निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण बुंधा ताठ व हिरवा हे वर्णन सप्तपर्णीचे आहे
बरोबर.. सप्तपर्णीच आहे ती (शेफ्लेरा).

अरुंधती, भजी कशी करतात? कोथिंबिरीसारखी चिरुन टाकायची की ओव्यासारखी बुडवुन तळायची.

ओव्यावरुन आठवले. जागुने पोपटीच्या पाकृत टाकलेली भांबुर्ड्याची पाने ही बहुतेक ओव्याच्या कुळातली असावित. यांच्या झुडपांच्य बाजुने जरी गेले तरी ओव्याचा वास येतो.

माधव, कोवळी पाने तिखट असतात हो, माझे तोंड भाजलेय त्यामुळे मी विसरणार नाही Proud

साधना, ओव्याचा गंध हा त्या कूळाबाहेर पण दत्तक गेलाय. ओव्याची पाने म्हणून ज्याची भजी करतात, (बदामाकृती, जाड पांढरट पाने.) ते झाड काही ओव्याचे नसते. ओवा, धण्या जिर्‍याच्या कूळातला म्हणून त्याचे झाड तसेच असते.
माईनमूळ्यांच्या पानांना पण तसाच वास येतो आणि नायजेरियात मटणाबरोबर सेंट लीफ म्हणून एक पाला वापरतात, त्याला पण तसाच वास येतो.

अरुंधती, ती एक जूनी रेसिपी आहे. त्याला काहितरी खास नाव आहे. रुचिरा मधे आहे बहुतेक.

साधना, ओव्यासारखी बुडवून तळायची.... पानांच्या नैसर्गिक तिखट चवीमुळे स्स्स हाऽऽ चव येते, आणि मस्त कुरकुरीत होतात.

ही नागवेलीची पान जरा तिखटच आहे. पण तोंडात टाकल्यावर लगेचच विरघळते. इथे बहुतेक लोकांचा टाइमपास असतो ही पान खाण्याचा. माझ्या घराजवळच्या सगळ्या बायका खाली जमतात आणि पान कात चुना इतकेच टाकून खातात. ह्या लोकांच्या खाण्यामध्ये भरपूर कॅलशियम असते.

साधना दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे ओव्याच्या त्या झाडला ओवा लागत नाही. पण ओव्याचा छान वास येतो अगदी पन तोडल तरी ओव्याचा छान वास दरवळतो. माझ्या कुंडीत आहे हे झाड.
Ova.JPGOva1.JPG

मी म्हणतेय त्या सावरीच्या झाडाचे फोटो मला सापडले तर टाकेन दोन चार दिवसात. त्याला काटे नव्हते असं वाटतय. सप्तपर्णी असेल तर त्याला ही सावरीसारखी बोंड असतात का?

खुप लहान्पणी नागवेलीची पानं आंबोळ्यात घातलेली आठवताहेत मला.

सप्तपर्णी असेल तर त्याला ही सावरीसारखी बोंड असतात का

नाही, त्याला अगदी पातळ अर्धा फुट लांब हिरव्या शेंगा येतात. सध्या सप्तपर्णीची झाडे शेंगांवर आलीत. काल ठाण्यात गेलेले तेव्हा एका रस्त्यावर दुतर्फा सप्तपर्णी होती लावलेली. तिच्या फुलांना जरा मसाल्यासारखा वास येतो. एपिएम्सीच्या मसाला मार्केटात कधीकधी असला वास येतो. बारिक पांढरी फुले असतात. ही झाडे थोडी विषारी असतात असा माझा अंदाज आहे.

मी सांताक्रुझ पुर्व रेल्वे स्टेशनला लागुन एक झाड पाहिलेले. आपल्या नेहमीच्या झाडापेक्षा जरा उंच, सरळसोट. त्याला काजुच्या आकाराची मोठी बोंडे येत. रविवारी माहेरी जाणार आहे Happy तेव्हा बघते अजुनही आहे का ते झाड. असल्यास फोटू काढते. आणि तुम्हा सगळ्यांबरोबर शेअरते. Happy

आज सकाळी सावरीचा फोटू काढला. उद्या सप्तपर्णीचाही काढते आणि डकवते इथे.

माधव खुप खुप धन्यवाद.

साधना अग ही झाड आमच्या कंपनीच्या टाउनशिपमध्ये भरपुर आहेत. तसेच इतर ठिकाणीही दिसतात. ह्याच्या फुलांना इतका उग्र वास येतो ना. आणि टाउनशिप मध्ये भरपुर असल्याने सहन न होण्याइतका वास येतो. एकदा मी टाउनशिप्च्या हॉस्पिटलमध्ये गेले होते तेंव्हा मला त्या वासाने अगदी कसेतरीच झाले. मला वाटत ही झाडे काढून टाकण्याचीही मागणी तेथिल वसाहतीने केली होती.

काजुच्या फुलांनाही दालचिनीचा वास येतो. पण तो इतका उग्र नसतो.

हो, वास उग्रट आहे जरा. दुरुनच वास येतो. पण मला मात्र आवडतो हा वास Happy

एक 'नरक्या' म्हणून झाड असते. त्याच्या फुलांनाही खूप वाईट वास येतो. सातार्‍याच्या आसपास सापडायचे हे झाड पूर्वी. पण यातले एक द्रव्य कॅन्सरकरता औषधात वापरले जाते हे कळल्यापासून त्याची बेसुमार तोड झाली. आज या झाडाचा काळा बाजार होतो. Sad

सप्तपर्णीसारखेच एक झाड असते. त्याला पाच पाने असतात. त्याला पांढरट फूले येतात. आणि सावरीसारखीच बोंडे लागतात. त्यातून कापूसही निघतो. त्याची वाढ पातळ्या पातळ्यात होते. म्हणजे एक मूख्य खोड आणि ठराविक उंचीवर एकाच पातळीत गोलाकार पसरलेली असतात.

आणि दूसरे म्हणजे दिल्ली सावर. हे झाड दिल्लीतच जास्त दिसते. गुलाबी पांढरी मोठी फूले येतात. (साधारण जास्वंदीसारखी. ) याला पण काटे असतात आणि यालाही कापसाची बोंडे लागतात. पण ती जरा कमी प्रमाणात असतात. फूले मात्र भरपूर लागतात.

दिनेश मी जे म्हणतेय ते हे झाड. ह्या झाडाला फांद्यांचा पसारा नसतोच. बिल्डिंग बांधताना कसे १०-१० फुट जागा सोडुन वर वर स्लॅब टाकत जातात तशा याच्या फांद्या खोडावर मध्ये अंतर ठेऊन वर वर जातात. हेच झाड मी पाहिलेले सांताक्रुझला. आता रविवारी नक्कीच जाईन परत.

जागू माझ्याकडे नाहिये. परत आल्यावर मला पण जाणवले होते की सगळ्या झाडाचाच एक फोटो काढायला हवा होता. पण तेंव्हा त्या उग्र वासाने मला दूर जाण्याशिवाय दुसरे काही सुचले नाही.

पण Mappia Foetida ह्या नावाने गुगलून पहा. बरेच फोटो मिळतील.

फिटीडा, हा ग्रुपच तसा घाणेरड्या वासाचा (उपमा फूटलेल्या ड्रेनेजशी )
कैलासपति आणि जंगली बदाम पण हे बिरुद मिरवतात.

महाराष्ट्रात खाऊच्या पानांच उत्पादन हे सांगली जिल्ह्यात मिरज जवळच्या अनेक गावामध्ये जास्त प्रमाणात घेतलं जात.इथली पाने अजुनही खास चवीसाठी देशात्/देशाबाहेर प्रसिद्ध आहेत
..एक विशेष बाब म्हणजे या पिकाला (अजुनही) रासायनिक खत चालत नाही,जरी घातलं तर काही महिने जोरात उत्पादन मिळतं पण वेली खुप काळ जगत नाहीत.
..अजुनही या मळ्यातील पानांची किंवा डागांची,करड्यांची (ज्यात पाने भरली जातात) चोरी कधीच झाल्याच ऐकिवात नाही, कदाचित म्हणुनच याला "नागवेली" म्हणत असतील.
..अद्यापही या मळ्यात जाताना लोक पादत्राणेविनाच जाताना दिसतात, स्त्रियां देखील महिन्यातले ते ४ दिवस मळ्यात जात नाहीत.
..याची जी मुख्य वेल असते त्याला गोलाकार मोठी,जाड पाने (कलकत्ता,बनारस सारखी) लागतात,त्यांना 'फाफडा' अस म्हणतात्,मुंबईतील सायन-चुनाभट्टी जवळ पानाचा मोठा बाजार आहे
मुख्य वेलीला फुटलेल्या अनेक फुटव्यांना (छोट्या फांद्याना) लांब (हाताच्या तळव्यासारखी) पाने लागतात्,त्याना 'कळी' म्हणतात्,जी पुजेलाही वापरली जातात.
मुंबईतला बाजार फक्त कळी आणि फाफडा या दोन नावांनी चालतो,फाफडा पानांच प्रमाण कळीच्या मानानी कमी असतं,पण दर ३-४ पटींनी असतो.

(मळ्याचे फोटो नाहीत त्याबद्दल सध्या माफ करा)
Happy

अनिल, कसं अगदी सोनाराने कान टोचल्यागत वरिजिनल पोष्ट.
मला एक विचारायचं होतं. पानाच्या टोकाबद्दल पण काहितरी समज आहे ना ? म्हणजे खायच्या आधी ते टोक आवर्जून खूडायचे असते म्हणून. का तो समज देठाबद्दल आहे ?
बाकि अस्सल चवदार पान कुठले याबद्दल मात्र गावे तितकी मते, वसईवाले त्यांच्या गावाबद्दल अभिमानी तर विदर्भातले लोक रामटेकी पानाबद्दल.
माझ्या एका मित्राने आफ्रिकेतल्या गावंढ्या गावात हि वेल वाढवली होती. हौसेने मला पान खाऊ घालायचा, पण पानात घालायला आमच्याकडे काहीच नसायचे. मग आम्ही त्यात च्यवनप्राश घालून खायचो.

अनिल, फाफडा पानांची किंमत एवढी जास्त का असते? ठेलेवाला जी पाने बनवतो ती आपल्या घरी (पुजेला अथवा इतर घरगुती समारंभात) आणल्या जाणार्‍या पानांपेक्षा बरीच मोठी असतात तीच फाफडा का?

दिनेशदा,
लई भारी ! तुम्ही पानात काही घालुन खा, पण पान खाल्ल्याचे आम्हाला तमाम (शेतकर्‍यांना) समाधान आहे.:हाहा:
अनुमोदन !
त्यातल्या त्यात नदीकाठच्या (लाल मातीमुळे) पानांना एक वेगळीच खास चव आणि भरदारपणा असतो
पानाच्या टोकाबद्दल असलेला समज का आहे हे नक्की माहित नाही पण खाणारे सगळे ते काढुनच खाताना दिसतात,मी घरी विचारुन बघतो.
Happy

अनिल, नक्की विचारून बघ. मला वाटतं नागाशी संबंधित काहि तरी आहे.
असाच एक समज चाफ्याच्या शेंगाबाबत आहे. आपल्याकडे साध्या खूर चाफ्याला कधी शेंगा आल्याचे दिसत नाही (आफ्रिकेत त्या दिसतात.) तर त्याबद्दल असे सांगतात कि या शेंगा म्हणजे सापाच्या विषावर उतारा असतात. आणि रात्री साप येऊन या शेंगा खुडून टाकतात आणि शत्रुपक्षाचा नायनाट करतात.

देठाबद्दल असेल दिनेशदा, कारण पूजेला ठेवलेल्या विड्याच्या पानांचे देठ तोडत नाहीत आणि पानवाल्यांकडच्या पानांचे देठ कापलेले असतात.

खायच्या पानांची वेल घरातल्या कुंडीत वाढते का? त्याची रोपं कुठे मिळतील?
शर्मिला,
या वेलाची एक फांदी कापुन लावावी लागते, मळे असलेल्या गावातुन किंवा घरी लावलेल्यांच्याकडुन मिळु शकेल,पण नाजुक असल्यामुळे खुप जपुन आणाव लागेल,याला खुप ऊन चालत नाही.
दिवाळीत मी ५-६ रोपे आणली पण शेजार्‍यांनी लगेच लावली नाहीत्,नाही जगली

Pages