उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पान ३६ वर अंकु यांचा प्रतिसाद आहे.
>>
अंकु | 7 August, 2013 - 17:18
धन्यवाद अश्विनी
फायनली माझा शोध पुर्ण झाला. लाजुर सोप पुण्यात मंडई गणपतीजवळ जिथे बांबु पासुन वस्तु बनवर्णाची दुकान आहेत. तिथे शिंदे आळीच्या उजव्या बाजुला "शिल्पा आयुर्वेदीक " नावाचे दुकान आहे. इथे नक्कीच मिळेन.त्यांच्याकडे डीस्ट्रीब्युटरशीप आहे. बाकी पुण्यातल्या आयुर्वेदीक दुकानात सुदधा मिळेन अस त्यांच म्हणण आहे.तसेच एजंट घरपोच सुदधा आणुन देऊ शकतात. कोणाला नंबर हवा असेल तर मला विपु करा.

माझा चेहरा ओइली आहे.त्यासथी काही उपाय सन्गा.
<<<

नुसति मुलतानि माति जरी लावली तरी तेलकटपणा कमी होइल. केमिस्टकडॅ हेश फार्माची डबी मिळते ती आणुन साध्या पाण्यात मिसळुन लेप बनवा आणि सुकेपर्यंत चेह-यावर ठेवुन मग चेहरा धुवा. आठवडाभर केले तरी बरे वाटेल.

माझा चेहरा ओइली आहे.त्यासथी काही उपाय सन्च्।

एखाद्या चांगल्या COSMETIC च्या दुकानात जा . जिथून पार्लर वाले सामान घेतात तिथे जा.
त्यांना सांगा कि OIL CONTROLLING FACE PACK हवा आहे .

( GENERAL STORE मध्ये जावू नका. तिथली लोक काहीही देतात )

माझा अनुभव हवा असेल तर RAHUL PHATE चा OIL CONTROLLING & DETOXIFYING PACK 1;1 एकत्र करून लावणे . घरातील टीन एजर साठी वापरते. ह्यामुळे oil secretion कमी नाही होत पण चेहरा स्वच्छ होतो .

मी दीड वर्षांपूर्वी फिरायला गेलेले असताना समुद्रात उतरले होते, अंधारात चालताना मोठा खडक लागला डाव्या पायाला आणि भळाभळा रक्तही आले. आता जखम नाही, पायही दुखत नाही, पण पायावर तो काळा डाग आहे अजूनही. तो जाण्यासाठी काय करावे?

आणि गोव्याला गेलेले असताना हौस म्हणून टॅटू काढून घेतला (कलरने, गोंदवून नव्हे) पण त्याचीही अ‍ॅलर्जी आली आणि सगळा दंड लाल झाला, पुरळ आले. औषधाने ते जरी बरे असले तरी टॅटूचा आकार हातावर दिसतोच अजून, म्हणजे त्याचा छाप आहे अजून हातावर.
तो कसा घालवावा? फार विचित्र दिसतयं. Sad

मिनाक्षी वरती गोगो ने BETNOVATE क्रिम सुचवलय काळ्या डागांवर ते वापरा. लहान मुलांना पण चालतं (३ वर्षावरिल). मे वापर्तेय सध्या. फरक आहे Happy

माझ्या ओठांच्या दोन्ही टोकाला काले दाग झाले आहेत आणि खालच्या ओठाच्या खाली मधोमध पण कालं झालं आहे मला सांगा ना मी काय करू ते काले दाग जाण्यासाठी

फक्त बदाम उगाळून लावल्याने हे दाग जातील का? आणि हे उगाळून कधी लावयचे रात्रीचे का दिवसाचे आणि किती हे लावून ठेवायच

Are Kay yrr konich rpl det nahi mala. Saglyanna upay milato mag mala ka rpl yet nahi ajun????? Hi fake side tar nahi na?????

Are Kay yrr konich rpl det nahi mala. Saglyanna upay milato mag mala ka rpl yet nahi ajun????? Hi fake side tar nahi na?????

priya jadhav, जायफळ ,कच्च्या दूधात उगाळून डागांवर लावा.अर्धा तासभर ठेवून साध्या पाण्याने चेहरा धुवा.
लेप जाडसर असावा.

अहो प्रीया जाधव इथे फेक(माझ्यासहित) आयडीही ज्येन्युइन आणि चांगले आहेत तर तुम्ही माबो लाच फेक बोलताय ! असं नका हो मनात आणु Proud

तुमच्या प्रश्नाचे उत्तर वर दिलय तरी.हि लिंक क्लिक करुन पहा.

http://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-how-to-get-rid-of-dark-lips...

आणि यानेही फरक पडला नाही तर सायो यांनी लिहिल्याप्रमाणे स्किन स्पेशालिस्ट( डर्मॅटॉलॉजिस्ट)कडे जावा. कधीकधी घरगुती उपाय एका मर्यांदे पलीकडे काही करु शकत नाही.

Priya, एक Evion नावाचं क्रीम मिळतं. हे व्हिटॅमिन E चं आहे. ते थोड्या थोड्या वेळाने तेवढ्या भागावर चोळा. फरक पडेल. माझ्या एका मैत्रिणीचा गालावरचा अ‍ॅक्सिडंटचा भयानक आणि साधारण ४ इंचाचा स्कार दिड दोन महिन्यात गायब झाला. नामोनिशाण नाही.

जगावेगळी ,
वर तुमची post वाचली ,Betnovate बद्दल.त्या cream चे long term side effects खुप आहेत.
मी २-३ वर्श वापरले होते आणि आता त्रास होतोय...skin texture पार बदलुन गेलेय Sad
Dermatologist चा सलला घेतल्याशिवाय नका वापरु ते क्रिम.

काळ्या डागाकरीता Depiwhite किन्वा Vitaderm चान्गले आहे.पण ते देखील Dematologist च्या सल्ल्यानेच लावा.

माझे ओठ फार कोरडे आहेत. मी लहान असल्यापासुनच ओठ बाराही महिने फाटतात त्यामुळे मी त्यांना सतत जिभ लावत राहते. सतत जीभ लावुन व दाताने मांस चावुन माझा खालचा ओठ फार जाड झाला आहे. त्यामानाने माझा वरचा ओठ मात्र नाजुक आणि मुलायम आहे.
हल्ली तर माझा खा.ओ. पांढरा दिसु लागला आहे. Sad
दर दहाव्या सेकंदाला माझा ओठ कोरडा होऊन त्यावरील त्वचा निघु लागते त्यामुळे सतत पे.जेली अथवा लिपबाल्म लावणे शक्य होत नाही त्यामुळे आपसुकच ओठांवर जीभ फिरवली जाते.
कोणतीही जेली, बाम, लिपस्टिक माझ्या ओठांवर ५-१० मिं.पेक्षा जास्तवेळ राहु शकत नाही. त्यातले मॉईश कमी झाले की परत ये रे माझ्या मागल्या Sad

कृपया कुणाकडे काही उपाय आहे का?

आणि हो आता सेम प्रॉब्लेम माझ्या ४ वर्षाच्या लेकीलाही होत आहे. तिचेही ओठ बारा महिने फाटतात आणि आता ती पण जीभ लावते किंवा दाताने चावते.

तुप वैगरे लावुन फरक नाही पडत. माझ्यासारखे तिचेही ओठ जाड होतील अशी भिती वाटतेय मला. मी खुप जणांकडुन टोमणे ऐकलेत यावरुन. माझ्या लेकीलाही असे काही ऐकावे लागु नये अशी इच्छा आहे.

काही उपाय असेल तर नक्की सांगा.

निल्सन, इथल्या कडाक्याच्या थंडीत मला ओठासाठी उपयोगी पडलेला उपाय म्हणजे रात्री झोपताना ओठांना खोबरेल तेल लावणे. मी इथे लोकली तयार होणारी कोकोबटर + खोबरेल तेल वाली चॅप स्टिक वापरते. सुरवातीला ओठ बरे होईपर्यंत दर तासाला ओठावरुन फिरवावी लागे. अजून एक म्हणजे तुम्ही टुथपेस्ट कुठली वापरता तेही बघा. बरेचदा त्यामुळेही ओठांना त्रास होतो.

निल्सन,
मलाहि हा त्रास होता. मनस्ताप मि नक्किच समजु शकते. मी vitamin D tab खाण्यास सुरुवात केली. D ची diffiency तशी नव्हती मला पण त्याने फरक मात्र पडला. बरेच drs फिरुन झाले माझे तरी. कोणाला काही allergy सापडली नाहि मग एकाने vitamin D suggest केले आणि फरक पडला.
तुम्हिही एकदा allergy testing करुन घ्या.

सध्या पोहायला जाते आहे, त्यामुळे हात, मान अन चेहरा एकदम काळे पडले आहेत.. ते परत मूळ रन्गाचे होण्या साठी काय करावे ?

Pages