टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात कसे सानियाताईंना हरभर्‍याच्या झाडावर चढवून ठेवले आहे.. >>>> हो ना.. ते ही आहेच.. पण ब्रिटीश मिडीया जरा अतिच आहे... फेअब्रदर नामक बॅट्समन्ची काहीही न विचार करता सचिन, लारा आणि ब्रॅडमनशी बरोबरी होते ब्रिटीश वृत्तपत्रांमधे.... Uhoh
असो.. तो ह्या बाफचा विषय नाही.. Happy मरे बोर आहे हे मात्र खरं.. Proud

सिंडे,
मरेचा रॅन्क गेल्या वर्षी ४ का ५ होता. यावर्षी २ आहे. म्हणून त्याचा खेळ सुधारला आहे वगैरे म्हणतात. गेल्या दोन वर्षांपासून तो प्रत्येक ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत "दावेदार" समजला जातो. मध्येच कुठल्यातरी राऊंडला हरतो, किंवा फायनलला पोचलाच, तरी तिथेही ६-२ ६-३ असं किरकोळीत हरतो.
म्हणून मला बोर वाटतो तो.

असो. आता जोकोविच आणि फेडरर आहे सेमीफायनल. मजा येईल. Happy

मरेने मागच्या वर्षी नदालला सेमीफायनल मधे खुप मस्त हरवले होते. त्यानन्तर त्याचा तसा खेळ कधीच नाही पाहिला..नन्तर फेडररने त्याला फायनल मधे किरकोळीत हरवले होते. असो....

ह्यावर्षी फेडरर - नदाल फायनल ह्यावी.....

मरे फालतू आहे. Happy त्रिवार हेच सांगेन!!

सानिया जिंकली अशी बातमी येतच नाही कधी!! "अमुक स्पर्धेत पहिल्या / दुसर्‍या फेरीत सानिया पराभूत" हीच बातमी. इतर वेळी ती कुठली अ‍ॅड करनार, आणि लग्न कधी करणार या बातम्या!!

मागायचीच झाली तर नादाल/गोंझुची माफी मागा, ते मायबोलीकर असते तर बिचारे सकाळी-सकाळी घाबरले असते Wink

नादालला ओळीने तीन दिवस खेळायला लागणार अस दिसतय.
शिवाय गोंझू चांगली लढत देत होत काल. आज वारं नसल तर गोंझू जिंकू शकेल.
डेल पोर्टोनी सुद्धा नाडाल ला नुकतच हरवलय.
अवघड दिसतय राफाचा करियर ग्रॅंड स्लॅम यावर्षी व्हायला.

यु.एस. ओपन च तिकिट किती असत हो. कधीतरी एकदा बघायची आहे.
पहाण्याचा ग्रँड स्लॅम करता आला तर काय मजा येइल. आणि त्याच वर्षी फुट्बॉल आणि क्रिकेटच्या वर्ल्ड कप फायनल्स बघायला मिळाल्या तर. :). (बहुतेक सकाळ मधे नोकरी धरावी लागणार अशी स्वप्न पूर्ण होण्यासाठी.)

आत्ताच फेडरर सेमीफायनलला पोचला त्यावर एक सदर वाचत होतो. तिथे मला असे कळले की फेडररने सलग २२व्या ग्रॅन्डस्लॅम सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे!! ह्यापूर्वी तो २००३ (५ वर्षांपूर्वी!!) च्या फ्रेंच ओपनमध्ये ३ र्‍या फेरीत हरला होता. त्यानंतर प्रत्येक स्पर्धेत तो किमान सेमीफायनला पोचला अहे. त्याच्याआधीचा रेकॉर्ड सलग फक्त १० ग्रॅन्ड्स्लॅम सेमीफायनलमध्ये पोचल्याचा होता.
अशक्य performance!!

तो मरे परवा हरला त्यानंतरच्या मुलाखतीत म्हणाला, ' I am not a perfect human'. बेक्कार हसू आलं. म्हटलं, लेका आधी जिंक आणि मग असलं काहीतरी बोल. फेडररने तसं म्हटलं तर ठीक आहे. उगाच आपलं काहीतरी...
चला, मरे टीकापुराण थांबवतो. Happy

गोंझू >> सिंडे, तू म्हणजे त्या गोंझालेसबरोबर लहानपणापासून टेनिस खेळत असल्यासारखं बोलतियेस.. Proud

सिंडे, तू म्हणजे त्या गोंझालेसबरोबर लहानपणापासून टेनिस खेळत असल्यासारखं बोलतियेस.. >>> तू जगजेता असल्याच्या थाटात मरेला शिव्या घालतो आहे त्यापेक्षा बरे आहे Proud

आणि हे काही बरे नाही हां आमच्या बाफवर येऊन शहाणपणा शिकवायचा आणि इथे येऊन लोकांना काय वाट्टेल ते बोलायचे Wink

परत पाऊस लागला ना. आम्हाला काही तिथे जाऊन फायनल बघायला मिळणार नाही यंदा Sad

What a shame Sad

किम विरूध्द वोझनियाकी.. ! कोणीही अपेक्षा केली नसेल की ह्या दोघी फायनलला येतील बहूतेक..
याआधी एकाच स्पर्धेत विल्यम्स भगिंनींवर विजय बहूतेक जस्टीनी हेनीन ने मिळवला होता ना ? आता पण दुसर्‍या बेल्जियनने मिळवला.. Happy

सरिनाने लाइन-वुमनला उद्देशुन जे उदगार काढले.. ते खरच शेमलेस होते... बर झाले हरली ती..

गोंझु... Happy पण गोन्झालेसने आज त्याच्या पायाला लागले होते म्हणुन... बेफिकीरपणे खेळुन... सामना फेकुन दिल्यासारखा वाटले. पण फेडरर व नादालमधेच फायनल व्हायला हवी...

आजच्या रेन डिले ब्रॉडकास्ट मधे... कॉनर्स व एरन क्रिकस्टिनमधे झालेल्या-- १९९१ मधल्या.. ४ थ्या फेरीतल्या अजरामर मॅचचे हायलाइट्स दाखवले.. ते कोणी पाहीलेत की नाही? १८ वर्षापुर्वी ती मॅच लाइव्ह टिव्ही वर पाहताना काय मजा आली होती.... कॉनर्स अ‍ॅट हिज बेस्ट! कॉनर्स तेव्हा ३९ वर्षाचा होता..सँप्रास-फेडररच्या आधी .... कॉनर्सच यु एस ओपनचा अनभिषिक्त सम्राट होता... मला वाटत यु एस ओपन स्पर्धेच्या इतिहासात..अजुनही त्याच्याच नावावर.. सर्वात जास्त मॅचेस जिंकण्याचा विक्रम आहे. आणि एक.. कॉनर्सने यु एस ओपन ग्रास्,क्ले व हार्ड अश्या तिन वेगवेगळ्या सरफेसवर जिंकल्या आहेत्( सध्याच्या फ्लशींग मेडोजच्या आधी या स्पर्धा फॉरेस्ट हिल्सच्या ग्रास कोर्टवर(१९७५ पर्यंत) व क्ले कोर्ट वर(१९७५ ते १९७७) खेळल्या जात. १९७७ पासुन फ्लशींग मेडोजच्या डेको टर्फच्या हार्ड कोर्टवर या स्पर्धा खेळल्या जाउ लागल्या.

आणी ए‍ॅगॅसी..फेडरर यांच्यातली २००४ मधली जी उप्-उपांत्य फेरीतली मॅच आजच्या रेन डिलेमधे दाखवली... त्या मॅचला मी प्रत्यक्ष हजर होतो... सप्टेंबर ७ पर्यंत..हरिकेन फ्रांसीसचे.. ट्रॉपिकल डिप्रेशन मधे रुपांतर झाले होते त्या डिप्रेशनमुळेमुळे पुढचे २-३ दिवस..अमेरिकेच्या पुर्व किनार्‍यावर व कॅनडाच्या दक्षिण ऑन्टॅरिओ मधे पावसाचे थैमान चालु होते... त्यामुळे न्यु यॉर्कमधे त्याही दिवशी आजच्या सारखाच दिवसभर पाउस पडत होता.. आमच्याकडे बुधवार ८ सप्टेंबरच्या संध्याकाळच्या सेशनचे तिकिट होते. आम्ही साडेतिनलाच फ्लशिंग मेडोजला येउन पोहोचलो होतो. पण पावसाला कंटाळुन..साडेपाचपर्यंत वाट पाहुन.. बरेच लोक घरी गेली.. कारण ज्या रितीने पावसाची रपरप चालु होती ते पाहुन संध्याकाळचा सेशन होण्याची आशा फारच कमी लोकांना होती. आम्ही मात्र आर्थर अ‍ॅश स्टेडिअमवर.. अगदी वर.. कोनाड्यात.. सगळ्यात वरच्या रांगेला जे छत असते त्याच्याखाली बसुन.. समोरच्या मोठ्या स्क्रिनवर दाखवत असलेल्या .. मॅकेन्रो-लेंडलमधल्या जुन्या मॅचेस बघत बसलो होतो. अचानक साडेसहा वाजता पाउस थांबला व सात वाजेपर्यंत.. मोठमोठे पंखे वापरुन.. रोलर मॉप्स वापरुन.. स्टेडिअम कोरडे करण्यात आले व सव्वा सात वाजता अ‍ॅगॅसि-फेडररची मॅच चालु करण्यात आली . पेक्षक तुरळकच असल्यामुळे सगळ्यांना पुढे येउन बसायला सांगीतले. आम्ही अगदी प्लेयर्सच्या मागे.. चौथ्या रांगेत बसुन ती मॅच पाहीली.. नंतर ज्यांच्या सिट्स्वर आम्ही बसलो होतो ती माणसे साडे आठला आली.. आम्ही त्यांना सांगीतले की आता आमच्या सिटवर दुसरे कोणीतरी बसले आहे.. त्या स्टेडिअम मधल्या कर्मचार्‍यांनीच आम्हाला असे पुढे येउन बसायला सांगीतले आहे.. त्यांना जाउन तुम्ही विचारा... कारण खरच कोणीही कुठेही बसले होते. मॅच चालु असल्यामुळे त्यांनीही काही जास्त खिट खिट केली नाही व ते कुठेतरी जाउन बसले. दुसरा सेट संपेसपर्यंत मॅच चालु झाल्याची बातमी सगळ्यांना कळली होती व बरेच न्यु यॉर्ककर मॅचला परत आले होते व स्टेडिअम बरेच भरले होते. मॅचमधे अ‍ॅगॅसीने दुसरा सेट घेतल्यावर सगळ्यांनी स्टेडिअम डोक्यावर घेतले होते.. पण तिसरा सेट फेडररने घेतला व परत एकदा जोराचा पाउस सुरु झाला. एव्हाना ९ वाजुन गेले होते व तिथेच सामना थंबवला गेला . तो नंतर दुसर्‍या दिवशी पाच सेटमधे.. फेडररने जिंकुन संपवला.

अँडी मरेचा खेळ उंचावला आहे.. पण त्याला नादाल्-फेडररच्या पंगतीत बसायला अजुन वेळ आहे. इंग्लंडमधे उगाचाच त्याचा नको तितका गवगवा करतात... थोडक्यात म्हणजे.. हाइप!ब्रिटीश लोक त्यांच्या देशातुन एकतरी ग्रँड स्लॅम विनर व्हावा यासाठी अतिशय हपापलेले आहेत..

सोडर्लिंग व फेडररचा सामना मस्तच झाला. पण प्रत्येक सामन्यात.. फेडररचे ते.... अचुक बॉल अँटिसिपेशन , सहजसुंदर शॉट सिलेक्शन्,नजाकती व्हॉलीज, दणकेबाज पासिंग शॉट्स,अप्रतिम पददालित्य,चित्यासारखी चपळता,प्रत्येक शॉट मारताना किंवा रिटर्न करताना.. बरोब्बर हवे तिथे.. पळापळ न करता... दत्त म्हणुन उभे असणे... असे सगळे(माहीत असलेले.. पण तरीही परत्..एकदा..) पाहील्यावर... खरोखरच या माणसाच्या टेनिस खेळाकडे बघुन.. प्रत्येक वेळी नव्याने आपण आपली मान त्याच्या त्या खेळातल्या अदाकारीला पाहुन.. अन-बिलिव्हेबल! असे मनातल्या मनात म्हणत.. शेक करत राहतो..... Happy

राफा ला काय झालय?? Sad बॅकहँड असे का मारतोय... ?
आणि ते मूर्ख कमेंट्रिटर त्याची आणि सेरेनाची तुलना का करतायत?????? Angry

पोट्रो ने राफा चा चक्क कचरा केला Sad Sad Sad
जबरदस्त ताकदवान फटके मारले त्याने.. त्याची उंची त्याच्या मदतिला आली

पोट्रो म्हणजे अजून तरुण आणि अजून उंच राफा वाटला आज त्याचा खेळ बघताना..

फेडी ला कठीण जाणार त्याला हरविणे Sad

भारी हरवलं डेलने नदालला...
़एकसे एक फोरहॅन्ड मारले त्याने आज...
सगळा गेम त्यानेच कंट्रोल केला असे वाट्ले..

अरे हे खेळाडु स्क्रीन वर इतके ऊंच वाटत नाहीत जितके ते प्रत्यक्षात आहेत. तो योकोविच तर लहान पोरगा वाटतो तो ६ फुट १ इंच आहे. वॉजझनियाकी ५ फुट ८ इंच.

किम क्लिज्स्ट्र्स काही तर्री करणार अस वाटतच होत.
हुआन मार्टीन डेल पोत्रो चा खेळ बघून अस वाटल, खरच फेडररच्या तोडीचा कोणी तरी आलाय.
मजा येइल बघायला.

विक्रम, एकंदर तुम्ही ह्या बाफवर फारच विनोदी बोलता ब्वा.. !! Happy
मॅच चांगली होईल ठिके.. पण डायरेक्ट फेडररची तोड??? Uhoh

Pages