नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप, ही शब्दवेधच्या कार्यक्रमांची एमपी कुठेशी मिळेल मुंबई - ठाण्यात?

इथे ( लंडन मधे ) The Lion King musical पाहिलं. डिस्ने चा दर्जा खरंच खुप वरचा आहे. ते नेपथ्य, ती वेशभूषा, ती रंगभूषा (make up), ते संगीत... लाजवाब. शब्दातीत अनुभव वाटला. सर्वात कहर म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना सादर करण्यासाठी वापरलेल्या कल्पना, क्लुप्त्या. Costume designing अफाट होतं. फार फार सुंदर !!

अरुण सरनाईकचे तुघलक पाहिलेले कुणी आहे का इथे (नी ??)
या नाटकाबद्दल खुप उत्सुकता आहे.
मूळ लेखक गिरिश कर्नाड, भाषांतर विजय तेंडुलकर.
भुमिका : अरुण सरनाईक, सुनिला प्रधान कमलाकर सारंग, इर्शाद हाश्मी.

हे नाटक माझे बघायचे राहुन गेले आणि नंतर कुणी केल्याचे वाचले नाही.
==

शकुन,

हकुना मटाटा गाणे होते कि नाही. या स्वाहिली शब्दांचा अर्थ. नो प्रॉबलेम !!!

हाकुनामाटाटा होते की. आणि हे गाणं माझ्या पिढीला नक्किच माहित आहे. गाताही येतं. ते पण हिन्दी मधे. Lol शाळेत होतो तेव्हा २-३ नवोदित pop singers नि त्यांच्या album मधे गायलं होतं हे. मला तर तो video पण डोळ्यासमोर येतो.
@नीधप : खरच. माझी पण पहिली प्रतिक्रिया अशीच होती कि मी किती भाग्यवान आहे. पुण्यात राहताना सुद्धा बघायचंच असं ठरवलेली सगळी नाटकं बघता येत नाहीत. आणि इथे हा world class show बघायला मिळाला. आता एखादं नाटक पण बघायचा विचार आहे. जाणकरांनी (इथली) चांगली नाटकं सुचवावीत ही नम्र विनंती.

शनिवारी रात्री.. बर्‍याच वर्षांनी पुरुषोत्तम करंडकातील अंतिम फेरीतील ९ नाटकांपैकी ३ नाटकं बघायला मिळाली..
यंदाच्या वर्षी पहिलं आलेलं एमआयटीसीओईचं 'सिरीयल किलर्स' - भ्रूण हत्येवर प्रकाश टाकणारं नाटक. वेगवेगळ्या परिस्थीतीमध्ये अ‍ॅबोर्शन करावे लागलेल्या चार युवतींच्या अनुषंगाने नाटक बांधलं होतं.. आणि एकूणच सध्याची परिस्थिती अ‍ॅबोर्शनची परिस्थिती किती गंभीर आहे ह्यावर भाष्य. मुख्य नायिकेला आणि नायकाला त्यांच्या अभिनयासाठी पहिलं पारितोषिक मिळालं.. चारही भूमिका उत्तम वठवल्या होत्या.. एकूण विषयाचा आवाका मोठा असूनही नेमकं सादरीकरण.
सीओइपीचं 'चेकमेट' - बुध्दीबळाच्या पटावर कोपर्‍यात आडकलेल्या राज्याकडे तीनच पर्याय असतात ह्या वाक्याने नाटकाची सुरुवात होते.. आणि प्रत्येक पर्याय नायक कसा करेल आणि काय होईल हेच पहिल्या तीन प्रसंगात दाखवले होते.. आणि त्यानंतर प्रत्यक्ष काय घडले आणि नायकापुढे तीनच पर्याय का होते ह्याचं सादरीकरण.. कथेचा मूळ जीव फारच छोटा वाटला..
आणि कमिन्ससीओएचं 'अन्वय'.. ओ. हेन्री ह्या प्रसिद्ध लेखकाच्या एका कथेचं रुपांतर करुन त्यावर ही नाटक बेतलेलं होतं... कलाकार कसे मनस्वी असतात आणि त्यांच्या मानसिक अवस्थेचं सादरीकरण.. कुठल्याश्या वेलीची पानं ही आपल्या जीवनाशी निगडीत आहेत आणि ती जशीजशी पडत जातात तशीच आपली ही अवस्था होणार ह्या मानसिकते पायी आजारी पडून घेणारी लेखिका असणारी नायिका... आणि आपण काढलेली चित्र ही जगाच्या पुढची आहेत.. कोणालाच कळत नाहीत मग कशाला काढायची म्हणून स्वतःला बंदिस्त करून घेतलेली चित्रकार.. आणि ह्या दोघींच्या मध्ये लेखिकीची मैत्रिण असलेली आणि चित्रकाराकडे शिकायला जाणारी तरुणी...

सादरीकरण फारच चकाचक होतं तिन्ही नाटकांचं.. सेट्स वर प्रचंड मेहनत घेऊन लावले होते.. आणि लाईट्स पण तिन्ही नाटकात मस्त वापरले होते.. वेगवेगळ्या ठिकाणी घडणारे प्रसंग असल्यामुळे सेट्सच्या माध्यमातून ठिकाणं मस्त उभी केली होती.

हर्बेरियम तर्फे आलेलं शेवटचं नाटक - झोपी गेलेला जागा झाला - पाहिलं. खूप आवडलं. मर्यादित प्रयोग आणि त्यापायी एक तास तिकिटासाठी रांगेत उभं राहायचा त्रास नसता तर पुन्हा पहायला नक्की आवडलं असतं. Happy

सुनिल बर्वे, विजू खोटे, भरत जाधव, सतिश पुळेकर, भार्गवी चिरमुले, दिन्यार तिरंदाज, संपदा कुळकर्णी

आत्माराम भेंडे आणि बबन प्रभु चे हे नाटक. मूळ नाटकात ती होती का माहित नाही पण दूरदर्शनवरच्या गजर्‍यात इंदुमती पैंगणकर (कानन कौशल) ने यातला एक प्रवेश केला होता.

दिनेशदा, हर्बेरियमच्या प्रत्येक नाटकाच्या वेळी एक २ पानांचं छापील माहितीपत्र मिळतं त्यात मूळ नाटकाचे दिग्दर्शक, नट-नट्या ह्यांची माहिती असते. त्यात मला इंदुमती पैंगणकर (कानन कौशल) चं नाव दिसलं नाही. आज घरी जाऊन पुन्हा पहाते. मूळ नाटकात दिनू आणि विनू कोण होते? आशा भेंडे होत्या म्हणजे बहुतेक त्या दिनूची बायको असणार आणि दिनू आत्माराम भेंडे असणार.

बहुतेक ती नव्हतीच नाटकात. तिने मोजकीच नाटके केली (मला उत्तर हवय किंवा अपराध मीच केला, यापैकी एक) तिने तो हिप्नोटीझम चा प्रवेश केला होता. सोबत आत्माराम भेंडेच होते.

या मंडळींचा दिनूच्या सासूबाई राधाबाई, हा फार्स परत यायला पाहिजे. मूळ नाटकात मनोरमा वागळे होत्या, आता निर्मिती सावंत चालेल !!

वार्‍यावरची वरात पाहिलं. आनंद इंगळे पुलंच्या वेषात झक्कास दिसत होते आणि तो गावातल्या कार्यक्रमाला जायचा प्रसंग, साक्षीचा प्रसंग त्यांनी रंगवलेही छान. "दिल देके देखो' चा प्रसंग तर झक्कासच! शिरप्या झालेल्या कलाकाराने धम्माल आणली.

कडवेकर मामी म्हणजे आतिषा नाईक. मला वाटतं ह्या नाटकाच्या काही वर्षांपूर्वीच्या प्रयोगात सुचित्रा बांदेकरने हे काम केलं होतं. तेव्हा तिचं काम आवडलं होतं आणि आतिषा नाईकचं ही आवडलं. कडवेकर मामांचा मामीने खडसावल्यावर होणारा चेहेरा अफलातून. Happy प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, सुप्रिया पाठारे, श्रीकांत मोघे, विघ्नेश जोशी, बाकी कलाकार ह्यांची साथही छान.

फक्त काही ठिकाणी म्युझिक लाऊड झाल्याने गाण्यांचे शब्द नीट ऐकू येत नव्हते. Sad तसंच १-२ वेळा नट बोलत असतानाच मागचं नेपथ्य गुंडाळलं जात होतं ते खटकलं.

आणि हो, 'दारू म्हणजे काय रे भाऊ' नव्हतं Sad

खूप महिने पहायचे राहिलेले 'नवा गडी नवं राज्य' काल पाहिलं. मस्त नाटक आहे. लग्न झाल्यानंतर 'बायकोचा मित्र' आणि 'नवर्‍याची मैत्रिण' ह्या कशा चूक वाटू लागतात, खुपायला लागतात, 'तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण...' अशा अटी कशा निर्माण होतात आणि 'ते प्रेम कुठे गेलं?' असे प्रश्न पडायला कधी आणि का पडू लागतात हे दाखवणारं हे नाटक.

उमेश कामतने टिपिकल मॅच्यअर नवरा मस्त साकारला आहे. प्रिया बापटच्या व्यक्तीमत्त्वास हा रोल एकदम फिट. बिनधास्त वावरली आहे ती नाटकात. पण धमाल आणतो तो 'हिम्मतराव'! (नाव आठवत नाही) त्याने 'बायकोचा मित्र' साकारलेला एकदम धमाल. कोणताही अभिनिवेष नसलेला, मैत्रिणीबद्दल नितांत स्नेह असलेला हिम्मतराव आतून बाहेरून एकदम पारदर्शक आणि म्हणूनच नवर्‍याला खुपणारा. 'केतकी' साकारणारी अभिनेत्री ओके.

एकंदरीत एकदम फ्रेश नाटक. एकदातरी नक्की पहावे असे.

पूनम, अगं हेमंत ढोमे आहे तो हिम्मतराव.
मलाही नाटक आवडलेलं. प्रिया बापट आणि उमेश कामत मस्त दिसतात. पण सगळ्यात जास्त आवडला तो हिम्मतराव.
बरेच दिवस झाले हे नाटक बघुन त्यामुळे अजुन तेव्हा खटकलेलं वा आवडलेलं पटकन आठवत नाहिये. नंतर आठवलं तर नक्की लिहीन.

लग्नबंबाळ पाहिल काही दिवसांपूर्वी.
नाटक मला आवडलं. एक अगदी जुन्या विचारांची, लग्न करुन सुखी होण्याची अपेक्षा असणारी मुलगी मधुरा वेलणकर ने छान उभी केलीये. आणि तिच्या विरुद्ध मतं असणारा, लग्न संस्थेत विश्वास न ठेवणार मुलगा सुबोध भावे ने मस्त साकारलाय.

पण सगळ्यात मजा आणलीये ती आनंद् इंगळेनी. त्याचा जज अफलातुन.

प्रेम करुन, लग्नाची आशा दाखवुन लग्नाला नाही म्हणणार्‍या मुलाला कोर्टात खेचल्यानंतरची गंमत जंमत नाटकात आहे. सुबोध भावे च्या कॅरेक्टरची मतं बरीच बोल्ड दाखवली आहेत.

मुलीला घेउन गेलेले पण ती लहान असल्याने तिला काही कळलं नाही म्हणुन ठिक Proud

पण न आवडलेली गोष्ट म्हणजे नाटकातुन काही कंक्लुजन निघत नाही. त्याने काही फार फरक पडत नाही म्हणा पण तरीही.

मधे १ सिनेमा आलेला 'क्षणभर विश्रांती'. सचित पाटिल, सोनाली कुलकर्णी, भरत जाधव इ. होते. त्यात हा हेमंत ढोमे होता. त्या सिनेमात तो अगदी लाजाळू मुलगा दाखवलेला. त्याच्या अगदी विरुद्ध भुमिका आहे नाटकात त्याची.

युएस ला असताना खूप मराठी सिनेमे पहायचो. Proud

Pages