टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रम.. बरं.. तुम्ही म्हणता तर तसं... Proud

राफा नाहिये विम्बल्डनमध्ये... Sad फेडेक्सची परतफेड करण्याची संधी सुटली Sad

अड्म भाय
हे काही बरोबर नाही. मजा नाही आली. निदान यू. एस. ओपनला बघून घेउ अस तरी म्हणायच होतं.

फेडी चांगल्या फॉर्ममध्ये आहे.. दुसर्‍या राऊंडची मॅचही ३ सरळ सेटमध्येच जिंकली...

अरेरे तिला बघण्यासाठी म्हणुन तिकिट्स काढलेल्यांना माझी सहानुभुती Wink

आपली सानिया पण गेली Happy

अरे मण्डळींनो,
मरे आणि जोकोविक एकाच हाफ मध्ये आहेत का आणि फेडिच्या हाफ मधे कोण आहे.? र्रॉडिक कुठे आहे.
मुकुंदराव तुमच्या ब्रेकफास्ट अ‍ॅट विम्बल्डनची वाट बघतोय.

हेविट डार्क हॉर्स दिसतोय. आणि हा कोण इव्हो कार्लोविक_- एका मॅच मध्ये ४६ एसेस. काहीतरीच. गोरानीसेविच ची गादी चालवतोय.

उद्याची विलिअम्स भगिनींची फायनल पाहण्यात अर्थच नाही आणि आता रविवारी रॉडिक-फेडरर फायनल होणार आहे.. त्यामुळे ब्रेकफास्ट मांडुन ठेवण्याच्या आतच ही मॅच संपणार..:(

अर्थात रॉडिक्-फेडरर यांच्यातल्या २००५ व २००६ मधल्या इथल्या फायनल्स बघितल्यावर कोणालाही असेच वाटेल कारण फेडररने दोन्ही वेळेला ३ स्ट्रेट सेट्समधे रॉडिकचा धुव्वा उडवला होता.पण आज मला रॉडिक व अँडी मरेमधला उपांत्य फेरिचा सामना बघायला मिळाला. मरेच्या खांद्यावर सबंध ब्रिटनचे ओझे होते असे वाटले. १९३६ पासुन कोणि ब्रिटिश विंबल्डन स्पर्धा जिंकलेला नाही. त्या गोष्टिचे ओझे प्रत्येक चांगल्या ब्रिटिश टेनिसपटुच्या खांद्यावर हे ब्रिटिश लोक टाकतात.आजचेच बघा ना... सगळ्या ब्रिटिश पेपरमधे हे छापुन आले होते की मरे जर विंबल्डन जिंकला तर त्याला २०० मिलिअन पाउंड्सच्या एंडॉर्समेंट्स मिळणार आहेत.. अँडि मरे हा त्या बोझ्याखाली वाकणारा अजुन एक चांगला ब्रिटिश टेनिसपटु... या आधी बिचार्‍या टिन हेनमनने चार वेळा विंबल्डन सेमिफायनल पर्यंत मजल मारली होती पण त्याच्या पलिकडे तो कधी जाउच शकला नाही . हा अँडि मरे हेनमनपेक्षा चांगल्या दर्जाचा वाटतो. मस्त सर्व्हिसबरोबर जबरदस्त व्हॉलि व व टॉप क्वालिटी ग्राउंड स्ट्रोकही याच्याकडे आहेत. पण आज जरा दबावाखाली खेळल्यासारखा वाटला.(आजच्या मॅचमधे त्याने एक व्हॉली नेटजवळ धावत जाउन..सँप्राससारखी हवेत उंच उडी मारुन मारली.. तेव्हा ग्रेट पिट सँप्रासची खुप आठवण आली..)

असे जरी असले तरी रॉडिक या सामन्यात मस्तच खेळला यात वादच नाही . त्याच्या आजच्या एक एक सर्व्ह्सि कसल्या जबरी होत्या.. सटासट त्याच्या रॅकेटमधुन त्या निघत होत्या. त्याचा सर्व्हिसगेम लाजवाब आहे हे सगळ्या जगाला ठाउक आहे. पण आज मरेबरोबर खेळताना त्याचे ग्रांउंड स्ट्रोकही मस्तच होते. पण ग्रँड स्लॅम फायनल जिंकायला जे मेंटल फॉर्टिट्युड लागते त्याचा काही कारणाने त्याच्याकडे अभाव आहे.. खासकरुन फेडरर बरोबर खेळतानाचा त्याचा जो मेंटल ब्लॉक होतो.. तो जर परवा रॉडिक काढू शकला नाही तर खरच मी वर म्हणालो त्याप्रमाणे रविवारी ब्रेकफास्ट मांडायच्या आतच त्यांच्यातली या वर्षीची ही विंबल्डन फायनल संपेल व फेडरर एकटा विक्रमी ..१५ ग्रँड स्लॅमचा मानकरी म्हणुन.. विंबल्डनच्या गवतावर ट्रॉफी डोक्यावर घेउन उभा असलेला दिसेल..

अरे बघत आहे का कोण? ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन? आता लंच टाइम होत आला... आणी मॅच पाचव्या सेटमधे ११-११ अजुन चालुच आहे... व्हॉट अ मॅच! रॉडिक काय खेळतोय! हॅट्स ऑफ टु हिम!

.....आणि फेडरर जिंकला!!!!

One of the greatest matches I have ever seen. Fantastic. Sorry for Rodick.
the defining moment was the crosscourt drop shot by federerer for which Roddick dived like Nadal but failed to touch. It was a great backhand cross court by Federer. Federer apologised to Rodick, for winning the point and making him fall. And that was the spirit of the game.
In the end it was as Federer said, somebody had to win. Thank you, Sir.

काय मॅच झाली!!! रॉडीक चे फार वाईट वाट्ले.व्हॉट अ वे टू लूज...

गौरी,

मस्त मॅच झाली. खाऊन खाऊन सगळी नखं संपली तरी मॅच संपेना. शेवटी पिझा ऑर्डर केला Proud आता तुनळीवर पुन्हा एकदा निवांत बघणार Proud

रॉडिकची सेमि फायनल पण मस्त झाली होती. ती पाच सेटची मॅच खेळुनही आज तो दमलेला वगैरे वाटला नाही. शेवटच्या मॅरेथॉन सेटमधे देखील वेगवान सर्विस मारल्या. एकुणच त्याचा खेळ मस्तच सुधारला आहे. फेडीच्या सर्विस मस्तच. मॅच झाल्यावर सगळ्या लेजेन्ड्सना एकत्र बघायला मजा आली.

फेडी आणि रॉडिक दोघांचे अभिनंदन !!!

ता. क. मॅच इतकी लांबल्यामुळे सँटीचे दहीवडे हुकले Lol

सॉल्लिड झाली मॅच! रविवार सकाळ सार्थकी लागली! Happy

रॉडिक जिन्कायला हवा होता, पुर्ण मॅच मध्ये एकदाच बिचारा कमजोर पडला आणि हरला Sad
फेडी त्याच्या नावाला साजेसे नाही खेळला, पुर्ण डिफेन्सिव होता..नशीब जोरावर होते पण आज त्याचे..

ग्रेटेस्ट एव्हर मॅच. एकदम बेष्ट. लाइव्ह बघताना दरवेळी आता काय होणार ह्याची धास्ती. स्पेशली शेवटच्या सेट मध्ये. Happy

अफलातुन मॅच!!!!
काय खेळलाय रॉडीक!!! हॅट्स ऑफ!! त्याचा गेम खरच खुपच सुधारलाय. संपुर्ण मॅच मधे अतिशय अग्रेसिव्ह खेळला. दुसरा सेट टायब्रेकरमधे अनफोर्सड एरर करुन गमावणे फारच महागात पडले त्याला.

फेडीच्या सर्विसने वेळोवेळी हात दिला त्याला.

फेडरर अन रॉडिक दोघांचे मनःपुर्वक अभिनंदन!!

दोघांनाही स्पेशल थँक्स Happy मेजवानी ऑफ विंबल्डन दिल्याबद्द्ल!! Happy

सहीच मॅच झाली एकदम... मला तर हेविट आणि रॉडिक च्या फायनल ची आठवण झाली...
बहुतेक ती विंबल्डन होती का Australian Open ते आठवत नाही, आणि अगदी अशीच शेवटच्या सेट पर्यन्त रंगलेली मॅच होती, पण त्यात सुद्धा बहुतेक रॉडिक हरला होता.. Sad

फेडरर क्लासच आहे, पण यामधे रॉडिकने अत्युच्च खेळ केला. Happy

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

डबल्स मधे काय झाले ?

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

काय टेरिफिक मॅच झाली... रॉडिक तुफान खेळला.. पहिल्यांदाच फेडीविरुध्द इतकं चांगलं खेळताना पाहिलं मी त्याला.. फेडी पण मस्तच खेळला... आणि नशिबानेही त्याला साथ दिली.. ५० एसेस मारल्या काल फेडीने आणि रॉडिकने त्याच्या जवळपासच...

अश्या रितीने फेडीने सॅंप्रासचा रेकॉर्ड मोडला आणि १५ वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले...

मिक्स्ड डबल्समध्ये पेस आणि ब्लॅक हरले फायनलमध्ये :(.

लई भारी झाली फायनल... काय मजा आली... दोघेही चांगले खेळले. खरंच रॉडीक इतका चांगला कधीच खेळला नसेल फेडरर बरोबर.

पण फेडररने सुध्दा अगदी लौकीकाला साजेसा खेळ केला. पहिला सेट हरल्यावरसुध्दा तो ढेपाळला नाही. तसेच दुसर्‍या सेटचा टायब्रेकर त्याने ६-२ वरुन पिछाडीवरुन येऊन ८-६ असा जिंकला. अगदी शेवटपर्यंत उत्कृष्ट सर्व्हिस केली. अनफोर्स्ड एरर्स फेडररनेच जास्त केल्या बहुतेक आज... त्यामुळे त्याचे नशीब जोरावर होते असे म्हणावेसे वाटत नाही आहे.

पण मॅच म्हणजे खरंच मेजवानी होती... Happy

रॉडिकने घालवली मॅच! पण बरच झाल मला फेडीच हवा होता जिंकायला. Happy

आता तुनळीवर पुन्हा एकदा निवांत बघणार >> ती कशी काय गं सिडरेला?

*********************

My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.

फार मस्त मॅच...

फेडी जिंकल्याचा आनंद...
पण हेच नादाल विरुद्ध असतं तर जास्ती आनंद झाला असता...

रॉडिक केवळ झकास...
फेडी जिंकला तो त्याच्या संयमामुळे आणि रॉडिकच्या ऐन वेळच्या चुकांमुळे...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

जबरा मॅच. फेडी रॉडिक चूक कधी करतोय यासाठी दबा धरून बसला होता.. इतक्या शेवटी केवळ प्रचंड मानसिक बळच विजेता कोण हे ठरवतं. आणि रॉडीकची सर्व्ह दुसरी होती त्या सेट मध्ये.. त्याचंही उगाच मानसिक दडपण येतं. तो फेडीच्या तोडीसतोड खेळला. त्याचं खूप खूप कौतुक Happy
फेडीला केवळ एक संधी मिळताच मात्र त्याने ती सोडली नाही. फेडेक्स- द ग्रेटेस्ट! Happy
-------------------------
God knows! (I hope..)

मागे सिंड्रेलाने फेडरर्-राफाच्या मॅचनंतर म्हटलेले आज परत म्हणावेसे वाटते.... आज खर म्हणजे टेनिस या खेळाचा विजय झाला..

आजच्या मॅचनंतर एकाला विजेता म्हणुन ट्रॉफी देणे म्हणजे फेडरर म्हणाला त्याप्रमाणे अत्यंत क्र्युएल! आकडेवारीच्या इतिहासात २००९ च्या विंबल्डन स्पर्धेचा विजेता म्हणुन फेडररच्या नावाचा उल्लेख होइल पण आज ज्यांनी ज्यांनी ही आजची अविस्मरणिय मॅच पाहीली ते या गोष्टीची साक्ष देतील की त्याला ट्रॉफी जरी मिळाली नसली तरी आजच्या मॅचचा विजेता म्हणुन रॉडिक हाही तितकाच पात्र होता. रॉडिक रिअली डिडन्ट डिझर्व्ह् टु लुज धिस मॅच!

गेल्या वर्षीच्या नादाल्-फेडरर विंबल्डन फायनलच्या एपिक मॅचनंत लगेचच दुसर्‍या वर्षी सुद्धा तशीच एपिक मॅच बघायला मिळेल.. तेही फेडरर-रॉडिक मधे... असे कोणि सांगीतले असते तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. पण २ वर्षात २ अश्या मॅचेस तेही विंबल्डनला... अहाहा.. टेनिस प्रेमिंना अजुन काय पाहीजे होते? आणि आणी या मॅचचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे नंबर ऑफ विनर्स! दोघांनी जे काही पॉइंट्स जिंकले ते बहुतेक सगळे आउटराइट विनर्सच होते.. फार कमी अनफोर्स्ड एरर्स त्या दोघांनी आज केल्या म्हणुन बघतानाच कळत होते की ही मॅच इतिहासात एक अविस्मरणिय मॅच म्हणुनच गणली जाइल. इ एस पी एन क्लासिक चॅनलवर ही मॅच परत परत दाखवली जाणार यात काही वादच नाही...

खर म्हणजे या मॅचचि चिरफाड करणे खरच जिवावर येत आहे पण माझ्या दृष्टीने दुसर्‍या सेटमधल्या टायब्रेकरमधे.. ६-२ असे पुढे असताना व ४ सेट पॉइंट्स असताना रॉडिकने ज्या २ अनफोर्स्ड एरर्स केल्या तिथेच त्याने मॅच घालवली असे मला वाटते...

पण शेवटी फेडररचे... त्याच्या विक्रमी १५ व्या ग्रँड स्लॅमबद्दल.. अभिनंदन केलेच पाहीजे... वेल डन फेडरर!

मुकुन्द अनुमोदन , मस्त लिहिलेस.

मी प्रवासात असल्याने मिसली मॅच.. Sad Sad Sad

रॉजर चे १५ व्या ग्रँडस्लॅम बद्दल खूप अभिनंदन.. परवा जेव्हा बघितलं कि फेडरर आणि रॉडिक ची फायनल तेव्हा जरा विरसच झाल्या सारखं वाटलं... काल निघायच्या आधी थोडावेळ मॅच पाहिली तेव्हा जाणवलं की ह्या वेळी प्रकरण काहितरी वेगळं आहे.. दुसर्‍या सेट चा टायब्रेकर पाहिला.. आणि मुकूंद म्हणतोय तसं तोच निर्णायक क्षण ठरला... !

कालचा निकाल ऐकल्यानंतर इव्हानिसेविक ची आठवण झाली.. होपफुली रॉडिक पुढे विंबल्डन जिंकेल... !

आता तू नळी वर बघायला पाहिजे मॅच...

आणि हो.. फायनलच्या वेळी स्टेडियम मधे असलेल्या सँप्रस आणि इतर लेजंड्स च दर्शन सुखवाह होतं...

Pages