निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खायच्या पानांची वेल घरातल्या कुंडीत वाढते का? त्याची रोपं कुठे मिळतील?

नर्सरीतही मिळतात. मी खुप नर्सरीत पाहिलीत. अर्थात ते दोनच पाने असलेला वेल देतात. पण वेल वाढतो भराभर.

चातकभौ, तुम्हाला काय माहिती पाहिजे एरंडाबद्दल? उन्हाळ्यात मुलांच्या आणि मोठ्यांच्याही डोक्यावर त्याचे पान ठेवतात, त्याच्या बिया थोड्या विषारी असु शकतात, एरंड कुठेही कसाही वाढतो, मराठीत काही मौलिक वाक्प्रचार एरंडावरुन आहेत, ज्यांचा आया वेळोवेळी उपयोग करतात इ.इ. माहिती मला आहे Proud

तुम्हाला जट्रोफाबद्दल माहिती पाहिजे काय? पण जट्रोफा म्हणजे आपल्याला इकडे तिकडे दिसते तो एरंड नाही. त्याची माहिती पाहिजे अस्ल्यास इथे पाहा http://www.jatrophabiodiesel.org

सप्तपर्णीसारखेच एक झाड असते. त्याला पाच पाने असतात. त्याला पांढरट फूले येतात. आणि सावरीसारखीच बोंडे लागतात. त्यातून कापूसही निघतो. त्याची वाढ पातळ्या पातळ्यात होते. म्हणजे एक मूख्य खोड आणि ठराविक उंचीवर एकाच पातळीत गोलाकार पसरलेली असतात.>>> दिनेशदा हिच झाडं मी म्हणत होते. ती ठाण्यात माजीवड्यात खुपच होती आता तोडली आहेत, पण तरी थोडीफार आहेत. यावर तांबट आणि पोपट खुप येतात.

आज सक्काळीच क्यामेरा घेऊन निघाले. एक अख्खा रस्ता कवर केला आणि उत्साहाने घरी परतले. तोपर्यंत ऑफिसला निघायची वेळ झालेली म्हणुन मेमरी कार्ड आणि कार्ड रिडर घेऊन अधीरपणे इथे आले आणि कार्ड रिडर लावुन पाहते तो काय??? ऑफिसात कार्ड रिडर बॅन.. Angry गेल्या आठवड्यापर्यंत सगळे ठिकठाक होते, आज चालत नाहीये... Sad

रच्याकने, पंचकर्णीची १०-१२ झाडे महापेच्या लोकमत कार्यालयासमोर आज येताना पाहिली. दुपारी जाऊन मोबाइलवर कैद करते आणि रात्री डकवते इथे. आज रात्री सकाळचे सगळे फोटो डकवायचाच उद्योग करणार आहे. जागु, सप्तपर्णीच्या शेंगाही कैद केल्यात आणि सावलीसाठी काटेसावरीची बाळ, नुकतीच वयात आलेली आणि चांगली प्रौढ अशी तिन्ही रुपे.. चक्क फुलेही आलीत काटेसावरीला. काल मी पाहिलीच नाही.

लेखन मी कागदावर उतरवायच्या आधी ते डोक्यात लिहिले जाते आणि ते तिथे एकदा लिहुन झाले की परत कॉपी करायचा उत्साह ओसरतो. ते डोक्यातच लिहित असताना हातात रेकॉर्डर घेऊन बोलत बसले तर काहीतरी लिखाण होईल हातुन.... Happy तुला खोटे वाटेल पण ह्या दोन महिन्यात कमीतकमी १० लेख तरी झाले माझे डोक्यात लिहुन.. आणि मी खरेच मनातल्या मनात बोलत फिरत असते. पण ते बोलणे एकदा संपले की मग हाताने नाही काढवत लिहुन... असेच दोन-चार दिवस गेले की वाटते, जाऊदे, कोण वाचेल हे च-हाट, कशाला उगाच लिहायचे ?????

कोकणात बकुळीला ओवळीणच म्हणतात.. >> आणि याची फळे पण फार छान लागतात. पण पिठूळ असतात. एकदम खाल्ल्यास घशात पिठूळ गर अडकतो. कोकणात आमच्या शाळेत जायच्या वाटेवर याचं झाड होत. शाळेत जाताना आमचा जास्तीत जास्त वेळ ही फळे गोळा करून खाण्यातच जात असे, व शाळेत गेल्यावर ऊशीर झाल्याबद्द्ल हातावर पट्टीचा प्रसादही दररोज घेतलेला आहे.
असचं एक आटकं(कोकणात त्याला हे नाव आहे ) नावाच एक झाड आमच्या शाळेत जायच्या वाटेवर होत. तिथेही आमची वानरसेना त्या आंबट फळांवर तुटून पडायची. कोकण्यांना नक्की माहीत असेल.
जमल्यास फोटो व माहीती द्यावी.

शोभा आठवणी जागा केल्यास. अम्ही शाळेत जाताना रस्त्याच्या कडेला घाणेरीची भरपुर झाडे होती. त्या घाणेरीला फळे येतात. ती पिकली की काळी कुळकुळीत होतात. खायला गोड आणि थोडी पिठूळ. पण त्याचा वास अजुनही जिवंत आहे मनात.
अजुन छोटी फळे असायची ती कुणाच्या वाडीत वगैरे मिळायची त्याला अस्वने म्हणतात. परवाच मी कच्च्या अस्वनांचा फोटो काढला आहे. वॉकला गेले तेंव्हा दिसले झाड. ही फळेही खुप गोड आणि थोडी पिठूळ असतात. झाडावरुन ती खाली पडतात पिकली की. लहानपणी आम्ही चिल्लर कंपनी खुप खायचो हा रानमेवा.

Aswane1.JPGAswane.JPG

कोकणात आमच्या अंगणात गुलबक्षी राणी कलरची, पिवळ्या पाकळ्यांवर छोटे छोटे लाल ठिपके, पिवळ्या पाकळ्यांवर भरपूर चॉकलेटी ठिपके, अशा विविध रंगांची होती. माझी आई संध्याकाळी फुले फुलल्यावर फुलांचे देठ एकमेकात गुंफून छान वेणी करायची, आणि आम्ही खूप आनंदाने ती आमच्या वेणीवर माळायचो.
कोर्‍हांटीपण पिवळी, पांढरी, व निळी होती. आम्ही संध्याकाळी त्याच्या कळ्या काढून आईला द्यायचो, व आई दोर्‍याचे वेढे घेऊन त्यांची रंगीबेरंगी वेणी करायची. ती वेणी गोल करून फुलांच्या देठावर वाटी ठेवायची म्हणजे फुले जास्त फुलत नाहीत. दुसर्‍या दिवशी अर्धवट फुललेल्या कळ्यांची वेणी खूपच छान दिसायची. (व आमची वेणी सुद्धा).
गेले ते दिन गेले.

खाउच्या पानाबद्दल >> पानाचे टोक काढूनच पान खावे.वेलाला नागवेल म्हणतात कारण मळ्यात सापांचा जास्त वावर असतो.त्यांचे विषारी अंश पानाच्या टोकाला जमा होण्याची शक्यता असते.(पाने वेलीला खालच्या दिशेने झुकलेली अस्तात.)

.

माधव तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. वरच्या फोटोत घाणेरी नाही ते अस्वन आहे. घाणेरी वेगळी बारिक फुलांची.

पावडर पफचे झाड, पुण्यात पौडरोडला माधवबाग सोसयटी आहे, तेथे आहे. तसेच त्याला लागूनच एक झाड आहे, त्याची फुले कागदी असल्यासारखी वाटतात. फुलाची रचना एक छोटी बशी, त्यात ऊभी असलेली छोटी छोटी लांबट फुले अशी आहे. अशी फुले मी प्रथमच पाहिली.

कोकणात ओवळदोडा पिठूळ फळ होते. ते सुधा आम्हि फार आवडीने खायचो. तसेच कवठी चाफ्याचे झाड होते. शोभा१२३ आठवतेय का?

प्रज्ञा कवटी चाफा दोन प्रकारचे माहीत आहेत मला. एक पिवळा आणि एक पाढरा.

ही बघा घाणेरी. पहीला रस्त्यला ही पांढरी आणि केशरी लाल रंगाची असायची. आता ह्या घाणेरीत बरेच कलर असतात. निळा, पिवळा रंगही असतो.
ghaneri.JPG

बर्‍याच गप्पा मारताय कि रे.
कोकणात अजूनही रानमेवा ठिकठिकाणी विकायला असतो. पण आता त्याची माहिती असणारे रसिकच उरले नाहीत. हिरवट काळी जगमं, पांढरट गुलाबी तोरणं, लाल काळे हाशाळे, चंदेरी गुलाबी नेर्ली, चॉकलेटी अळूची फळे..
आमचा सगळा ग्रूप, ज्यात जी एस, आरती, नलिनी, गिर्‍या असे बरेच जण होते, एकदा ट्रेकला गेलो होतो. तिथे फळांनी लगडलेला नेर्लीचा वेल मला दिसला. मग मी थोडीच सोडणार ? पण नवल म्हणजे, येण्याजाण्याच्या वाटेवर असूनही, ती फळे कुणी तोडली नव्हती. असेच मला आणि गिर्‍याला, गोव्यात तोरणं लगडलेले झाड दिसले होते. चोर्ला घाटात मोठी उंबरे लगडलेले झाड दिसले होते.

घाणेरी च्या फळांचा वापर दृष्ट काढण्यासाठी पण करतात. माकडे, हरणं वगैरे ती फळे आवडीने खातात. पण घाणेरी ने आता भारतातील अनेक जंगलाचा ताबा घेतलेला आहे. तिची वाढ प्रचंड प्रमाणात होते. आणि प्रसारही फार झपाट्याने होतोय. हे तण आपल्याकडे बाहेरून आलेय, आणि अगदी प्रतिकूल हवामानातही तग धरते (मारुति चितमपल्ली यांना देखील हि चिंता वाटते ) आता एखादा जैविक अपघातच या तणाचा नायनाट करु शकेल.

पावडर पफ चा फोटो इथेच मागच्या पानावर आहे की.
शोभाने वर्णन केलेले फूल कुठले, बघायला पाहिजे.
पानांवरच्या शिरा आणि खास करुन टोकं हि त्यावर पडलेले पाणी लगेच ओघळून जावे, यासाठी केलेली सोय आहे. पानांना पाणी हवे असते पण ते त्यांना देठाकडून यायला हवे असते. पानावर पडलेले पाणी ती शोषून घेउ शकत नाहीत. उलट त्या पाण्यांमूळे त्याच्या कार्बन डाय ऑक्साइड शोषणाला आणि प्रकाश संश्लेषण करायला अडथळाच होतो. तूम्ही एक बघितलेले असेल. पान जरा जून झाले, कि त्याचे टोक हमखास जमिनीच्या दिशेने वळलेले असते.

साधना खरंच तुम्हि लिहायला सुरुवात कराच. तुमचे बालपणीच्या आठ्वणी पाहाता मला असे वाटतेय, कि आपले बालपण बहुदा जवळपास्च्या गावातिलच असणार आहे.

आमचा सगळा ग्रूप, ज्यात जी एस, आरती, नलिनी, गिर्‍या असे बरेच जण होते, एकदा ट्रेकला गेलो होतो. तिथे फळांनी लगडलेला नेर्लीचा वेल मला दिसला

तो ट्रेक कसला, ट्रेकतज्ज्ञांच्या मते ती पिकनीकच झालेली .. सोबत एक पक्षीतज्ज्ञ आणि एक वनस्पतीतज्ज्ञ.... Happy किती नेर्ली (आंबोलीला त्यांना नेरडा म्हणत) खाल्ली त्या दिवशी... Happy सॉल्लीड मजा आलेली. आजही आम्ही त्या ट्रेकच्या आठवणी काढतो..

जिज्ञासूंनी ट्रेकबद्दल इथे वाचुन वर्चुअल गिरीभ्रमणाचा आनंद मिळवावा. Happy
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/138530.html?1207817215

आणि याची फळे पण फार छान लागतात. पण पिठूळ असतात. एकदम खाल्ल्यास घशात पिठूळ गर अडकतो
गेली कित्येक वर्षे ही फळे शोधतेय मी. मुंबईत बकुळ आहे पण अभावानेच.... इथे बेलापुर गावातल्या राम मंदिरासमोर मोठे झाड आहे बकुळीचे. पण फळे खायचे भाग्य अजुन लाभले नाही. वाडीला खाल्लेली ती सुंदर शेंदरी रंगाची फळे, त्याचा स्वाद हल्लीहल्लीपर्यंत जीभेवर होता. आता मात्र विसरायला लागलेय. पुर्ण विसरायच्या आधी परत कुठुनतरी मिळवुन खायलाच हवीत.

जागु कवटी चाफा नाही गं कवठी चाफा. हा चाफा अगदी गोल असतो. गावठी अंड्याच्या आकाराचा. अंड्याला कोकणात कवठ म्हणतात म्हणुन हा कवठी चाफा.

अजुन एक चाफा आहे ज्याला भुईचाफा म्हणतात. याला अवर्णनीय असा स्वर्गिय सुगंध आहे. आणि हा खरोखरच थेट भुईतुन वर येतो. याचे खोड जमिनीखाली असते आणि फुलांच्या मोसमात थेट जमिनीतुन लहानसा देठ आणि त्यावर फुल असा चाफा फुलतो. मी वाडीला राहात असताना घरासमोरील एका बाईच्या घरी भुईचाफे यायचे. त्याचे एकुण स्वरुप लक्षात घेता हा चाफा आता इतिहासजमा झाला असणार Sad मी खुपजणांना विचारले पण असले फुल अस्तित्वात होते हेही ब-याच कोकणी मंडळींना माहित नाहीय. एका कथेत याचा उल्लेख वाचलेला. मातीतुन येऊनही अंगावर अजिबात मातीचे डाग पडु न देणारा चाफा.....

हिरवा चाफा पाहिला असेल ब-याच जणांनी. दिसतो सुंदर पण याला अतिशय तीव्र वास असतो. याच्या सानिध्यात राहिल्यास पाच मिनिटांत डोकेदुखी सुरू व्हायची खात्री Happy

लांजा तालुक्यात भुइचाफा असायचा. तसेच उन्हाळ्यात काजुच्या बिया अशाच पडून गेलेल्या असत त्यांना पऊस पडल्यानंतर जमिनीतुन कोवळे कोंब यायचे व त्यावर हिरव्या रंगाचे काजु यायचा. ते खाण्यासाठी काजुच्या झाडाखाली आम्ही रेंगाळायचो. ह्या धाग्याच्या निमिट्ताने हे सर्व परत एकेक करुन आठवायला लागले. जागु, त्याबद्द्ल तुमचे विशेष आभार!

http://www.maayboli.com/node/21956

थोडेफार लिहिलेय... उद्या जमले तर अजुन थोडे फोटो टाकेन.

प्रज्ञा.... मस्त गं..
बी रुजुन वर येते तेव्हा दोन पाने घेऊन वर येते. पानाच्या खाली द्विदल बियाची दोन दले असतात. थोडे दिवस ती पानांना अन्न पुरवतात. अजुन दोनचार पाने येऊन रोप स्वतःचे अन्न स्वतःच बनवु लागले की ती बियाची दले गळुन पडतात.
ती दले तुम्ही खायचा Happy गोड लागत असणार.. त्या वयात अकस्मात खायला मिळालेले सगळेच गोड लागते.

भुईचाफा आहे साधना अजून गोव्यात. तो कूंडीत पण वाढू शकतो. फक्त वर्षभर ती कुंडी पडीक ठेवावी लागते. हिरव्या चाफ्याचा आणखी एक प्रकार आहे. त्याला घोसाने फूले लागतात. हिरवीच असतात. त्याचा वास फार छान असतो. गाडीत एखादी फांदी ठेवली तर एअर फ्रेशनर चे काम करते.
हिरव्या चाफ्याचे सकर टाईप झाड असते पण हा दुसरा प्रकार मात्र भक्कम बूंध्याचा असतो.

भुईचाफ्यासारखाच एक प्रकार बर्फाळ प्रदेशात उगवतो. बर्फ वितळू लागल्याबरोबर हि जांभळी फूले दिसतात. ती बर्फाच्या खाली फूललेल्या अवस्थेतच असतात.

Pages