नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात >> पुण्यात याचे प्रयोग होत नाहीत की काय, कधि वाचल्याचे आठवत नाही. Sad

दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेला "कट्यार काळजात घुसली" चा नविन संचातला प्रयोग कुणी पाहिला का? राहुल देशपांडे, महेश काळे, सुबोध भावे, वेदश्री ओक, दिप्ती माटे, सौरभ काडगांवकर इ. कलाकार आहेत या नविन संचात.

शनिवारी २१ऑगस्टला, बालगंधर्वला "बारा गावचं पाणी" याचा पहिला प्रयोग झाला. क्रिडा पत्रकार सुनंदन लेले, मिमिक्री आर्टिस्ट विक्रम साठ्ये व हर्षा भोगले यांचा सहभाग असलेल्या या नाटकाचा (अथवा प्रयोगच म्हणने जास्त उत्तम ठरेल) पहिलाच प्रयोग होता.

क्रिकेट पर्यटन, क्रिकेट मधील किस्से, विविध क्रिकेटपटूंचे‍ अनुभव, महान खेळाडूंबद्दल रंजक माहिती तसेच उत्तम मिमिक्री यांमुळे कार्यक्रम जोरदार झाला. सुरुवात लेल्यांनी केली त्यांनी स्लाइड्सद्वारे फोटो दाखवून क्रिकेट पर्यटनाची ओळख करून दिली, त्यांना पत्रकारितेत आलेले अनुभवपण सांगितले.
नंतरचा जोरदार परफॉर्मन्स होता तो विक्रम साठ्ये यांचा, त्यांनी मिमिक्री व किस्से यांची जोरदार आतिषबाजी केली. Happy हर्षा भोगलेंनी पण समालोचनाचे अनुभव सादर केले.

दुसरा भाग हा परिसंवादा सारखा होता (ईंटरॅर्‍क्टिव्ह??) यात स्लेजींगचे किस्से, सचिन-सेहेवाग या व्यक्तिविशेषांबद्दल अधिक चर्चा, T-२० क्रिकेटबद्दलची मते असा प्रश्नोत्तरासारखा कार्यक्रम झाला.

त्यांनी सांगितलेले किस्से हे त्या कार्यक्रमात ऐकले तर आणखी धमाल येईल म्हणून इथे काही लिहित नाही.

एकून पूर्ण कार्यक्रम अतिशय धमाल झाला, व सर्वांनी अवश्य पाहण्यासारखा आहे. भारतीय लोकांचे क्रिकेटवर असणारे अतोनात प्रेम पाहता त्यांच्या या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद नक्की मिळणार हे नक्की.

रंगासेठ, धन्यवाद ह्या माहितीबद्दल!

गिरिश ओकांच्या "तो मी नव्हेच" चे प्रयोग सगळीकडे होत नाहीयेत का? कोणी पाहिलंय हे नाटक? कसं वाटलं?

रविवारी विक्रम भागवत लिखित "एक लफडं" नाटक पाहीलं. उत्कृष्ट लेखन, अभिनय आणि संगीत. आदीती सारंगधर आणि चिन्मय मांडलेकर हे दोनच कलाकार आहेत. नाटक पाहणेबल आहे.

शनिवारी 'काटकोन त्रिकोण' नाटक पाहीलं. गिरिश जोशी यांनी दिग्दर्शन केलेय. डॉ. विवेक बेले, केतकी थत्ते व डॉ. मोहन आगाशे यांच्या भूमिका आहेत.

राहुल व भक्ती हे जोडपं आणि राहुलचे वडील (आप्पा) यांच्यातील संघर्षावर हे नाटक आहे. आप्पांना झालेल्या अपघाताची चौकशी करण्यास आलेल्या इन्स्पेक्टर बापटांना या घटनेचे वर्णन सांगताना फ्लॅशबॅक दाखवलाय. भक्ती व आप्पा यांच्यातील कौटुंबिक वाद, मग त्यावर त्यांनी केलेली चर्चा, यात मुलाची मधल्या मध्ये फरफट कशी होते , बापटांनी पोलिसी तपास करतानाचे प्रसंग यांनी नाटक पुढे जाते.
भक्ती भूमितीची शिक्षिका असते व आपली बाजू भूमितीतील त्रिकोणांचा वापर करत मांडते. तो प्रसंग मस्त आहे. त्रिकोणांचा असा वापर पहिल्यांदा पाहिला.

एकूण नाटकात पंचेस मस्त आहेत, भरपूर हसवणारे प्रसंग आहेत. डॉ. मोहन आगाशांनी , आप्पा व इ. बापट अशा दुहेरी भूमिका उत्तम सादर केल्यात. डॉ. विवेक बेले, केतकी थत्ते यांचीही कामे उत्तम.

लोकसत्ताच्या परिक्षणामध्ये दिलय तसं "संवेदनशील व्यक्तींना सध्या माणसा-माणसांतील या बदलत्या नातेसंबंधांबद्दल तीव्र चिंता वाटू लागली असेल तर त्यात आश्चर्य नाही. कारण माणसाच्या अस्तित्वाचा डोलाराच मुळी परस्परांशी भावनिकतेनं जोडलेलं असण्यावर अवलंबून आहे. तोच नष्ट झाला तर काळोखाची स्वयंभू बेटं निर्माण होऊन जगण्यातलं सुंदरपण संपून जाईल. निरागसता, निरपेक्षता या गोष्टी बावळटपणाच्या नाहीत, तर त्या माणसाच्या माणूसपणाशी निगडित आहेत, याची जाणीव आजच्या व्यक्तिवादी पिडीला प्रकर्षांनं करून देण्याची वेळ आता आली आहे.
आयएनटी निर्मित, डॉ. विवेक बेळे लिखित आणि गिरीश जोशी दिग्दर्शित ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक या मुद्दय़ाकडेच आपलं लक्ष वेधतं. "

काटकोन त्रिकोण - लोकसत्तामधील परिक्षण

हयवदन बद्दल खूप वाचले होते.
अशी बरीच नाटके आहेत, जी परत परत सादर व्हायला हवीत. या परत परत सादर करण्याच्या नाटकात, केवळ विनोदी नाटकेच असू नयेत. आणि निदान आता तरी त्याचे चित्रीकरण होणे गरजेचे आहे.

मला वाटतं 'सख्खे शेजारी" सुध्दा पुन्हा येतंय. काही दिवसांपूर्वी जाहिरात पाहिल्याचं आठवतंय.

घाशीराम कोतवाल पण परत येतय.... बहुतेक १६ डिसेंबरला नवीन संचातला पहिला प्रयोग होईल. ह्या नाटकाची सुरुवात ह्याच दिवशी झाली होती म्हणून..

सख्खे शेजारी, मला वाटतं आता कालबाह्य झालेय. त्या संचात सुहास जोशी धमाल करायची, ती जादू परत आणणे कठीण.
हि आपली माझी विश लिष्ट
अंधार माझा सोबती
रथचक्र
जन्मगाठ
गुंतता हृदय हे
डोंगर म्हातारा झाला
गारंबीचा बापू
राहिले दूर घर माझे
नातीगोती
ध्यानीमनी
रंग माझा वेगळा
आरोप
झोपी गेलेला जागा झाला
दिनूच्या सासुबाई राधाबाई
संगीत मंदोदरी
संगीत मंदारमाला
खंडोबाचे लगीन

अशी बरीच आहेत......

झोपी गेलेला जागा झाला
दिनूच्या सासुबाई राधाबाई

बा़की काही नाही आले तरी ही दोन तरी परत यायलाच पाहिजेत. वरिजिनल संचात आणता आली असती तर.............. पण ते शक्यच नाही आता.. Sad

मनोरमा वागळे, छे अशी कलाकार परत होणे नाही. मायबोलीकर सई च्या ओळखीने त्यांच्या माहीमच्या घरी जायचा योग आला होता. पण हाय ....... त्यावेळी त्या या जगात नव्हत्या. निव्वळ त्यांचे फोटो बघून समाधान मानावे लागले होते.
सचिनच्या, आत्मविश्वास सिनेमात, त्यांचा अगदी काहि मिनिटांचा रोल होता. "या गोळ्या असल्या नाहित काही.. तसल्या आहेत" हा संवाद त्यांनी असा काही म्हंटलाय !! उंबरठा (चूभूद्याघ्या) मधे त्यांची गंभीर भुमिका होती.

झोपी गेलेला जागा झाला चा एक प्रवेश, खरे वाटणार नाही पण कानन कौशल आणि आत्माराम भेंडे यांनी, दूरदर्शनवर सादर केला होता. नेहमीची रडूबाई इमेज सोडून, तिला त्या प्रवेशात बघायला मजा आली होती.

सुनील बर्वच्या हर्बेरियम तर्फे नवं नाटक येतंय बाळ कोल्हटकरांचं लहानपण देगा देवा. काही माहिती मिळेल का नाटकाचं कथानक, ओरिजिनल कास्ट ह्याबद्दल?

लहानपण देगा देवा, हे नाटक का निवडलं ? काहि खास नाही. बडे घर पोकळ वासा, अशा टाईपच्या घरात, त्यातल्या स्त्रीचा भाऊ येतो आणि सगळ्यांना जेरीस आणतो, असे कथानक. पण जाताना भरपूर पैसे देऊन जातो (त्याच्या आफ्रिकेत सोन्याच्या खाणी असतात !!)
कुमार गंधर्वांनी यातले शीर्षक गीत गायले होते.

ह्या माहितीबद्दल धन्यवाद दिनेशदा! उगाच १-२ तास रांगेत उभं राहून तिकिट काढायला नको. कोणी प्रयोग पाहिलात तर नक्की कळवा. 'रामनगरी' पुन्हा आलंय पण कलाकारांच्या लिस्टमध्ये निदान मला तरी काही ओळखीची नावं दिसली नाहीत.

लहानपण देगा देवा, हे नाटक का निवडलं ? काहि खास नाही.>>> कोल्हटकरी वळणाच्या मराठी सिरीअल्स जर तुफान चालतायत, तर नाटक का नको? असा विचार असावा.

आगाऊ, आता परत आशा काळे, अलका कुबल फॉर्मात येणार कि काय ?

रामनगरी वर हिंदी सिनेमा आल्याचे आठवतेय. अमोल पालेकर, सुहासिनी मूळ्ये, सुलभा देशपांडे होते बहुतेक त्यात.

बडे घर पोकळ वासा, अशा टाईपच्या घरात, त्यातल्या स्त्रीचा भाऊ येतो आणि सगळ्यांना जेरीस आणतो, असे कथानक. पण जाताना भरपूर पैसे देऊन जातो

ओह गॉड, सेम हेच कथानक लक्ष्याच्या एका चित्रपटाचे आहे. बहिण निना कुलकर्णी होती वाटते. सासरा मोहन जोशी आणि कणाहीन नवरा कोण ते आता विसरले. हाच सुनेचा भाऊ किंवा असेच काहीतरी नाव होते. पण चित्रपट ब-यापैकी ठिकठाक होता. लक्श्याने मधुन्मधुन धुडगुस घातला पण बराच कंट्रोलमध्ये होता तो.

रामनगरी मी पाहिलाय. त्यात रामच्या लग्नासाठी दुस-या गावी जातात आणि गावाबाहेर राम कुणाच्यातरी थडग्याला टेकुन विश्रांती घेत पहुडतो हे दृश्य चांगलेच आठवतेय. Happy

हाच सूनबाईचा भाऊ Proud चॅनेल सर्फिंग करताना एका चॅनेलवर हे नाव वाचून मी लगेच चॅनेल बदललं होतं Happy

खरं सांगायचं तर, हेच नाटक साक्षीदार नावाने पुर्वी आले होते. त्यात आशा भेंडे आत्माराम भेंडे काम करत.
मधुकर तोरडमलांनी काही रहस्यप्रधान नाटके लिहिली होती, काळे बेट लाल बत्ती, भोवरा, कलम ३०२ अशी नावे होती.
कुणीतरी आहे तिथे, या नावाचे पण नाटक होते (याच नावाचा सिनेमा पण होता, सिनेमात अश्विनी भावे, प्रशांत दामले, आणि लागू होते.)
जन्मगांठ हे एका अर्थाने रहस्यप्रधान नाटक होते (विनय आपटे, सुकन्या कुलकर्णी, सीमा पोंक्षे, लालन सारंग)
आरोप (लालन सारंग, जयराम हर्डीकर) हे पण द्वीपात्री रहस्यप्रधान नाटक होते.
लालन सारंगचेच आणखी एक नाटक होते. त्यात ती पांगळी असते. दिलिप कुलकर्णी असे त्या नाटकात.
कुसुम मनोहर लेले, पण रहस्यप्रधानच.

विनोदी नाटकांची लाट यायच्या पुर्वी, मराठी नाटकात अनेक विषय येऊन गेले.

संजय मोने आणि डॉ गिरिश ओक यांचे लव्हबर्डस हे एक उत्तम रहस्यप्रधान नाटक होते. हिच कथा प्रियांका चोप्रा आणि अर्जून राजपाल यांच्या, नकाब नावाच्या सिनेमासाठी वापरली होती.

Pages