टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्षी फेडररच.
सेरेना हरली ते बरे झाले. तिचा खेळ मला आवडतो पण तिने उगीचच दिनारा साफीन विरुद्ध कॉमेंट केली होती.
विक्रम

फेडररची टरकली आहे त्या पोट्रोसमोर... हरतोय की काय लेकाचा आज.. Sad

बघ ना.. दुसरा सेट पण कसाबसा घेतलेला दिसतोय Sad

कोणी पाहत आहे ती फ्रेंच ओपन सेमीफायनल? एवढी चांगली मॅच पहायला मिळत नाहीये नेमकी..
मी आंतरजालावर स्कोर पाहतोय...
काय चालू आहे... फेडरर अचानक पेटला आहे... ४था सेट जिंकला !! २-२ झाले आता...
बाप रे... अटीतटीची मॅच.. !

अरे, nbcवर दाखवत नाहीयेत. Sad पहीली सेमी दाखवली. मी पण online स्कोर बघतेय. टेनिस चॅनलवर दाखवणार आहेत असं लालू म्हणाली.

हुश्श् Happy

(लालू, तु हे वाचू नकोस) Wink

फेडी जिंकला का शेवटी? हुश्श!
त्याम्च्य website वर अजून ५-४ च आहे.

यस्स्स्स !!! जिंकला शेवटी... Happy

पिछाडीवरुन येऊन जिंकण्याची हातोटी आहे त्याच्याकडे... परवा त्या टॉमी हास बरोबर पण ०-२ सेट असा मागे होता आणि नंतरचे तिन्ही सेट जिंकून मॅच जिंकली....

फायनलला आता सोडर्लिंग...

धन्यवाद पन्ना आणि झेलम. रविवारी मजा येइल. पण फेडीच जिंकणार.
त्याचा बॅक हॅन्ड तलवारी सारखा चालवतो.

Sad Sad

त्याचा बॅक हॅन्ड तलवारी सारखा चालवतो. >>>>>> हे म्हणजे कै च्या कै च हां !! फेडरर चा बॅकहँड कमकुवत आहे.. (स्टेफी ग्राफ सारखाच.. ) Wink
पण त्याला जिंकायला फोरहँड पुरेसा आहे...

अ‍ॅडम,
बरोबर आहे तुमच. पण मी त्याच्या बॅक हँड आणि फोरहँडची तूलना करत नाही, तर इतरांच्या.

मला फेडररचा बॅकहॅन्ड कमकुवत आहे असं अजिबात वाटत नाही... व्यवस्थित मारतो की तो बॅकहॅन्ड.
तलवारीसारखा त्याचा फोरहॅन्ड चालतो हे खरं आहे. Happy

उजव्या हातानी डाव्या बाजूला लावलेल्या म्यानातली तलवार काढायची जोरात अ‍ॅक्शन करा. तो फेडररचा बॅकहॅन्ड.

मस्तच झाल्या कालच्या दोन्ही मॅचेस.. गोंझालेझने चांगली संधी घालवली सामना जिंकण्याची.. पाचव्या सेटमध्ये सुरूवातीलाच इतका चांगला ब्रेक मिळवला होता.. पण स्वतःची सर्विस राखता न आल्याने त्याने सामना गमावला..

दुसरा सामनाही सहीच.. पहिले तीन सेट डेल्पोट्रोची सर्व्हिस जबरदस्तच.. फक्त दुसर्‍या सेटच्या टायब्रेकरमध्ये सोडुन.. डेलपोट्रो जरी टायब्रेक्ररमध्ये हरला दुसर्‍या सेटमध्ये तरी पहिल्या तीन सेटमध्ये फेडररला एकदाही डेल्पोट्रोची सर्व्हिस ब्रेक करून एकही गेम जिंकता आला नाही उलट डेलपोट्रोने मात्र पहिल्या सेटमध्ये दोनदा आणि तिसर्‍या सेटमध्ये दोनदा फेडीची सर्व्हिस ब्रेक करून ६-३,६-२ असे ते दोन्ही सेट जिंकले सहज.. फक्त दुसर्‍या सेट्च्या टायब्रेकरम्ध्ये त्याची मात्रा चालली नाही आणि फेडीने तो सेट ७-६ ने जिंकला.. चौथ्या सेटपासुन मात्र फेडररचा आत्मविश्वास परत आला आणि त्याचा खेळ जोरदार सुरू झाला..उलट डेलपोट्रो दमल्यासारखा वाटत होता..त्याची उर्जा कमी लागत होती..सर्व्हिसही पहिल्या तीन सेट्ससारखी होत नव्हती.. आणि अखेर तो सेट फेडीने ६-१ असा सहज खिशात घातला..

एकदा फेडी फॉर्ममध्ये आला की त्याला रोखणे कठीण असते .. पाचव्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये फेडीने डेलपोट्रोची सर्व्हिस भेदली... सहाव्या गेममध्ये डेलपोट्रोने फेडीची सर्व्हिस भेदत ३-३ अशी बरोबरी करून अखेरचा प्रतिकार केला.. पण फेडीने पुढच्याच गेममध्ये त्याची सर्व्हिस भेदत ४-३ ने आघाडी घेतली आणि नंतरच्या गेम्समध्ये आपली सर्व्हिस राखत सामना ६-४ ने जिंकला..

या सामन्यात सगळ्यात पहाण्यासारखे होते ते म्हणजे फेडीचे ड्रॉपशॉट्स.. सामन्यात कितीतरी वेळा यांचा वापर करून त्याने डेलपोट्रोला जोरदार पळवलं :).. फेडीचा बॅकहँड त्याच्या फोरहँडइतका जबरदस्त नाही पण कालचे त्याचे बॅकहँडचे काही फटके खरोखर चांगले होते... मेन म्हणजे फार कमी वेळा बॉल जाळ्यात गेला आणि टॉपस्पिनही होत होते चांगले:)

आता सोडर्लिंग आणि फेडी फायनल.. हा सामनाही असाच जबरदस्त व्हावा.. अर्थात यावेळी नशीब फेडीला साथ देतय असं आतापर्यंत तरी दिसुन आलय..फेडी फायनल जिंकणार असं मन सांगतय.. पाहुयात काय होतय ते रविवारी Happy

छान वर्णन मयूरेश Happy
खास धन्यवाद कारण फेडी- डेल्पोट्रोच्या सामन्याबद्दल सविस्तरपणे वाचायला मिळाले. Happy

आज महीलांमधे कोण बाजी मारेल अस वाटतय?? दिनारा की स्वेतलाना ??

पन्ना,मरूरेश नाही गं मयूरेश Happy

मला स्वेतलाना मारेल असं का कोण जाणे वाटतय... तिचा खेळ मस्त होतोय..

अरे, खरच की. सॉरी सॉरी.
मलाही स्वेतलानाचे जिंकण्याचे चान्सेस जास्त वाटतायत. दिनारा आत्तापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात झगडून इथपर्यंत पोचलीये.

मयुरेश, छान!
धन्यवाद..! Happy

अपेक्षेप्रमाणे स्वेतलानाने विजय मिळवला.. मॅच बर्‍यापैकी एकतर्फी झाली.. साफिना दोन सेटमध्ये हरेल असं वाटलं नव्हत. पण आज ती भरकटल्यासारखी खेळत होती याउलट स्वेतलाना फोकसड होती.. काम आणि कुल होती.. जणु काही आपण जिंकणार अशी तिला आधीपासुनच खात्री होती.. २००४ मधल्या अमेरेकन ओपनच्या विजेतेपदानंतरचं तिचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद...

उद्याही अपेक्षेप्रमाणेच घडेल ही आशा Happy

पेस जिंकला. ग्रेट.

अखेर पेस आणि लुई या जोडीने आपलं पहिलं वाहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपेद मिळवलं :).. काल चांगले खेळले दोघही.. मेन म्हणजे दोघांमधला समन्वय चांगला होता आणि लुईने शेवटच्या सेट्मध्ये गेल्या अमेरिकन ओपन मधल्या फायनल सारख्या चुका केल्या नाहीत...

पुरूषांची अंतीम फेरी सुरू होईल लव्करच... Happy

आणि फेडररने पहिलाच गेम ब्रेक केला आहे... सुरुवात चांगली झालेली आहे... Happy

पहिले तीनही गेम जिंकले त्याने..चांगल्या फॉर्मात आहे.. Happy .. ४-१ झालाय स्कोअर.. आता फेडीची सर्विस...

सोड्या खूप unforced errors करतोय... आणि फेडरर ड्रॉप शॉट चांगले मारतोय...

६-१ ने पहिला सेट जिंकला फेडी.. मस्तच खेळतोय.. Happy

Pages