Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
हिच कथा प्रियांका चोप्रा आणि
हिच कथा प्रियांका चोप्रा आणि अर्जून राजपाल यांच्या, नकाब नावाच्या सिनेमासाठी वापरली होती.
तो चित्रपट "यकीन" होता.
"नकाब" मध्ये बॉबी, अक्षय खन्ना, उर्वशी आहेत.
आभार अमित, तो मी व्होल्वो बस
आभार अमित, तो मी व्होल्वो बस मधे (अर्धवट झोपेत) बघितला होता. पण तोच ना प्लॅष्टिक सर्जरीवाला ?
>>कुणीतरी आहे तिथे, या नावाचे
>>कुणीतरी आहे तिथे, या नावाचे पण नाटक होते (याच नावाचा सिनेमा पण होता, सिनेमात अश्विनी भावे, प्रशांत दामले, आणि लागू होते.)
एक रात्र मंतरलेली का? ह्यात निळू फुलेही होते मला वाटतं. टीव्हीवर पाहिल्याचं आठवतंय. दिनेशदा, माहितीबद्दल खूप धन्स!
हर्बेरियममध्ये ‘लहानपण देगा देवा’
‘सख्खे शेजारी’ : गतरम्य सफर
‘सख्खे शेजारी’ : गतरम्य सफर
संवेदनशीलता जागविणारं ‘वा
संवेदनशीलता जागविणारं ‘वा गुरू!’ - कोणी पाहिलं का?
पाहिलं. फारसं आवडलं नाही.
पाहिलं. फारसं आवडलं नाही.
चिनूक्स, वेळ मिळाला तर थोडा
चिनूक्स, वेळ मिळाला तर थोडा खुलासा कराल का ह्याबद्दल? दिलीप प्रभावळकरांचं नाव वाचून पहायला जायचं ठरवत होते.
>> आभार अमित, तो मी व्होल्वो
>> आभार अमित, तो मी व्होल्वो बस मधे (अर्धवट झोपेत) बघितला होता. पण तोच ना प्लॅष्टिक सर्जरीवाला ? <<<
हो, तोच तो. माझ्या मते हा चित्रपट आणि ते नाटक कुठल्यातरी दुसर्याच चित्रपटाची कॉपी असावी. कारण फार वर्षापुर्वी मी एका रहस्यमय सिरियलमध्ये तंतोतंत अशीच कथा पाहिली होती.
"कॉटेज नं. ५४" हे पण एक
"कॉटेज नं. ५४" हे पण एक रहस्यप्रधान नाटक होते. नाटक साधारणच होते, पण त्यात निवेदिता जोशी-सराफने अप्रतिम काम केले होते.
‘पोपटपंची’ : पोस्ट मॉडर्न
‘पोपटपंची’ : पोस्ट मॉडर्न काळातला लोच्या
कुणी बघितलं का, पोपटपंची.
कुणी बघितलं का, पोपटपंची. समीक्षण फार चांगले आहे.
मी पाह्यलेय. धमाल आहे. पण
मी पाह्यलेय. धमाल आहे. पण डार्क आणि तिरका विनोद झेपत असेल तरच जावे कुणीही.
मी रवीवारी विक्रम गोखले-सुहास
मी रवीवारी विक्रम गोखले-सुहास जोशिंचे "कथ(the story)" हे नाटक पाहिले. दुसराच प्र्योग होता. गर्दी फार नव्हती. नाटकाचा विषय छान , वेगळा आहे. कलाकार तर काय ? जिवन्त अॅ़क्टींग म्हणजे काय ते कळते.
नीधप. ते नाटक लेखकानेच
नीधप. ते नाटक लेखकानेच दिग्दर्शित केल्याने खूप नेटके झालेय असे वाचले. बघायला कधी मिळणार कोण जाणे !
प्रज्ञा, बर्याच वर्षांनी ते दोघे एकत्र काम करताहेत. कथानक थोडक्यात लिहिणार का ? तेवढेच समाधान.
प्रज्ञा, खूप आभार! विक्रम
प्रज्ञा, खूप आभार! विक्रम गोखले-सुहास जोशी नावं ऐकून मी जायचा विचार करतच होते. आता नक्की पाहेन.
‘चौकोनी वर्तुळ’ दिर्घाकाचा ३१
‘चौकोनी वर्तुळ’ दिर्घाकाचा ३१ डिसेंबरला प्रयोग
जयवंत दळवींचं "बॅरिस्टर"
जयवंत दळवींचं "बॅरिस्टर" येतंय. दिग्दर्शन विक्रम गोखले. प्रमुख भूमिका जयंत सावरकर आणि शैलेश दातार. फक्त २५ प्रयोग (हे नाटक सुनिल बर्वेच्या हर्बेरियमतर्फे नाहिये).
दिनेशदा हि घ्या कथेचि
दिनेशदा हि घ्या कथेचि थोडक्यात कथा (the story) ----33 वर्ष संसार करून सुद्धा एकाहि विषयावर एकमत होत नाही. पण कधी घटस्फोटाचा विचार सुद्धा त्यांच्या मनात येत नाहि. कारण एकमेकांवर असलेले निस्सीम प्रेम! ह्या कथाबीजवर ह्या नाटकाचा डोलारा केवळ तीन पात्रांनी (कलाकारांनी) छान उभारलाय! नाटक कुठेहि कंटाळवाणे होत नाही.
खूप वर्षांपुर्वि मी विक्रम गोखले-स्वति चिटनिस ह्यांचे "सकेत मिलनचा " हे असेच एक अप्रतिम नाटक पाहिले होते.
नाट्यरंग : हास्यस्फोटक
नाट्यरंग : हास्यस्फोटक ‘रामनगरी
>> 33 वर्ष संसार करून सुद्धा
>> 33 वर्ष संसार करून सुद्धा एकाहि विषयावर एकमत होत नाही. पण कधी घटस्फोटाचा विचार सुद्धा त्यांच्या मनात येत नाहि. कारण एकमेकांवर असलेले निस्सीम प्रेम! <<
यात विरोधाभास आहे असे वाटत नाही का? एकमेकांची एकही गोष्ट पटत नाही, तरीही निस्सीम प्रेम ???
सध्या सिद्धार्थ जाधव
सध्या सिद्धार्थ जाधव असलेल्या महेश मांजरेकर दिग्दर्शीत नविन नाटक कुणी पाहिले का ??
पुन्हा सही रे सही छान वाट्ले
पुन्हा सही रे सही छान वाट्ले
"वा गुरु!" पाहिलं. आवडलं.
"वा गुरु!" पाहिलं. आवडलं. दिलीप प्रभावळकरांची तर "चिमणराव" ते थेट "टिपरे" आणि मुन्नाभाई पर्यंत फॅन आहेच. पण गिरिजा काटदरे ह्यांच्या सुधाताई सुध्दा आवडल्या. फक्त कॉफीशॉपमधल्या एका सीनमध्ये अतुल परचुरे पूर्णिमा तळवलकरकडे पाहण्याऐवजी प्रेक्षकांकडे पाहून संवाद का म्हणत होता कळलं नाही.
ह्यापुढे जयवंत दळवींचं "सारे प्रवासी घडीचे" रंगमंचावर येणार आहे असं "वा गुरु!"च्या जाहिरातीत खाली नमूद केलं आहे. ह्या नाटकाबद्दल काही माहिती असेल तर लिहा प्लीज.
आभार प्रज्ञा. त्या दोघांनी
आभार प्रज्ञा. त्या दोघांनी एकेकाळी राऊ आणि राधाक्का, रंगमंचावर जिवंत केले होते. अजून ते विसरु शकत नाही.
दळवींचे, सारे प्रवासी घडीचे, म्हणजे आमच्या पिढीचा मर्मबंधातला ठेवा आहे. त्याचे रंगमंचावर कसे सादरीकरण होईल, त्याची उत्सुकता आहे. त्याला समर्थ रंगकर्मी लाभो, हि सदिच्छा !
हुटुन उबो रव, म्या मेंबर असय... माय नेम नरु ! प्राईम मिनिस्टर नरु ?... पेस्तँव चा गुत्ता...
विसरता येणे कठीण...
'कट्यार काळजात घुसली' पाहीले.
'कट्यार काळजात घुसली' पाहीले. मूळ नाटक ऐकले होते (कॅसेट होत्या ). त्यामूळे थोडे तुटक तुटक वाट्ले हे नवीन व्हर्जन. सदाशिवचे लहानपण आणि पंडितजींचे पात्रच काढुन टाकले आहे. कथेतला मूळ ट्विस्ट पडद्यामागून सूत्रधाराकडून ऐकू येतो, त्यामूळे मनाची पकड घेत नाही. शेवटही परिणामकारक नाही वाटला.
सर्व गायकानी आपली जबाबदारी उत्तम पार पाडली आहे.
अश्विनी, तो प्रवेश पण
अश्विनी,
तो प्रवेश पण महत्वाचा होता (त्यात भार्गवराम आचरेकर असत ) दिन गेले भजनावीण सारे, हे त्या प्रवेशातले पद ना ? सदाशिवची दीक्षा, हा प्रसंग पण चांगला होता. मला वाटतं, गोरख कल्याण राग वापरला होता त्यात.
>>दळवींचे, सारे प्रवासी
>>दळवींचे, सारे प्रवासी घडीचे, म्हणजे आमच्या पिढीचा मर्मबंधातला ठेवा आहे
दिनेशदा, नाटक कशाबद्द्ल आहे ते सांगा ना प्लीज थोडक्यात. जाहिरातीवरून तरी आगगाडीत घडत असावं असं वाटतंय. ह्या शनिवारी शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिरला आहे. पण रात्रौ ८ ला असल्याने जायला जमणार नाही. एखादे दिवशी दुपारचा असेल तर नक्की जमवीन.
रच्याकने, सुनिल बर्वेच्या हर्बेरियम तर्फे तिसरं नाटक "हमिदाबाईची कोठी" येतंय. खरोखर, आता कुठलं नाटक पाहू आणि कुठलं नको असं झालंय अगदी
सारे प्रवासी घडीचे हे दळवींचे
सारे प्रवासी घडीचे हे दळवींचे ललित लेखन आहे कोकणातली इरसाल व्यक्तिचित्रे रंगविणारे. मूळ फॉर्म हा स्टोरीटेलिंग टाइप आहे मालगुडी डेज सारखा. त्यामुळे दिनेश ना त्याचे नाट्यरूपान्तर कसे केले असावे अशी उत्सुकता असावी कारण् त्याला कथावस्तू नाही पंचेस आहेत . त्यामुळे त्याला प्रवाहित ठेवणे हेच खरे कसब आहे...
<<सुनिल बर्वेच्या हर्बेरियम
<<सुनिल बर्वेच्या हर्बेरियम तर्फे तिसरं नाटक "हमिदाबाईची कोठी" येतंय>>
अरे वा. ओरिजनल नाटक बघितले होते.
नाना आणि नीना चे. विजयाबाई होत्याच.
पण २५ म्हणजे खुपच कमी प्रयोग होतात.
हमिदाबाईची कोठी"अनिल बर्वे च आहे का जयवन्त द्ळवीन्च?
जयवंत दळवींच्या 'सारे प्रवासी
जयवंत दळवींच्या 'सारे प्रवासी घडीचे'वर मराठी दूरदर्शन मालिकाही होणार होती. सुरुवातीच्या काही भागांचं चित्रिकरणही झालं होतं पण नंतर निर्मात्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती मालिका शब्दश: डब्यात गेली.
मी शनिवारी जाणार आहे शिवाजी मंदिरला...
Pages