टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या सेट्मध्ये २-१ ची आघाडी.. सर्व्हिस मस्तच होतेय त्याची... ड्रॉप शॉट्शी मस्तच..:)

हो... सर्व्हिस खरंच चांगली करतोय... या स्पर्धेत ड्रॉप शॉट्स खूप मारतोय... मी पूर्वी एवढे मारलेले पाहिले नाहीत.

सॉडर्लिंग खूपच टाईट खेळतोय.
फेडीची सर्विस, ड्रॉप शॉट्स आणि मुख्य अस्त्र फोरहँड अप्रतिम Happy

एक माणूस मध्येच स्वित्झर्लंड्चा झेंडा घेऊन मैदानात घुसला आणि फेडीपाशी गेला.. सुरक्षारक्षकांनी नंतर त्याला धरून बाहेर काढला :).. ३-२ ने फेडी पुढे

मयुरेश, अरे तो स्वीडनचा होता ना.. मला स्वीडनचा झेंडा वाटला...
नेटवरुन उड्या वगैरे मारल्या त्या माणसाने..
पाऊस येणार अशी चिन्हं दिसतायेत..

हो ना पाऊस यायला लागलायः(.. ५-४ फेडी पुढे

दुसरा सेट टायब्रेकरम्ध्ये जिंकला फेडी.. ७-१ ने टायब्रेकर घेतला... ४ एसेस.. सहीच Happy

६-२ ७-६ ... Happy
काय उत्कृष्ट सर्व्हिस आहे फेडीची.... वाह... टायब्रेकर ५ मिनिटांत संपला..

तिसर्‍या सेटला पहिलाच गेम ब्रेक केला फेडीने.. Happy

२-१ ने पुढे फेडी.. पाऊस परत सुरू Sad .. आशा आहे की वाढ्णार नाही ... Happy

३-२ ने फेडी पुढे..फक्त स्वतःची सर्व्हिस राखायचे काम करायचे आहे त्याला.. Happy

बरोबर मयुरेश... हेच लिहायला आलो होतो मी पण.. Happy

काय बोर आहे सोल्डरींग... अगदी त्या मरियन बार्टोली चा भाऊ वाटतो... Angry

सोड्या काही काही शॉट्स तर अगदी आशा सोडून दिल्यासारखा खेळतो...

५-४.. सर्व्हिस राखली या गेममध्ये की १४ वं विजेतेपद खिशात :).. आदमा,सॉरी रे.. Happy

अडमला बार्टोली जितकी आवडते तितकाच हा सोडर्लिंग आवडणार आता ... Proud
अडमा, सॉरी रे... Lol Light 1

वा वा क्या बात है!!! मजा आ गया :)... फेडी आज परत रडला पण आनंदाने... अस्खलित फ्रेंचमध्ये बोलला..

आता विंबल्डनमध्ये त्याचं १५वं विजेतेपद व्हावं म्हणजे सोनेपे सुहागा Happy

मया किती वेळा एडिटणार ???? Happy
बोलून घ्या लोको... तुमचा दिवस आहे आज.. !!!

अरे भाषण शब्द बरोबर नाही वाटला रे Happy इतका दु:खी होऊ नकोस रे .. Happy

१४व्या ग्रँड स्लॅम आणि पहिल्या फ्रेंच विजेतेपदासाठी रॉजर फेडररचे हार्दीक अभिनंदन!! Happy

पांशामोसु :
सकाळपासनं पाण्यात ठेवलेले देव साग्रसंगीत पूजा करुन परत देव्हार्‍यात बसवले. Happy सायोच्या मलई बर्फीचा नेवैद्य दाखवला. Happy
पांशामोबं :

सही रे सही....

आता विंबल्डन...
ते पण नादाल ला हरवून जिंकायला पाहिजे...
म्हणजे कलेजे को ठंडक....
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

अर्थातच, विम्बल्डन मधे पोल पोझिशन फेडररला.

१४व्या ग्रँड स्लॅम आणि पहिल्या फ्रेंच विजेतेपदासाठी रॉजर चे हार्दीक अभिनंदन!! Happy Happy
ऱोजर ने पीट च्या विक्रमाची बरोबरी केली आणि त्या बरोबरच, चारही ग्रँड स्लॅम जिंकणार्‍या,
पेरी, अग्गासी वैगेरेंच्या पंक्तीत जाउन बसला... Happy

(याचे थोडे बहुत श्रेय सोडर्लिंग पण दिले पाहिजे.. नाहीतर परत फेडरर-नडाल आमने-सामने आले असते आणि त्यावेळी नडाल ला रोखणे कठिण गेले असते.. :फिदी:)

त्याबरोबरच, मेन्स डबल्स चे टायटल जिंकल्याबद्दल पेस चे ही अभिनंदन..पण पेस्-भुपती सारखी मजा येत नाय बघायला.. परत त्यानी एकत्र यावे Happy

गुढघ्याच्या दुखापतीमुळे रफेल नदालने विंबल्डन २००९ स्पर्धेतून माघार घेतली आहे.

काय सांगतोस......श्या !!!!!
आता माझा आकडा आणि आशा जोकोविक आणि मरे वर !
तसा फारसा उपयोग नाही म्हणा काही Sad Sad

अरे आडमा.. किती तो राग राग करायचा... अशानी तब्येत बिघडेल बर तुझी..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

हो मी पण वाचली ही बातमी ... नदाल फेडी फायनल पहायची संधी हुकणार म्हणजे यावेळी Sad

LOL... हिम्या राग नाही रे.. फक्त जरा टिपी..
अरे.. आमचं मित्रांमधे लहानपणापासून असंच चालायचं एकाला स्ट्राँग सपोर्ट करायचा आणि एकाला स्ट्राँग अपोज.. सो ठिके.. एव्हडं पण सिरीयस नाही ते.. Happy

अदम भाय,
तुम्हाला जरा अजून उचकवायला माझ जरा स्ट्राँग मत देतो, तुम्ही ज्याला स्टाँग सपोर्ट करता त्याच्या बद्दल. (म्हणजे तुम्हाला जुने मित्र भेटल्यासारखे वाटावे म्हणून बर का. Happy )

नादाल मायकेल चँगची केवळ स्टाँग व्हर्जन आहे. फक्त बॉल सतत परत टाकणे. प्रचन्ड स्टॅमिना हा मुख्य गूण. गेल्यावेळेला फेडी ने अगणीत स्व चुका केल्या म्हणून नादाल जिंकला.

या वर्षी नाही तरी काही खरे नव्हते. आता झाकली मूठ सव्वा लाखाची.

Pages