नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो रैना, पुलंनी त्यात अप्रतिम हार्मोनियम वाजवली होती. आजही ते विसरता येणे शक्य नाही. पण या प्रयोगात, गाणं सिरियसली येत नाही. काळ्यांना एखादे गाणे पूर्ण गायला लावायला हवे होते.

त्या जून्या प्रयोगात, आशालताने पण एक गाणे सादर केले होते ना ? (पिकला गहू नि हरभरा, असे शब्द होते) ते नाही नवीन प्रयोगात.

ती सुचित्रा भागवत आवडली, पण आशालताचे हेल आणि उच्चार नाही विसरता येत. ( आमचं ह्ये बाळंत्तकाढा कि वो प्यालं !!! )

पुलंचेच बटाट्याची चाळ, पण सादर झाले होते. (त्याची सिडी पण आली नंतर) त्यातल्या गायनाच्या प्रवेशाला तर तोड नाही. अष्टपैलू कलाकार म्हणजे काय, ते त्यात दिसायचे.

दिनेश, क्या यार एकदम बचपन की याद दिलादी. मी पण दहावीत असताना ते वार्‍यावरची वरात पाहिले आहे.
तू म्हणतोस ते प्रत्येक पॉइंटला अगदी अगदी. हार्मोनियम, कडवेकर मामी ते पिशवीची अदला बदल. सर्व संवाद अजूनही तोंड पाठ आहेत. ते तू म्हणतोस ते गजरे सुद्धा पाहिले आहेत भेंडे व इतर कंपनीचे. याकूब सैद
किशोर प्रधान बबन पण असत. त्या वरात आधी एकदा माझे शाळकरी जीवन पुलंचे - बिगरी ते म्याट्रिक ते ही पाठ आहे. सुपर. Happy

बरीच जुनी नाटकं मुंबई दूरदर्शनाने चित्रीत केली होती. पण नंतर चित्रफितींचा तुटवडा निर्माण झाला, इंदिरा गांधींनी पैसा देणं बंद केला, आणि या नाटकांच्या चित्रफितींवर इतर कार्यक्रम चित्रीत केले गेले.

माय गॉड विश्वास बसत नाही यावर.... Sad मी कधीची आशा लावुन बसलेले की ते जुने कार्यक्रम सह्याद्रीवर कधीतरी दाखवतील म्हणुन Sad Sad Sad

दिनेश मी रविवार सकाळी ९ वाजता प्रक्षेपित केली जाणारी पुलंची वरात अर्धीमुर्धी पाहिलेली Sad आमच्याकडे तेव्हा टीवी नसल्याने शेजा-यांनी जर लावला तरच पाहायला मिळायचा. दिल देके देखो, मुझे पिलाओ,मुझे पिलाओ, एक कप कोको करत नाचणारा गावचा शेतकरी श्रीकांत मोघे अजुनही डोळ्यासमोर आहे. आणि तो बाळंतकाढ्याचा प्रसंगही पाहिलाय... Happy नविन संचातली वरात मात्र पाहणार नाही. जुने पाहिलेले जे काय अर्धेमुर्धे स्मरणात आहे ते तसेच राहुदे, त्याचा आनंद घालवायचा नाहीय.

तेव्हाचे गजरे.. सुरेश खरे आणि दया डोंगरेने किती चांगले कार्यक्रम दिले होते... जाउदे विषयांतर नको, इथे नाटकाची चर्चा चाललीय.... Happy पण नाटकांची चर्चा चालु आहे तर तेव्हा कामगार विश्व, ज्ञानदिप मध्येही कधीकधी खुप चांगली नाटके पाहायला मिळायची.

हो नवीन कार्यक्रमांच्यासाठी जुने कार्यक्रम पुसून टाकले डीडी ने. दूरदर्शन म्हणजे एक मोठ्ठा मूर्खांचा बाजार आहे.

दूरदर्शन म्हणजे एक मोठ्ठा मूर्खांचा बाजार आहे

हे शब्द अपुरे आहेत गं.. मिळतील तितक्या कोल्हापु-या घेऊन जायला पाहिजे तिथे Angry

खरंय... प्रदीप वैद्यच्या धाग्यावर मी माझा एक अनुभव लिहिला होता बघ दूरदर्शनचा. Sad

असो लोक्सांनो....
आसक्तचं नवीन नाटक अप्रतिम आहे.
'गजब कहानी'
होजे सारामागोच्या 'द एलिफंटस जर्नी' या रचनेवर आधारित.
भाषांतर व नाट्य रूपांतर - प्रदीप वैद्य
दिग्दर्शन - मोहित टाकळकर

प्र. भू.
गीतांजली कुलकर्णी
नचिकेत पूर्णपात्रे
उमेश जगताप

नाटक फारच मस्त आहे. गीतांजलीच्या मी पाह्यलेल्या आत्तापर्यंतच्या कामांपैकी सगळ्यात बेस्ट..... क्लास आहे नाटक.

नीधप, असे पोस्ट्स आम्हाला आणखी व्याकूळ करतात. कारण भारतवारीत ती बघावीशी वाटली, तरी प्रयोग नसतात. म्हणून थोडेसे सविस्तर पाहिजे पोस्ट. तेवढेच समाधान मिळते.

बाकी दूरदर्शनने, काय काय हरवलेय त्याची गणनाच होणार नाही. कै जयराम हर्डीकर यांची सुद्धा नाटके होती. मला आठवतेय, श्रीकांत मोघे आणि ज्योत्स्ना किर्पेकर यांचे छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या आयूष्यातील एका प्रसंगावर हिंदी नाटक सादर झाले होते. त्यात लता मंगेशकरने गायन केले होते.

ज्योत्स्ना भोळे आणि मास्टर अविनाश, यांनी तब्बल ३३ वर्षांनंतर त्याच उत्साहात, संगीत कूलवधूचा प्रयोग केला होता.

मच्छींद्र कांबळींचे ओरिजीनल, वस्त्रहरण होते. पति गेले गं काठेवाडी, गारंबीचा बापू, दूर्गा झाली गौरी , लग्नाची बेडी ही सगळी नाटके मूळ संचात सादर झाली होती.

वार्‍यावरची वरात मला ओरिजनलच आवडतं. मीपण नवीन बघितलंय थोडं. पण सुरळीच्या वड्या, मालूताईंचं "तुझा नवरा नाही का घरात?" असं मैत्रीणींनी विचारल्यावर गोंधळून जाणं हे प्रकार नको तिथे हशा मिळवायला केलेत असं मला तरी वाटलं!! असो!

नाट्यरंग : ‘हमिदाबाईची कोठी’ आहे मनोहर तरी..

ह्या परिक्षणातलं "करीमभाईनं मोहल्ल्याची सत्ता हाती घेतल्यावर लुक्काची झालेली दयनीय अवस्था संजय नार्वेकरांनी ज्या गंभीरतेनं अभिव्यक्त (express) करायला हवी होती, तशी ती न करता उलट ते पंटरच्या काही वाक्यांवर प्रेक्षकानुनयी अभिनय करतात. हे अत्यंत अक्षम्य आहे. विनोदी नटाची ही खोड वापरून ते नाटकाचं अपेक्षित गांभीर्य घालवतात." हे मत मला अगदी पटलं.

"करीमभाईनं मोहल्ल्याची सत्ता हाती घेतल्यावर लुक्काची झालेली दयनीय अवस्था संजय नार्वेकरांनी ज्या गंभीरतेनं अभिव्यक्त (express) करायला हवी होती, तशी ती न करता उलट ते पंटरच्या काही वाक्यांवर प्रेक्षकानुनयी अभिनय करतात. हे अत्यंत अक्षम्य आहे. विनोदी नटाची ही खोड वापरून ते नाटकाचं अपेक्षित गांभीर्य घालवतात." >>>>>> मला ही पटला..
पण बाकी प्रयोग झकास आहे.. बाकि सगळ्यान्चा अभिनय भारी झालाय एकदम.. Happy

‘व्याप कुणाचा, ताप कुणा?’

‘जास्वंदी’चं सहानुभूत अध:पतन - शेवटच्या १-२ परिच्छेदात नाटकाचा शेवट सांगून टाकलाय त्यामुळे नाटक पहायचं असल्यास हे परिक्षण वाचताना तो भाग टाळा.

करुन गेलो गाव- मागच्या आठवड्यात बघितले. मालवणी समजत नसल्याने काही काही विनोद पटकन कळले नाहित. येकंदरीत बेतलेले विनोद आणि बेतलेला प्लॉट. ओढुन ताणुन जैतापुरशी जोडलेला संबंध. वैभव मांगले चे यशस्वी गाणे आणि स्त्री पात्र. फार अपेक्षा न ठेवता पाहिले तर कदाचीत आवडेल.

आजच सकाळी २ जाहिराती वाचल्या. भद्रकाली प्रॉडक्शन्स तर्फे 'सुखांशी भांडतो आम्ही" ह्या नावाचं नाटक येतंय - चिन्मय मांडलेकर आणि डॉ गिरिश ओक. तसंच 'ऑल द बेस्ट' पुन्हा येतंय.

"लव्हबर्डस" हे नाटक कोणी पाहिलं आहे का? कसं वाटलं? जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर अशी जाहिरात येतेय. काही माहिती असेल तर प्लीज पोस्ट करा.

स्वप्ना, जबरदस्त नाटक आहे. मी बघितले त्यावेळी गिरिश ओक आणि संजय मोने असायचे. कथानकाची मूळ कल्पना परकिय आहे. याच कथानकावर अर्जून रामपाल आणि प्रियांका चोप्राचा सिनेमा पण येऊन गेलाय.

"जास्वंदी" पाहिले. नाटक आधी वाचलेले असल्यामुळे संदर्भ पटकन लागले, मागच्या रांगेत बसलेल्या आजीबाईंना बराच वेळ ते २ बोके आहेत हे कळत्/वळत आणि पटत नव्हतं! Happy
नाटक गंभीर आहे, सगळ्यांच्या भुमिका छान; पण तो तरुण मुलगा फारच पोरकट वाटतो नवाथेबाईंच्यापुढे.
नाटक संपल्यावर सुन्न व्ह्यायला होतं हे खरं.
जसं "हसरतें" मालिकेतल्या विबास. ला आपली सहनुभूती गेली होती, तसंच इथे होतं. नायिकेचं वागणं चूक होतं कि बरोबर हा विचार न येता, आपल्याला वाईट वाटतं!

तानपुरे खास! संगीतही उत्तम आहे.

आणखी कोणी पाहिले का? काय मत?

धन्स दिनेशदा!. हिंदी पिक्चर येऊन गेलाय म्हणजे कुठल्यातरी टीव्ही चॅनेलवर पाहिला असेल मी. त्यामुळे नाटक स्किप करता येईल.

मला माफ करा मित्रांनो मी मधेच घूसतो आहे पण दिनेश यांनी ३० एप्रिल ला ओपन झालेले लव्हबर्डस हे नाटक पाहिले आहे असे मला वाटत नाही.१९९५ साली पहिल्यांदा हे माझे नाटक आले होते. हिन्दी फिल्म २००५ साली आली. आत्ता आलेले नाटक पूर्णपणे Rewrite केलेले आहे.काळाप्रमाणे अनेक subplots नविन लिहावे लागले आहेत. मूळ मध्यवर्ती कल्पना परकिय चित्रपटावरून घेतलेली असली तरी नाटक आणि दोन्ही चित्रपट (हिन्दी आणि english) हे सगळं पाहून जर कुणी ठरवल की त्यात किती साम्य आहे तर बरं होईल. धन्यवाद.
गिरीश जोशी.

"चेहराफेरी" पाहीलं. मला प्रियदर्शन जाधवांचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तिन्ही गोष्टी आवडतात. त्या नाटकातला प्रियदर्शन जाधवांचा 'डॉक्टर' मला भुषण कडूपेक्षा वरचढ वाटला.

गिरिश, मी जून्या संचातले पाहिले असेच लिहिले आहे. जर कथा बदलली असेल तर मला नक्की परत बघावेसे वाटेल. हिंदी चित्रपटाची कथा, जून्या नाटकासारखीच होती, पण चित्रपटच असल्याने, दॄष्यात्मकता जास्त होती.

गिरिश, मग मला नक्कीच बघायचे आहे. भारतात आलो कि नक्कीच.
चांगल्या नाटकाचे, भरपूर प्रयोग व्हावेत, या शुभेच्छा.

girishjayantjoshi, दिनेशदा - जुनं नाटक मी पाहिलं नाही. आणि २००५ चा कुठला पिक्चर ते माझ्या नक्की ध्यानात येत नाहिये. त्यामुळे मी विचार करते आहे बघायचा. बघितलं की पोस्टेन.

Pages