मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Xiaomi today announced the Redmi Note 3
for the Indian market. The phone is priced
at INR 9,999 ($148) for the 16GB model,
and INR 11,999 ($178) for the 32GB model.
The Redmi Note 3 for India runs on the
brand new Snapdragon 650 SoC and 2GB of
RAM on the 16GB model and 3GB RAM on
the 32GB model. It also has a new 16
megapixel camera with f2.0 aperture and
phase detect autofocus. Then there's the
5.5-inch 1080p display, 5 megapixel front
camera, and a massive 4,050mAh battery.
The Redmi Note 3 is also the first Xiaomi
phone to have a fingerprint sensor and the
first Redmi phone to have a metal body.
The phone runs on MIUI 7 on Android 5.1
Lollipop.
The Redmi Note 3 will be manufactured in
India as part of the country's Make in India
initiative.
The Redmi Note 3 will be available through
Mi.com and Amazon, starting March 9 at 2
PM, and on Flipkart and Snapdeal at a later
date. The phone will be available in silver,
gold, and gray.

What is feedback for OPPO handsets .. i seen many mobile stores recommend to go for OPPO phone and say.. it has better features than others at low cost.. however since no much heard about this .. can anyone here who is using or have good exp about OPPO phones .. Pls give details .. i have to purchase one .. OPPO NEO7 is model seen today

मी सध्या खालील ४ मोबाईलमधे दोलायमान आहे.

असुस झेनफोन २ ४ जीबी ३२ जीबी
लेनोव्हो वाईब एक्स ३ (सध्या अ‍ॅव्हलेबल नाही)(जबरदस्त रिव्ह्य्यु आहेत)
एम आय ५ (अजुन येतो आहे)
लेटव्ही मॅक्स प्रो (अजुन येतो आहे)

कुठला घ्याव्या. मध्यंतरी लेटव्ही १ एस घेतला. अप्रतिम फोन आहे. फास्ट आहे, उत्त्म डिस्पे, चकाचक फोन, फिंगरप्रींट स्कॅनर मस्त, फक्त एकच तक्रार. मेन कॅमेरा बंडल आहे.

काय करावे.

सिनियर सिटिझनसाठी स्मार्ट फोन घ्यायचा आहे. पहिल्यांदाच वापरणार आहेत स्मार्ट्फोन. मुख्य उद्देश वॉट्सॅप, फोटो बघणे आणि गाणी ऐकणे ( फोन घेणे आणि करणे सोडून) हा आहे. बजेट पाच हजाराच्या आसपास आहे.

कोणते फोन सुचवाल? मी मायक्रोमॅक्स वापरत असल्याने तोच घ्यावा अस विचार करते आहे.

सिनियर सिटिझनसाठी स्मार्ट फोन घ्यायचा आहे. पहिल्यांदाच वापरणार आहेत स्मार्ट्फोन.
>>>>

+७८६

हेच विचारायला मी आलोय Happy

पण आमची आई व्हॉटसप, गाणी यातले काही करणार नाहीये. तरी सर्वात जास्त आवडीने कॅमेरा वापरला जाईल. म्हणून मागचा कॅमेरा ८ चा आणि पुढचा ५ चा या हिशोबाने सात-साडेसात बजेटला शोधायला घेतले.

मला खालील फोन बरा वाटला.

कोणी सांगेल का हा कसा आहे?

प्लीज प्लीज प्लीज .. जरा लवकर सांगा

Lenovo VIBE P1m

किंमत ७ हजार

लिंक देतो

http://www.flipkart.com/lenovo-vibe-p1m/p/itmecrurvpmzhcyg?pid=MOBEB3VWZ...

आणखी एक प्रश्न - ऑनलाईन घ्यावा का? ते फायद्यात आणि सेफ पडते की दुकानात जाऊन. ऑनलाईन खरेदी बरीच केलीय आजवर पण कधी मोबाईल किंवा ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूची नाही केली.

Samsung j5 mast ahe
वडील वापरतात.सिनियर सिटीसन साठी बेस्ट

फक्त camera वापरायचा असल्यास Nokia भारी आहे.. otherwise Moto ,Samsung, Lenovo, Redmi....

ऑनलाईन घ्यावा का?.. -- बिनधास्त घ्या (Flipcart, Amazon, Snapdeal)... सेफ आहे... फायदा होतोच शक्यतो.. offer चालूच असतात... फक्त ज्याच service centre घराजवळ किवा तुम्हाला accessible आहे त्या कंपनी चा घ्या...

या सॅमसंग जे सिरीजमधील नुकताच वडीलांनी त्यांचा पहिला स्मार्ट फोन म्हणून घेतलाय.. बहुतेक जे फाईव्ह असेल.. ११-१२ प्लस किंमत होती.. त्याचेच एक घर उतरत आईला जे थ्री घ्यावा असा विचार केलेला.. जेणे करून काही प्रॉब्लेम आला तर आपसात शिकतील.. पण मग वेगळेपणा नाही राहणार, दोघांना दोन वेगळे फोन एंजॉय करायला मिळावेत तसेच जे एकात कमी असेल ती कमतरता दुसरा भरून काढेल असा विचार करून शोधत होतो..

गुड्डू धन्यवाद, घेईन ऑनलाईनच .. बेस्ट डील कुठे मिळतेय ते बघून

२ दिवसापासुन मोबाईलमध्ये 'unfortunately Lenovo launcher has been stopped' असा मेसेज येऊन मोबाईल हॅन्ग होतोय. लेनोवो A6000+ आहे मॉडेल. सॉफ्टवेअरचा इश्यु असेल का काही??

माझ्या फोनमधले contacts माझ्या Google account बरोबर sync होत नाहीयेत काही महिने! कोणाला असा प्रॉब्लेम येतोय का? (Samsung Galaxy S3)
एकूणच नवीन फोन घेण्याची इच्छा होते आहे! One plus 3 looks very tempting!

बर झालं बाफ वर आला तो . माझं व्हाट्स अप नीट चालत नाहीये म्हणजे रिफ्रेश मारल्याशिवाय मेसेजस येतच नाहीत . लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करून करून घेतलेय . घरी वायफायवर नीट चालत. पण बाहेर डेटा पॅक वर चालत नाही . काय कारण असावे ? हेल्प प्लिज

नाही मला वाटले मार्शमेलॉ अपडेट केल्यानंतर असा प्रोब्लेम येत आहे . मोबाईल मोकळा करा फोटो व्हिडीओ सगळे मेमरी कार्ड मधे ट्रांस्फर करा काही दिवस मेमरी कार्ड वापरू नका. मग बघा असा प्रोब्लेम येतोय का
नसल्यास तुमचा डाटा जास्त होता ज्याने मेमरीवर लोड वाढलेला. असे समजू शकतात. पण १६ जीबी मेमरी आणि २ जीबी रॅम मुळे इतका हँग झाला नाही पाहिजे.
व्हॉट्सप्प मधले व्हिडीओ आणि फोटोस मोबाईल मधून बाहेर काढा

उदय८२, फक्त contacts sync होत नाहीयेत. गुगल केलं तर इतरांना देखिल हा प्रॉब्लेम येतो आहे असं कळलं पण त्यावर उपाय सापडला नाही. एक दोन गोष्टी करुन पाहिल्या पण त्यांनी असलेले contacts जायची वेळ आली Sad

तर मंडळी अनेक महिने वाट पाहुन नंतर MI5 ने फक्त ३२ जीबीवाले व्हर्जन ते सुद्धा २५ हजारात आणल्याने मी शेवटी Nexus 6P 64 GB घेतला. जबराट आहे. खतरनाक स्पीड, कॅमेरा सगळेच तुफान. आयेम लव्हिंग इट. फोन इथे न घेता अमेरीकेतुन मागवला. ३०के ला मिळाला.

सर्वात आधी तुम्ही तुमचे सगळे काँटॅक्स मेमरी कार्ड मधे ट्रान्स्फर करा
vcard फाईल मधे ते मेमरीकार्ड मधे कॉपी होतात

नंतर मेमरीकार्ड बाहेर काढून मग मोबाईल मधे इतरांनी दिलेले सोल्युशन करून बघा
म्हनजे तुमचे काँन्टॅक्स मेमरी कार्ड मधे सुरक्षित राहतील

शक्यतो ज्या कंपन्या मोबाईलमध्ये मुळात नाहीत त्यांचे घ्यायचे टाळावे.लिनोन्वो , सोनी, पनसोनिक, एसर .इ. हे मुळातले टीव्ही, लॅपटॉप मधले.यांची मोबाईल सर्विस सेन्टर्स एखादेच आणि कुठे तरीच असते. मुंबैतदेखील एसरचे सर्वीस सेन्टर शोधायला खूप फिरावे लागले. तिथे गर्दीही खूप असते .कारण एकच सर्विस सेन्टर आणि याना हमखास प्रॉब्लेम येतातच त्यांचेकडे स्पेअर्स नसतात मागवावे लागतात. शिवाय यांचे चार्जर / पिना प्रोप्रायटी असतात ते सोडून दुसरीकडे मिळत नाहीत. त्यांच्याकडेही रेडी टु सेल नसतात. एक तर आय फोन घ्याअथवा सॅमसंग घ्यावा बहुत करून .त्यांच्या सगळ्या हार्डवेअर/ सॉफ्टवेअर सिस्टीम सेट झालेल्या आहेत . सर्विस सेन्टर्स गल्लोगल्ली आहेत.

रिलायन्स जिओ चे ४ जी कसे आहे? स्पीड काय मिळतो? त्यांचा एफ वाय जे का काय तो हँड्सेट चायनीज आहे म्हणे. क्वालिटी यथातथाच पण स्पीड २० एम्बीपी एस च्या पुढे प्रॅक्टीकली मिळतो. रिलायन्स जी एस एम वर ४ जी कधी सुरू होणार आहे? २ जुलै म्हणत होते. एनी न्यूज?

settings > battery / power management > stamina mode > des\able mobile data and wifi when the screen is off > या खाली अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅड असतील त्यात व्हॉट्सप्प चा समावेश करावा

म्हणजे तुमचा मोबाईलची स्क्रिन ऑफ झाली तरी तुमचे अ‍ॅप्लिकेशन चालू राहतील

म्हणजे ऍप ओपन केल्यावरच मेसेज येतात . असेच नोटिफिकेशन येत नाही>>> बॅकग्राऊंड रीफ्रेश डिसेबल्ड असेल कदाचित, चेक करा. किंवा काही मोबाईल मधे लो पॉवर मोड ऑन असेल तर पुश इन बंद होते तेही चेक करा.

सॅमसंगचा ह्या आधीच्या फोनचा अनुभव चांगला नाही. आता एक स्मार्ट फोन घ्यायला परमिशन:::फिदी:
मिळाली आहे. चांगला ब्रँडेड फोन हवा आहे. सॅमसंगचा फोन बोलताना कानाला गरम लागत होता. ते टाळायचे आहे. एचटीसी कसे आहे?

मोटो जी चांगला आहे असे ऐकलेय बाकी माहीत नाही, वन प्लस एक्स, टू, थ्री पैकी घेऊ नका बकवास मोबाईल आहे. परवडत असेल तर आयफोन घ्या. बेस्ट फोन एव्हर. Happy

दिप्स मी Nexus 6P घेतला. अप्रतिम आहे. पैशाचा इश्यु नसेल तर भारी आहे सगळेच. सर्व स्पेसिफिकेशन कडक आहेत.

दिप्या, लेनोव्हो के-३ नोट घे. घरची जनरेशन-नेक्स्ट या फोनवर खूष आहे. (हा फोन फक्त ऑनलाईनच ऑर्डर करता येतो.) सहा महिन्यांपूर्वी किंमत < 10K होती.

माझा one plus 3 चा अनुभव चांगला आहे. पण Samsung TouchWiz नंतर oxygen os खूप साधी वाटते. You may miss the functionality of the tweaks made to stock android.

Pages