मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवीजा, फोन चांगला आहे. रॅम जास्त असल्याने स्पीडही चांगला आहे. माझा प्लस नाहीय, ६००० आहे. प्लसला १ जीबी रॅम आहे. ऑनलाईन घेतलात तर हॅन्ड्सफ्री येत नाहीत. त्यासाठी पुन्हा शोधाशोध करावी लागेल. ह्या फोनचा एकच ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे हॅन्ड्सफ्री कनेक्ट केले की आपोआप रेडिओ चालु होतो बरेचदा.

योडी तुम्ही हँड्स्फ्री ची सेटींग बघा त्यात असत हेड्फोन जोडला की रेडिओ किंवा मेमरी कार्डातले गाणे आपोआप चालु होतात. तुमच्या मोबाईल मधे स्मार्ट कनेक्ट नावाचे अ‍ॅप असेल त्यातुन ते बदलता येईल.

वडिलांसाठी मोबाइल घ्यायचा आहे. स्मार्टफोनच.
१. ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आधी साधाच फोन वापरलेला आहे त्यामुळे वापरायला सोपा हवा.
२. आवाज दणदणीत हवा. फोन कायला आणि गाणी ऐकायलाही
३. बॅटरी उत्तम.
४. व्हॉटसॅप, मनीकंट्रोल व त्सम साइटस, इमेल इतकाच उपयोग नेटचा असणार आहे.
५. कॅमेरा ८ मेगापिक्सेल तरी हवा जेणेकरून ट्रिपला जाताना वगैरे वेगळा कॅमेरा बरोबर ठेवायची गरज नाही.
६. बजेट ९ ते १० हजाराच्या आत.
७. स्मार्टफोन पटपट खराब होतात असा त्यांचा समज आहे त्यामुळे वर्ष दीड वर्ष सुखाने चालला तर बरे पडेल अन्यथा ते पूर्वीच्या ठोकळा फोन्सकडे जातील Happy

सुचवा.

मायक्रोसोफ्ट लुमिया घेवू साकता वापरायला सोपा ,
कोणत्यातरी चांगल्या कंपनी चा घ्या, उदा - microsoft, motorola, samsung, lenovo etc....

आम्ही डायहार्ड सॅमसंग पंखे आहोत.
सॅमसंग ए७ लिस्टवर आहे. पण आज वन प्लस २ चे स्पेसिफिकेशन्स पाहिल्यावर तोही लिस्टवर टाकला आहे. फक्त
सॅमसंग सोडून वन प्लस कडे जावे का हाच प्र्श्न आहे.
वन प्लसबद्दल काय फीड्बॅक आहे? फोन खरेच चांगले आहेत का वन प्लसचे?

१+१ हा एक चांगला फोन आहे, आणि त्याचे OS पण साधे सोपे असे आहे
१+२ हा सध्या फक्त invitation वर मिळतो , waiting list खूप मोठी आहे

मी सॅमसंग j५ घेतला . कॅमेरा उत्तम आहे. बॅटरी लाइफ चांगली आहे . ११५०० मध्ये चांगला फोन आहे
सॅमसंग A ८ मध्ये असलेले फिचर यात आहेत अस कलीग म्हणत होता. पण मला ते फार पटलं नाही .
तर एकंदरीत फोन value for मनी आहे

कुलपॅड नोट ३ घ्या ९ हजारात
३जीबी रॅम, फिंगर स्कॅनर, एच डी डिस्प्ले
माझा एक जवळचा मित्र वापरतोय २ आठवड्या पासून. खूप चांगला फीडबॅक. रूट करणे पण एकदम सोपे.
सध्याचा बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी

लागोपाठ दोन मोबाईल (नोकिया आणी मायक्रोमॅक्स) वर्षाच्या आत खराब झाले. फार वैताग आलाय. कोणता घ्यावा असे सुचवाल?

चांगला कॅमेरा, उत्तम साऊंड, १० च्या आस्पास किंमत अशा मझ्या अपेक्शा आहेत. मी गेम्स वगैरे खेळत नाही त्यावर.

नवरा आयफोनच घे म्हणतोय. धीर होत नाहीये.

लागोपाठ दोन मोबाईल (नोकिया आणी मायक्रोमॅक्स) वर्षाच्या आत खराब झाले >>> खराब म्हणजे नेमके काय झाले ?

टच स्क्रीन मधे मधे काम न करणे, पटकन ऑन न होणे, एखादे अ‍ॅप काम करता करता अचानक थांबणे, स्क्रीन उगीच ब्लँक होणे इत्यादि.

हो.. चांगल्या कंपनीची पावरबँक घ्या. सोनी सिस्का वगैरे थोडी महाग येईल पण मोबाईल खराब होण्यापासून वाचेल.

एचटीसी कंपनीचा मोबाईल एकदा वापरून बघा.

होय एच टीसी चांगली कम्पनी आहे. माझ्या माहितीनुसार एच टी सी स्वतःचा ब्रँड आणण्यापूर्वी सॅमसंग साठी हँड सेट बनवून देत होती.

होय एच टीसी चांगली कम्पनी आहे. माझ्या माहितीनुसार एच टी सी स्वतःचा ब्रँड आणण्यापूर्वी सॅमसंग साठी हँड सेट बनवून देत होती.

मी पण झेनफोन २ ४ जीबी रॅम व ३२ जीबी स्पेसवाला फोन घ्यायचा विचारात आहे. थोडी किंमत उतरली की घेणार.

नावाजलेल्या कंपन्यांन्च्या तुलनेत कार्बन मायक्रोमॅक्स किंवा इतर कंपन्यांचे फोन वापरल्यावर असे लक्षात आले की हे फिचर चांगले देतात कॅमेरा अगरी ८-१३ एम्पीचा असतो पण क्वालीटी २-५ एम्पीची मिळते.

मोटोचा X Play पण आवडला. मला कॅमेरात जास्ती रस. २१ MP म्हणल्यावर खुष झालो होतो पण कॅमेरा भारी असला तरी फिचर्स\मोड फारच गरीब. त्यामानाने आमचा गॅलॅक्सी ८ MP मधे चांगले मोडे\फिचर व क्वालीटी देतो.

सरळ आहे पहिल्या मोबाईल मधे १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी आहे त्याचे रेझोल्युशन पण खराब आहे
वर १८००ची बॅटरी म्हणजे ४ तास ३जी चालवले की बॅटरी मेली सारखे चार्जिंग करून मोबाईल १-२ वर्षात थडग्यात पुरावा लागणार.

दुसरा मोबाईल
कॅमेरा ढिला आहे वर रेझोल्युशन ८००*४०० ५ इंच असुन देखील एचडी व्हिडीओ बेक्कार क्वालिटीचे दिसणार. आढ्यातच नाहीतर पोहर्‍यात कसे येईल. क्वाड कोर प्रोसेसरवर ५१२एम्बी रॅम दिली बनवणारा महामुर्खच दिसतो.

असल्या कंपन्या म्हणजे ग्राहकांना मुर्ख बनवणार्‍या असतात

मी पण झेनफोन २ ४ जीबी रॅम व ३२ जीबी स्पेसवाला फोन घ्यायचा विचारात आहे. थोडी किंमत उतरली की घेणार. >> मी वापरत आहे २० ला घेतलेला. अजुन काय किंमत कमी होणार ? Uhoh

अरे पण लुमिया सिरीजही पाहा की. स्वस्तात मस्त, टिकाऊ, चांगले फोन्स आहेत. अ‍ॅपस्टोरवरही आवश्यक असलेले सगळेच अ‍ॅप्स आहेत. तसेही एकावेळेला असे कितीसे अ‍ॅप्स वापरता?

तीन महिन्यांपूर्वी शाओमी रेड मी नोट ४ जी घेतला होता. आत्ता अ‍ॅमेझॉन वर निम्म्या किंमतीला उपलब्ध होता दिवाळी सेल मधे. बायकोसाठी घ्यायचा होता पण नंबर लागला नाही. मग वाय यू चा प्लस घेतला. चांगला वाटला. इतरांचे अनुभव कसे आहेत ?

अजुन काय किंमत कमी होणार ?>> सक्रिय. होते किंमत कमी. मला घाई नाहीये. सध्य S2 वापरत आहे. ८MP १६ जीबी वाला. तो मरायच्या तयारीत लागेल तेव्हा घेणार. Happy

कापोचे रेडमीचा अनुभव कसा आहे?

रेडमी फास्ट आहे.
पण हाय डेन्सिटी मोड व्हिडीओचं सेटींग बदलून घ्यावं लागतं किंवा मेमरी कार्ड टाकलेलं बरं. क्लाऊड चा फायदा झाला एकदा डेटा रिकव्हरी साठी.

प्रवासात अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठी माइक्रोसॅाफ्टचा नवीन नोकिआ ( होय नोकिआ )२३० परवा जाहिर झाला आहे.
बटण कीपॅड,2.8 inch,पुढचा आणि मागचा कॅम्रा २ मेपि प्रत्येकी, दोघांनाही फ्लॅश. नेटिव ब्राउजर ओपरा मिनी.( वर्शन चार असावे. )ड्यूल सिम पण आहे( न कापलेले सिम.)रेडिओ. किंमत साडेतीन हजार.
xx एफएम रेडिओला रेकॅार्डिंग द्यायला हवे होते.३जी नाही.
नोकिआच्या शेवटच्या काही 2G मॅाडेलात सिंबिअन S 40 वर्शन ६ होते ते एकदम S 30 कशाला केले?

नवीन फोन घ्यायचा आहे. वापरः

१. इमेल
२. कॅमेरा
३. व्हॉट्सअ‍ॅप, टाईम्स ऑफ इंडिया वगैरे जनरल अ‍ॅप्स...
४. गाणी
५. इंटरनेटवरन मुख्यतः गूगलसर्च आणि मॅप्स वगैरे...

अर्थातच फोन घेणे आणि करणे Wink

आधीचा कार्बन s१ होता. टचस्क्रीन काम करेना झाल्यावर आता नवा घ्यायचाय. जुन्याच्या रिपेरीपेक्षा नवा बरा पडेल असा निर्णय झालाय. सुचवा प्लीज.

Range?

रेडमी नोट प्राईम

13MP primary camera with ISO, auto focus and
5MP front facing camera

5.5 inches HD IPS multi-touch capacitive touchscreen with 1280 x 720 pixels resolution and 267 ppi pixel density

Android v4.4 KitKat based MIUI 7 operating system with 1.2GHz Qualcomm Snapdragon 410 quad core processor,
Adreno-306 GPU,
2GB RAM,
16GB internal memory expandable up to 32GB and
dual micro-SIM dual standby (4G + 4G)

3100mAH lithium-polymer battery providing talk-time of 38 hours and standby time of 775 hours

1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box accessories including batteries from the date of purchase

http://www.amazon.in/dp/B018U7PG30/ref=br_imp?pf_rd_m=A1VBAL9TL5WCBF&pf_...

.. रु .८४९९ मधे खूप परवडण्यासारखी डील आहे...
आजच लौंच झालाय.. review आल्यावर घेण्यास हरकत नाही..

९, जर नेहेमीच्या कामांकरता हवाय तर लुमीया ५४० पाहा. वेल इन बजेट. चांगलं बॅट्रीलाईफ. विंडोज १० ला अपग्रेड होईल हा फोन.

सॅमसंग ग्रँड प्राईम फोर जी घेतलाय- बेक्कार आहे फोन.

कोणी घ्यायच्या विचारात असेल तर 'नका घेऊ' हाच सल्ला.

सॅमसंग on7/on5 नवीन आलाय.रिव्हुमध्ये म्हणतात त्याची रॅम 200mb पर्यंत खाली उतरते.पण हे कसं मोजतात?

माझे झेनफोन २ ४ जीबी ३२ जीबी व मोटो एक्स प्ले २ जीबी ३२ जीबी मधे काय घ्यावे घे ठरत नाहीये. कुणी काही सल्ला देऊ शकेल काय? किंमत दोन्हीची सारखीच आहे. रॅममधे २ विरुध्द ४ व कॅमेरामधे १३ विरुध्द २१ असा फरक सोडल्यास बाकी काहीच फरक नाही.

मला वाटतं की ४ जीबी रॅम असणं केव्हाही चांगलं. बेस्ट म्हणजे क्रोमाला भेट द्या. तिथे बहुधा चालु फोन हाताळु शकता. त्याव्रुन अंदाज येऊ शकेल

मोटोरोला नॅनो सिम मागतोय.
सिमकार्ड कंपनीकडून बदलून घ्यावे लागेल हे लक्षात घ्या.

Pages