टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युएस ओपन सुरु !!!!!!!!!!
गो राफा, गो नोल, गो अँडी...
गो मारिया, गो येलेना, गो व्हिनस... >>>>

आणि अजून राफा "गो" झालेला नाही. :). अडमा बाकी सगळे गेले.

काल अँडी मरे पराभूत झाला. त्याला १६ व्या मानांकित सिलिकने हरवले. नदालची मॅच मस्त झाली.
तसेच सेरेना आणि क्लायस्टर्स यांचा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

Lol

शारापोवा वगैरे बघितल्या होत्या. ह्या लॉकर रुममधल्या नव्हत्या बघितल्या कधी. परवा तर खासच. पब्लिकने सही गोंधळ केला Happy

मरे हरला बरे झाले. अत्यंत बोर खेळाडू. नुसता चढवून ठेवला आहे त्याला.

आता हरलाय तरीसुध्दा सर्व बातम्यांमध्ये 'त्याला ग्रॅन्ड्स्लॅम जिंकण्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट बघावी लागेल' वगैरे लिहिले आहे.. Uhoh

हरली मेलनी Sad
आजचा तिचा हुकमी एक्का फोरहँडच बसत नव्हता. फूटवर्कही कमी पडत होते. खूप इरीटेट झाली होती.

पेस आणि भूपती आपापल्या साथीदारांसोबत डबल्सच्या मॅचेस जिंकलेत. आता फायनलला एकमेकांसमोर उभे राहतील!!

फेडीची मस्त सुरवात!! ६-०,६-३ !!

पेस तर मिक्स्ड डबल्स मधे पण फायनलला पोहोचलाय....यु एस ओपन च्या ऑफिशीयल वेबसाईट वर ब्रॅकेट बस्टर सेक्शन मधे पेस चं बरच कौतुक केलयं.

ह्या वर्षातला त्याचा गेम बघून तसे वाटत नाही >> अनुमोदन सिंडे , गेल्या एक-दीड वर्षात त्याचा गेम खूपच सुधाराला आहे.

आपला युकी भांबरी हा ज्युनिअर बॉइजच्या चौथ्या फेरीत पोहोचला आहे. त्याने या वर्षी चांगली कामगिरी केली आहे.

ह्या वर्षातला त्याचा गेम बघून तसे वाटत नाही
>> अगं, नदाल ह्यावेळी फिट नसल्यामुळे आणि इकडच्या तिकडच्या टेनिस मास्टर्स स्पर्धा जिंकून त्याने पॉइंट्स मिळवले आहेत आणि दोन नंबरवर आला आहे. आता हरल्यामुळे पुन्हा नंबर खाली जाईल. मी परवा वाचत होतो की त्याचा खेळ कसा सुधारला आहे. तर तो आजकाल खूप चांगली प्रॅक्टीस श्येडुल पाळतो, कोर्टवर शिव्या देत नाही, वगैरे. बाकी काही विशेष फरक नाही.

चांगले खेळाडू त्याला किरकोळीत काढतात. Proud

मरे त्या भुक्कड टीम हेन्मन पेक्षा बराच बरा आहे...>> हे मात्र खरे आहे..

अगदी अगदी सँटी..
बोर आहे मरे.. हेन्मन ला जसं ब्रिटीश मिडीयाने उगीच डोक्यावर घेतलं होतं तसचं मरेचं पण होतं चाललय हळूहळू... हेन्मनने किती प्रयत्नांची पराकाष्ठा केली विंबल्डन साठी पण सेमीच्या पुढे गेला नाही कधी.. !
त्याचा नंबर २ गेला ऑलरेडी.. राफा होणार आता नंबर २...

सिंडे.. गेम पण ठिकच आहे त्याचा.. स्ट्राँग पाँईट म्हणावा असा कुठला स्पेसिफीक नाहिये माझ्यामते तरी... अ‍ॅव्हरेज मुलं खूप घासून डिस्टी "पाडतात" तसं आहे ते.. Happy

हेन्मन ला जसं ब्रिटीश मिडीयाने उगीच डोक्यावर घेतलं होतं तसचं मरेचं पण होतं चाललय हळूहळू >> चालायचंच... भारतात कसे सानियाताईंना हरभर्‍याच्या झाडावर चढवून ठेवले आहे..

Pages