उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनन... "तू" म्हटल्यास चालेल... रादर अधिक धावेल Happy
आणि अरे वा ट्राय पण केलंस बनाना फेशियल? ओके पपई पण ट्राय कर अधून मधून! त्याचाही मस्त इफेक्ट येतो... आणि इथे नक्की लिही कसं वाटलं ते Happy

हो नक्कि , पन केळि एवजि , पपई वाप्ररायचि का??????????

सन्स्क्रीन + मॉइश्चराईजर म्हणून कोणतं क्रीम चालेल? म्हणजे ब्रँड कोणता... आणि ते क्रीम चेहर्‍यालाही चालेल का? हातापायाला लावतेच..

कनन केळ्याऐवजी फक्त पिकलेली पपई वापरायची... क्रीम मिक्स नाही केलं तरी चालेल.

प्रज्ञा, मी लॅक्मे सन एक्सपर्ट वापरते. मला तरी चांगलं वाटतं तेच.

प्रज्ञा, लॅक्मे सन एक्सपर्ट गुगलून बघ. त्याचा SPF चांगला आहे आणि अ‍ॅडमध्ये दावा केलाय की चेहर्‍याला वापरला तरी चालतो. मी वापरते कधी कधी. पण माझी नॉर्मल टू सेस्निटिव स्कीन असल्याने व खूप घाम येत असल्याने थोडा चिकटपणा जाणवतो. त्यामुळे शक्यतो भर दुपारी बाहेर पडतच नाही. पण चेहर्‍याला वापरल्यास चालते.

कोणि Dr. Urjita jain चे cucumber Jail वापरले आहे का??माझ्या भावाचे कपाळ ऊन्हामुळे काळे झाले आहे व त्वचा सावाळि आहे, ते उजळण्यासठि या जेल चा उपयोग होउ शकतो का??????? किवा अजुन काहि घरगुति उपाय सान्गता येतिल का????????

कनन, मागच्या पानांवर सावळ्या व उन्हाने टॅन झालेल्या हात व चेहर्‍याच्या त्वचेसाठी काही होम रेमिडीज सुचवल्या आहेत. तसंच उर्जिता जैन चे कोरफड जेल पण फायदेशीर आहे. त्यावरही पुष्कळच चर्चा झालेय मागच्या पानांवर!!!

मला उजळ कांतीपेक्षा जरा वेगळा सल्ला हवा आहे पण स्किन बद्दल आहे म्हणून इथे विचारत आहे.
माझे वजन कमी झाले आहे आणि गाल तर चांगलेच उतरले आहेत. पण त्यामुळे गाल आणि मानेची स्किन थोडी लुज वाटते आहे. ती पुन्हा टोन्ड दिसण्यासाठी काय करता येईल? मला फेशियल फार सुट होत नाही. मी अधून मधून क्लिनप करते. प्लिज मदत करा.

पारीजाता, गालांचे व मानेचे व्यायाम करता येतील स्कीन टाईटनिंग साठी.. गालात हवा भरून फुगवायचे, स्लोली हवा सोडायची. मानेचे मान अलगद गोल फिरवणे डावा कान डाव्या खांद्यापासून ते उजवा उजव्यापर्यंत...वाईस वर्सा...

जर फार तेलकट त्वचा नसेल तर घरच्या घरीच फळांचं फेशियल करता येइल. पाणी भरपूर प्या... तसेही उन्हाळ्याचे दिवस आहेतच! शरीरातील पाणे कमी झाल्यानेही त्वचा सुरकुतल्यासारखी काळवंडलेली दिसू शकते... बाकी उपाय इतरत्र आधीच्या पोस्टींमध्ये सापडतीलच...

कोणि Dr. Urjita jain चे cucumber Jail वापरले आहे का??माझ्या भावाचे कपाळ ऊन्हामुळे काळे झाले आहे व त्वचा सावाळि आहे, ते उजळण्यासठि या जेल चा उपयोग होउ शकतो का??????? किवा अजुन काहि घरगुति उपाय सान्गता येतिल का????????

फायदा होईल असे लिहिलेय जेलवर. उर्जिता जैनचे प्रॉडक्ट आहे म्हणजे छापलेय ते ब-यापैकी खरे असावे. वापरुन बघा. त्याच्यावर जसे लिहिलेय तसेच वापरा म्हणजे झाले. cucumber Jail आनि अलोए जेल वापरायची पद्धत वेगवेगळी आहे.

पुण्यात जोगेश्वरीच्या बोळात 'इंद्राणी' नावाचे ब्युटी पार्लरचे सामान मिळणारे दुकान आहे.त्यांच्याकडे फेशियल किट्स मिळतात.आपली त्वचा बघून कोणते किट वापरायचे,कसे वापरायचे ते सांगतात.घरगुती वापरासाठी चांगले वाटले.

लॅक्मे सन एक्स्पर्टची १५ मिलीची बाटली ९९ ला Sad आणि अगदीच पिटुकली आहे ती. रोज वापरायची तर ४ दिवसांत संपेल.

VLCC ची अ‍ॅड बघितली आहे, दुकानात जाऊन बघायला पाहिजे. शिवाय २-३ मेडिकेटेड/ फार्मसी स्पेशल वगैरेही नावं समजली आहेत. लॅक्मे घेईनसं वाटत नाही.

तुशपी |.... साबन न वापरता रोज मसुर डाळीचे पिठ लाव चेहर्‍याला.... एकदाच मिक्सर मधुन पावडर करुन डब्यात भरुन ठेव..

सॉरि मि आज पाहिलि पोस्ट...मसुर डाळीचे पिठ दह्यातुन लावावे..पन मि वेळ नसेल तर पाण्यातून लावते...

-namaskar, hi majhi pahili post
hithe sarvjan chehrya sambadhit tips det aahet
mala hair tips pahije hotya
mjhe kes khup dry aani weak aahet
aani ata tar te saay padate mhnje mdhech takkal padate..mi khup ghabrley
plzzz kahi upay astil tr sangavet

Pages