Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
नाट्यरंग : ‘व्याप कुणाचा, ताप
नाट्यरंग : ‘व्याप कुणाचा, ताप कुणा!’ कोमट फार्स
बरं झालं गिरीश तूच येऊन
बरं झालं गिरीश तूच येऊन सांगितलंस ते.
इंदिरा गांधींनी पैसा देणं बंद
इंदिरा गांधींनी पैसा देणं बंद केला, आणि या नाटकांच्या चित्रफितींवर इतर कार्यक्रम चित्रीत केले गेले.
मी चुकत नसेल तर त्यानी केळकर संग्रहालयालाही भेट (गिफ्ट नव्हे व्हिजिट)दिली आहे. बर्लिन महोत्सवात घाशीराम कोतवाल नाटक जाऊ नये म्हणून पुण्यातल्या मंडळीनी जो त्यावेळी म्हणजे १९८० मध्ये गदारोळ केला होता त्यात विकृत इतिहासवादी विरुद्ध कलास्वातंत्र्यवादी असा मोठाच सामना रंगून आन्तरराष्ट्रीय पातळीवर भारतातील कलास्वातंत्र्याचा मुद्दा चर्चिला जाऊ लागला होता. वसन्त साठे परवानगीच देत नव्हते. शेवटच्या क्षणी इदिराजीनी हस्तक्षेप करून त्यानी नाटकाचा मार्ग मोकळा केला. हे एवढे विस्ताराने सांगायचे म्हणजे इन्दिरा गांधी डॉक्युमेन्टेशनचे महत्व ओळखण्याइतक्या संवेदनाशील नक्कीच होत्या. त्यामुळे त्यानी पैसा देणं बन्द केलं हे म्हणणे अन्यायकारक होईल. शासनात बजेट मागण्याची एक पद्धत असते. ती वेळीच अवलम्बिली जात नाही नोकरशहांकडून मग ऐनवेळेला धावाधाव करायचीही एक सवय असते.
>>>> हे कशावरून? एकतर तेव्हा इन्दिरा गांधी प्रसारण मंत्री नव्हत्या.प्रधानमंत्री म्हणून त्या फिल्मच्या कोट्यात हस्त क्षेप करतील असे वाटत नाही. इन्दिरा गांधीबद्दल तुमची काहीही मते असली तरी राजकारणी वगळता एक कलासक्त व्यक्ती म्हणून इन्दिराजींचे दुसरे रूप आहे तेही विलक्षण आहे. भारतातील म्युझियम्स बद्दल त्यानी जे काम केले आहे ते मोठे आहे. या बाबत सदाशिव गोरक्षकर यांची साक्ष काढायला हरकत नाही
दुसरे असे की ज्या काळातल्या कार्यक्रमाबद्दल चर्चा चालू आहे त्या काळातील तन्त्र विचारात घेता, त्यात एक फिल्म एक्सपोज झाल्यावर पुसून त्यावर दुसरे रेकॉर्डिंग करता येईल असे वाटत नाही. मात्र ध्वनिमुद्रणाबाबत रिरेकॉर्डिन्ग शक्य आहे त्याच फिल्मवर...
धन्यवाद.
धन्यवाद.
<हे कशावरून? एकतर तेव्हा
<हे कशावरून? एकतर तेव्हा इन्दिरा गांधी प्रसारण मंत्री नव्हत्या.प्रधानमंत्री म्हणून त्या फिल्मच्या कोट्यात हस्त क्षेप करतील असे वाटत नाही.>
तेव्हा म्हणजे केव्हा? अरुण काकतकर आणि याकुब सईद यांनीच ही माहिती मला दिली आहे. नाटकं या मंडळींनीच चित्रीत केली होती, आणि त्यांवर इतर कार्यक्रमही या लोकांनीच चित्रीत केले. त्या काळी कुठल्या प्रकारच्या केसेटी असत, त्यांची किंमत किती होती, आणि पैसा नसल्याने त्याच परत परत का वापराव्या लागत, याचेही तपशील आहेत. शोधून लिहितो.
या कॅसेटी परदेशातून आयात होत, आणि इंदिरा गांधींनी पैसे नसल्यानं आयातीस परवानगी नाकारली, हे आत्ता आठवलं. या दोघांशी बोलून दोन वर्षं झाली. ती ध्वनिमुद्रणं शोधून त्या मुलाखती लिहायला हव्यात.
तेव्हा म्हणजे दूरदर्शन मुळातच
तेव्हा म्हणजे दूरदर्शन मुळातच मुम्बैला १९७२ ला सुरु झाले. हे कार्यक्रम १९७४ दरम्यान चालू होते . याकूब सैद त्यावेळी चांगलेच अॅक्टिव्ह होते. व्ही एच एस टेप्स वर मात्र रिरेकॉर्डिंग शक्य असावे. तरीही टेप्सची बाब व ते खरेदीचे अधिकार पाहता ही बाब इन्दिरा गांधींपर्यन्त पोचू शकते हे पटण्यासारखे नाहीच... त्यावेळी तर प्रसारभारतीही नव्हते. आणि डिपारटमेन्टल बजेट पन्तप्रधान मंजूर करीत नसून पार्लमेन्ट मंजूर करते...
इम्पोर्टचा लफडा असेल तर
इम्पोर्टचा लफडा असेल तर सांगता येत नाही...
नाना पाटेकरला साकारायचाय
नाना पाटेकरला साकारायचाय ‘सखाराम बाइंडर’!
प्रशांत दामले फॅन फाऊन्डेशन तर्फे 'श्री तशी सौ' रंगमंचावर येत आहे. प्र.भू. प्रशांत दामले आणि वंदना गुप्ते.
नमस्कार खास पुणेरी टच असलेलं
नमस्कार
खास पुणेरी टच असलेलं झेड ब्रिज हे नाटक येत आहे. पहिला प्रयोग बालगंधर्वला आहे. ३ जून संध्याकाळी ५.३० वाजता.
हृदयी धरा हा नि:‘संशय’ खरा!
हृदयी धरा हा नि:‘संशय’ खरा!
नाट्यरंग : लव्हबर्डस्
नाट्यरंग : लव्हबर्डस् गरगरवणारं सस्पेन्स थ्रिलर
लव्हबर्डस पाहीलं. हे नाटक
लव्हबर्डस पाहीलं. हे नाटक खरचं शेवटापर्यंत खिळवून ठेवणारं आहे. शेवटचा धक्का तर आपल्या अंदाजाना सपशेल तोंडघशी पाडतो.
कृपया शेवटचे धक्के असे
कृपया शेवटचे धक्के असे जाहिरपणे लिहू नका.
'लव्हबर्ड्ज' हे रहस्यप्रधान
'लव्हबर्ड्ज' हे रहस्यप्रधान नाटक 'सकाळ'मध्ये परिक्षण आलं होतं, त्याप्रमाणे खरंच 'स्लीक' आहे. सगळे कलाकार आपापल्या भूमिकांमध्ये पर्फेक्ट! अमृता सुभाषचं काम उत्तरार्धात एकदम खुलतं. अनिकेतची तिला समर्थ साथ. 'साने', 'सुप्रिया'ही मस्त. नरेन्द भिडे ह्यांनी रहस्य नाटकाला शोभेलसं संगीत दिलं आहे, तेही नाटकातलं एक पात्रच आहे, असं म्हणता येईल.
'लव्हबर्ड्ज' हे पिंजर्यातले पक्षी- जोडीने पिंजर्यात राहतात, एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. त्या जोडीपैकी एकाचीही ताटातूट झाली, तर उरलेला ते सहन करू शकत नाही, आणि आपला प्राण सोडतो- ही संकल्पना घेऊन एका जोडप्याची कहाणी, त्याला असलेले प्रेमाचे, पैशाचे, त्यागाचे आणि तिसर्या व्यक्तीचे अॅंगल गुंफून एक मस्त रहस्य साकार केले आहे.
नाटकाची खरी गंमत ही नेपथ्यात आहे. एरवी नाटक हे '१-डी' अर्थात, एकाच मितीतलं असतं- जे काही घडतं, ते आपल्यासमोर रंगमंचावर. ह्या नाटकात काही प्रमाणात '२-डी'चा वापर केला आहे, त्यामुळे त्याचा वेगळाच परिणाम होतो, अधिक रोचक होतं नाटक. शिवाय अनेकदा सेट बदलले आहेत, ते सगळं सामान जागच्याजागी आणणं-नेणं ह्या कसरतीसाठी त्यांच्या टीमचं विशेष कौतुक. नेपथ्यबदलाबरोबरच अशा नाटकात प्रत्येक वस्तू त्या त्या जागी असणं हेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्वांनी जमेल तेव्हा अवश्य पहा हे नाटक, आणि हो रहस्याचा भेद आपल्यापुरताच ठेवा
पौर्णिमा, मी काही
पौर्णिमा, मी काही वर्षांपुर्वी बघितलेल्या प्रयोगात, वायर गॉज वापरुन, काही प्रवेश त्यामागे दाखवले होते. या प्रयोगात नेपथ्यात नवीन काय आहे ?
दिनेश, वायर गॉज वापरून म्हणजे
दिनेश, वायर गॉज वापरून म्हणजे कसे हे समजले नाही, पण ह्या नेपथ्याची मजा प्रत्यक्ष पाहण्यात आहे, असं मला वाटतं. तो 'धक्का' जो बसतो ना, तो मस्त आहे एकदम! नवीन टेक्नॉलॉजी वापरून नाटक 'सॅव्ही' केलं आहे, इतकंच म्हणेन. काही काही साध्या गोष्टी वापरून नाटक वेगळ्याच पातळीवर कसं नेता येईल, ह्याचं उत्तम उदाहरण.
मी काही खूप नाटकं पाहिली नाहीयेत, त्यामुळे टू-डी नेपथ्य करतात का, ते तसं कॉमन आहे का ह्याची मला कल्पना नाही. पण आम्हाला तो प्रयोग नावीन्यपूर्ण आणि नाटकात अधिक गंमत आणणारा वाटला.
वायर गॉज म्हणजे स्टेजवरच्या
वायर गॉज म्हणजे स्टेजवरच्या एका भिंतीतल्या काही भागावर जाळी लावलेली असते. स्टेजवर प्रकाश असताना तो भाग भिंतीचाच भाग वाटतो. पण स्टेजवर अंधार केला आणि त्या जाळीमागे प्रकाश टाकला, कि एक वेगळाच भाग नजरेच्या टप्प्यात येतो. त्या भागात काही प्रसंग दाखवता येतात. या जाळीची खासियत अशी असते कि त्यामागचे प्रसंग आपण जाळीच्या आडून बघतोय असे वाटत नाही. (घराच्या खिडक्यांना डासांसाठी जाळी लावली असेल, तरी असा भास होतो.)
आता माझी उत्सुकता आणखीनच वाढली.
दिनेशदा, तुम्ही आधीच्या
दिनेशदा,
तुम्ही आधीच्या प्रतिसादात जुने नाटक पाहिले तेव्हा गिरीश ओक असे लिहीले होते, नंतर ईथे गिरीश जोशी यांनी खुलासा केला आहे.. नेमके काय आहे?
नव्याने आले आहे हे नाटक.
नव्याने आले आहे हे नाटक. वरच्या प्रतिसादानुसार बरेच बदल झालेले दिसताहेत. कथानक जबरदस्त होतेच, आता सादरीकरण पण जास्त चकाचक झाल्यासारखे वाटतेय.
>>तुम्ही आधीच्या प्रतिसादात
>>तुम्ही आधीच्या प्रतिसादात जुने नाटक पाहिले तेव्हा गिरीश ओक असे लिहीले होते, नंतर ईथे गिरीश जोशी यांनी खुलासा केला आहे.
जुन्या संचात गिरीश ओक ह्यांनी अभिनय केला होता असं दिनेशदा म्हणाले. नाटकाच्या जाहिरातीत गिरीश जोशी ह्यांचं नाव लेखक, दिग्दर्शक आणि प्रकाश ह्यापुढे आहे.
मी रविवारी 'श्री तशी सौ'
मी रविवारी 'श्री तशी सौ' पाहील..
प्रशांत दामले आणि वंदना गुप्ते स्टेज वर असे पर्यन्त नातक छान वाटत..
पण मधे मधे बोर झाल..
शेवटी शेवटी तर फारच कंटाळा यायला लागला होता..
नाटकात १-२ वेळेस उगीचच बिग बझार चि जाहिरात केली आहे..
अवनी ही नवीनच ट्रेंड आहे. या
अवनी ही नवीनच ट्रेंड आहे. या नाटकाची सीडी बघितली होती. त्यात मोहन जोशी आहे. फार ग्रेट नाही. ठिकच आहे.
लव्हबर्ड्ज जुन्य नाटकात वायर
लव्हबर्ड्ज जुन्य नाटकात वायर गॉज नसून वॅनिशींग ब्लाईंडस वापरला होता. एका फोन कट मधे पलिकडची व्यक्ती (साने) दाखवायला तो वापरला होता. फोन च्या वेळी तो उघडला जायचा आणि नंतर बंद केला जायचा. आता त्याच्या ऐवजी direct video sync वापरला जातो.
अधीक माहिती साठी
http://lovebirdscomments.blogspot.com/
गिरीश जोशी.
त्यात मोहन जोशी आहे. फार
त्यात मोहन जोशी आहे. फार ग्रेट नाही. ठिकच आहे. >>
मी पण मोहन जोशी चेच यशवंतराव ला बघीतले होते. कंटाळवाणी कॉमेडी आहे.
मी पण जुन्या 'श्री तशी सौ'
मी पण जुन्या 'श्री तशी सौ' ची सीडी पाहीली होती..
पण जुन नाटक नव्या नाटका पेक्शा खुप चांगल वाटल होत..
फुल्या, नाटकाचे नाव ’गजब
फुल्या, नाटकाचे नाव ’गजब कहानी’ आहे
गज (हत्ती) वर श्लेष आहे.
रूपके उघड होवो न होवो मला तरी नुसता तो प्रवास आणि प्रवासाच्या अनुषंगाने बदलत जाणार्या व्यक्तीरेखा, वेगवेगळ्या वर्गांची परिस्थिती, पूर्ण अनोळखी गोष्टीबद्दलचे कुतूहल ते अंगवळणी पडणे, मुळापासून उपटून नेल्यावर परक्या ठिकाणी रूजणे/ न रूजणे अश्या अनेक गोष्टी ज्या सहज समोर येतात त्या जास्त इंटरेस्टिंग वाटल्या.
माहुताप्रमाणे भाषा बोलली जात नाही म्हणजे काय? त्या पूर्ण सेटपमधे भाषेचा माहुताचा लहेजा या गोष्टीची गरजच दिसत नाही. भाषेचा वास्तवतावादी लहेजा हे सूत्र केवळ एका व्यक्तिरेखेसाठी कसे घेऊन चालेल मग ते सगळ्यांसाठीच असायला लागेल. आता मराठी भाषेत युरोपियन भाषांचे, हत्तीच्या भाषेचे लहेजे कसे आणणार? ते केलं तर नाटकाच्या आशयाकडे पोचण्यापेक्षा प्रेक्षक लहेजाच्या गमतीतच अडकणार नाही का? नाटक कुठल्याही पद्धतीने वास्तवतावादी नाहीच्चेय. आणि भाषेचा लहेजा ही ठरवून नाकारलेली गोष्ट आहे तिथे. ते मलातरी योग्य आणि सहज वाटलं.
लेखकाबद्दल.. होजे सारामागो इथे बघणे.
लोभ असावा, ही विनंती
लोभ असावा, ही विनंती
नाट्यरंग : ‘प्रेमाच्या गावा
नाट्यरंग : ‘प्रेमाच्या गावा जावे’ रंजक कौटुंबिक कॉमेडी
दिग्दर्शक वामन केंद्रे
दिग्दर्शक वामन केंद्रे त्रिभाषिक नाटय़प्रयोगांचा विक्रम करणार!
अभिवाचन हा म्हणले तर
अभिवाचन हा म्हणले तर नाट्यप्रयोग आणि म्हणले तर नाही. पण जेव्हा चंद्रकांत काळे असा प्रयोग घेऊन येतात ते ही 'नाटक्याचे तारे' अश्या शीर्षकाचा तेव्हा ते अभिवाचन हा नाट्यप्रयोगच असतो.

१९०० च्या आसपास कधीतरी नाटक्या उर्फ काशिनाथ नारायण पटवर्धन यांनी 'नाटक्याचे तारे' हे त्या काळच्या रंगभूमीच्या परिस्थितीवर उपरोधातून भाष्य करणारे हे पुस्तक लिहिले.
त्या काळात या पुस्तकाच्या ८ आवृत्त्या निघालेल्या आहेत.
रंगभूमीशी निगडीत अनेक गोष्टींचा खरपूस समाचार यात घेतलेला आहे.
साधारण एक नाटक उत्तम चाललं की मग त्याच नाटकाच्या विविध कंपन्यांनी केलेल्या भीषण नकला यांपासून रंगभूमीशी संबंधित अनेक विचित्र प्रघात या सगळ्यांचे उपहासात्मक खुसखुशीत वर्णन यात आहे. गंमत अशी की यातले बरेचसे आजही तसेच्या तसे लागू होऊ शकते. उदाहरणार्थ.. शारदा असो वा कुंटीण असो वा सरदार स्त्री असो तिचा पार्ट करणार्यास पैठणीच नेसायची असे.
चंद्रकांत काळ्यांनी या पुस्तकाचे प्रयोगाच्या दृष्टीने संकलन केले आहे. एक तास वीस मिनिटे ते दीड तास असा या प्रयोगाचा अवधी आहे.
इतका निखळ विनोद हल्ली बघायला/ ऐकायला मिळत नाही. पूर्ण वेळ हसून हसून वेड लागायची वेळ आली. होती. शंभरपेक्षा जास्त वर्षापूर्वी लिहिले गेलेले आजही इतके चपखल बसतेय हे बघून थक्क व्हायला होते. जुन्या काळाबद्दल सगळंच सुंदर सुंदर नसतं. कोणीतरी एखादा हिंमत करून हे असं लिहून ठेवतो. जे रंगभूमीच्या इतिहासासाठीही महत्वाचं असतंच.
वयाच्या साठीनंतरही ज्या ताकदीने आणि ज्या कमिटमेंटने चंद्रकांत काळे हा प्रयोग करतात तेही तितकंच थक्क करून सोडणारं आहे. सलग दीड तास इतक्या जुन्या भाषेतील मजकूराचे अभिवाचन करून संपूर्ण प्रेक्षागृह खिळवून ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हे.
तर काय एकुणात मस्ट सी..
शब्दवेधच्या सगळ्याच कार्यक्रमांची एकत्रित एम्पी ३ विकत मिळते त्यात हे ही आहेच. पण प्रत्यक्ष अभिवाचनात बसल्या बसल्या काळे जे काय धमाल करतात त्यासाठी हा प्रत्यक्ष पाह्यलाच पाहिजे असा कार्यक्रम आहे.
Pages