मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.flipkart.com/asus-zenfone-2-ze551ml/p/itme6cg7whgfznu7?pid=MO...

अ‍ॅसुस्चा झेनफोन२.
अ‍ॅसुस बद्दल माहीती हवी होती. जास्त करून त्याच्या उणीवांबद्दल
१. युजर फ्रेंडली आहे का?
२. मोबाईल चालू केल्यावर सोनी, सॅमसंग सारखेच अंतरंग आहे का? (काही मोबाईल मधे मेनु हा ऑप्शनच नाही आहे सगळे अ‍ॅप्लिकेशन्स ऑनस्क्रिनवर असतात म्हणून विचारले)
३. बॅटरी बॅकअप कसा आहे.?
४. स्क्रिनटच कसा आहे. ? (लिनोव्होचा वापर वाढल्यावर फारच खराब होतो. )
५. हँग होण्याचे प्रमाण ?
६. Zen UI Experience हा प्रकार काय आहे. (सॅमसंग गॅलक्सीसारखे अ‍ॅप्लिकेशन आहे की अजून काही)

विंडोज १० फुकट वाटणारेत २९ जून २०१५ पासून. फोन, टॅब्लेट अन पीसीज करता फ्री मिळेल. ३ जिबी पर्यंतची डाऊनलोड असेल. विंडोजच्या ऑफिशिअल साईटवर जास्त माहीती मिळेल. आताच आपली कॉपी राखा... Happy

मित्राने युरेका घेतला तीन महिन्यापुर्वी.(बहुतेक cyanogen os)
गुगल प्ले स्टोर लोड केले एकदा की पन्नास एमबी डेटा खातो असं सांगतो कोणास अनुभव आहे का याविषयी ?

गुगल प्ले स्टोअर लोड केले तर माझा 10MBडेटा जातो,gmail fb ची सतत बॅकग्रांऊडला डेटा खाण्याचा वैताग आला आहे.हा ANDROID चा प्रॉब्लेम आहे.

>>>विंडोज १० फुकट वाटणारेत २९ जून २०१५ पासून. फोन, टॅब्लेट अन पीसीज करता फ्री मिळेल. ३ जिबी पर्यंतची>>>माझं जुनं नोकियाचं खातं माइक्रोसोफ्ट कडे गेल्याने रीतसर मेल आला आहे लुमियासाठी. परंतू मी अजिबात धरसोड करणार नाही. या ओएसचं संपूर्ण वाचन केल्यावर ( नेट रिव्हयु) समजलं काही। विशेष आपल्या कामाचं नाही.

तीनेक आठवड्यांपूर्वी लेनोवो ए६००० प्लस घेतला. उत्तम चाललाय. ल्युमियाच्या तुलनेत वापरायला जरा नाजूक वाटला आणि डिस्प्ले जरा भडक आहे. पण परफॉर्मन्स सुरेख.. मुख्य म्हणजे मेल व फेबु मी बघेन रिफ्रेश मारून तेव्हाच नवी नोटिफिकेशन्स दिसताहेत - तसं सेटिंग करता आलं. त्यामुळे डेटाचा वापरही कमी होतोय.
फक्त ऑपरेटिंग बटन्स दिसायची मारामार (बॅकलिट नाहीत) आहे.

पॉवर बँक- portable charger बद्दल चर्चा झाली आहे क इथे? खरंच उपयोग होतो का?
आपल्या मोबाईलला कुठला portable charger चालेल हे कसं ठरवायंच?
माझ्याकडे samsung galaxy ACE आहे.

१ - http://www.amazon.in/ihave-ia1310-10000mAH-Power-Silver/dp/B00N9P2PHE?ta...

२ - http://www.flipkart.com/iball-pc4400-portable-power-bank/p/itmdm5u8jpt6y...

३ - http://www.amazon.in/ADATA-PT100-10000mAH-Power-Black-Green/dp/B00Q648VS...

पॉवर बँक तुम्ही वापर किती करता त्यावर अवलंबून आहे. तुमच्या फोन ची mAh* जेवढी आहे त्याच्या २ पट पॉवर ची पॉवर बँक घेतलीत तर तुम्ही तुमचा फोन (पॉवर बँक फुल चार्ज्ड झाली कि) एकदा फुल चार्ज करू शकता. mAh जेवढे जास्त तेवढ्या जास्त वेळा चार्ज करू शकता. म्हणजे पॉवर बँक एकदा फुल चार्ज केली कि अजून २-३ वेळा करू शकता.

इथे पॉवर बँक बद्दल अजून माहिती मिळेल.

Anker® या कंपनीची पॉवर बँक बेस्ट इन क्लास आहे पण तेवढीच महागही आहे.

Amazon इंडिया वर लेनोवोची PA १३००० mAh बेस्ट सेलिंग आहे. मी आत्ता तीच मागवली आहे. माझा फोन आणि कॅमेरा मिळून ३५०० mAh होतात आणि प्रवासात लागेल म्हणून मुद्दाम १३००० mAh ची घेतली. सोमवारी येईल. कशी वाटली ते लिहेन इथे.

* - A milliampere hour (mAh) is 1000th of an ampere hour (Ah). Both measures are commonly used to describe the energy charge that a battery will hold and how long a device will run before the battery needs recharging.

आजच माझी पॉवर बँक आली. मस्त आहे पण थोडी जड वाटली. २ USB पोर्ट आहेत. सोबत एक कॉर्ड येते. adapter नाहीये.

बहुतेक इम्पोर्ट केलीये कारण मन्युअल मध्ये फक्त चायनीज भाषा आहे. चार्ज करून झाली. वापरून कसी वाटली सांगते.

माझ्या व्हॉटस अपला प्रॉब्लेम येतोय. अ‍ॅपवर टिचकी मारताक्षणी unfortunately whats up has stopped असा मेसेज येऊन ते बंद पडतोय. काय कारण असू शकेल Uhoh

हेल्प प्लीज !!

गिरी, तुला आज-उद्याकडे गगोवर येऊन हटकणार होतोच. रिव्ह्यु टाकच. याच्यामुळे रेडमी नोटची किंमत २००० ने कमी झाली आहे.

४ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर रविवारीच फोन हातात पडला.
मॉडेल लेनोव्हो के३ नोट,
अ‍ॅन्ड्रॉईड ५.०,
१.७ गिगाहर्ट्झ ऑक्टॅकोअर प्रोसेसर,
२ जिबी रॅम, १६ जिबी रॉम, (पुर्ण १६ जिबी वापरायला मिळेल असे दिसतेय)
मायक्रो एस.डी. कार्ड स्लॉट
५.५" डिस्प्ले,
वजनाला आकाराच्या मानाने बराच हलका, (दोन वर्ष मायक्रोमॅक्स कॅनवास टु+ वापरल्यानंतर हे जाणवले)
ड्युएल सिम, (मायक्रो)
२९०० एमएएच बॅटरी
गरजेचे बरेचसे अ‍ॅप्स, उदा. गुगलचे सर्व अ‍ॅप्स, फेसबुक, स्काईप, ट्रुकॉलर, क्रोम, यु.सी. ब्राऊजर्स आधीच ईन्स्टॉल्ड आहेत.
१३ मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा.
डॉल्बी अ‍ॅटमॉस हा प्रकार खोलात जाऊन तपासायचाय अजुन. कॉल रेकॉर्डिंग करता येते.
दोनच गोष्टी खटकल्या त्या म्हण्जे,
कॅमेरामधे ईमेज साईज बदलता येत नाहीये (किंवा मला अजुन ते सेटिंग्ज शोधता आले नाहीये)
आणी डुचक्यांनी हँडस फ्री दिले नाहीये. Angry

पण एकुणात रु. १००००/- मधे बेश्ट डील आहे.

एकाचा के ३ नोट पाहिला.
लाइटवेट आहे. कॅमेरा ८ मेगा पिक्सेल आहे ना?
ऑटोफोकस चांगला वाटला. टच सेन्स मस्त आहे.

http://www.gsmarena.com/lenovo_k3_note-7147.php

हाच रे तो.
त्याला माहिती नसेल मग पक्क अथवा माझी ऐकण्यात चुक झाली असेल.

ह्याची एस ए आर व्हॅल्यु हाय रेन्ज जवळ आहे.
ब्लुटुथ घे गिरी, जास्त कॉलिन्ग असेल तर.

झक्या, व्हय, व्हय, हाच तो फोन. मला ब्लुटुथ हा प्रकार फारसा आवडत नाही. हँडसफ्री वापरणे पसंत करतो मी.

प्राची: ह्याच दोन गोष्टी अजुन डीटेलवार बघितल्या नाहीयेत.

अहो राॅबिनहूड... Bluetooth 4.0 असेल तर data transfer करतानाच battery consume होते.. it is specially designed to be used with hands free... otherwise very little consumption.....

प्राची,
कॅमेरा ठिकठाक आहे, फोटो बर्‍यापैकी शार्प येतात अर्थात Youcam Selfie सारखे अ‍ॅप वापरुन एकुन फोटोंचा दर्जा अजुन उंचावता नक्कीच येईल. मी २.५ / ५ गुण देईन.
साऊंडचा दर्जा पण ठिक आहे. अर्थात मी मोबाईलवर जास्त गाणी ऐकत नाहीत त्यामुळे फार अपेक्षा नसतात माझ्या. पण मी एकुण ३/५ गुण देईन.

Mi gelya mahinyat moto g2 ghetala. Chhanacha aahe. Pan jevha me tyacha key-pad vaparate, tevha to vibrate hota. Mi sagali settings check keli, pan kahi sapadala nahi. Sagale vibrator mod off aahet.
Kuni sangel ka? (Sorry, pan marathi select kela tari english cha type hotay...)

दिपाकुल
खालील प्रमाणे प्रयत्न करुन पहा.

१) सेटिन्ग मध्ये जा
२) त्यात साउन्ड वर क्लिक करा
३) डायल पॅड टच टोन्स आणि व्हायब्रेट ऑन टच हे दोन्ही ऑन असतील (टिक मार्क) तर ऑफ करा.

काम होउन जाइल तुमचे,.

ओह. धन्यवाद गिरीकंद. सध्याच्या सोनी एस पी मध्ये कॅमेरा चांगला नाही म्हणूनच फोन बदलायचा होता. Happy

जर माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर लेनोव्हो के३ नोटचा आज दुसरा फ्लॅश सेल होता फ्लिपकार्ट वर. १२ वाजता.

एखादं अ‍ॅप आहे ज्याने तुमचं हे सेटिन्ग ऑन ठेवलय.
त्या अ‍ॅप मधुन बंद कराव लागेल.
उदा. माझ्याकडे अ‍ॅन्ड्रॉइड असिस्टन्ट आहे.
त्याच्यात व्हायब्रेट मोड ऑन असेल तर तो ऑफ करावा लागेल.
ते अ‍ॅप कोणत हे तुम्हालाच शोधाव लागेल.
ह्या उपायाविषयी मी साशंक आहे.

मोबाइल सेफ मोड मध्ये सुरु करुन एकदा सेटिन्ग बदलुन पहा.
फोन योग्य ते सेटिन्ग मध्ये नीट वागत असेल तर एखादं अ‍ॅपच कन्ट्रोल करतय सेटिन्ग.

Deepakul, Go to Settings- Language & input
Then tap on the the keyboard you are using.
There you will get option "Vibrate on Keypress". Set it off.

मोटो मध्ये तरी खालीलप्रमाणे आहे दिमा काका.

१) पॉवर बटण दाबुन ठेवा
२) ३ ऑप्शन येतील. त्यातील एक बंद करण्यासाठी असेल. पॉवर ऑफ
३) ह्या पॉवर ऑफला दाबुन ठेवा. सिन्गल क्लिक नव्हे तर दाबुन ठेवणे गरजेचे आहे.
४) रिस्टार्ट इन सेफ मोड असा मेसेज येइल. तो वाचुन ओके म्हणलं की झाला फोन रिबुट.

Pages