रंग दे ब्संती, सलामेइश्क मधे गोर्या मॉडेल होत्याच.
एक साऊथ आफ्रिकन मॉडेल पूजा भट्टच्या रोग मधे होती
<< पण त्या तशाच रोल मधे होत्या, उगीच आणून 'गाव कि छोरी' नव्हत बनवलं त्यांना
असो, बर्बरा मोरि येइलच अता !
अरे,तुला माहित नाय बदललेला शेवट? त्या काळ्या कोटाच्या आत अभिषेक ऐवजी अमिताभ निघतो आणि तो तर देव त्याला कसं मारणार ना म्हणुन लोक त्याला सोडून देतात.अभिषेक हिरविणीबरोबर अमेरिकेस जातो आणि एक्सपोर्ट क्वालीटी माकडांची फ्याक्ट्रि टाकतो.नक्की अवॉर्ड मिळाणार ह्याला- सामाजिकता,स्पिरिच्युअलिटी, अमेरिकेचा ग्रेटनेस,भारतीय एक्झॉटीकपणा सगळे आवश्यक घटक आले की
वँटेज पॉइंट हा सिनेमा पाहिला का? एकवेळ नक्कीच पाहण्यासारखा आहे. एकच घटना वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून कशी दिसते अथवा पाहिली जाते, त्या घटनेचा होणारा परिणाम, त्या घटनेतील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग यावर हा बेतला आहे.
अमेरिकन राष्ट्राधक्षांची हत्या ही मुख्य घटना!
या चित्रपटात ही घटना वारंवार दाखवल्या गेल्या मुळे (कारण एकच घटना वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून कशी दिसते अथवा पाहिली जाते, हे दर्शवन्यासाठी) आमच्या गावच्या पब्लिक ला वाटलं की थेटरात रिळं अडकली आणि त्योच शीन सारखं सारखं दिसायलायं त्यात दोनवेळा वीजपुरवठा खंडित झाला त्यामुळे गोंधळात भर पडली!
रंगाशेठ.. हा व्हँटेज पॉईंट. एच बी ओ, किंवा स्टार मूव्हिज वर झाला का हो नुकताच..
तोच असेल तर बघितला मी.. मधूनच बघायला सुरु केल्यामुळे. काहीच टोटल लागत नव्हती.. पण एकदा टोटल लागल्यावर बरा वाटला
नायतर काय, तिला ना रूप रंग ना आकार उकार सारेगम किंवा तत्सम कार्यक्रमात सिनेमा प्रमोट करायला वगैरे येते तेव्हा सामान्य मेकप मधे तर अगदी अति सामान्य दिसते!
दीपिका इतकीही वाईट नाहिये...
बर्याच सीन्स मधे जरी ती सैफ पुढे फिकी असली तरी काही सीन्स मधे तिचा अभिनय मस्त झालाय...
उदा. ब्रेक्-अप चा सीन, एअरपोर्ट वरून सैफ शी फोन वर बोलतानाचा सीन, आणि माय फेवरिट... शेवटच्या सीन मधे सैफ ला फटके घालते तेंव्हाचं तिचं काम हे पूर्णपणे नॅचरल झालंय...
रामूदादांनी फिलीमची पाटी आल्या आल्या एक गाणं म्हणून टाकलं. तेव्हा वाटलं होतं, की नंतर सिनेम्यात घाबरवघाबरवघाबरवायचं असल्याने गाण्याला चान्स मिळणार नाही म्हणून आधीच गाणं उरकून घेतलं. प्रियांका कोठारी उरलेल्या २ तासांत 'अशी' दिसेल की नाही, हा विचार करून मीही तिला पाहून घेतलं. (नंतरही ती गाणी म्हणताना, व्यायाम करताना, नदीत पोहताना दिसतच राहिली, हे वेगळे.)
शुटिंगसाठी जंगलात आलेल्या क्र्युची ही गोष्ट. यांना पण रामूसारखाच हॉरर सिनेमा काढायचा असतो. पण त्यांचा डायरेक्टर मात्र लघुचित्रपट काढणारा 'बिचारा' अन आर्ट फिलिम काढायची असल्यागत २४ तास तोंडात पेन्सिल घेऊन विचार करीत असतो. हिरो, त्याचा अॅटेंडंट, हिर्विण, डायरेक्टर, असि. डायरेक्टर, कॅमेरामन, फाईटमास्तर अन निर्माता एवढे लोक. आता निर्माता इथे जंगलात कशाला तडफडलाय, बाकीची छोटीमोठी कामे कोण करणार, पिक्चरमध्ये हिरो हिर्विण व्यतिरिक्त पात्रेच नाहीत काय.. असे प्रश्न रामूला विचारायचे नाहीत. कारण प्रश्न न विचारण्याच्या बदल्यात तो पुढे पोट धरून धरून घाबरवणार असतो. ससे, हरीण, हत्ती असे निरूपद्रवी प्राणी, फार फार तर साप असलेल्या जंगलात ही लोके गेल्यावर अचानक एक 'अग्यात शक्ती' जागृत होते, अन एकेकाचा काटा काढायला चालू करते. या शक्तीकडून काय पुन्हा पुन्हा मारलेले दाखवायचे म्हणून काही लोक आपसांतच मारामार्या करून मरतात. (तेवढेच त्या शक्तीला काम कमी.)
हे सारे उपद्व्याप चालू असताना बॅकग्राऊंड म्युझिक, जंगलात नसलेल्या प्राण्यांचे आवाज, क्यामेर्याने आळोखेपिळोखे देत काढलेले झाडे अन जंगलातले सीन्स, उगीच 'भॉ' करणे इत्यादी सारे चाललेलेच असते. काही काही ठिकाणी रामू केव्हा 'भॉ' करणार आहे, ते सुद्धा दोन मिनिटे आधीच कळते. हे सारे 'भॉ' घाबरवण्यासाठी केलेले नसून निखळ करमणूकीसाठी, हसविण्यासाठी केलेले आहेत असे कळू लागणार, तेवढ्यात रामू 'अग्यात २ - कमिंग सुन' ची पाटी दाखवून, आता घरला जावा म्हणून, हात झटकत मोकळा होतो. ती अग्यात शक्ती कोण, अन कशी, तिचा हेतू नक्की काय, तिला प्रियांका कोठारी आवडत नाही काय.. ते सारे गुलदस्त्यात!
हा रामू म्हणजे कंपनी, कौन, रंगीला, सरकार वाला रामू नसून त्याचा कुणीतरी ड्युप्लिकेट आयडी असावा असा विचार करीत, नानाची टांग.. च्या बैलाला.. वगैरे घोकत मी बाहेर पडतो. ह्या ड्युप्लिकेट रामूच्या फिल्मा पुन्हा पाहायच्या नाहीत असाही विचार करतो. पण तेवढ्यात ती मनोरंजक अग्यात शक्ती आठवते. या अग्यातमध्ये तिच्याबद्दल काहीच कळले नाही, पुढच्या अग्यात मध्ये तरी कळेल. तेवढा एक पाहू, नंतर रामू बंद; असे ठरवतो. आज गेलेले दोनशे रुपये वसूल व्हायला नकोत का?
झकास,<<उगीच 'भॉ' करणे ,पुढे पोट धरून धरून घाबरवणार असतो.
तिला प्रियांका कोठारी आवडत नाही काय..>> आवडून कशी चालेल,नायतर पार्ट टू मदे कोन भेटणार याला?
निशा कोठारीची प्रियांका का झाली हे ही अग्यातच आहे. पुढील भागात 'आग्या'वेताळाशी कायतर लिंक लावणार हा.
एका चांगल्या सिनेमानंतर रामूला स्मृतीभ्रंश होऊन तो किमान दोन वाईट सिनेमे टाकतो हा नेहमीचा अनुभव आहे,रंगीला नंतर दौड,सरकार नंतर आग इ.इ.
बाकी स्वाईन फ्लू असो वा नसो,असला सिनेमा पाहयला जाताना तोंड लपवण्यासाठी मास्क पायजेच!
बाकी स्वाईन फ्लू असो वा नसो,असला सिनेमा पाहयला जाताना तोंड लपवण्यासाठी मास्क पायजेच! >>>
हेच, हेच. हेच लिहायचे होते मला. पण अग्यात शक्तीच्या प्रभावामुळे विसरलो. मी 'लिटरली' तोंड लपवत बाहेर पडलो. अगदी, 'लक'च्या वेळेस लपवले होते तस्सेच.
साजिर्या...
धन्स रे तुला परिक्षण लिहिण्यासाठी इतका भयाण सिनेमा बघितल्याबद्दल.. आम्हाला सावध केल्याबद्दल आणि भयाण सिनेमावर धम्माल परीक्षण लिहून करमणूक केल्याबद्दल...
आगावा गेले काही सिनेमे तो ठरवून आणि हटकून वाईट देतोय ही उबळ कुठल्या चांगल्यानंतरची बाबा?
रंग दे ब्संती, सलामेइश्क मधे
रंग दे ब्संती, सलामेइश्क मधे गोर्या मॉडेल होत्याच.
एक साऊथ आफ्रिकन मॉडेल पूजा भट्टच्या रोग मधे होती
<< पण त्या तशाच रोल मधे होत्या, उगीच आणून 'गाव कि छोरी' नव्हत बनवलं त्यांना
असो, बर्बरा मोरि येइलच अता !
अरे,तुला माहित नाय बदललेला
अरे,तुला माहित नाय बदललेला शेवट? त्या काळ्या कोटाच्या आत अभिषेक ऐवजी अमिताभ निघतो आणि तो तर देव त्याला कसं मारणार ना म्हणुन लोक त्याला सोडून देतात.अभिषेक हिरविणीबरोबर अमेरिकेस जातो आणि एक्सपोर्ट क्वालीटी माकडांची फ्याक्ट्रि टाकतो.नक्की अवॉर्ड मिळाणार ह्याला- सामाजिकता,स्पिरिच्युअलिटी, अमेरिकेचा ग्रेटनेस,भारतीय एक्झॉटीकपणा सगळे आवश्यक घटक आले की
ग्रेसी सिंगचा एक उल्लेखनीय
ग्रेसी सिंगचा एक उल्लेखनीय शिणुमा म्हन्जी 'देशद्रोही'
त्यात ग्रेसी सिंगने मोटरसायकलवरुन हिंडणार्या टपोरी मुलीचा रोल केलाय. 
आपल्याला तर ती हरलीन कौर लै आवडली बुवा.. ब्राझिलिअन असून कुठेही ती अ-भारतीय वाटली नाही (अभिनयाच्या बाबतीत).
देशद्रोही मधे ग्रेसी आहे
देशद्रोही मधे ग्रेसी आहे का?
मित्राकडून ऐकलं होतं की क्यायच्या क्याय आहे सिनेमा...
या वीकेंड ला बघायचं म्हणतोय...
वँटेज पॉइंट हा सिनेमा पाहिला
वँटेज पॉइंट हा सिनेमा पाहिला का? एकवेळ नक्कीच पाहण्यासारखा आहे. एकच घटना वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून कशी दिसते अथवा पाहिली जाते, त्या घटनेचा होणारा परिणाम, त्या घटनेतील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग यावर हा बेतला आहे.
अमेरिकन राष्ट्राधक्षांची हत्या ही मुख्य घटना!
या चित्रपटात ही घटना वारंवार दाखवल्या गेल्या मुळे (कारण एकच घटना वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून कशी दिसते अथवा पाहिली जाते, हे दर्शवन्यासाठी) आमच्या गावच्या पब्लिक ला वाटलं की थेटरात रिळं अडकली आणि त्योच शीन सारखं सारखं दिसायलायं
त्यात दोनवेळा वीजपुरवठा खंडित झाला त्यामुळे गोंधळात भर पडली!
थेटरात रिळं अडकली >
थेटरात रिळं अडकली >

सामाजिकता,स्पिरिच्युअलिटी, अमेरिकेचा ग्रेटनेस,भारतीय एक्झॉटीकपणा सगळे आवश्यक घटक आले की>>>
पाहणार पाहणार लआक. धन्यवाद रिव्ह्यु टाकणारे लोक्स.
आगाऊ, एक क्षण मला खरंच वाटलं
आगाऊ, एक क्षण मला खरंच वाटलं
थेटरात रिळं अडकली आणि त्योच शीन सारखं सारखं दिसायलायं >>>
रच्याकने, 'युवा'मध्येही तसंच आहे ना?
रंगाशेठ.. हा व्हँटेज पॉईंट.
रंगाशेठ.. हा व्हँटेज पॉईंट. एच बी ओ, किंवा स्टार मूव्हिज वर झाला का हो नुकताच..
तोच असेल तर बघितला मी.. मधूनच बघायला सुरु केल्यामुळे. काहीच टोटल लागत नव्हती.. पण एकदा टोटल लागल्यावर बरा वाटला
लव्ह आज कल मी पाहिला नाहीये,
लव्ह आज कल मी पाहिला नाहीये, पण कुठे कुठे प्रोमोज पाहिलेत. दीपिका अतिशय सामान्य दिसते. सैफ ला अजिबात शोभत नाही. या बाबतीत dj ला मोदक.
माझ्या प्रत्येक पोस्ट नंतर "
माझ्या प्रत्येक पोस्ट नंतर " संपादन " असं का येतं ?
>>>माझ्या प्रत्येक पोस्ट नंतर
>>>माझ्या प्रत्येक पोस्ट नंतर " संपादन " असं का येतं ?
कारण, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमची पोस्ट परत संपादित करू शकता यासाठी ही सुविधा आहे.
himscool, हो व्हँटेज पॉईंट परवा बहुदा एच बी ओ वर आला होता.
हायला... या बाफवरती दिपीकाचे
हायला... या बाफवरती दिपीकाचे एवढे दुश्मन आहेत??? दिपीका सामान्य, लंबुळकी वगैरे???हा हंत हंत... (सर्वांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर उघडावे का या विचारात असलेली बाहुली)
नायतर काय, तिला ना रूप रंग ना
नायतर काय, तिला ना रूप रंग ना आकार उकार
सारेगम किंवा तत्सम कार्यक्रमात सिनेमा प्रमोट करायला वगैरे येते तेव्हा सामान्य मेकप मधे तर अगदी अति सामान्य दिसते!
नायतर काय, तिला ना रूप रंग ना
नायतर काय, तिला ना रूप रंग ना आकार उकार>>>> :(:राग: :(:राग: :(:राग: :(:राग:
>> थेटरात रिळं अडकली एकच
>> थेटरात रिळं अडकली
एकच घटना वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून दाखवल्यामुळे 'वँटेज पॉइंट' थोडातरी 'उल्लेखनीय' झालाय. नाहीतर कथेत काही वेगळेपण नाही.
मलाही खूप आवडला होता वँटेज
मलाही खूप आवडला होता वँटेज पॉईंट.
या weekend साठी काही इंग्रजी
या weekend साठी काही इंग्रजी / हिंदी / मराठी सिनेमे सुचवा. हलकेफुलके, जास्त डोक्याला ताण न येणारे
दीपिका बद्दल अनुमोदन. तिच्या
दीपिका बद्दल अनुमोदन. तिच्या पेक्षा चान्ग्ल्या नाकी डोळी नीट्स मुली आपल्या कडे नक्कि आहेत. धुणे वाळीत घालायची काठी निव्व्ळ.
दीपिका इतकीही वाईट
दीपिका इतकीही वाईट नाहिये...
बर्याच सीन्स मधे जरी ती सैफ पुढे फिकी असली तरी काही सीन्स मधे तिचा अभिनय मस्त झालाय...
उदा. ब्रेक्-अप चा सीन, एअरपोर्ट वरून सैफ शी फोन वर बोलतानाचा सीन, आणि माय फेवरिट... शेवटच्या सीन मधे सैफ ला फटके घालते तेंव्हाचं तिचं काम हे पूर्णपणे नॅचरल झालंय...
अर्रर्र. इथं काहीतरी भुताटकी
अर्रर्र. इथं काहीतरी भुताटकी आहे. मधल्या १०-५ पोष्टी उडाल्यात. कळलं का कुणाला?
(राम गोपाल वर्मा येऊन गेला की काय?)
धुणे वाळीत घालायची काठी
धुणे वाळीत घालायची काठी निव्व्ळ.
>> नाही.. ती काठी म्हणजे करीना आहे.
करीना धुणं वाळत घालायची काठी
करीना धुणं वाळत घालायची काठी तर दिपीकाला हीरकूट म्हणायला पाहिजे.:फिदी:
करीना धुणं वाळत घालायची काठी
करीना धुणं वाळत घालायची काठी तर दिपीकाला हीरकूट म्हणायला पाहिजे.
>>>
आमचा एक मित्र म्हणायचा "चिमटे
आमचा एक मित्र म्हणायचा "चिमटे काढायला लागतील! " वाइट वाट्ले तर पोष्ट उड्वा बरे.
आताच 'अग्यात' (अज्ञात) पाहून
आताच 'अग्यात' (अज्ञात) पाहून आलो, मास्क लावून.
रामूदादांनी फिलीमची पाटी आल्या आल्या एक गाणं म्हणून टाकलं. तेव्हा वाटलं होतं, की नंतर सिनेम्यात घाबरवघाबरवघाबरवायचं असल्याने गाण्याला चान्स मिळणार नाही म्हणून आधीच गाणं उरकून घेतलं. प्रियांका कोठारी उरलेल्या २ तासांत 'अशी' दिसेल की नाही, हा विचार करून मीही तिला पाहून घेतलं. (नंतरही ती गाणी म्हणताना, व्यायाम करताना, नदीत पोहताना दिसतच राहिली, हे वेगळे.)
शुटिंगसाठी जंगलात आलेल्या क्र्युची ही गोष्ट. यांना पण रामूसारखाच हॉरर सिनेमा काढायचा असतो. पण त्यांचा डायरेक्टर मात्र लघुचित्रपट काढणारा 'बिचारा' अन आर्ट फिलिम काढायची असल्यागत २४ तास तोंडात पेन्सिल घेऊन विचार करीत असतो. हिरो, त्याचा अॅटेंडंट, हिर्विण, डायरेक्टर, असि. डायरेक्टर, कॅमेरामन, फाईटमास्तर अन निर्माता एवढे लोक. आता निर्माता इथे जंगलात कशाला तडफडलाय, बाकीची छोटीमोठी कामे कोण करणार, पिक्चरमध्ये हिरो हिर्विण व्यतिरिक्त पात्रेच नाहीत काय.. असे प्रश्न रामूला विचारायचे नाहीत. कारण प्रश्न न विचारण्याच्या बदल्यात तो पुढे पोट धरून धरून घाबरवणार असतो. ससे, हरीण, हत्ती असे निरूपद्रवी प्राणी, फार फार तर साप असलेल्या जंगलात ही लोके गेल्यावर अचानक एक 'अग्यात शक्ती' जागृत होते, अन एकेकाचा काटा काढायला चालू करते. या शक्तीकडून काय पुन्हा पुन्हा मारलेले दाखवायचे म्हणून काही लोक आपसांतच मारामार्या करून मरतात. (तेवढेच त्या शक्तीला काम कमी.)
हे सारे उपद्व्याप चालू असताना बॅकग्राऊंड म्युझिक, जंगलात नसलेल्या प्राण्यांचे आवाज, क्यामेर्याने आळोखेपिळोखे देत काढलेले झाडे अन जंगलातले सीन्स, उगीच 'भॉ' करणे इत्यादी सारे चाललेलेच असते. काही काही ठिकाणी रामू केव्हा 'भॉ' करणार आहे, ते सुद्धा दोन मिनिटे आधीच कळते. हे सारे 'भॉ' घाबरवण्यासाठी केलेले नसून निखळ करमणूकीसाठी, हसविण्यासाठी केलेले आहेत असे कळू लागणार, तेवढ्यात रामू 'अग्यात २ - कमिंग सुन' ची पाटी दाखवून, आता घरला जावा म्हणून, हात झटकत मोकळा होतो. ती अग्यात शक्ती कोण, अन कशी, तिचा हेतू नक्की काय, तिला प्रियांका कोठारी आवडत नाही काय.. ते सारे गुलदस्त्यात!
हा रामू म्हणजे कंपनी, कौन, रंगीला, सरकार वाला रामू नसून त्याचा कुणीतरी ड्युप्लिकेट आयडी असावा असा विचार करीत, नानाची टांग.. च्या बैलाला.. वगैरे घोकत मी बाहेर पडतो. ह्या ड्युप्लिकेट रामूच्या फिल्मा पुन्हा पाहायच्या नाहीत असाही विचार करतो. पण तेवढ्यात ती मनोरंजक अग्यात शक्ती आठवते. या अग्यातमध्ये तिच्याबद्दल काहीच कळले नाही, पुढच्या अग्यात मध्ये तरी कळेल. तेवढा एक पाहू, नंतर रामू बंद; असे ठरवतो. आज गेलेले दोनशे रुपये वसूल व्हायला नकोत का?
झकास,<<उगीच 'भॉ' करणे ,पुढे
झकास,<<उगीच 'भॉ' करणे ,पुढे पोट धरून धरून घाबरवणार असतो.
तिला प्रियांका कोठारी आवडत नाही काय..>> आवडून कशी चालेल,नायतर पार्ट टू मदे कोन भेटणार याला?
निशा कोठारीची प्रियांका का झाली हे ही अग्यातच आहे. पुढील भागात 'आग्या'वेताळाशी कायतर लिंक लावणार हा.
एका चांगल्या सिनेमानंतर रामूला स्मृतीभ्रंश होऊन तो किमान दोन वाईट सिनेमे टाकतो हा नेहमीचा अनुभव आहे,रंगीला नंतर दौड,सरकार नंतर आग इ.इ.
बाकी स्वाईन फ्लू असो वा नसो,असला सिनेमा पाहयला जाताना तोंड लपवण्यासाठी मास्क पायजेच!
बाकी स्वाईन फ्लू असो वा
बाकी स्वाईन फ्लू असो वा नसो,असला सिनेमा पाहयला जाताना तोंड लपवण्यासाठी मास्क पायजेच! >>>
हेच, हेच. हेच लिहायचे होते मला. पण अग्यात शक्तीच्या प्रभावामुळे विसरलो. मी 'लिटरली' तोंड लपवत बाहेर पडलो. अगदी, 'लक'च्या वेळेस लपवले होते तस्सेच.
साजिर्या... धन्स रे तुला
साजिर्या...

धन्स रे तुला परिक्षण लिहिण्यासाठी इतका भयाण सिनेमा बघितल्याबद्दल.. आम्हाला सावध केल्याबद्दल आणि भयाण सिनेमावर धम्माल परीक्षण लिहून करमणूक केल्याबद्दल...
आगावा गेले काही सिनेमे तो ठरवून आणि हटकून वाईट देतोय ही उबळ कुठल्या चांगल्यानंतरची बाबा?
हम्म, त्याचा यावेळचा झटका जरा
हम्म, त्याचा यावेळचा झटका जरा जास्त दिवस टिकलाय हे खरयं,जरा बर्यापैकी सरकार राज नंतर फूंक,आणि आता हे.
सावध रहा... थोड्याच दिवसात
सावध रहा...
थोड्याच दिवसात त्याचा 'रण' येणारे...
Pages