिम. झहीरने शेवटी काढलेल्या २ विकेटमुळे मॅच फिरली नाहीतर भयंकर हारलो असतो आपण.

इंग्लंड वर्ल्ड कप जिंकण्याचे ऑड्स या सामन्यापूर्वी ९/१ होते. म्हणजे £1 लावला तर £10 मिळणार. ते या मॅच नंतर एकदम ७/१ झाले. द. आफ्रिका ४/१ आणि भारत ११/४. भारत अजून फेवरिट आहे, पण माझा अजूनही द. आफ्रिकाच घोडा आहे केवळ आपल्या सुमार बॉलिंग/फिल्डिंग मुळे... काल प्रचिती आलीच असेल सगळ्यांना! Wink

http://www.williamhill.com/en/nui/free-bet/

<< पाकिस्त्नान संघातल्या काही खेळाडूंनीच ह्या सामन्यासाठी बांगलाच्या बाजूने बेटिंग केले होते व नंतर जाणीवपूर्वक सामना हरून भरपूर धन कमावले. >> मास्तुरेजी, खरंय तुमचं. मी "जवळ जवळ अशक्यप्राय " त्याचकरता म्हटल होतं. पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला नको असलेला प्रतिस्पर्धी जर आपण एखादी मॅच विशिष्ठ संघाबरोबर हरलो तर आयताच बाद होईल, या हेतूनेही सोईस्करपणे हरणं कांही अगदीच दुर्मिळ नाही !

कालच्या मॅच बद्दल एक भा.प्र. शेवटच्या बॉलला आउट न होण्याच्या उद्देश्याने एक च रन काढून इंग्लंडने काय साधले..?? दुसर्‍या रनासाठी पळाले असते तर जास्तीत जास्त आउट झाले असते आणि तरीही एक रन काढून मॅच ड्रॉ झाली च असतीना? ..straussला lbw असताना का आउट दिला नाही?
कृपया जाणकारांनी शंकांचे निरसन करावे

>>स्ट्रॉस एकदा १३ वर असताना व एकदा १११ वर असताना झहीरच्याच गोलंदाजीवर बाद झाला होता. स्ट्रॉसच्या बॅटला लागून चेंडू धोनीकडे गेला. मैदानावरच्या सर्वांनी, कॉमेंटेटरनीसुध्दा बॅटकटचा मोठा आवाज ऐकला. तरी सुध्दा धोनी व झहीरने अपील केले नाही. अपील केले असते तर त्याचक्षणी स्ट्रॉस बाद झाला असता. एकंदरीत काहीतरी गडबड दिसतेय.>>

हो, अगदी...! तो कटचा आवाज चांगलाच जाणवण्याइतका मोठा होता. पण रांचीकर ढिम्म होते! Sad

netherland ani england....match fix hoti...?.shetavchya 10 over madhe leg side la ek hi nhavta sagale 30 yard chya baher hote...tya mule calingwood ne 1-2 runs kadhun samna england chya bajune kela..n netherland ne 290 kelya ne bookinna bhav pan changla milale la asel...

karan itakya runs leg side la jar kadhat hote tevha GALLI CHYA pora ne suddha run adavnya sathi 1 tari thevlach asata...pan netherland ne ek hi thevla nahi...

मॅच फिक्सिंग..........पुन्हा?

सचिन तेंडूलकर निवृत्त झाल्यावर मी क्रिकेट बघणंच सोडून देणार आहे. मरुदे साल्यांना.

मैदानात प्रेक्षकांच्या आवाजात खेळाडूंना कटचा आवाज ऐकू न येणे शक्य होते, असे सुद्धा हे समालोचकच म्हणत होते. त्यांना (आणि आपल्याला) स्टंप माइकचा फायदा होता.(तरी पण फुकटचे अपील करायला काय जात होतं?)

वॉर्नने मॅच खरंच टाय झाल्यावर आता मला लॉटरीचे तिकिट काढून बघितले पाहिजे असे म्हटलेय.

इंग्लंडातल्या लोकांना वर्ल्ड कपच अजिबातच कौतुक नाही. बर्‍याच जणांना वर्ल्ड कप सुरू झाला आहे हे पण माहिती नाही. पेपरच्या खेळ पुरवणीत १० पैकी १ पान क्रिकेटच्या वाट्याला असतं! नाही तर आपल्याकडे.. २००३ च्या वर्ल्ड कपच्या वेळेला आमच्या कंपनीत आलेल्या अमेरिकन गोर्‍याला पण माहीत झालं होतं.

>>हे अत्यंत अनाकलनीय आहे. स्ट्रॉस एकदा १३ वर असताना व एकदा १११ वर असताना झहीरच्याच गोलंदाजीवर बाद झाला होता. स्ट्रॉसच्या बॅटला लागून चेंडू धोनीकडे गेला. मैदानावरच्या सर्वांनी, कॉमेंटेटरनीसुध्दा बॅटकटचा मोठा आवाज ऐकला. तरी सुध्दा धोनी व झहीरने अपील केले नाही. अपील केले असते तर त्याचक्षणी स्ट्रॉस बाद झाला असता. एकंदरीत काहीतरी गडबड दिसतेय.

http://www.indianexpress.com/news/strauss-edged-it-twice-but-indians-did...>>

मी आत्ता परत सामन्याचं रेकॉर्डींग बघितलं:
तिसर्‍या षटकाचा शेवटचा चेंडू, स्ट्रॉस १७ वर, ईं. २३ वर.
झहीर ने चेंडू टाकल्यावर स्ट्रॉस पुढे येवून मारायला जातो... "कट" चा मोठा आवाज येवून चेंडू धोणीकडे जातो. चेंडूची दीशा कट लागल्यावर व्यवस्थित बदललेली आहे.. आधी middle leg कडे जाणारा चेंडू धोणी कलेक्ट करतो तोच मुळी उजव्या यष्टीच्या (स्ट्रॉस ची ऊजवी यष्टी) २ स्टंप्स बाहेर!!! अख्खे स्टेडीयम जवळ जवळ आउट झाल्याचा जल्लोश करते-- पण झहीर आणि धोणी अपिल करत नाहीत.
समालोचकः सन्नी/शास्त्री: it is clear nick.. lets have second look.. definitely big sound.. there is big noise is stadium so prehaps dhoni didn;t pick up the sound.. action reply shows big nick and deviation of ball..
अरे पण मला हा प्रश्ण पडतो की एव्हडॅ थेट डेव्हियेशन असताना भले धोणीला आवाज ऐकू आला नसेल तरी किमान अपिल करायला काय हरकत होती? लक्षात घ्या- स्ट्रॉस ने बाहेर येवून चेंडू मारायचा प्रयत्न केलाय, क्रिज मध्ये ऊभे राहून नाही.. आणि तरिही थेट डेव्हियेशन असताना किमान एकाने तरी अपिल करायला नको? कळस म्हणजे ज्या हाईट वर चेंडू होता आणी बॅट बोल मधिल जे अंतर आहे त्यानुसार बॉल पॅद सोडा, ग्लोव नाही, पॅड नाही, बॅटलाच लागू शकत होता..
कळस म्हणजे त्याननंतर झहीर हिंदी मध्ये काहितरी हसून बोलतो ते स्ट्रॉस ने चक्क समजल्यासारखे "जाऊ दे रे" वगैरे असे हावभाव दाखवले आहेत...
जे के काही आहे ते "अनाकलनीय" आहे....

भयंकर!

अशा वेळी निदान विरू ने गोलंदाजी करायला हवीच होती. >> त्याचा खांदा दुखावलाय म्हणून तो टाकत नाहि असे preview मधे सांगितले होते.

आइशप्पथ!
३१.२ षटके-- थोडक्यात ३२ व्या षटकाचा दुसरा चेंडू. स्ट्रॉस १११ वर्‍
स्ट्रॉस पुन्हा एकदा झहीर चा चेंडू कट करायला बघतो क्रिज मध्येच उभे राहून. चेंडू स्ट्रॉस च्या ऊजव्या यष्टीच्या रोखाने आहे.. कट मिस झाल्यावर, धोणी चेंडू कलेक्ट करतो तो जवळ जवळ स्ट्रॉस च्या मध्य/डाव्या यष्टीच्या मागे... धोणी परत तीच लूक देतोय जी स्ट्रॉस १७ वर असताना कट लागल्यावर दिली होती... अपिल करू की नको???
कमाल आहे... धोणी बहिरा असला तरी आंधळा पण आहे का??? स्लिप मधे सेहवाग देखिल बहिरा/आंधळा आहे काय?
आणि सर्वात कळसः सन्निभाय समालोचकः this is big nick.. and sachin at midwicket going up in the appeal.. yuvi half hearted at short leg.. but dhoni/jhahir not appealing...
two balls later english commentrator: what is dhoni doing? easy singles, no close fielders, no points, nothing... no slip,
एक गोष्ट लक्षात येते दोन्ही प्रकरणात झहीर अज्जिबात अपिल करत नाहीये.. धोणी विचारात आहे पण झहीर अपिल करत नसल्याने बहुदा करत नाहीये????
कितीही तर्क लावले तरी हे "झेपत" नाहीये... काल सामना बघताना जाणवले नव्हते आज सामना बरोबरीत सुटल्यावर या गोष्टी भयानक खटकतायत. काय चाललय काय?
--------------------------------------------------------------------------------
एव्हडे सर्व असले तरी शेवटच्या षटकात सिक्सर मारायला लागेल अशा प्रकारे सामना "स्पॉट" फिक्स करणे जरा अशक्यच वाटते... पण there are clearly obvious questions and some things not making sense at all.........

योग... हे फारच भन्नाट आहे... जोरदार शंका येते की ह्या प्रकारामुळे मॅच फिक्सिंगची...

योग्या, अरे तू शीण नको करून घेऊस उगीच! सगळं फिक्स असेल तर नक्कीच मिळेल आपल्याला वर्ल्ड कप! मागच्या वेळेप्रमाणे वर्ल्ड कप मधून आपण लवकर बाहेर पडणार नाही हे पण आयसीसीच्या लेव्हलला फिक्स झालंय तर यात काय अवघड आहे? Wink

हे पण आयसीसीच्या लेव्हलला फिक्स झालंय तर यात काय अवघड आहे? >>> चिमण्या तुझा 'फिक्स्ड' कप तुलाच मुबारक Angry वर्ल्ड कप सारख्या सर्वोत्तकृष्ट थरावरील खेळात या गोष्टींना थारा असू नये... तरी पण Sad

अगदी अगदी कृषिमम्त्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कारकिर्दीत "कप" आणण्यासाठी साहेब स्वतःच जातीने " लक्ष पुरवताहेत दिसतय डोळा मारा

कट मिस झाल्यावर, धोणी चेंडू कलेकट करतो तो जवळ जवळ स्टॉर च्या मध्य/डाव्या यष्टीच्या मागे... धोणी परत तीच लूक देतोय जी स्ट्रॉस १७ वर असताना कट लागल्यावर दिली होती... अपिल करू की नको???>>>

हा प्रश्न मलाही पडत होता... दोन दा एज लागूनही साधं अपील सुध्धा नाही !!! टीव्ही वर तर ऐकू येत होते... व्यवस्थित!!

म्याच फिक्सिंग असेल असे आजिबात म्हणत नाही... पण दोन्ही एज दोघा दोघांच्या कानातून मिस होतात म्हणजे अवघड आहे...

सध्या जाहिरात तर जोरात चालू आहे.. Cricket is clean ची... सगळे आधीचे विनींग कॅप्टनना घेऊन केलीये जाहिरात..

>> हे पण आयसीसीच्या लेव्हलला फिक्स झालंय तर यात काय अवघड आहे? >> चिमण्या तुझा 'फिक्स्ड' कप तुलाच मुबारक

अरे इण्द्रा, हे वाच, त्यात स्पष्ट कबुली दिली आहे की भारत लवकर बाहेर पडू नये अशा रीतिनेच सुरुवातीच्या राऊंड्सची रचना केली आहे. -- http://www.rediff.com/cricket/report/world-cup-2011-ratnakar-shetty-fixt...

.

>>योग्या, अरे तू शीण नको करून घेऊस उगीच! सगळं फिक्स असेल तर नक्कीच मिळेल आपल्याला वर्ल्ड कप! मागच्या वेळेप्रमाणे वर्ल्ड कप मधून आपण लवकर बाहेर पडणार नाही हे पण आयसीसीच्या लेव्हलला फिक्स झालंय तर यात काय अवघड आहे?

छे! मी कशाला शीण करून घेवू... फायनल मुंबईला ठेवलीये.. आत्ताच सर्व तिकीटे विकली गेली आहेत (वेबसाईट क्रॅश वगैरे निव्वळ फार्स वाटतो..) यावरूनच काय ते समजावे. अर्थातच फॉर्मॅट असा ठेवलाय की आपला संघ कमीत कमी सेमि फायनल ला जाईल.. मला तर दाट शंका आहे ही सेमि मध्ये ऑसी वि. ईं. आणि भारत वि. आफ्रिका यावे असे सेटींग आहे.. फायनल आपण आणि कांगारू.

लंका, पाक फिक्स्ड वाटली नाही पण काही गोष्टि त्याही सामन्यात खटकल्याच.. सर्व सामने रेकॉर्ड करून ठेवलेत सावकाश पुन्हा बघितल्यावर मुद्दामून काही अनाकलनीय गोष्टि दिसतात का यावर नजर ठेवली तर कदाचित एक दोन गोष्टी नजरेत येतील देखिल.. असो. तेव्हडा वेळ या लोकांवर घालवायला माझ्याकडे वेळ नाहीये.. कालचा सामना अगदीच "सी सॉ" टाईप झाला म्हणून आश्चर्य वाटले आणि शंकेच्या पाली चुकचुकल्या..
------------------------------------------------------------------------------
सनी, गांगुली वगैरे नी कालच्या सामन्यावर काही खास भाष्य केले का बघायला हवे.

हर्षा भोगले गेली अनेक वर्षे पाट्या टाकून आता समालोचक झाला आहे.. (होता है. कॅतरीना कैफ अभिनेत्री झाले तसेच हेही!) मराठी माणूस आहे, तेव्हा माफ Happy बाकी त्याच्या कॉमेंट्स फारश्या मनावर घेवू नयेत.

मी तुम्हाला किती तरी दिवसा पासून सांगतोय की कप आपण जिंकणार आहोत हे फिक्स आहे. बाकीच्यांना आम्ही करमणूकी साठी बोलावले आहे. झाली की नाही करमणूक सगळ्यांची रविवारी. (माझी नाही कारण त्याच वेळेस नेमका प्रवासात). हो पण हे फिक्सिंग बुकीज चे नाही. आम्ही आमच्या कर्तृत्वानी कप जिंकणार आहोत आधिच सांगतोय. योगजी उगाच शंका घेउ नका. आम्ही दर मॅचला ३२५+ काढणारच. Happy जय हो.

लोकसत्तेत रोज वर्ल्ड कप साठी विशेष पुरवणी आहे. द्वा.सं., अतुल परचुरे, विनायक दळवी वगैरे काही जाणकार, हौशी, कधी इतर क्षेत्रातली वलयांकित मंडळी वगैरे लिहितायत या पुरवणीत. 'क्रिकेट झिंग' नाव आहे पुरवणीचं.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layou...

ही १ मार्चची आहे.

Pages