टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए कुणाला युट्युब वगैरे वर लिंक मिळाली तरी प्लीज प्लीज इथे टाका!
मी नेहेमीप्रमाणे फेडररची मॅच मिसली!! Uhoh Angry

www.bhagyashree.co.cc/

यु एस ओपन सिरीज सुरु झाली. यंदा यु एस ओपन बघायला कोण कोण येणार ? आम्ही फक्त मेन्स फायनल्स बघणार आहोत.

यु एस ओपन सुरु झालीये. चला या चर्चेला बसुयात Happy मिर्झा आणि सोमदेव दोघे दुसर्‍या फेरीत गेलेत. आज काही सामने बघायला मिळाले नाहीत. कुणी बघतय का ?

बाकी यंदाची/चा बेस्ट बेट कोण ?

-

usopen.org वर live streaming एकदम झकास आहे. HD quality दिसते आणि आपल्याला पाहिजे ते कोर्ट select करत येते. पुर्वी ही सुविधा होते की नाही महित नाही पण नुकतेच कळाल्यामुळे ऑफिस मधे पण अधुन मधुन मॅच बघायची सोय झाली.

courts वर क्लिक केलं की सगळ्या मॅचेस आणि स्कोर दिसतात. तिथे जाऊन बघावे लागते.

तो जोकोविच पूर्वी चांगला खेळायचा. एकदम पॉवरफुल फोरहॅन्ड मारायचा. आजकाल विचित्रच खेळतो. त्याचं काही खरं नाही या स्पर्धेत. तो पुढे एक दोन फेर्‍यांमध्ये हरेल असे मला वाटते.

आणि ती सौंदर्यललना इव्हानोविच पहिल्याच फेरीमध्ये हरली! Proud Sad
काही सातत्यच नाहीये महिला खेळाडूंमध्ये व्हिनस भगिनी सोडून..

फेडी जिंकला... खर तर तीन सेटमध्येच जिंकायला हवा होता...पहिल्या सेटमध्ये टाळता येण्यासाऱख्या चुका केल्या त्याने आणि हातातला सेट घालवला.. हेविटने नेहमीपेक्षा चांगली लढत दिली फेडीला... आता चौथ्या फेरीत जेम्स ब्लॅक आणि टॉमी रॉब्रेडो यांच्यातील विजेत्याबरोबर फेडीची लढत...

जोकोविच पण जिंकला...

शारापोव्हा गेली. ऑडिन फार काही छान खेळली असे नाही. स्टॅट्स बघितले तर शारापोवाने हाताने घालवली मॅच- Double Faults 21 Unforced Errors 63. ऑडिनने आतापर्यंत दोन रशिअन खेळाडुंना हरवले आहे आणि पुढील फेरीत अजून एक रशिअन बरोबर सामना आहे Happy

फेडीने सुद्ध किती त्या Unforced Errors मारल्या Sad

Pages