विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ASALE BOWLER GHEUN WORLD CUP JINKNAR....340 RUNS KADHUN PAN YANNA PURAT NASEL TAR KITI KADHAYCHYAA....FILDING SUMAR ZALI...PAR AABRU LUTALI GELI..

PUDHCHYA MATCHES PASUN DHONI NE EK KATAVE...TOSS JINKO KI HARO..BOWLING PRATHAMCH GHYAVI...SAMORCHYANNA PAHIJE TITAKE RUN KARUDYAVE MAG PATHLAG KARAVA..

KENIYA SUDDHA JINKLI ASATI JAR TICHE 340 ZALE ASATE...NETHERLAND TAR JINKLICH ASATI...

BAKICHI TEAM YANNAA AATA AAPLYA BOWLERS CHI MARYAADAA LAKSHAT AALI AAHE..

KUTHE DURBUDHHI SUCHALI DHONI LA JI TYANE CHAWALAA LA 49 OVER DILI..BALL OLLA HOTA N GRIP BHETAT NAVHATI..HE EVDE SADHE KASE VISARLE LOK...YUSUF OR YUVRAJ LA JAR DILI ASTI TAR CHITRA VEGLE ASATE..

SOME THINGS ARE JUST TO BE EXPERIENCED , you can not describe them . Watching today's game in Chinnaswamy was one such experience . Right from Our national anthem being sung by 40000 people together giving goosebumps .... to Sachin's hundred ... To awsome English reply ..to rivalry with Engilsh supporters ... to the thrilling Finish ... This will remain in memory for long long time !!!!

<< SOME THINGS ARE JUST TO BE EXPERIENCED >>,केदारजी, माझ्या मनातलं बोललात; भारत जिंकला तर दुधात साखर पण खरा आनंद असा अटीतटीचा सामना खेळायला/ पहायला मिळणं !
एक सहज मनात आलं - समजा इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून ३३८ धावा केल्या असत्या व सामन्याचा हाच निकाल लागला असता तर इंग्लंडच्या गोलंदाजीबद्दल व आपल्या फलंदाजीबद्दल असंच मतप्रदर्शन झालं असतं का ! Wink

भारत जिंकला तर दुधात साखर पण खरा आनंद असा अटीतटीचा सामना खेळायला/ पहायला मिळणं !
>>>

हे खरे असले तरी मला असे वाटते की कालचा सामना 'सहज जिंकण्याच्या' पात्रतेचा होता. क्षेत्ररक्षण व गोलंदाजी हे आपले ऐतिहासिक शत्रू आहेत / असावेत.

नशीब हा आपला एक ऐतिहासिक मित्र असावा असेही वाटते.

जमेची बाब इतकीच की कमकुवत संघासमोर काढल्या त्याप्रमाणे साहेबासमोरही आपण बर्‍याच धावा काढू शकलो.

(आपली इनिंग दुसरी असती तर? हारलो असततो या धावसंख्येवर?)

या बोलिंगच्या मदतीने वर्ल्डकप जिंकणे अवघड आहे.
>> आहे अवघड, खरंय! पण याच बोलींगने आजची मॅच टाय केली हेही विसरुन चालणार नाही. झहीरचा पॉवरप्लेमधला स्पेल भन्नाट. तसंच ऑस्ट्रेलियाविरुध्द सराव सामन्यात यांनीच कांगारुना गुंडाळलेल (ईंग्लंडपेक्षा बलवान फलंदाजी).

बॉलींग म्हणालतर ईंग्लंडचीपण फोडली, कदाचित विकेटच पाटा असल.

गाफीलता (दुसरी ईनिंग चालु होण्यानंतरची) भारताला नडली. पण बर झाल कि प्राथमिक फेरीतच झटका बसलाय. निदान पुढील मॅचतरी सुधारावेत.

so... it was just a matter of time that our weak bowling attack was exposed, and it came at the right time. ज्या प्रकारे आपले शेपूट खेळले होते, जणू काही ३००+ पण ईं ला भारी पडेल तो अगाऊपणा नडलाच. नाहितर ३५० व्हायला हव्या होत्या.
असो.. जर तर च्या गोष्टी. सामना खरं तर ईं ने जिंकायला हवा होता- बरोबरीत सुटला हे आपलं नशीब!
बांगला विरुध्ध ३७० असल्याने तो सामन आपण जिंकलो होतो अन्यथा बांगला फलंदाजांनीही अगदी आरामात पिसे काढली होती.
अजून बरेच सामने बाकी आहेत आणि गम्मत म्हणजे हे सर्व संघ पुन्हा एकेमेकाविरुध्ध ऊपांत्यपूर्व फेरीत खेळतीलच. फक्त भारताच्या गोलंदाजीविरुध्ध आता तमाम संघ "बिनधास्त" खेळतील.
मी आधिही म्हटले होते की आपण ५ गोलंदाज घेवूण खेळायला हवे. तूर्तास गंभीर्/युवी/पठान पैकी एकाला बसवावे लागेल- युवी फॉर्मात आलाय आणि गोलंदाजी करू शकतो, युसुफ ला बसवणे तोट्यचे ठरू शकते. कोहली ने चांगला फॉर्म दाखवलाय तेव्हा ५ गोलंदाज खेळवायचे तर नाईलाजाने गंभीर ला बसवावे लागेल. पुढील सर्व सामन्यांसाठी धोणी ला याचा विचार करावा लागेल. सचिन, सेहवाग, विराट यापिकी कुणीही खेळले तरी मग खाली कोण येवून मारतो याला विशेष महत्व रहात नाही..
कदाचित गंभीर ला बसवून रैना ला घेता यईल- तो गोलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षणातही ऊजवा आहे.

संघ संतुलन ही आपली मोठी डोकेदुखी आहे. वेळीच ऊपाय केला नाही तर ऑ, आफ्रिका, पाक यांविरुध्ध ही गोष्ट महागात पडणार. या मालिकेत फक्त ऑ आणि आफ्रिका हे दोघेच संतुलीत आणि बलवान संघ वाटतायत बाकी ईतर सर्व असंतुलीत आणि अन्प्रेडिक्टेबल वाटत आहेत..........
------------------------------------------------------------------------------
साहेबांचा नवा (जुना) अवतार एकदम झकास आहे...... मजा आ या!
काल विरु ने गोलंदाजी करयाला हवी होती. शांत डोक्याने निव्वळ टप्पा अन दिशा यावर लक्ष ठेवून गोलंदाजी केली असती तरी आपण जिंकू शकलो असतो. चावला ने जरा फाजिल वैविध्य प्रयत्न केले असे मला वाटते. जंबो म्हणला होता की विश्वचषक सामन्यात प्रयोग नकोत. मुनाफ हा सर्वसाधारणच गोलंदाज आहे-नेहरा/श्री पेक्षा थोडा बरा आहे ईतपत.. झहीर आणि भज्जी चालले नाहीत तर ३७५ देखिल वि. संघ पार करू शकतात...

तेव्हा जागो धोणी प्यारे!

असो.. जर तर च्या गोष्टी. सामना खरं तर ईं ने जिंकायला हवा होता- बरोबरीत सुटला हे आपलं नशीब!
<< Exactly... आपल्या पेक्षा हळहळ त्यांना वाटली असणार !

शेवटी काय भ्रमाचा भोपळा फूटला..
आता तरी जागे व्हा अन सुधरा.. आम्ही आहोतच तुमच्या बरोबर ... Happy

कोणी बरं इथे लिहिलं होतं : या वर्ल्डकप मधल्या मॅचेस कंटाळवाण्या आणि एकतर्फी होताहेत? कसोटी खेळणारा एक संघ आणि एक असोसिएट संघ यांच्यातले सामने कसे रंगले असते?
इयान बेलला पायचित न देणारा तिसरा अंपायर माझा मॅन ऑफ द मॅच.
भाऊ, झहीरला शेवटच्या ओव्हरसाठी शिल्लक ठेवण्याऐवजी आणखी विकेट घेण्याचा धोनीचा विचार असावा.

>>इयान बेलला पायचित न देणारा तिसरा अंपायर माझा मॅन ऑफ द मॅच.

तिसर्‍या अंपायरने नव्हे बिली नेच त्याला नाबाद ठरवले होते. सामना आपण हरलो असतो तर आज बिली च्या त्या निर्णयावर रकाने भरून वाहीले असते. UDRS ही दुधारी तलवार आहे.. मला वैयक्तीक ती सिस्टीमच आवडत नाही- निव्वळ धावचित साठी तिसरा पंच हे ठीक होते पण आता udrs चा वापर in the heat of the moment केल्यासारखा वाटतो. शिवाय निदान या बाबतीत तरी टेक्नॉलॉजी अजून १००% विश्वसनीय आहे असे म्हणता येणार नाही. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो "नेमका" कसा कुठल्या दिशेने जाणार आहे हे दर वेळी टेक्नॉलॉजी दाखवू शकेल असे वाटत नाही. ज्या वेळी चेंडू थेट यष्टीवर जाणार आहे (विशेषतः फलंदाज आपल्या क्रिज मध्ये ऊभा असेल किंवा चेंडू मागच्या पायाला लागल असेल) हे स्पष्ट असते तेव्हा बहुतांशी सर्व खेळाडू/जाणकार्/पंच यांना ते थेट कळतच असते. पण ईतर वेळी क्रिज च्या बाहेर ६ फूटापेक्षा अलिकडे टप्पा पडल्यावर तो चेंडू नेमका कसा कुठे किती ऊंचीवर जाईल हे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने प्रेडीक्ट करणे निव्वळ अतर्क्य वाटते. यात खेळपट्टीचा स्वभाव, चेंडूचा वेग, ऊसळी, टप्पा पडल्यानंतर चेंडूची दिशा या बर्‍याच dynamic गोष्टी गृहीत धरल्या जातात.- नेमके त्याच आधारावर (बेल जवळ जवळ ६ फूट क्रीज च्या बाहेर होता) बिली ने त्याला नाबाद ठरवले असे मला वाटते- जे योग्य आहे. पण मग ते योग्य आहे तर udrs ला एकंदरीतच अर्थ ऊरत नाही, एकतर पंचाने निर्णय द्यावा किंवा udrs ने.. पंचांनी udrs चा निर्णय फेटाळणे म्हणजे सेशन कोर्टाने उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळण्यासारखे आहे- there is clearly a problem in the working of the UDRS System.
जंबो, मुरली अशा गोलंदाजांनी खुद्दा याला विरोध केला आहे कारण टेक्नॉलॉजी अजून १००% भरवशाची नाही असेच त्यांचेही मत आहे.

मुनाफ ने शेवटच्या षटकात टाकलेल्या "त्या" चेंडूवर चेतन शर्मानेही षटकार मारला असता. Happy
भरवश्याच्या म्हशीला....
------------------------------------------------------------------------------
साहेब आणि विरू यांचे गोलंदाजीचे दुकान कायमचे बंद झाले आहे काय? "अनुभवाच्या" जोरावर हे दोघे केव्हाही अधिक इकॉनॉमिकल गोलंदाजी करू शकतात असे वाटते. साहेबांच्या "खांद्याचा" प्रॉब्लेम वाटत नाही कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षणाला ऊभे राहून थ्रो करत असतात... Sad

चावला अननुभवी आहे. त्याच्या ओव्हरमधील दोन षटकारांमुळे मॅच गेली असे म्हणणे सोपे असले तरीही प्रत्यक्षात सगळ्यांनी मिळूनच मॅच घालवली 'दुसर्‍या इनिंगमध्ये'!

तुम्हाला शेवटची पाच षटके टाकण्यासाठी दोन रेप्युटेड बोलर्स मिळत नाहीत?

सचिन!

हा प्रश्ण विचारल्याबद्दल बेफिकीर यांना एक गझल लिहीण्याची शीक्षा देण्यात यावी हुकुमावरून.. किंव्वा पर्याय म्हणून या बाफ वरील आधीची सर्व पोष्टी वाचून काढवीत, गृहपाठ म्हणून Happy

धोनीची एक गोष्ट फारच खटकते आहे.. तो माणूस कधीही दुसर्‍या खेळाडूंबरोबर चर्चा करुन पुढचा निर्णय घेताना दिसत नाही...

<< साहेब आणि विरू यांचे गोलंदाजीचे दुकान कायमचे बंद झाले आहे काय? >> मलाही खरं तर हेच कोडं पडलं आहे, विशेषतः साहेबांबद्दल. टिकलेली जोडी फोडायला साहेबाना मधेच लेगस्पीन टाकायला सांगण लाभदायक ठरूं शकतं.साहेब तयार नाहीत कीं धोनीला विश्वास नाही हें सांगणं कठीण. उंची देऊन चेंडू टाकल्याशिवाय चावला तर परिणामकारक ठरूंच शकत नाही - निदान स्पर्धेतल्या सरस संघांविरुद्ध. ["फ्लॅट" चेंडू टाकून फक्त कुंबळेच विकेट घेऊं शकायचा कारण त्याची गोलंदाजी मध्यमगती व लेगस्पीन याचं आगळंच मिश्रण होती.] चावलाला नीट मार्गदर्शन करून , प्रोत्साहन देऊन वापरला तर तो अजूनही खूप उपयुक्त होईल असा विश्वास वाटतो.

नेहरा आणि इरफान किस खुषीमे बाहेर आहेत ते मला माहीतच नाही आहे. खरंच गृहपाठ करायला हवा आहे.

श्रीशांतची देहबोली आक्रमक आहे. देहबोलीचा फायदा काही निर्जीव क्षेत्ररक्षण करणार्‍या सदस्यांचे मनोधैर्य तात्कालीन स्वरुपात उंचावण्यात होऊ शकतो आणि गोलंदाज म्हणून श्रीशांत एखाद दोन विकेट्स घेणे किंवा धावा रोखणे या स्वरुपात करू शकतो हे एक वेगळेच!

तीन जलदगती गोलंदाजांशिवाय विश्वचषकात एखादा इतर संघ उतरलेला आहे का ही माहिती जाणून घेण्यासारखी वाटते. अशी अवाक करणारी कृत्ये करण्यात आपला हात कोण कोण धरू शकत असेल??

<< अशी अवाक करणारी कृत्ये करण्यात आपला हात कोण कोण धरू शकत असेल?? >> बेफिकरजी, आपल्याकडे खर्‍या अर्थाने "जलदगती" म्हणण्यासारखे गोलंदाजच नाहीत अन उपखंडातील खेळपट्ट्यांना तर "स्विंग" व "बाऊन्स" हे प्रकारच माहित नाहीत. शिवाय इतर संघासारखे आपल्याकडे खरेखुरे "ऑलराऊंडर" पण नाहीत; तेंव्हा, "अशी अवाक कृत्ये करण्याला" इतर कांही पर्याय असेल तर ना !! Wink
<< साहेब म्हणजे कोण? >> महाराष्ट्रात सध्या तीन "साहेब" गाजताहेत; बाळासाहेब, पवारसाहेब व सचिन ! गाजण्यामधे पहिल्या दोघांची अधूनमधून चलती असते, तिसर्‍याची नेहमीच !! Wink

भाऊ,
चावला ची ऊंची बघता त्याने एरवी टाकलेले चेंडू फ्लॅटच असतात Happy त्याला चेंडूला ऊंची द्यायला विशेष प्रयत्न करावे लागतील. कालच्या सामन्याचे विश्लेषण एका वाक्यात करता येईल दोन्ही संघांसाठी:
दैव देते कर्म नेते Happy
काही खटकलेल्या गोष्टी:
१. सामना बरोबरीत सुटला तरीही निराश झालेले अन स्ट्रॉस ला सामनावीर पुरस्कार मिळाल्यावर कौतूक न करणारे आपले प्रेक्षकः एक सुजाण प्रेक्षक म्हणून आपण कधी ओळखकले जाणार?
२. बेल आणि स्ट्रॉस साधारण ३५+ षटकाच्या आसपास आरामात एकेरी दुहेरी धावा काढताना विकेट घ्यायची संधी ऊपलब्ध करायच्या दृष्टीने धोणीने कसलाही सापळा-क्षेत्ररक्षण रचना केली नव्हती- किमान ४-५ क्षेत्ररक्षक जवळ ऊभे करून दबाव आणायचा प्रयत्न करायला हवा होता- अक्खा भारतीय संघ ई. ने काहीतरी चूक करयाच्या प्रतिक्षेत होता असे वाटत होते. अशा डावपेचाने तुम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही.
३. सामना हरायला आलो की काय असे वाटायला जरी लागले तरी लगेच आपल्या तमाम संघाची देहबोली ऊदास्/मरगळलेली/हाराकिरी ची भासायला लागते- हे कधी बदलणार? पाक कडून या बाबतीत धडे घ्यावेत- शेवटपर्यंत झुंज देत राहतात- खरे जिगरबाज!
४. गेल्या दोन सामन्यातून आपण एखाद्या खेळाडूला विशेष सापळा रचून बाद केल्याचे कुठे दिसत नाही- जसे सेहवाग, रैना, युवी यांसाठी विरुध्ध संघ व्यवस्थित अभाय्सपूर्वक मोर्चेबांधणी करतात. गॅरी कर्स्टन या बाब्तीत काही सल्ला देत नाही का? वि. खेळाडूंचा अभ्यास करून क्षेत्रव्यूव्ह अन गोलंदाजी करण्याचे दिवस संपले का? निव्वळ ठोकाठोक किंव्वा हाराकिरी या दोनच गोष्टी आपला संघ मैदानावर करताना दिसत आहे....
५. पहिली फलंदाजी करून ३००+ धावा केल्या तरी सामना जिंकायचे थेट डावपेच दिसत नाहीत आणि त्या दृष्टीने प्लॅन करून केलेली गोलंदाजीही दिसत नाही. दुसरी फलंदाजी करून ३००+ चा पाठलाग करायची क्षमता आहे पण आफ्रिका, ऑ, पाक, ई. विरुध्ध ते जमेल का हे माहित नाही... ते अजून सिध्द व्हायचे आहे. दोन्ही बाबतीत ५ फलंदाज अन ५ गोलंदाज महत्वाचे ठरतात.
६. युवी फॉर्मात आला तर नक्कीच अष्ट्पैलू खेळाडू आहे मग अशा वेळी गंभीर, कोहली, यांचे स्थान्/भूमिका काय? रैना ला सर्व सामने सब्-क्षेत्ररक्षक म्हणून खेळवणार का? या प्रश्णाच्या ऊत्तरात आपले संघ संतुलन दडलेले आहे. आयर्लंड, नेदर्लँड बरोबर रैना, श्री यांना खेळवून (धोका पत्करून) विजय मिळवणे हे मालिकेतील आपल्या पुढील सामन्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरेल.
मग पुढील सामन्यांसाठी ५ गोलंदाज (झहीर, भज्जी, चावला, श्री/नेहरा, मुनाफ), ५ फलंदाज (साहेब, विरु, युवी, कोहली/गंभीर, रैना/पठाण) आणि धोणी असा संघ अधिक संतुलीत असेल.

भाऊ नमस्कर व योग,

आपल्या दोघांशी सहमत!

हल्ली तर धोनीचा रोल काय तेही समजेनासे होते काही वेळा!

रच्याकने:
हा सामना फिक्स्ड होता काय याही शंकांना पेव फुटेल- विशेषतः वॉर्नी ने सामन्या आधी ट्विटर वर "टाय" प्रेडीक्ट केला होता म्हणे.
रेडीफ वरील एका वाचकाचे हे मुद्दे, विशेषतः क्र. ६, ८, ९, १० नक्कीच विचार करायला लावणारे आहेतः

There are so many points which indicating that the whole match was fixed.
1. Shane warne predictions.He had already pridict before the match start.
2. Everybody thought that india would reach 350 but he failed to do so.
3. India were 292/3 in 45 overs but india failed to play complete 50 overs match.
4 7 wickets down in last 5 overs.
5. Eng 280/2 in 42 overs.
6. Even not a single bowler builded pressure in 42 overs but suddenly break 3 wickets in dead pitch

7. Strauss nicket the ball when he was at 20, but no appeal from wicket keeper or bowler
8. No action from India captain to control singles & twos

9. Strauss suddenly option a power play when things were going smooth for him
10. England not trying to take a second run at all on the last ball though they had nothing to loose!!
11. Indian captain not bringing in Shewag or Sachin who could have broken the partnership...
-----------------------------------------------------------------------------
अर्थात "टाय" फिक्स करायचा तर फारच जद्दोजेहेद करावी लागेल ते अशक्य वाटते. पण तरिही जेव्हा यार्डी सारखा गोलंदाज निव्वळ फ्लॅट, न वळणारे, न ऊसळणारे low darts टाकतो, आणि तरिही ६ च्या गतीने निव्वळ धावा देतो अशा वेळी निदान विरू ने गोलंदाजी करायला हवीच होती. ते एक गूढ कायम आहेच!

दुसरी फलंदाजी करून ३००+ चा पाठलाग करायची क्षमता आहे पण आफ्रिका, ऑ, पाक, ई. विरुध्ध ते जमेल का हे माहित नाही... >>> एक-दोनदा ठिक आहे... रोज रोज ३००+ धावांचा पाठलाग अशक्य आहे... भले साहेब, विरू, विराट शतक ठोकतीलही... पण बाकीचे हाराकिरी करण्यात 'माही'र आहेत.

ते अजून सिध्द व्हायचे आहे. >>> २००३च्या अंतिम सामन्यातील चूक कित्ती जिव्हारी लागली होती Sad

साभारः http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/50342...

The slow motion replay showed up on the giant screen and to the naked eye it met with most criteria: not a no ball, hitting in line of the stumps and striking the wicket. The crowd roared with delight expecting Bell to be on his way and he had already begun his dejected trek back, supposedly out for 17 to complete another unfullfilled one-day innings.

Until, that is, his captain began to holler him to a halt halfway to the dressing room. The last criteria that was showing up on the screen indicated the distance that the ball would have to travel from point of impact to the stumps was more than 2.5 metres, a rule most on the ground did not know about. Not even England.

The 2.5m rule has been put into place because it is from that point onwards that the precision of the ball tracking technology begins to reduce. That last piece of information was conveyed to Bowden by the third umpire and he stuck to his original decision. Not out. Too far down the pitch.

The ICC playing conditions relating to this part of the system come under Process of Consultation No. 3.3 (i). It states that if a 'not out' decision is being reviewed and the distance from impact to the stumps is greater than 2.5m then the third umpire passes this information to the on-field official along with: the distance from the wickets of the point of impact with the batsman, the approximate distance from the point of pitching to the point of impact, and whether the ball is predicted to the hit the stumps.

The playing condition goes onto state that: "In such a case the on-field umpire shall have regard to the normal cricketing principles concerning the level of certainty in making his decision as to whether to change his decision."

मॅच फिक्सींगचं पेंव फुटलं तेंव्हां यापुढें क्रिकेट सामने पहावे कीं नाही असाही पेंच पडला होता. माझ्यापुरता तरी मी हा निर्णय घेतला आहे - - "स्पॉट फिक्सींग" शक्य असलं तरी " मॅच फिक्सींग" [ ज्यात अकराही खेळाडू थोड्याफार प्रमाणात सामील व्हावे लागतील] ही जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून मॅच पहाताना तसं कांही फिक्सींग नाही असं समजूनच पहायची;
वरीलप्रमाणे कांही संशयास्पद जाणवलंच तर ती चूक, घोडचूक किंवा "ग्लोरीअस अनसर्टनटी ऑफ क्रिकेट" समजायची ! मॅच फिक्सींग असेल हा किडा डोक्यात वळवळत ठेऊन मॅच बघण्यापेक्षा ती न पाहिलेलीच बरी.
माझा हा निर्णय तर्कशुद्ध नसेलही, पण माझ्यापुरता तरी मला ठीक वाटतो.

>>> 7. Strauss nicket the ball when he was at 20, but no appeal from wicket keeper or bowler

हे अत्यंत अनाकलनीय आहे. स्ट्रॉस एकदा १३ वर असताना व एकदा १११ वर असताना झहीरच्याच गोलंदाजीवर बाद झाला होता. स्ट्रॉसच्या बॅटला लागून चेंडू धोनीकडे गेला. मैदानावरच्या सर्वांनी, कॉमेंटेटरनीसुध्दा बॅटकटचा मोठा आवाज ऐकला. तरी सुध्दा धोनी व झहीरने अपील केले नाही. अपील केले असते तर त्याचक्षणी स्ट्रॉस बाद झाला असता. एकंदरीत काहीतरी गडबड दिसतेय.

http://www.indianexpress.com/news/strauss-edged-it-twice-but-indians-did...

धोनीची कप्तानकी अनाकलनीय आहे. स्ट्रॉस प्रत्येक षटकात चौकार मारत होता. धोनीने क्षेत्ररक्षक भलत्याच ठिकाणी ठेवले होते. युवराज व पठाणला खूप बदडले तरी त्यांना भरपूर षटके दिली. सेहवाग व सचिनला १-२ षटके तरी द्यायला पाहिजे होती. ३५ षटके झाल्यावर भज्जीच्या गोलंदाजीवर धोनीने पहिल्या स्लिपमध्ये एकाला उभे केले होते. त्याची काय जरूरी होती? शेवटी ५ षटकांत ५२ धावा हव्या असताना सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार हे नक्की झाले होते. अशा वेळी ४९ व्या किंवा ५० व्या षटकासाठी झहीरला राखून ठेवायला पाहिजे होते. त्याऐवजी ४७ वे षटक झहीरला देऊन त्याने झहीरला संपवून टाकले. ७ बाद झालेले असताना व शेवटच्या २ षटकात तब्बल २९ धावा हव्या असताना आपल्याला हा सामना जिंकता येऊ नये ही नामुष्कीच. क्षेत्ररक्षण तर अगदी गचाळ झाले. कोहलीने स्लिपमध्ये एक लोण्याचा गोळा खाली टाकला. भजीने सुरवातील एक झेल तर एका हातानेच घ्यायचा प्रयत्न केला. एकंदरीत फक्त दोनच मध्यमगती गोलंदाज खेळविण्याचा प्रयोग अंगलट आला. पुढच्या सामन्यात भजीला बसवून त्याऐवजी नेहरा किंवा स्रिसंथला घेतले पाहिजे.

शेन वॉर्नने सामना सुरू होण्याआधीच टाय होणार असे भाकीत केले होते.

http://www.indianexpress.com/news/shane-warne-a-genius-to-have-predicted...

सहमत आहे. हरभजन हा जादूगार नाही. अनेक देशांना आता हरभजन व्यवस्थित समजलेला असणार! व्हेरिएशन नावाचा प्रकारच आपल्याकडे नाही. तरी हल्ली हल्ली चौथ्या क्रमांकासाठी अनेक फलंदाज आहेत. पण गोलंदाजीत आप्ल्याकडे निवडीला वाव का नसावा समजत नाही.

चावलाच्या षटकात दोन सिक्स लावून सामना फिरवला गेला. हे दोन षटकार साधारण एकाच भागात मारले गेले. हे कसे काय? लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक नको? स्पेशली जेव्हा ते शेवटच्या तीनपैकी, त्यतही स्पिनरचे व अत्यंत महत्वाचे षटक असताना?

या वेळेस आफ्रिदी कांगारूंना दमवणार असेच वाटू लागले आहे.

हर्षा भोगले अधिक तरुण दिसू लागला हा भारताला या विश्वचषकाचा झालेला फायदा असे मानावे लागणार बहुधा!

>>> "स्पॉट फिक्सींग" शक्य असलं तरी " मॅच फिक्सींग" [ ज्यात अकराही खेळाडू थोड्याफार प्रमाणात सामील व्हावे लागतील] ही जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट आहे.

तुम्हाला १९९९ च्या विश्वचषकातला पाकडे विरूध्द बांगलादेश हा सामना आठवत असेलच. पाकड्यांनी आपल्या गटातले आधीचे सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले होते. त्यांनी सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकले होते. त्यांचा शेवटचा सामना बांगलाविरूध्द होता. ह्या सामन्याचा काहिही निकाल लागला असता तरी पाकड्यांचा पहिला क्रमांक बदलला नसता. ह्या सामन्यात बांगलाने पहिली फलंदाजी करून २४० च्या आसपास धावा केल्या. १२ वर्षांपूर्वी बांगलाचा संघ आताच्या कॅनडा / केनिया सारखा दुर्बल होता. पाकिस्तानच्या अक्रम, शोएब अख्तर, वकार युनुस इ. भारी गोलंदाजांविरूध्द बांगलासारख्या दुर्बल संघाने २४० धावा करणे हे मोठे आश्चर्य होते. त्यानंतर २४० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सर्वबाद १०० च्या आसपास धावा केल्या. हे सामूहिक फिक्सिंग होते. हे अर्थातच नंतर उघडकीला आले. असे म्हणतात की पाकिस्त्नान संघातल्या काही खेळाडूंनीच ह्या सामन्यासाठी बांगलाच्या बाजूने बेटिंग केले होते व नंतर जाणीवपूर्वक सामना हरून भरपूर धन कमावले.

सांगायचा मुद्दा असा की मॅच फिक्सिंग सुध्दा शक्य आहे.

नेहरू ! Proud

Pages