Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
सेहवाग १०० *
सेहवाग १०० *
अरे दिवाळीमुळे पोस्ट नाहीत की
अरे दिवाळीमुळे पोस्ट नाहीत की काय?
सेहवागचे फ्रि हिट आहे का विचारने खतरा होते. जाम हसू आले. लगेच गावस्कर म्हणाला, "सेहवागला काय करायचा फ्रि हिट तो असाही फ्रीच हिट करत असतो". अन लगेच दुसर्या बॉल वर चौका!! द्रविड पण मस्त. पूर्ण रात्र पाहता आले नाही. पण आज सचिन साठी जागावे लागणार.
केदार.. मी मुद्दामच लिहिले
केदार.. मी मुद्दामच लिहिले नाही.. उगाच जिंक्स आला परत तर काय करा... एकूणच सेहवाग आणि द्रविड बाबांनी धुतला आहे... द्रविडचे शतक झाले हे उत्तम.. आता जरा फॉर्मात आल्यासारखा वाटतोय... सुरुवातील जामच हळू खेळत होता.. पण जम बसल्यावर मस्त खेळला..
अरे काही जिंक्स येत नाही.
अरे काही जिंक्स येत नाही.
द्रविडचे शातक झाले हे बरे झाले. आता तो थोडा फ्रि होईल. (मानसिक) पण पण स्ट्राईक रेट थोडा वाढवला असता तर आपण ३५० मध्ये राहिलो असतो. बरेच दिवस ड्यु होते. तो टीम मध्ये अजुनही थोडा हरवल्या सारखाच दिसतो. आता ते बदलेल कदाचित. (बदलावे.)
कालच्या २ शतकांनी प्रेरीत
कालच्या २ शतकांनी प्रेरीत होऊन आजकालचे (व नवोदीत) जबरदस्त शतककार कोण आहेत हे पाहण्यासाठी एक तक्ता बनवला. १३ जणांची ती यादी खाली दिली आहे. सेहवाग व द्रवीड दोघेही त्यात आहेत.
यादितील भारतियांची स्थाने जरा जास्तच top-heavy वाटतात का?
http://www.astro.caltech.edu/~aam/cricket/prolific_centurians.html
आशिष, हे कळायला जरा वेळ लागला
आशिष, हे कळायला जरा वेळ लागला पण टॉपचा शतकवीर घेउन, दोन्ही अर्थाने "त्याच्या नंतर" कोण आहे याचा अॅनेलिसिस आहे का?
सचिन ने ४९ मारल्याने तो आपोआपच वर येतो. मार्कस नॉर्थ २००९ साली आला आणि त्याने आत्तापर्यंत पाच शतके मारली. तेवढ्यात सचिनने आठ मारली आहेत. आता सचिन मुळातच या लिस्ट मधे असल्याने तो प्रश्न येत नाही.
पण समजा लारासारखा एखादा असता - जो बराच आधी खेळू लागला, ज्याने एकूण शतके इतरांपेक्षा कमी मारली पण मागच्या दोन वर्षात सर्वात जास्त मारली - असे असते तर या लिस्ट मधे तो आला असता का?
किती शतकं आहेत या वर सॉर्ट
किती शतकं आहेत या वर सॉर्ट केलेली लिस्ट आधी घेतली व वरुन सुरुवात केली.
केवळ इत्क्यात कुणाची शतके जास्त आहेत म्हणुन तो यादीत आला नसता. ही तशी एक त्रुटीच आहे.
टेस्ट्स च्या आकड्यावरून पण अशी यादी बनवता येईल, त्यात बहुदा गावस्कर, लारा प्रभुती येतील, पण ब्रॅडमन नंतर फक्त नॉर्थ येईल
वेगळ्या शब्दांमध्ये असे म्हणता येईल की या यादीत असे लोक आहेत की ज्यांच्यानंतर खेळणे सुरु करुन त्यांच्यापेक्षा अधीक शतके कुणीच काढली नाहीत उदा. सेहवागने २००१ मध्ये खेळणे सुरु केले व त्याची २२ शतके आहेत. त्यानंतर आलेल्या कुणी त्यापेक्षा जास्त शतके काढली असती तर या यादित सेहवाग नसता.
त्यानंतर आलेल्या कुणी
त्यानंतर आलेल्या कुणी त्यापेक्षा जास्त शतके काढली असती तर या यादित सेहवाग नसता.>> त्यादृष्टीने ही यादी सही आहे!
आयबीएन लोकमत वर 'माझे घर माझी
आयबीएन लोकमत वर 'माझे घर माझी माणसे' ह्या कार्यक्रमात सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेतली आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार शुक्रवारी स. १०, दु. १:३०, रात्री ९:३० तसेच शनिवारी स. ९:३० आणि सायंकाळी ५:३० वाजता दाखवण्यात येणार आहे.
( http://www.facebook.com/photo.php?fbid=452240059750&set=a.452240054750.2... )
माहिती स्तोत्र ? ऐ.ते. न
माहिती स्तोत्र ? ऐ.ते. न
बाळू जोशी मराठी लिहु की
बाळू जोशी
मराठी लिहु की इंग्रजी ह्या गोंधळात भलतेच टाईप झाले .
उपाहारापर्यंतच्या २ तासात
उपाहारापर्यंतच्या २ तासात फक्त ६३ धावा झाल्या व भारताने ३ बळी गमावले. भरपूर धावा व बळी हातात असताना सचिन आणि लक्ष्मण नांगर टाकून का खेळले खुदा जाने! काय मिळविलं या दोघांनी टुकुटुकु खेळून? सेहवागने १९९ चेंडूत १७३ धावा करून जे कमावलं ते या दोघांनी गमावलं.
८ वा पण गेला. ८ पैकी ६ बळी
८ वा पण गेला. ८ पैकी ६ बळी फिरकी गोलंदाजांनी मिळविलेत. खेळपट्टी दुसर्याच दिवशी फिरायला लागली की काय?
>>खेळपट्टी दुसर्याच दिवशी
>>खेळपट्टी दुसर्याच दिवशी फिरायला लागली की काय
काही नाही हो... सुखासुखी बाद होतात आपेल लोक
मणींदर सिंग म्हणतो- खेळपट्टी कधीच फिरत नाही, गोलंदाज चेंडू फिरवतो!
असो.

या मालिकेच्या आधी मी म्हटले होते की गोलंदाजी विभागात आपण निश्चीतच कमी आहोत- त्यातही झहीर बसला की सर्व बसतेच. भज्जी अन ओझा हे हमखास गडी बाद करणारे गोलंदाज नव्हेत. शिवाय श्रीशांत चा चेहेरा त्याच्या चेंडू पेक्षा अधिक बोलतो, त्यामूळे एकंदरीत हा सामना अनिर्णीतच राहू शकतो.
सेहवाग ने ईतक्या वेगात ईतक्या धावा केल्या नस्त्या तर बहुतेक किवी संघ आता आघाडी घेवून आपल्या पुढे गेला असता.
अगदीच चमत्कार झाले तर सामन्याचा निर्णय लागू शकतो. नाहीतर सेहवाग अन भज्जी ची फटकेबाजी सोडली तर सर्व "बोअरींग" प्रकारात मोडते.
-----------------------------------------------------------------------------------
धोणी फिरकी खेळू शकत नाही हे आता मान्य करायलाच हवे! नाणेफेक न जिंकल्यास कप्तानाला "बसवता" येते का? जाणकार सांगू शकतील का?
-----------------------------------------------------------------------------------
काल जिमी ने भज्जी ला प्रश्ण केला: कपिल अन शास्त्री सुध्धा सुरुवातीला खूप खाली खेळून मग वर खेळायला लागले अन अष्टपैलू खेळाडू झाले. तू देखिल आता फलंदाजीत वरच्या क्रमांकावर येणार का?
-- आता बोला..
ब्लॅक कॅप्स ऑन फायर! ४ डाऊन,
ब्लॅक कॅप्स ऑन फायर! ४ डाऊन, ६ टु गो.
२०० झाल्याशिवाय काही खरे नाही.
>>२०० झाल्याशिवाय कोण करणारे?
>>२०० झाल्याशिवाय
कोण करणारे? भज्जी अन ओझा?
६ बाद ८२. भारताकडे फक्त ११०
६ बाद ८२. भारताकडे फक्त ११० धावांची आघाडी. गंभीर, सचिन, रैना आणि धोनी दोन्ही डावात अपयशी. भारताला सामना वाचवता येणार का?
पुन्हा एकदा द ग्रेट लक्ष्मण
पुन्हा एकदा द ग्रेट लक्ष्मण राव वाचवणार.
आज उपहारा पर्यंत एकही बळी
आज उपहारा पर्यंत एकही बळी नाही. सामना वाचण्याच्या मार्गावर. पुनः एकदा हिरो लक्ष्मण. आणि दोन्ही डावात खेळून भज्जी. पण त्याच्या पहिल्या इनिंग्स च्या ५० ऐवजी लवकर काढलेल्या ५ विकेटस असत्या तर मॅच चा निकाल वेगळा लागला असता.
पहिल्या इनिंगला रडत खडत का होईना शतक मारल्याने विल्यम्सन्चा ११ वर सोडलेला सोपा कॅच व नेहमीच्या स्तायलीत वीरूला केलेला रन आउट द्रविडला माफ होउ शकतो का?. पहिल्या चुकी मुळे आपण जिंकू शकलो नाही, तर दुसरीयामुळे पराभवाच्या दारात.
पण त्याच्या पहिल्या इनिंग्स
पण त्याच्या पहिल्या इनिंग्स च्या ५० ऐवजी लवकर काढलेल्या ५ विकेटस असत्या तर मॅच चा निकाल वेगळा लागला असता. >>> अनुमोदन
उत्तम फाईट्बॅक, आता ही वेळच
उत्तम फाईट्बॅक, आता ही वेळच का आली हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, पण निदान आपण क्रायसिसच्यावेळी हातपाय गाळून बसत नाही, नं १ रँकिंग टीम असल्याप्रमाणे लढतो हे ही चांगलेच आहे.
धोनीने ४० ओव्हर राखून डीक्लेअर केले तर आपल्याला जिंकायचा एक अंधुक मौका आहे.
धोनी आता भज्जीच्या शतकाची वाट
धोनी आता भज्जीच्या शतकाची वाट बघत बसणार.. आणि मॅच नक्की ड्रॉ होणार..
ऑस्ट्रेलियाची टीम सुद्धा अशीच
ऑस्ट्रेलियाची टीम सुद्धा अशीच बर्याच वेळा अडचणीत सापडून गिलख्रिस्ट वगैरे कोणीतरी त्यांना बाहेर काढत असे आणि मग उरलेल्या मॅच मधे ते दुसर्यांना धुवून काढत. आपली त्यांच्या विरूद्धची सिरीज म्हणजे तसेच (उलटे) उदाहरण होते.
आजही त्याचीच आठवण झाली.
आता ही मॅच वाचल्यात जमा आहे -५०-५५ ओव्हर्स बाकी आहेत फक्त. त्यामुळे पुढच्या २-३ ओव्हर्स मधे तीन विकेट गेल्या तरी त्यांना ते रन्स करणे सोपे नाही.
जरा स्पोर्टींग डीक्लेरेशन
जरा स्पोर्टींग डीक्लेरेशन द्यायला काय हरकत आहे आता?
धोणी म्हणजे काय स्टीव्ह वॉ
धोणी म्हणजे काय स्टीव्ह वॉ किंवा पॉन्टीन्ग आहे का स्पोर्टींग डिक्लरेशन द्यायला.. आणि धोणीला गोलंदाजांबद्दल खात्री थोडीच आहे...
ते बरोबर आहे पण जेंव्हा
ते बरोबर आहे पण जेंव्हा तुम्ही स्वतःला नं १ म्हणवता तेंव्हा तशी वृत्ती दाखवणे गरजेचे आहे. 'सेफ्टी फर्स्ट' चा मंत्र किती दिवस जपणार आहेत?
सगळ्या विकेट्स घेण्याची आपली तयारी नाही पण निदान ते जिंकणार नाहीत एवढी तरी बॉलिंग बरी आहे!
>>सगळ्या विकेट्स घेण्याची
>>सगळ्या विकेट्स घेण्याची आपली तयारी नाही पण निदान ते जिंकणार नाहीत एवढी तरी बॉलिंग बरी आहे>>लक्षमण अन भज्जी चे शतक झाल्यावर डाव घोषित करेल बहुदा.
धोणी संघात का आहे:
नाणेफेक, डाव घोषित करणे, सामन्यानंतर दोन शब्द बोलणे वगैरे या साठी
-----------------------------------------------------------------------------------
द्रविड बरोबर सेहवाग हमखास धावचित होतोच... कारण द्रविड चे रनिंग बिटविन विकेट्स अत्यंत कमकुवत आहे अन त्याचबरोबर सेहवाग ला कमी स्ट्राईक दिल्याने दडपण वाढते ते वेगळेच. मी अजूनही असेच म्हणेन की विरू असतो तेव्हा चक्क रैना ला क्र. ३ वर पाठवावे. रैना समोर विरू असल्यावर बेधडक खेळतोच पण विरूलाही धावफलक हलता असल्याने ऊगाच धोका पत्करावा लागत नाही.
एक शतक सोडता द्रविड भाऊंचे दिवस जवळ आले आहेत असे वाटते.
अंपायरला कंटाळा आला बहुतेक
अंपायरला कंटाळा आला बहुतेक भारताची बॅटींग बघून... लागोपाठ दोन ढापले आणि परत वर नंतर ५ बॉल मध्येच ओव्हर संपवली... दुसर्या बाजूचा अंपायर झोपलाय की काय.. किती बॉल झाले ते दोघीही मोजतात आणि अशी गडबड झाली तर योग्य तो निर्णय घेतात खरं तर..
भज्जी १००
भज्जी १००
रोहीत , बाफ चूकला. पाककृती
रोहीत , बाफ चूकला. पाककृती मधे टाक भजी १००
भज्जी साला माणूसच निराळा आहे.
एका छकडीत १०० भज्ज्या.. !
Pages