Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
झक्की आणि भाऊ यांचा सामना
झक्की आणि भाऊ यांचा सामना चांगला रंगू शकतो आणि चुरचुरीत आणि दर्जेदारही होईल. नाहीतरी ते भम्पक रॉबीनहूड हल्ली नसल्याने झक्कीनाही करमत नसेल...
जोशी, अहो ते रॉबिनहूड भंपक
जोशी, अहो ते रॉबिनहूड भंपक नाहीत. भारतीय राज्यघटना, कायदे इ. बाबत एक अतिशय जाणकार व्यक्ति आहेत. इथे आपली नुसती गंमत हो.
भाऊ, सुरुवात म्हणून चांगले आहे. हळू हळू, 'फॉर्मात' कोण आहे हेहि आपणच ठरवायचे असते.
दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा: भारतीय फलंदाजांबद्दल किंवा गोलंदाजांबद्दल न बोलता परदेशियांबद्दल बोलावे. आपआपसात भांडणे, आपल्याच लोकांची चूक काढणे हे paradigm आता जुने झाले. अशी नम्रता, खरेपणा, 'खर्या तज्ज्ञा'ला चांगला दिसत नाही.
नेहेमी 'पाँटिंग याची फलंदाजी बरी आहे, स्वभाव असे ना का रडका, चिडका, भांडखोर' असे म्हणावे.
कुठेहि लिहिण्या आधी एक डुप्लिकेट आय डी घेऊन, "मला या बाबतीत भाऊंसारख्या जाणकारांचे मत काय आहे ते वाचायला आवडेल" असे लिहावे. असे बरेचदा करावे.
झक्की
झक्की
मला या बाबतीत भाऊंसारख्या
मला या बाबतीत भाऊंसारख्या जाणकारांचे मत काय आहे ते वाचायला आवडेल" असे लिहावे. असे बरेचदा करावे >>
चला दिवसाची सुरुवात चांगली झाली.
पण झक्की, भाऊ मायबोलीवर तज्ञ कसे व्हावे हे विचारत नाहीत. हे मायबोलीवर तज्ञ होण्यासाठी बरं आहे.
या सगळ्या विजयोत्सवात आपले
या सगळ्या विजयोत्सवात आपले कोच गॅरी कर्स्टन यांचे कुठेच नाव नाहीये
या सगळ्या विजयोत्सवात आपले
या सगळ्या विजयोत्सवात आपले कोच गॅरी कर्स्टन यांचे कुठेच नाव नाहीये >> महत्वाचा मुद्दा, कर्स्टन आल्यानंतर टीम ची प्रगती जोरदार झाली, पण याची सुरुवात कधीतरी राईट यांच्या जमान्यात झाली (मधला चॅपेल काळ वगळता).
झक्की आणि भाऊ यांचा सामना चांगला रंगू शकतो >>

जरुर, मला बाल्कनी अथवा सर्वात बेस्ट सीटवरुन बसुन हा सामना लाईव्ह बघायला आवडेल. तेवढेच तज्ञांचे विचार कानी पडतील
>>या सगळ्या विजयोत्सवात आपले
>>या सगळ्या विजयोत्सवात आपले कोच गॅरी कर्स्टन यांचे कुठेच नाव नाहीये
अहो चांगलच आहे की.... प्रशिक्षकाने असेच असावे.... प्रसिद्धीपराड्मुख (हे कस लिहतात बुवा?)
गौतम, तुला अनुमोदन.... राईट हा सुद्धा भारतीयांसाठी भारी कोच होता!.... एक नक्की... भारतीय टीमला डॉमिनंट कोच मानवत नाहीत
हो स्वरुपराव, डॉमिनंट कोच आणि
हो स्वरुपराव, डॉमिनंट कोच आणि भारतीय टीमचा ३६ चा आकडा आहे. बहुतेक मोस्ट ऑफ प्लेअर स्वभावाने जहाल नसुन मवाळ मतवादी असल्याने (साहेब, द्रविडाण्णा, लक्ष्मणाअण्णा, वगैरे, अपवाद भजी, गांगुली)
कोच व्यतिरिक्त ईतरही बॅकस्टेज मेंबर आहे टीममध्ये, उदा. मानेकाका नावाचे मसाजर, वगैरे. त्यांचेपण नाव या विजयोत्सवात घ्यायला हवे हे प्रामाणिक मत.
या सगळ्या विजयोत्सवात आपले
या सगळ्या विजयोत्सवात आपले कोच गॅरी कर्स्टन यांचे कुठेच नाव नाहीये>>> अगदी सहमत. त्यालाही आणि इतर बॅकस्टेज मेम्बर्स ना क्रेडिट द्यायला पाहिजे. गॅरीच्या खेळण्याच्या दिवसांत आफ्रिका कधीही ऑस्ट्रेलियाला हरवू शकली नाही (सिरीज मधे). त्यालाही माफक सूड उगवल्यासारखे झाले असेल :). पण त्याचे कोचिंग उपयोगी नक्कीच पडले असेल.
<<कुठेहि लिहिण्या आधी एक
<<कुठेहि लिहिण्या आधी एक डुप्लिकेट आय डी घेऊन,"मला या बाबतीत भाऊंसारख्या जाणकारांचे मत काय आहे ते वाचायला आवडेल" असे लिहावे.>>अहो झक्कीसाहेब, पण असं कांही माझ्याबद्दल लिहीलेलं घरच्यानी किंवा मित्रानी वाचलं, तर ते पोट धरून खो-खो करत हंसत सुटतील त्याचं काय !
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान !!
२०१२ पूर्वी एकच खेळ
पै.झक्की झर्सीकर
(वस्ताद ओमाबा यांचा पठ्ठा)
विरुद्ध
पै.भाऊ नमसकर
(वस्ताद मनमोहन सिंग यांचा पठ्ठा)
स्थळ. मायबोली मैदान...
आयसीसी च्या फलंदाजीच्या
आयसीसी च्या फलंदाजीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर जास्तीत जास्त काळ राहण्याचा मान कोणाकडे जातो, याबद्दल काही माहिती/लिंक्स आहेत का? मी पण गुगल काका ला विचारुन बघतोय.
<<निकाली कुस्त्यांचे जंगी
<<निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान !!>>
प्रिय बाळू जोशी,
१] पूर्वी "लखनौके बाँके" अशी एक कथा वाचली होती. लखनौचे दोन दादा [हल्ली त्याना "भाई" म्हणतात] एकमेकाना "भिडणार" आहेत अशी आठ दिवस वातावरण निर्मिती केली जाते; आपल्या वरच्या जाहिरातबाजीसारखीच ! अख्या लखनौमध्ये टेंशन !! ठरल्या दिवशी दोघेही आपल्या बगलबच्चांसहित आमने सामने येतात. आदाब-अर्ज इत्यादी अगदी लखनवी स्टाईलमध्ये होतो. मग दोघेही "गले मिलता"त. अन, अख्खं लखनौ "फुस्स" म्हणत घरीं परततं !
२] "कोंबडे झुंझवणे" या खेळावर बंदी घालणारं विधेयक येत्या लोकसभेच्या अधिवेशनात येऊं घातलं आहे, म्हणे ;
३] सध्यां ओबामा व मनमोहन एकमेकाच्या इतक्या प्रेमांत आहेत कीं त्यांच्या बायकानाही त्याचा हेवा वाटावा ! मग त्यांच्या चेल्यांकडून कांही "जंगी" होईल अशी अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ !
४] जहिरातीत कृपया "पैलवान" शब्द पूर्ण लिहिला तर बरं; नुसतं "पै." पैगंबरवासी असल्यासारखं वाटतं !
कळावे, लोभ असावा,
-भाऊ.
आजच्या अत्यंत महत्वपूर्ण
आजच्या अत्यंत महत्वपूर्ण अश्या एक दिवशीय सामन्याबद्दल श्री. भाऊ साहेबांचे मत ऐकायला आवडेल. त्यांची मते नेहेमीच समतोल व माहितीपूर्ण असतात!
क्रिकेट हा अत्यंत बेभरवशाचा
क्रिकेट हा अत्यंत बेभरवशाचा खेळ आहे हे पुन्हा एकदा सिध्द झालंय. बांगलादेश सारख्या अत्यंत कमकुवत संघाने तुलनेने अत्यंत बलाढ्य असलेल्या न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेत ४-० असं पराभूत केलंय. (एक सामना पावसामुळे झालाच नाही.) न्यूझीलंड सर्व प्रमुख खेळाडू घेऊन खेळत होता. संघात स्टायरिस नव्हता. पण रॉस टेलर, मॅकलम बंधू, रायडर, व्हेटोरी, कायल मिल्स, वॉटलिंग, ग्रॅन्ट इलियट असे सर्व प्रमुख खेळाडू संघात होते. ४ पैकी ३ सामने अत्यंत चुरशीचे झाले. त्यापैकी २ सामन्यांत ९ धावांनी तर एका सामन्यात ३ धावांनी बांगलादेश जिंकला.
विश्वचषक केवळ ४-५ महिन्यांवर आलेला असताना ह्या दारूण पराभवामुळे न्यूझीलंडचे मनोधैर्य खच्ची झालेले असणार. २००३ साली विश्वचषकाला केवळ २ महिने असताना आपण न्यूझीलंडविरूध्द कसोटी मालिका ०-२ व एकदिवसीय मालिका २-५ अशी हारलो होतो. आता न्यूझीलंडची साधारण तशीच अवस्था झाली आहे.
मास्तुरे बांग्लादेशने
मास्तुरे बांग्लादेशने न्यूझीलंडचा असा पराभव करणे आश्चर्यकारक आहेच.
>>विश्वचषक केवळ ४-५ महिन्यांवर आलेला असताना ह्या दारूण पराभवामुळे न्यूझीलंडचे मनोधैर्य खच्ची झालेले असणार. २००३ साली विश्वचषकाला केवळ २ महिने असताना आपण न्यूझीलंडविरूध्द कसोटी मालिका ०-२ व एकदिवसीय मालिका २-५ अशी हारलो होतो. आता न्यूझीलंडची साधारण तशीच अवस्था झाली आहे. << सहमत, पण २००३ मध्ये आपण अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती,
पण २००३ मध्ये आपण अंतिम
पण २००३ मध्ये आपण अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती,>> त्या मॅच चा हँग ओव्हर आत्ता कुठे उतरलाय.
डॉन ब्रॅडमनच्या खेळाची एखादी
डॉन ब्रॅडमनच्या खेळाची एखादी व्हीडीओ फिल्म उपलब्ध आहे का?
डॉन ब्रॅडमनच्या खेळाची एखादी
डॉन ब्रॅडमनच्या खेळाची एखादी व्हीडीओ फिल्म उपलब्ध आहे का?>>. मास्तुरे, सचिनची फिल्म बघा. डॉनच स्वतः तस त्याच्या बायकोला म्हणाला होता, " अगदी माझ्या सारख खेळतोय बघ हा पोरगा. लवकर बघायला बाहेर ये.
(डोना काकू त्यावेळेला स्वयपांक घरात काही तरी खुड्बूड करत होत्या बहूतेक.)
नेहरा रंगात आलाय दोन
नेहरा रंगात आलाय
दोन बळी.
ऑसीजना आत्ता नेहराही आवरेना काय?
Australia are alive and
Australia are alive and roaring here. - क्रिक इन्फो. १४२/२ १२६ धावांची भागीदारी.
क्लार्क ६४, हसी ५९, शेवटच्या ५ षटकात धावगति ६.
कुठे गेले ते योग आणि कोण, जे नेहेमी इथे आले की फलंदाज बाद होतात, ते?
आलो आलो झक्की.. मी आलो...
आलो आलो झक्की.. मी आलो... विसरलोच होतो आज मॅच आहे ते... बघू आता पुढची विकेट पडते का ते... २ बाद २३५ म्हणजे फारच झाले नाही का.. २ बाद २९ वरून..
अहो काय केलेत हे? २३५ ला
अहो काय केलेत हे? २३५ ला आलात नि नंतर ३ षटकात ५४ धावा!! सरासरी १८ धावा एका षटकात!! कुणाच्या बाजूने आहात तुम्ही? वैर्याच्या??!
आता असे करा - एकदा स्वछ स्नान करा, संध्या, पूजा लवकर आटपा, भारताचे राष्ट्रगीत, वंदे मातरम अशी देशभक्तिपर गाणी, स्तोत्रे समजून म्हणा. छत्रपति श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला साष्टांग नमस्कार घाला, नि मग परत या!
जरा लवकर आटोपलेत तर पहिले दोन तीन गडी बाद व्हायच्या आत येऊ शकाल परत.
भारताचे 'शिखर ' कापून नेले
भारताचे 'शिखर ' कापून नेले वैर्याने..
आता २ तर बाद झालेच आहेत.. पण
आता २ तर बाद झालेच आहेत.. पण सुदैवानी ९५ धावाही झाल्या आहेत. जिंकू कदाचित...
अरे कोहली आणि युवराज अजून
अरे कोहली आणि युवराज अजून खेळतायत!!!! वा वा!!! जिंकू शकतो आपण!!
टोटल व्हाईटवॉश केला तर मजा येईल! खेळा रे खेळा मर्दानो!!!
रनरेट किती 'गरीब' आहे !
रनरेट किती 'गरीब' आहे !
टोटल व्हाईटवॉश केला तर मजा
टोटल व्हाईटवॉश केला तर मजा येईल>>व्हाईटवॉश ???
टेस्ट दोन्ही जिंकल्या ना?
टेस्ट दोन्ही जिंकल्या ना? एखादी हरलो असेल तर मला माहीत नाही. आता वन डे पण दोन्ही जिंकल्या म्हणजे दोन्हीत व्हाईटवॉश म्हणून टोटल म्हंटलो. काही चुकलं का असाम्या?
त्याला ब्राऊन वॉश शब्द
त्याला ब्राऊन वॉश शब्द अपेक्षित असावा...
गेला गेला युवराज गेला..
Pages