विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्तापर्यंतच्या सगळ्या मॅचेस मधे धावांचा पाऊस पडला आहे (केनियाची मॅच हा अपवाद.. !) सगळ्या विकेट्स अश्याच खूप रन्स देणार्‍या असल्या तर कदाचित या वर्ल्डकप मधे सगळ्यात जास्त धावांचं रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे... !
खत्रू, किलर बॉलिंग बघायला मिळणार की नाही या विकेटसवर ?!
काय अंदाज तुमचा? Happy

<< खत्रू, किलर बॉलिंग बघायला मिळणार की नाही या विकेटसवर ?! >> शक्यता कमी पण मिळालीच तर फिरकी गोलंदाजांकडून व तीही लेगस्पीनर्सकडूनच !

matchfix.JPG

मस्त भाऊ .. Happy

Lol

ऐकला. तरी सुध्दा धोनी व झहीरने अपील केले नाही. अपील केले असते तर त्याचक्षणी स्ट्रॉस बाद झाला असता. एकंदरीत काहीतरी गडबड दिसतेय.>>
--- मॅचचा निकाल आधी ठरवलेला होता... असे वाटायला बरिच जागा आहे. Sad

त्या मटावरील सो कॉल्ड क्रिकेट "जाणकारांचे" रकाने अगदीच महान आहेत.... Sad
किमान विनायक दळवी सारख्या "जाणकाराकडून" तिसरा पंचही चुकला वगैरे शब्दप्रयोगाची अपेक्षा नव्हती. असो. क्रिकेट हा सार्वजनिक चर्चेचा विषय आहे तेव्हा एकापेक्षा एक Happy

रार,
खत्रू, किलर, गोलंदाजी आशिया ऊपखंडात रणजी मध्येही पहायला मिळत नाही, विश्वचषक दूरची गोष्ट आहे! आणि विशचषकात हा असा धोंडा स्वताच्या पायावर आपण मारून घेणार नाही याबद्दल शाहरूख च ही दूमत नसावं Happy

डीजे,
जुन्या बातम्या... Happy

भाऊ,
लयी ब्येश... Happy

त्या मटावरील सो कॉल्ड क्रिकेट "जाणकारांचे" रकाने अगदीच महान आहेत..
>> Lol हो, तिथे अतुल परचुरे वगैरे लोक पाहून (आणि 'क्रिकेट जिंकले' वगैरे काहीतरी लिखाण पाहून) ते पान लगेच बंद करून टाकले.

भाऊ, कार्टून मस्त Happy

>>> धोनीनी तोडलेले तारे वाचलेत की नाही आज..

मला असं वाटतं की धोनीला संघातले वरिष्ठ खेळाडू (सचिन, सेहवाग, युवराज, गांगुली, द्रविड इ.) कायम थ्रेट वाटत आले आहेत. त्याला कदाचित असे वाटत असेल की आपली कामगिरी जरा खालावली की आपली कप्तानकी जाईल व वरिष्ठ खेळाडूंपैकी कोणतरी कप्तान होईल. धोनीचे यष्टीरक्षण अ‍ॅव्हरेज दर्जाचे आहे. तो सरळ हातात आलेले झेल घेतो. डावीकडे किंवा उजवीकडे झेप टाकून झेल घेताना तो क्वचितच दिसतो. निव्वळ यष्टीरक्षक म्हणून तो फार काळ संघात टिकू शकणार नाही. अशा परिस्थितीत यष्टीरक्षण फार चांगले नसूनसुध्दा तो कप्तान म्हणून संघात राहू शकतो. पण कप्तानकी खराब केली तर कोणीतरी वरीष्ठ खेळाडू लगेच त्याची जागा घेईल. म्हणून एकंदरीत वरिष्ठ खेळाडूंना तो संघात घ्यायला तो नाखूष असतो. २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या संघनिवडीच्या वेळी नक्कीच अशा प्रकारचे काहीतरी झाले होते. कारण त्यानंतर लगेचच सचिनने आपण टी-२० कधीच खेळणार नाही असे जाहीर केले होते व त्यापाठोपाठ गांगुली व द्रविडने सुध्दा तसेच सांगितले होते.

संघातले वयस्कर खेळाडू चांगले क्षेत्ररक्षण करू शकत नाहीत असे त्याने काल सांगितले. त्याचा रोख नक्कीच सचिनवर असणार कारण सचिनला एक चौकार नीट अडवता आला नव्हता. पण इतर तरूण खेळाडूंनी तरी काय दिवे लावले? कोहलीने स्लिपमध्ये एक लोण्याचा गोळा खाली टाकला, भज्जीने एक झेल एका हाताने घ्यायचा अयशस्वी प्रयन्त केला, रैनाने सुध्दा शॉर्ट एक्स्ट्रॉ कव्हरवर उभा असताना एक सोपा फटका नीट न अडविल्यामुळे विनाकारण एक धाव गेली (भारताला विजयासाठी एकच धाव कमी पडली) आणि स्वत: धोनी व झहीरने स्ट्रॉस तब्बल दोन वेळा बाद असताना अपीलच केले नाही.

.

आता तर असा प्रश्न पडायला लागला आहे की हे कर्णधार आणि खेळाडू देशवासीयांना उत्तर द्यायला खरच जबाबदार असतात का?

समजा धोनीने म्हंटले असते की 'हा खेळ आहे, यावेळेस कुणी जिंकले नाही, मॅच टाय झाली' तर करणार काय कोण?

बिचार्‍यांनी ३३८ धावा केल्या की!

आता सतत जाहिराती, सतत क्रिकेट, त्यातच सट्टेबाजांचा ताण, प्रेक्षकांची हुल्लडबाजी, गोलंदाज क्षमतेचे नसणे, क्षेत्ररक्षण म्हणजे झोपडपट्टीत घुसलेला ससा पकडायला धावण्यासारखे असणे आणि हे सगळे करून आपल्यासारख्या रुक्ष देशात सामने ठेवणे (यांना जराही कधी न्युझीलंड वगैरे आठवत नाही का?) इतके घटक विरोधी असल्यावर हारणारच की बिचारे?

त्यात पुन्हा ज्यांनी हा खेळ निर्माण केला आणि ज्यांनी आपल्याला प्रत्यक्ष १५० वर्षे आणि अप्रत्यक्ष पुढची ६४ वर्षे लुटले त्या साहेबां समोर खेळायचे म्हणजे?

बिच्चारे!

<< त्याचा रोख नक्कीच सचिनवर असणार कारण सचिनला एक चौकार नीट अडवता आला नव्हता. >> सचिन बहुधा आऊटफिल्डमधे क्षेत्ररक्षण करतो व त्याचं धावणं, चेंडू अडवणं व फेंक आदर्शवत असते, हे वारंवार लक्षात येतं. त्याच्या या "कमिटमेंट"चं कौतुक ही समालोचनातली नित्याची बाब आहे. केवळ एखाद-दुसरा चेंडू अडवण्यात गडबड झाली याचा आधार घेऊन त्याच्यावर रोख ठेवून अशी टिपणी करणं खोडसाळपणाचा कळसच ! धोनी, तारे तोडताना खर्‍याच तार्‍याला हात घालशील तर तुझाच घात होईल रे बाबा !! Wink

मॅच फिक्स झालेली नाही. उगाच निष्कारण ओरडू नका. मॅच फिक्स झाली आहे अशी जरा जरी शंका तुमच्या दैवताला, ज्याला तुम्ही साहेब/गॉड असं काय काय म्हणता, त्याला, आली तर पहिली बोंब तो मारेल आणि एक क्षण देखील क्रिकेट मधे रहाणार नाही अशी मला खात्री आहे.

आता धोनीला स्ट्रॉसच्या बॅटची स्निक ऐकू आली नाही या बद्दल... ती तशी ऐकू न येण्याची खूपच शक्यता आहे. असं पूर्वीही घडलेलं आहे. गावसकरला इथे पूर्वी एका कॉमेंट्रीमधे त्याच्या १९७५च्या 'त्या' निवांत खेळाबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की 'मी त्या वेळेला पहिल्या बॉलला आउट होतो. माझा कॅच विकेटकीपरने घेतला होता. पण नो वन अपील्ड सो आय कंटिन्यूड प्लेयिंग'. ही कॉमेंट्री आणि गावसकरचं ते भाष्य मी स्वतः ऐकलेलं आहे. तेव्हा असं होऊ शकतं.

चिमणराव,
ऐकू न येण्याची शक्यता आहे तरिही चेंडूचं थेट डेव्हियेशन (तेही दोन वेळा) लपत नाही.. शिवाय मिडविकेट वर ऊभा असणारा सचिन अपिल करू पहातो पण किपर आणि स्लिप आणि गोलंदाज नाही हे जरा विचीत्र वाटतं.. आणि निव्वळ तर्कबुध्धीनुसार, अशा मह्त्वाच्या सामन्यात आणि स्ट्रॉस सारखा मह्त्वाचा फलंदाज असताना, अपिल न करायचं ठोस कारण मला तरी दिसत नाही- फार फार तर काय अपिल फेटाळलं गेलं असतं एव्हडच!
असो. बाकी यावर ईतर मुद्दे माझ्या आधीच्या पोस्टीत आहेत तेव्हा तूर्तास ईथेच थांबतो.
--------------------------------------------------------------------------------
तुमच्या ऊ.दा.. नुसार ऊद्याच स्ट्रॉस नेच कबूल केलं की मी देखिल दोन्ही वेळेला बाद होतो पण कुणी अपिलच नाही केलं.. तर मात्र घोळ होईल.. Happy

सामना नाही पण स्पॉट फिक्सिंग केले असेल तर साहेब्/सेहवाग ई. ना ते कळेल्/माहित असेल असे मानणे हेच चूक आहे. तुम्ही दुसरी गोलंदाजी करत असाल तर स्पॉT फिक्स करायला निव्वळ गोलंदाज आणि कप्तान पुरेसे आहेत- कारण क्षेत्ररक्षण कप्तान लावतो. गोलंदाजाने नेमकी (मुद्दामून) त्या अनुशंगाने गोलंदाजी केली नाही, तेही मोक्याच्या वेळी तर फलंदाज निश्चीतच मोकळे रान असलेल्या भागात मारून धावा करू शकतो! अशा वेळी हे स्पॉट फिक्सींग नसून, आमची गोलंदाजी प्लॅन नुसार झाली नाही ईतक्या साध्या शब्दात कप्तान सर्व शक्यता फेटाळून लावू शकतो. अगदी अलिकडे एका मालिकेत युनीस खान ने "सोडलेला झेल" स्पॉट फिक्सींग च्या कचाट्यात सापडला होता- झेल अगदी सरळ हातात होता पण जणू मुद्दामून टाकल्यासारखा होता.. अर्थातच प्रकरण मिटलं अन युनीस विश्वचषक खेळतोय.

"ऐन मोक्याच्या क्षणी" काय परिस्थिती आहे ते बघून नेमके काय फिक्स करायचे हे ठरवता येवू शकते- no big deal!!

मॅच फिक्स झाली आहे अशी जरा जरी शंका तुमच्या दैवताला, ज्याला तुम्ही साहेब/गॉड असं काय काय म्हणता, त्याला, आली तर पहिली बोंब तो मारेल आणि एक क्षण देखील क्रिकेट मधे रहाणार नाही अशी मला खात्री आहे>>>

हे पटलं नाही. अझर, जडेजा हे त्याच्या कारकीर्दीतच खेळत होते. कुठे सोडले त्याने क्रिकेट? हॅन्सी क्रोनिएने कबुली दिली, भले दुसर्‍या देशाचा असो पण भारताविरुद्ध खेळत होता, कुठे सोडले सचिनने क्रिकेट?

सचिन स्वतः स्वच्छ असला तरी फिक्सिंग होत असेल तर फार तर तो त्याबद्दल अवाक्षर काढणार नाही इतकेच, क्रिकेट सोडणार नाही. कारण सोडण्याचे कारण सांगावे लागेल आणि त्याचे प्रेशर भयंकर येईल.

चिमण व ईतर,
हे पहा अता खुद्द icc देखिल सतर्क आहे:
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/cricket-world-cup-2011...

लेखातील शेवटचे वाक्य बरेच काही सांगते: वॉर्न च्या जागी भारतीय वा पाक खेळाडूने तशी ट्विट केली असती तर ???
---------------------------------------------------------------------------------
फिक्सिंग चा, क्रिकेट मधिल देव, भगवान वगैरेंशी काही संबंध नाही.. आणि तरिही कृ. सचिन्/सेहवाग यांचे नाव यात चुकूनही घेतले जावू नये कुठल्याच संदर्भात!

बेफिकीर, तुझा पॉईंट पटतोय मला.

योग्या, जर एखादी मॅच टाय म्हणून फिक्स करायची असेल तर त्यासाठी किती काय काय लेव्हली करायला लागतील आणि खेळाडूंना त्यांना दिलेल्या रोल प्रमाणे अ‍ॅक्टिंग करावं लागेल, ते सुद्धा दोन्ही बाजूच्या, हे पहाता मला ती शक्यताच वाटत नाहीये.

चिमण,
किती वेळा तच दळण दळुयात? असो माझे आधीचे सर्व पोस्ट्स पहा:
विशेषत हे:

>>योग | 28 February, 2011 - 11:39
अर्थात "टाय" फिक्स करायचा तर फारच जद्दोजेहेद करावी लागेल ते अशक्य वाटते. पण तरिही जेव्हा यार्डी सारखा गोलंदाज निव्वळ फ्लॅट, न वळणारे, न ऊसळणारे low darts टाकतो, आणि तरिही ६ च्या गतीने निव्वळ धावा देतो अशा वेळी निदान विरू ने गोलंदाजी करायला हवीच होती. ते एक गूढ कायम आहेच!

परवची मॅच 'टाय' होण्यासाठी फिक्स करयची होती की 'भारताने नाट्यमय विजय मिळवण्यासाठी' हेही क्लीअर नाही आहे आणि फिक्स करायचीच होती का हेही!

बहुधा, 'जर फिक्स केलीच असेल तर', भारताना ड्रामॅटिक विजय मिळावा म्ह्णून केली असेल!

(मॅच फिक्सिंग अशक्य आहे असे वाटत नाही. दोन चार की प्लेअर्सनी जरी काही महत्वाच्या बाबी केल्या, जसे महत्वाचा कॅच सोडणे, रन आऊट न करणे, स्वतः बाद होणे, वगैरे, तरी सामन्याचा निकाल बदलू शकत असावा. असे वाटते.)

असो. एकंदरीत या वादातून काही निष्पन्न होणार नाही... तूर्तास आपल्या संघाने केलेल्या विशेषतः धोणी ने, अक्षम्य, अगम्य, चूका असे म्हणून पडदा टाकावा. ईतके वर्ष क्रिकेट खेळलेल्या आणि सध्ध्या क्र. २ वर असलेल्या संघाकडून ईतक्या सामान्य चुका अपेक्षित नाहीत. पुढील सामन्यात सुधारणा दिसतील अशी आशा करूयात. क्षेत्ररक्षण, रनिंग बिटविन विकेट, अचूक गोलंदाजी आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना संपलेला नसतो हे लक्षात ठेवून खेळणे, किमान एव्हडे केले तरी पुरे आहे. बाकी "संघसंतुलन" हे कोडे जितक्या लवकर सोडवले जाईल तितके बरे.
वैयक्तीक भारताने कप जिंकला किंवा नाही या पेक्षा ली/स्टेन/अख्तर्/आफ्रिदी/मुरली वि. साहेब आणि सेहवाग हा रोमहर्ष़क संघर्ष पहाणे मला अधिक आनंददायी आहे.. त्या दिवशी जे सवोत्कृष्ट खेळतील ते विजयी ठरतील हा या खेळाचा साधा नियम आहे. आपला संघ तो खेळ करू शकतो का एव्हडाच प्रश्ण आहे.
कागदावर ऊत्तर हो आहे, प्रत्त्यक्षात मात्र बर्‍याच गाळलेल्या जागा भरायच्या आहेत!

षटकार या संदीप पाटीलच्या पाक्षिकावर (?) एकदा हेडलाईन होती.

कपिलचे वाक्य होते ते!

"फलंदाज सामना वाचवतात, सामना जिंकून देतात ते गोलंदाजच "

गावसकर आणि रवी शास्त्री यांच्या स्तुतीला वाहून घेतलेल्या या पाक्षिकाची ही हेडलाईन आजही खरी ठरत आहे असे दिसते.

त्यावेळेस मात्र संदीप पाटीलने ही हेडलाईन कशी काय छापली काय माहीत? तेव्हा त्यचा संघात पुनरागमन करण्याचा मार्गच गावसकर व शास्त्री यांची स्तुती हा होता.

आणि कपिल आणि गावसकरचे जोरदार फाटलेही होते तेव्हा!

भारतीय मातीत व्यक्तीपूजक प्रजा निर्माण होते याचे उदाहरण म्हणजे 'सामना गेला तरी चालेल पण गावसकरचे शतक व्हायलाच पाहिजे' या साठी लोक बसून असायचे. तो बाद झाला कीजणू कर्तव्यच संपले भारताचे मैदानावरील! आपल्याला जर कपिल लाभला नसता तर आजही आपण फक्त 'सामना-वाचवू' पातळीचाच संघ राहिलो असतो असे काही वेळा वाटते. कपिलने विजयाची धुंदही दाखवली आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत हेही ठसवले.

मात्र आजही (परवाचाच इग्लंड भारत एक दिवसीय सामना) आपल्याला तेंडुलकरचे शतक झाले ही जमेची बाब वाटते. आपल्याला या शब्दाचा अर्थ एकंदर भारतीय प्रेक्षकाला असा कृपया घेतला जावा.

यातून बाहेर पडेपर्यंत इव्हन खेळाडुंनाही वाटणार नाही की जिंकायला हवे.

खरे आहे! अगदी ५० षटकाच्या सामन्यात देखिल हेच लागू होते.
सुरुवातीला गोलंदाजी असेल तर वि. संघाला कमीत कमी धावात रोखणे जेणेकरून पाठलाग शक्य ठरेल. दुसर्‍यांदा गोलंदाजी असेल तर धावसंख्येचा बचाव करणे. सर्व बाद झाले नाही तरि एकदिवसीय सामन्यात निकाल लागतो- अपवाद कालचा सामना Happy
आपली गोलंदाजी बघता आपल्या फलंदाजांनी कायम (दोन्ही परिस्थितीत, पाठलाग वा बचाव) ४०० चे लक्ष्य ठेवावे Happy

गावस्कर यायच्या आधी आपण सतत हरायचो. त्याने आणि वेंगसरकरने सततचे पराभव थांबवले. एक बाजू घट्ट झाल्यावर मग गोलंदाजी मध्ये आक्रमकता आणता आली. मग आपण जिंकायला लागलो. केवळ कपिल आल्यावर जिंकायला लागलो असे म्हणणे चुकीचे होईल. जिंकण्यासाठी तिन्ही क्षेत्रात तसेच कर्णधाराची सुद्धा कामगिरी चांगली व्हावी लागते हे साधे गणित आहे. ७१ ला वेस्ट इंडिज व इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट मधे (जी विजयांची सुरूवात होती) व नंतर ८३ आणि ८५ मध्ये हे सर्व झाले होते व त्यावेळेस वाडेकर, कपिल व गावस्कर असे वेगवेगळे कर्णधार होते. या चारही वेळेस कुठल्याच एका खेळाडूमुळे आपण जिंकलो असे म्हणता येणार नाही. आपला हा २०११ चा कप कुठल्याही एका खेळाडूचा न राहता सर्वांचा परफॉर्मन्स असलेला झाला तरच आपण जिंकू. व तशी लक्षण आहेत. Happy

धोनी फिल्डिंग बद्दल म्हणाला ते चूक नाही. त्याचा काहीतरी नक्की चांगला उद्देश असेल अशी आशा. पण धोनीच्या कॅप्टनशीप बद्दल जास्ती काळजी आहे. विशेषतः त्याच्या खेळांडू मधील पार्शालिटी बद्दल.

पण हे सगळे असले तरी मला अजून तरी नॉक आउट मधे हरण्याचा धोका दिसत नाही. Happy जय हो.

Pages