Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
धन्यवाद
धन्यवाद दिनेश, एवढी छान माहिती दिल्याबद्दल...
-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..
सॉरी, witness for
सॉरी, witness for the prosecution या Agatha Christie च्या कथेवर आधारीत नाटकाचे नाव
"खर सांगायचे तर"..
प्र.भु
विक्रम गोखले
सुप्रिया कुलकर्णी - पिळगावकर
फार छान
फार छान नाटक आहे हे. सुप्रियासाठी अवश्य बघावे. मी लिहिले होते. त्यावेळी सविता मालपेकर आणि विवेक लागू पण होते, या नाटकात.
काल
काल आदीपश्य नाटक पाहील


.
आवडल.
.
लेखन (विवेक आपटे) / दिग्दर्शन (चिन्मय मांडलेकर) आणी अभिनय (निखील हजारे ) अप्रतीम.
.
इथे फारस नाटक फारस कोणी पहात नाही वाटत ?
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
इथे फारस
इथे फारस नाटक फारस कोणी पहात नाही वाटत ? >>> पहतो रे..पण देशाबाहेर असल्यामुळे शक्य नाही लाइव्ह पहाणे... online जेवढी असतात तेव्हढी पहातो..(दुधाची तहान ताकावर :()
आपले परिक्षण देत रहा...तेवढेच समजते तरी कुठली नविन नाटके येत आहेत ते..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
केदार
केदार


)
.
म्हणजे जे माबो कर सध्या मुंबई -पुण्यात आहेत त्या बद्दल म्हणतो रे मी. किंवा नाटक बघत असावेत पण लिहायचा कंटाळा असावा
.
भारतात येशील तेंव्हा अवश्य बघ नाटक
(टीप : हे स्वगत नाही
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
साप्ताहिक
साप्ताहिक सकाळ मधे नाटकावर छान लेख यायचे. पण सध्या ते सदरही कोरेच आहे (?) भारतात निदान वृत्तपत्रातील नाटकांच्या जाहिराती तरी बघायला मिळायच्या, नेटवर त्याही नाहित.
हो ना
हो ना दिनेशदा

लोकसत्ता किंवा मटा वर येत असतील परीक्षण (ऑन लाईन आवृत्तीवर
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुप्रिया
सुप्रिया कुलकर्णी कोण ? सुप्रिया, सचिन ची बायको ही आधीची सबनिस ना ?
"खर
"खर सांगायचे तर"..>>> हे नाटक मी लाइव्ह पाहिले आहे...यशवंतराव नाट्यगृहात..
जबरी आहे...विक्रम गोखले नेहेमीप्रमाणे अफलातून्..पण सुप्रिया भाव खाउन जाते,,,ही म्हणजे सचिन ची बायकोच.. तिचे माहेरेचे आडनाव माहित नाही
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
मी ही
मी ही पाहीलय ते नाटक
पण शेवट 'तो मी नव्हेच' च्या अंगाने जातो जरासा
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
त्या
त्या नाटकात थोड्या कायदेशीर त्रुटी आहेत. पुराव्यादाखल न्यायालयासमोर आलेल्या वस्तू, अश्या निष्काळजीपणाने ठेवत नाहीत, तसेच कुठल्याही परिस्थितीत वकिल, न्यायाधिशांकडे पाठ करत नाहीत.
मी लिहिले होते या नाटकाबद्दल. हेच नाटक पुर्वी साक्षीदार या नावाने आले होते आणि त्यात लिली इझीकेल उर्फ आशा भेंडे भुमिका करत असत.
पण सदरचे नाटक, सुप्रिया खाऊन टाकते.
पण सदरचे
पण सदरचे नाटक, सुप्रिया खाऊन टाकते. >>>>

अनूमोदन दिनेशदा
विशेषतः त्या वारांगनेचा अभिनय अप्रतिम केलाय तीने
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
आधीची
आधीची सबनिस ना ? >> हो, सबनिसच
नमस्कार्!म
नमस्कार्!मी संजय मोने!माझे नवीन नाटक जरूर पहा!नाव आहे "प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा"या आधीचे माझे नाटक होते "सारखे छातीत दुखतय!"काही जणांना ते आवडले काही जणांना नाही!परंतू मला एवढेच सांगायचे आहे की बरी किंवा वाइट;पण त्या नाटका ला एक गोष्ट होती.अलीकडे ब-याच नाटकांना ती नसते.असो!
संजय मोने!
मी मधे
मी मधे प्रशांत दामलेंचे ओळख ना पाळख पाहिले. ठिक आहे. प्रशांत दामलेंचे काम छान आहे. बाकी उगाच गरज नसताना काही पाचकळ विनोद वापरले आहेत असे वाटते. कथानक सुद्धा खुप strong नाहीये.
अनुमोदन
अनुमोदन madhavi_Nayaneesh . शिवाय 'ओळख ना पाळख ' नाटकात शेवटी बायकोचे प्रेम प्रकरण समजल्यावरही प्रशांत दामलें ची प्रतिक्रिया strong वाटली नही.एकुणच प्रशांत दामलें च्या लौकिकाला साजेसे वाटले नाही.त्या परि तेलन्ग चा अभिनय (किन्चाळल्यासारखे बोलणे व 'फोट्टो' म्हणणे . शिवाय ती कुठल्याही
बाजुने श्रीमन्त कुटुम्बातली दिसत नव्हती.) डोक्यात जातो.
गेल्या
गेल्या आठवड्यात 'प्यार किया तो डरना क्या' हे नाटक कुटुंबियांनी जबरदस्तीने नेल्यामुळे पाहिले.
पण गेल्याचा पश्चात्ताप नाही झाला. दुसरा अंक लांबल्या सारखा वाटला पण तरिही 'पहा, पोटभर हसा आणि विसरून जा' अशा पठडीतले आहे.
'यू टर्न'
'यू टर्न' पाहिले. गिरीष ओक व इला भाटे या.न्ची कामे छान. पण विनोदाची वाक्ये सामान्य वाटली. आता 'पुणेकर व सदाशिव पेठ' वरचे विनोद आपण किती वर्ष ऐकणार आहोत ? सध्याच्या लेखनात दम नाही हे मात्र खरे. तसेच नाटकाला खूप पुरस्कार मिळालेत म्हणून खूप अपेक्शा ठेवून बघायला मात्र जाऊ नये! फक्त २ च पात्रे असणे हेही क.न्टाळा आणते.
नुकतेच
नुकतेच आपली मराठी वर "डबल क्रॉस्..कथा कुणाची व्यथा कुणाला" हे नाटक पाहिले..
रमेश भाटकर, मोहन जोशी इ नामवंत कलाकार असुनही निराशाजनक वाटले. मर्डर मिस्टरी अशी जाहिरात आहे त्याची पण फुसका बार वाटले.
सुयोगच्या,
सुयोगच्या, चार दिवस प्रेमाचे, या नाटकाची सीडी बाजारात उपलब्ध आहे. मी हे नाटक मूळ संचात बघितले होते. त्यात प्रशांत दामले, सविता प्रभुणे, अरुण नलावडे आणि कविता लाड होते. अत्यंत प्रसन्न असे हे नाटक अनेक वर्षानी बघायला खुप मजा आली. या सीडीमधे कविताच्या जागी, नीमा आहे. ती कविता इतकी दिसायला गोड नसली तरी अभिनय उत्तम करते. या तिघांपूढे ती अजिबात नवखी वाटत नाही. तिने उभी केलेली अर्कचित्रे खासच आहेत.
प्रेमाच्या विविध रिती असे या नाटकाचे स्वरुप आहे. हेच चार कलाकार यात आलटून पालटून विविध भुमिका करतात. (सविताची ठुमकणारी म्हातारी तर कळसच) सगळ्यांच्या अभिनयाचा यात कस लागलाय. आणि या चार कलाकारांचे ट्य़ूनिंग तर मस्तच जमलेय.
मूळ प्रयोगाच्या वेळी, प्रशांत, कविता रंगभूमीचे असले तरी अरुण व्यावसायिक नाटकात तरी नवीन होता. सविता सिनेमात रुळली होती तरी नाटकात नव्हती. पण तरीही हा प्रयोग मस्तच व्हायचा.
या नाटकाला रुढ अर्थाने नेपथ्य नव्हते. बारा रंगीबेरंगी ठोकळे आणि प्रवेशानुसार प्रॉपर्टी येत असे. या सीडीत मात्र पडद्याचे नेपथ्य आहे.
तसेच मूळ नाटकात नसलेल्या, दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा एक प्रवेश जास्तीचा आहे. मूळ प्रयोगात शेवटच्या प्रवेशात सविताच्या गळ्यात गळपट्टा असे. सीडीत तो नाही. सीडी करताना, नाटकात शक्य नसलेले काहि प्रयोग करता आलेले आहेत. ( वेशभूषा बदलाचे, गाण्याचे वगैरे )
नाटकातील विनोद अत्यंत सभ्य आहे. कुठेही त्याने दर्जा सोडलेला नाही.
एकंदर अवश्य संग्रही ठेवावी अशी आहे हि सीडी.
काही दिवसांपूर्वी लोकसत्तात
काही दिवसांपूर्वी लोकसत्तात गिरिश ओक ह्यांनी अभिनय केलेल्या "तो मी नव्हेच" ची जाहिरात आली होती. पण एकच दिवस आली. आता दिसत नाही. हे काय गौडबंगाल आहे?
ते नाटक स्वाइन फ्लूमुळे पुढे
ते नाटक स्वाइन फ्लूमुळे पुढे ढकललं गेलं आहे. आता ऑक्टोबर महिन्यात शुभारंभाचा प्रयोग होईल.
या विकांताला 'ओळख ना पाळख'
या विकांताला 'ओळख ना पाळख' पाहिले.
प्रशांत दामले, परी तेलंग... बाकिच्यांची नावं नाही आठवत आहेत. 'सस्पेंस कॉमेडी' या प्रकारात मोडणारं नाटक एकट्या प्रशांतच्या खांद्यावर पेललं आहे. त्याने तसा उत्तम न्यायही दिला आहे. इन्स्पेक्टर झारापकरच्या पात्रात जान ओतलीय पठठ्यानं. बाकीच्या पात्रांना फारसा वाव नाही. परि तेलंगचा अभिनय शब्दश: 'लाऊड; वाटतो. चिरका आवाज आणि संपूर्ण नाटकात आदळाआपट एवढंच काय ते काम आहे तिला. सस्पेन्स असल्याने कथेविषयी फारसं सांगणं योग्य होणार नाही. प्रशांत दामले फॅन असाल तर चूकवू नये असं नाटक.
मला तर मजा आली. हसून हसून बेजार....तुम्हीही पहा आणि इथे लिहा.
"निखारे" म्हणून एक नवं नाटक
"निखारे" म्हणून एक नवं नाटक आलंय. कोणी पाहिलंय का? पाहिलं असल्यास कसं वाटलं ते इथे लिहाल का प्लीज?
तमाम नाटय रसिक प्रेकक्शकांना
तमाम नाटय रसिक प्रेकक्शकांना सुहासचा सप्रेम नमस्कार ..
मुंबईला आल्यापासुन नाटक पहायचा वेड्चं लागलय मला ..
परवाचं .. नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात हे नाटक पाहिले.. आणि डोळे समाधान पावले..
खरंच सुरेख आणि सुस्पष्ट सादरीकरण होता .. विक्रम समेळ आणि आमदार केळ्करांचा तर अभिनय अप्रतिमचं.
पण एक खंत ही जरूर वाटली .. ती म्हणजे .. जो प्रेक्शकवर्ग जो होता त्यामद्ये तरूण (१८ ते २८) वयोगटातील लोकांचे प्रमाण खुपच कमी जाणवला .. तर माझ्या बंधुनों आणि भगिनीणों तुम्ही हे नाट्क जरुर पहा आणि तुमचा अभिप्राय कळ्वा ..
एक रिकामी बाजू पाह्यलं.
एक रिकामी बाजू पाह्यलं. नाटकाची शैली मस्त आहे. आणि करतात पण उत्तम.
"बहुरूपी" नाटक कुणी पाहिले
"बहुरूपी" नाटक कुणी पाहिले आहे काय? पाहिले असल्यास, कृपया कसं आहे ते सांगा.
"बहुरुपी" मी पाहिले. ठिक आहे.
"बहुरुपी" मी पाहिले. ठिक आहे. फार विनोदी वगैरे नाहि.
"बहुरुपी" ठिक आहे. नाही
"बहुरुपी" ठिक आहे. नाही पाहिलत तरी चालेल.
Pages