उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उर्जिता जैन च्या उटण्यामध्ये थोडं बदामाचं तेल आणि दूध घालून रोज साबणाच्या ऐवजी लावते आहे महिनाभर .त्वचा खूपच छान झाली आहे.

एखाद्या कार्यक्रमा साठी लवकर गोरेपणा हवा असेल तर KAYLIGHT नावाचे एक OINTMENT MEDICAL मध्ये मिळते …… ते ४-५ दिवस आधी लावायला सुरु केले कि छान GLOW येतो पण तो तात्पुरता असतो…. आणि कायम स्कीन GLOWING ठेवण्यासाठी नियमित योगा आणि भरपूर प्राणायाम करा मला त्याचा खूप फायदा झालाय …।

मागे कोणी तरी कुन्कुमादी तेलं बद्दल सान्गीतल होत. मी ते वापरायला सुरवात केलीये. खूप मस्त फरक पडलाय. त्वचा एकदम टोन्ड झालिये. ग्लो पण आलाय मस्त.

मुलींनो
हा प्रश्न लाजुर साबणासाठी आहे..
वर दिलेल्या लिंका आनि २६५० वाला नंबर लागत नाहीये.जर कोनाला पुण्यात माहीत असेन कुठे मिळतो तर मला प्लीज सांगा. माझ्या घराजवळ कुठल्याही मेडीकल स्टोअर्स मधे नाहीये.
तांबडी जोगेश्वरी च्यामागे असलेल्या राजस्थान शॉप मधे मिळेन का ???

धन्यवाद अश्विनी Happy
फायनली माझा शोध पुर्ण झाला. लाजुर सोप पुण्यात मंडई गणपतीजवळ जिथे बांबु पासुन वस्तु बनवर्णाची दुकान आहेत. तिथे शिंदे आळीच्या उजव्या बाजुला "शिल्पा आयुर्वेदीक " नावाचे दुकान आहे. इथे नक्कीच मिळेन.त्यांच्याकडे डीस्ट्रीब्युटरशीप आहे. बाकी पुण्यातल्या आयुर्वेदीक दुकानात सुदधा मिळेन अस त्यांच म्हणण आहे.तसेच एजंट घरपोच सुदधा आणुन देऊ शकतात. कोणाला नंबर हवा असेल तर मला विपु करा. Happy

नाशिक मधे डा. उर्जिता जैनचे product कुठे मिळ्तात. प्लीज सान्गा कोणी तरी, मि aloevera jel आणल पण त्याच्यावर फक्त जैन अस लिहल आहे. व ई तर सर्व ठिकाणी तेच मिळतय. व मि माग्च्या पानावर वाचल होत्त की उर्जिता जैन व जैन ही दोन्ही वेगळी company / product आहेत.

नाशिक मधे डा. उर्जिता जैनचे product कुठे मिळ्तात. प्लीज सान्गा कोणी तरी, मि aloevera jel आणल पण त्याच्यावर फक्त जैन अस लिहल आहे. व ई तर सर्व ठिकाणी तेच मिळतय. व मि माग्च्या पानावर वाचल होत्त की उर्जिता जैन व जैन ही दोन्ही वेगळी company / product आहेत.

मी सध्या doctor balaji tambe यांचे Santulan rose beauty oil वापरत आहे. पिंपल्सचे प्रमाण कमी झाले.

माझी त्वचा खुप तेलकट म्हणजे बाहेर गेले ना तर एक तासात परत तेलमय होतो चेहरा,
आधी interview ला जाताना एवढे लक्श नाही द्यायचे पण आता टिप टॉप राहायला सुरुवात केलिये तर confident नाही वाटत,
ऑईल कंट्रोल कसे करायचे पावडर सोडुन उपाय सांगा [वास सहन होत नाही]

प्रिती, माझीही त्वचा खुप तेलकट होती/आहे. उन्हाळ्यात तर चक्क काळपट होते. तुझ्याएवढी होते तेव्हा मी रोज संध्याकाळी ऑफिसातुन आल्यावर साधी मुलतानी माती पाण्यात भिजवुन त्याचा लेप लावुन साधारण २०-२५ मिनिटे म्हणजे लेप सुकेपर्यंत ठेऊन मग थंड पाण्याने चेहरा हळूहळू चोळून धुवायचे. लेप लावला की तोंड बंद ठेवायचे Happy आणि धुताना काळजीपुर्वक त्वचेवर अजिबात जोर न देता धुवायचे. असे केल्याने तेलाचे साठे बरेच कमी व्हायचे. अर्थात कायमचे नष्ट नाही होणार पण एक तेलकट फिल जो येतो तो कमी होतो.

तु नेरुळला राहतेस ना? सीवुड्स स्टेशन (पुर्व) च्य बाहेर प्रितिका हॉटेलच्या समोर एक आयुर्वेदिक दुकान आहे तिथे मुलतानी माती मिळेल. तिथे जायला होत नसेल तर कुठल्याही केमिस्टकडेही मिळेल.

तेलकट त्वचेवर सुरकुत्या पडायचे काम कोरड्या त्वचे एवढे लवकर होत नाही, त्यामुळे माझ्याएवढी झालीस की त्वचा तेलकट असण्याचे फायदे तुझ्या लक्षात येतील Happy

धन्स साधना ,
अग ते मुलतानी माती मी लावते पण आसे ३ ४ तासा साठी बाहेर जायचे असेल तर तिथे पोहोचे पर्यंत मी तेली होउन जाते , वॉश रुम असेल तर तिथे पोहो चल्य पोहोचल्या चेहरा धुवुन फ्रेश होते पण वॉश रुम नसेल तर प्रॉब्लेम होतो

चेह-यासाठी कोणता साबण वापरतेस? मॉइस्चरायजर असलेला सोप वापरत असशील तरीही त्रास होणार. कडुनिंब बेस असलेला मार्गोसारखा साबण वापरुन बघ. चेहरा धुतल्यावर तेल सगळे गेलेले दिसले तर मग ते परत लवकर अवतरत नाही.

चेहर्‍यावरील ओपन पोअर्स साठी काही उपाय आहे का? सुरवातीला मस्त नितळ तुळतुळीत स्कीन होती... साधा पिंपल नव्हता कधी. पण बाळंतपणानंतर फार खराब झालीये त्वचा. नाकाशेजारी गालांवर छोटे छोटे खड्डे (ओपन पोर्स) दिसायला लागलेत आणि ते पसरताहेत... Sad

कडुनिंब बेस असलेला मार्गोसारखा साबण वापरुन बघ.>> मेडीमीक्स वापरते ग

सध्याचा उपाय:
१> साधना ने म्हट ल्या प्रमाणे मुलतानी माती.
२> दर २ तासाने तोंड धुवा.

प्रिती वेट वाईप्स ठेवत जा पर्स मधे. जिथं पोचणार ती जागा जवळ आली की एखादं मिनीट चेहरा वाईप करायचा. रुमालाने करतो तसा. त्यामुळं कार, ऑटो, बस किंवा अगदी चालताना केलंस तरी फार ऑड नाही वाटत. फ्रेश वाटतं आणि तेलही जाईल.

प्रिती वेट वाईप्स ठेवत जा पर्स मधे. जिथं पोचणार ती जागा जवळ आली की एखादं मिनीट चेहरा वाईप करायचा. >>> अगदी अगदी. दिवसातून आंघोळीव्यतिरिक्त ४-५ वेळा चेहरा धुवा.
त्यामुळे माझ्याएवढी झालीस की त्वचा तेलकट असण्याचे फायदे तुझ्या लक्षात येतील >>>>त्यावेळी खरच भाग्यवान ठराल.

सहेली, मी आधी जायचे पोहायला पण खास काळजी असे काही घेतले नव्हते. पोहुन बाहेर आल्यावर साधारण अर्धा तास आपली त्वचा खुप काळपट दिसते, पोहायच्या कपड्याच्या आतली त्वचा आणि बाहेरची त्वचा यात खुप फरक दिसतो पण थोड्याच वेळात तीत्वचा पुर्ववत होते. क्लोरिन इफेक्ट.

मला तरी तास अर्धा तास स्विमिंगपुलमधल्या पाण्यात पोहल्यामुळे त्वचेला फार त्रास होतो असे वाटले नव्हते.

वेट वाईप्स मला अजिबात आवडत नाहीत. त्वचेवर एक चिकट आवरण पसरल्यासारखं वाटतं. पण हा व्यक्तीगत प्रश्न असावा. माझ्या लेकीची त्वचा माझ्याइतकीच तेलकट आहे तरी तिला वेट वाईप ने चेहरा पुसल्यावर फ्रेश वाटतं Happy

माझ्या हाताचे कोपरे खूप काळे पडले आहेत. तिथली त्वचा पण राठ व खरखरीत झाली आहे. काय उपाय करता येईल ?
लिंबाचा रस ट्राय केला होता पण त्वचा जास्त कोरडी झाली. वेगळं काही ट्राय करता येईल का?

chhan ahe mala pan ashach gappa maraychya ahet pan mala samjat nahiye ki kas bolaych plz mala madat kara

Pages