मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु,
ब्रँड म्हणजे काय या निमित्ताने.

समजा, तुम्ही एक उत्तम फोन तयार करणारी कंपनी निर्माण केली, व तिचे नांव योकुफोन असे ठेवलेत.
आता, तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश होईपर्यंत लोकांनी तुमचा फोन घेतलाच नाही, तर काय करावे?
सगळ्याच फोनचे पार्ट्स चायना/कोरियात बनतात. मग काय करावे?
आयफोन, सॅम्संग, नोकिया इ. एस्टॅब्लिश्ड ब्रँडचे फोन नादुरुस्त होत नाहीत, त्यांचे पीस डिफेक्टिव्ह निघत नाहीत असा काही विदा आहे का?
तसं असेल तर त्यांनी सर्विस सेंटर्स का काढली आहेत? उदा. नोकियाचा फोन दुरुस्त करून परत मिळायला किती वेळ लागतो?

(उदा.) मायक्रोमॅक्सचे फोन प्रॉब्लेम देतात असं इथे १० लोकांनी लिहिलं. पण तरीही हजारो लोक तो फोन फक्त स्वस्त मिळतोय म्हणून विकत घेतील, हे सलग २-३ वर्षे शक्य आहे का?

ब्रँड म्हणजे नक्की काय असतं शेवटी?

रॉहुंचे उदाहरण हे अपवाद समजायला हरकत नाही. सॅम्संग/एलजी ईत्यादिंची सर्विस चांगली असे म्हणणार्‍यांनी त्यांच्या सर्विस सेंटरला एकदा भेट द्यावी. तिथेही कटु अनुभव आलेले महाभाग भेटतातच. आणि या कंपन्यांना त्यांच्या आधिच्या प्रॉडक्ट लाईन मुळे 'लॉजिस्टीक्स' ची जाण आहे. त्याचा उपयोग आता होत आहे. पूर्वी सॅमसंगची हार्ड डिस्क उडली की पोटात गोळा यायचा कारण रीप्लेसमेंट कधी परत मिळेल याची शाश्वती नसायची . (सध्या ट्रांसेंड पेन ड्राईव्ह बाबत असे होते). पण नंतर याच सँम्संगने 'टेबलरीप्लेसमेंट' द्यायला सुरुवात केली.
तुमचा पीस कसा निघेल ते सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे नवीन ब्रांड्स ना सरसकट धोपटणे योग्य नाही.

आफ्टरसेल्स सर्वीस डिलेड आहेत हे मान्य. मग अ‍ॅज कस्टमर सर्वीस म्हणून अ‍ॅट्लीस्ट त्या पर्टीक्युलर कस्टमर ला रेग्युलर अपडेट्स तरी मिळायल्या हव्यात, त्याच्या इश्यू बद्दल. इथे कस्टमर ओरडत असतो प्रत्येक ठिकाणी. Uhoh
यात त्या सर्वीस सेंटर चं अ‍ॅक्टीव्ह पार्टीसिपेशन अन मॉनिटरिंग ही एक 'की' असू शकेल.
फार जास्त वेळ लागणार असेल तर पर्यायी रिप्लेसमेंट देण्याचा ही ऑप्शन आहेच. पण तो कितपत फिजिबल असेल हे मात्र सांगणं कठीण.
एस्टॅब्लिश्ड ब्रँडचेही फोन नादुरुस्त होतातच. पण माझ्यामते त्यांची सर्वीस बर्यापैकी ठीक असते. एसएलए ही देतात.

मला एका कार्बन टायटानिअम चा चांगलाच अनुभव आल आहे या बाबतीत. फोन अकोल्यात आहे. तिथे तो एक दिवस अचानक डेड झाला. सर्वीस सेंटर ला आधी फोनच लागला नाही. मग इमेल वर. तिथेही काहीच रिस्पॉन्स नाही. शेवटी, फोन बंद ठेवणं परवड्णारं नसल्यानी नवीन घ्यावाच लागला. Sad

आमच्याकडे पिम्परीत सॅमसन्ग, मायक्रोमॅक्स, आणि सोनीचे एकच सर्व्हीस सेन्टर आहे.
तिथली गर्दी पाहुन वाटलं होत सगळ्याच कम्पन्या बकवास फोन बनवत आहेत. Lol
एसबीआय बॅन्केत गेल्याचा फिल आलेला.

मायक्रोमॅक्स कुम्पनीत बरेच जण वापरतात.
एखाद्याचा सोडल्यास बाकीच्याचे फोन मख्खन चालतात.
त्या एखाद्यात तुम्ही आलात की डोक्याला ताप.

सॅमसन्ग भारी म्हनुन ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे चौकशी केली तरी आता लै डब्बा फोन बनवताहेत ते.
हॅन्गच होतोय, मोबाइल शुट केलेल मोबाइल मध्ये दिसतय पण पिसी मध्ये दिसतच नाही, फोन ब्लुटुथने इतर मोबाइलला कनेक्ट होत नाही वै वै प्रोब्लेम्स.
हे प्रोब्लेम्स चारातले एकजण तरी सांगतोच.

सोनी कोणी घेत नाहीत.

जो फोन हातात आहे आणि देवदयेने (बाय गॉडस ग्रेस ह्या अर्थाने) उत्तम चालतो तो मस्त.
लाव्हा, झोलो वापरणारे पण इतर ब्रॅन्ड वाल्याला लुक देतात. कायला एवढे पयसे वाया घालाव्ले बे म्हणुन.
सगळं माझ्याबी फोनात हाय ना भाउ.. असा पावशेर.
असो.

आता दक्षिणा पुरेशी कन्फुज झाली असेल. Lol

नाय नाय झकासराव.
मी आहे ना सोनीचा डायहार्ड फॅन
दोन्ही सोनीचेच(म्हणजे आता माझे) आहेत. अल्ट्रा टी २ आणी सी. लै भारी.

मी बाबांसाठी दुसरा युरेका घेतला.
आधीच्या युरेका वर CM12 चं अपग्रेड झालं.
नवीन ६४बिट ओ एस वर रूट करताना फोनची वीट बनवली.सर्विस सेंटर ला फोन लागतच नव्हता.
मीच आंतर्जालाच्या मदतीने पुन्हा चालू केला. आता एकदम मख्खन.
cyanogen च्या Privacy Guard ला पर्याय नाही.

सध्या फोन घ्यायचा असेल तर युरेकाच घ्या.

युरेकाच्या आवाजाचे काय? तोच जरा गरीब वाटतोय. हेडफोन्वर मस्त पण स्पिकर गरीब. थोडा वाढवण्या यश आले पन फार काही चांगला नाही.

RAM 1 GB
ROM 8 GB
Internal Phone Memory 4.5 GB for apps and mass storage
Expandable Memory Up to 32GB
Sensors G-sensor, Proximity sensor, Light sensor

Powerful Quad Core Processor
Access multiple apps effortlessly and enjoy powerful performance with
the 1.3GHz Quad Core Processor of Canvas Spark.
1.3GHz Quad Core Cortex A7 Processor
Mediatek MT6582M chipset
1 GB DDR3 RAM
ARM Mali-400 GPU
1,300MHz CPU Clock Speed

Battery Capacity 2000mAh
Standby Time 335Hours*
Talktime 7Hours*

My point of concern - just 4.5GB of usable space for apps and docs.
फेबु, अन तत्सम सोशल अ‍ॅप्स जसंजसं वापरत जाऊ तशीतशी जागा घेत जातात. कार्डवर जरी अ‍ॅप असेल तरी त्याचा डेटा हा रॉम मध्येच राहातो. सो...

सॅमसंग गॅलॅक्सी इ ७ कोणी वापरत आहे का ? मला चांगला कॅमेरा हवा. बाकी फेबु व्हॉअ‍ॅ चालायला हवं. गेम खेळत नाही. सॅमसंग च हवाय २० हजार पर्यन्त. इ ७ घ्यावा का ?

कांपो, पुन्हा मला पेचात पाडलंत. आता रेडमी किंवा ऑनर ४क एक्स Wink रेडमी २ लिमिटेड एडीशन लाँच डेट कुणाला माहितीये कां>?

_प्राची_, सॅमसंगच हवाय तर ए सिरीज पाहा. मस्त मेटल बॉडीचे स्टर्डी फोन्स आहेत. १५०००/- पासून सुरुवात. डिस्काउंटही मिळू शकेल.

परवा नवीन मोबाइल(lenovo a6000) मधील काही गोष्टी समजून घेताना अचानक काय झाल कोणास ठाऊक (चुकून कुठलीतरी कि दाबली गेली असेल), आणि त्या वेळेपासून बॅटरीचा खूप प्रॉब्लेम सुरु झालाय.

१० ते १२ तास पुरणारी बॅटरी आता फक्त ५ ते ६ तासच पुरते. Sad

नक्की काय झाले असावे? किंवा सेटिंग मध्ये काही बदल झाला असावा का? कोणकोणत्या शक्यता आजमावून पाहू शकतो?

प्रशु फोन रिसेट करा, सेटिंगमध्ये रिसेट् ऑप्शन आहे.reset करण्याआधी सगली ॲप्स् मेमरी कार्डवर टाका.

e-bliss थोडं तांत्रिक विवेचन करतोय त्यामुळे बरेच विंग्रजी शब्द येतील तर सांभाळून घ्या

युरेकाची आधीची OS (CM11) 32 Bit ची होती. त्यावेळी बूटलोडर unlock करून मी रूट केला होता. हे करण्यासाठी fastboot आणि ADB या tools चा वापर केला होता.
नवीन CM12 64 Bit ची आहे. अपग्रेड केल्या नंतर माझे root previleges गायब झाले. ते मिळवण्यासाठी मी पुन्हा fastboot मध्ये गेलो आणि bootloader unlock केला. पण त्या नंतर फोन चालूच होईना. सुरुवातीच्या "YU" prompt (logo) वरच अडकून रहात होता. याला काही जण मउ वीट (soft brick) म्हणतात म्हणजे फोन चालू होत नाही पण fastboot आणि ADB या tool मध्ये detect होतो. मला वाटलं कि bootloader पुन्हा unlock केल्यामुळे problem झाला कि काय, म्हणून मी fastboot वापरून bootloader lock केला. मग फोन चालू तर होईनाच पण fastboot आणि ADB मध्ये पण detect होईना. या वेळी मात्र माझी तंतरली. मला वाटलं की मी फोनची पक्की वीट (hard brick) बनवली. कारण काहीही उपाय योजना करण्यासाठी फोन detect होणं गरजेचं आहे. मी सर्विस सेंटर ला इमेल केलं, त्यांना फोन करत होतो पण संपर्क होऊ शकला नाही. मग मी युरेकाच्या फोरम वर माझा प्रश्न मांडला. एका युजर ने fastboot मध्ये detect होण्यासाठी एक युक्ती सांगितली. ती युक्ती वापरून फोन detect झाला. मग पुढच्या गोष्टी तुलनेने सोप्या होत्या.

@कांदापोहे @: तुम्ही जर फोन रूट केला असेल तर आवाज वाढवू शकता. "yureka volume increase" असं गुगलून बघा.

बूट लूप म्हणजे फोन सारखा री-बूट होत रहातो ना... माझ्या बाबतीत soft brick च्या वेळी फोन "YU" लोगो वर अडकून रहायचा. आणि नंतर Hard Brick च्या वेळी चालू केल्यावर तो सतत vibrate होत "YU" लोगो वर अडकून रहायचा. मी आधी नेहमीच्या सवयीने एक्सडीए च्या गल्ल्या धुंडाळत होतो पण एकदा yuplaygod च्या फोरमला भेट दिली आणि लक्षात आलं कि इथे एक्सडीए पेक्षा खूपच जास्त हालचाल आहे.
युरेका साठी अन्द्रोईड ५+ च्या १४ कस्टम रॉम आहेत. त्यामध्ये स्लिम, ब्लिस-पॉप, रिसरेक्षन, सायनोजेन १२.१ अशा एकाहून एक सरस रॉम आहेत.

@कांदापोहे: तुम्ही इथे जाऊन बघा http://forums.yuplaygod.com/threads/index-yureka-all-in-one-unlock-root-...

युरेकाचा आवाज अजून सुंदर करायला इथे http://forums.yuplaygod.com/threads/soundfx-lollipop-extremebeats-viper4...

आणि इथे भेट द्या

http://forums.yuplaygod.com/threads/lollipop-64bit-audio-fx-%E2%97%8F%E2...

>> रच्याकने, सर्विससेंटरला फोन करून काय होईल? रूट केल्याबरोबर वॉरंटी गेली की तुमची
अज्जाबात न्हाई. युरेकाला रूट केलं तरी वॉरंटी शाबूत राहते. 8)
युरेका झिंदाबाद

टग्या,
स्यानोजेन मॉड एक्सडीएवर पब्लिश झाली सर्वात आधी. अजूनही सपोर्ट थ्रेड असेल. बर्‍याच दिवसांत तिकडे फिरकायला वेळ मिळाला नाहिये.

तसेही मायक्रोमॅक्स सर्विससेंटरवाले रूट केलेले फोन बिनदिक्कीत बदलून देतात म्हणा.

रूटिंग, मोबाईल्सबद्दल तुम्हाला चांगले ज्ञान आहे. त्याबद्दलचा धागा काढा इथे. मराठीत याची माहिती फार लोकांना नसते. असंख्य लोक बिना-कामाचे १००-१०० एम्बीचे एक्स्पायर्ड ट्रायल गेम्स व इतर ब्लोटवेअर रूट पार्टिशनवर घेऊन फिरत असतात विनाकारण.

टग्या धन्यवाद. Happy

नाठाळ तुम्ची शंका टग्या यांनी दूर केली आहे. घेऊन टाका युरेका. झेनफोन २ भारी आहे म्हणे पण किंमत जास्ती आहे. त्याचाही आवाजाचा प्रॉब्लेम आहेच.

कांपो , टग्या धन्यवाद. गुरुवारी 'फिल्डींग' लावुन बसतोच!

टग्या, रुटींग बाबत एक धागा काढा की. कुठली टूल्स वापरावित, ती कुठे मिळतील, रुटींग करुन आपण काय आणि कसे करु शकतो इ. बाबतीत जरा मार्गदर्शन केल्यास अ.मा.मो.वा. आपले आभारी राहतील.

झेनफोन २ ची २ GB वाली मॉडेल १३-१५ हजाराला आहेत. ४ GB वाला २०००० ला. Asus च्या सगळ्या फोनच्या स्पिकरचा आवाज बंडल आहे. मित्राकदे झेन्फोन ५ आहे. यालाही तोच प्रॉब्लेम आहे असे म्हणतात. २ GB वाला १३-१५ मधे असेल तर यु युरेका ९ हजारात देते की २ GB va 16 GB Internal space.

रुटींगचो धागो काढतंलय पण वायच टाईम लागात. पोरांका घेवन कोकणाक जातंय. मे इलो पण अजून आंब्याची बाट तोंडाक लागाक नाय. तवसर ह्यो धागो वाचूक लागा. http://forums.yuplaygod.com/threads/index-yureka-all-in-one-unlock-root-...

मी परत आले इथे Proud
सध्या लेनोव्हो ए६०००प्लस, युफोरिया, रेडमी २ इ. विविध फोन्स दिसताहेत. पहिल्या दोनसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवलं आहे. या शिवाय लावा, झोलो, huawei, कार्बन असे अनेको माहित नसलेले ब्रॅण्ड्स आहेत (शेवटचा माहित आहे, पण हॅन्डसेटसाठी नव्हे)

पण साधारण ७ ते ७|| किंमतीत कुठला चांगला आहे? घरी एक ल्युमिया आहे म्हणून परत ल्युमिया नको असं सध्या म्हणतेय. तो फोन झक्कास चाललाय Happy

तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे

युफोरीया आत्ता तरी छान वाटतोय (किंमतीच्या मानाने). त्याचे दर्शनी लुक्स, स्पेसिफिकेशन्स (५" ,५ एमपी फ्रंट कॅमेर,साउंड) जबरी वाटताहेत. मुख्य म्हणजे ४जी सपोर्ट असल्याने फ्युचर प्रुफ आहे. Huwaei 4C देखिल चांगला वाटतोय पण फक्त ३जी सपोर्ट आहे. त्यामुळे युफोरीया अथवा रेडमी २!

लिनोवो 'दिसायला' बरा नाही हेमवैम Wink

आणि मी तज्ञ नाही, तरी 'मार्गदर्शन' करण्याचा आगाऊपणा केला आहे, तरी क्षमस्व. Happy

वरदा ,दिलेल्या ब्रँडसची सर्विस हाच मोठा प्रश्न आहे.एक लुमिया असल्यावर आता कोणत्या गोष्टीस प्राधान्य आहे ती त्यात(magnetic sensor /HD screen/memory/battery backup)असलेला घ्यावा असे मला सांगावेसे वाटते.

भ्रमर आणि एसारडी, धन्यवादः)
मलाही युफोरिया बरा वाटला आहे. पण एकुणात या विषयात काहीच कळत नाही म्हणून इथे धाव घेतली. अर्थात बरा वाटून उपेग नाही, त्या सेलमधे कितीश्या का सेकंदात तो घेता आला तर खरंय Proud

मलासुद्धा नवीन मोबाईल घ्यायचाय. शेवटचे पन्नास साठ प्रतिसाद वाचले पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही.
सातहजारात नोकिआ एक्स घेउन पश्चाताप करून पण आता एक वर्ष झालं. माझे निकष देतोय,
१. बजेटः १८-२१ हजार
२. ओएसः अँड्रोइड, लॉलिप्वाप
३. मॉडेल लाँच होउन एक महिन्यापेक्षा अधिक काळ नकोय. पण रिविव्ज बर्‍यापैकी चांगले हवेत. मागच्या वेळी नोकिया एक्स लगेच घेतला होता.
४. डिस्प्ले कमित कमी ५.२ '' आणि फूल एचडी
५.मोबाइल्ची जाडी ८एमएम पेक्षा कमी हवी (मस्ट)
६.कलरः व्हाइट, ग्रे वगैरे हवा (काळा किंवा गर्ली नको)

काही सजेश्चन्स?

मॉडेल लाँच होउन एक महिन्यापेक्षा अधिक काळ नकोय.
<<
याचे काही स्पेसिफिक कारण?
*
बजेटवरून अवांतर.
माझ्या मते १८-२० हजाराचे फोन निव्वळ शो ऑफ साठीचे असतात. मी जितका हेवी व विविधतेचा वापर करतो, तितका सगळेच करतात असे नाही, तरीही लोक प्रचण्ड महागडे फोन घेताना मला दिसतात.
अशीही दर वर्ष-दोन वर्षांत टेक्नॉलॉजी बदलते अन जुना फोन बदलावासा वाटू लागतो.
त्यामुळे माझा प्रेफरन्स 'स्वस्तात मस्त'वाल्या फोनलाच.

मागच्या एका वर्षापासून मोबाईलच्या टेक्नॉलोजीकडे लक्ष ठेउन आहे. जवळ जवळ प्रत्येक महिन्यानंतर नवीन काहीतरी अ‍ॅडवान्समेंट असते. त्यामुळे नवीन पण प्रूवन मॉडेल घ्यायचा विचार आहे. मोटोचा एक मोबाईल लाँच झाल्यावर लगेच लॉलिपॉप आली आणि अपडॅट मारल्यावर तो फोन प्रचंड स्लो होतो कारण लॉलिपॉप साठी ते हार्डवेअर ऑप्टिमाईझ्ड नाही त्यामुळे साधारण हजारेक रिविव्ज आल्यावरच घ्यायचा विचार आहे. माझी याच धाग्यावरची जुनी प्रतिक्रिया चिकटवतो. क्वालिटी फोन्स अठराहजारा खाली मिळत नाहीत असा समज झाला आहे.

<< तुर्रमखान | 4 June, 2014 - 18:39

एक वेळ माय्क्रोम्याक्स, लावा वगैरे घ्या पण नोकिआ एक्सच्या चुकून सुद्धा वाटेला जाउ नका. सॉफ्टवेअर मध्ये प्रचंड बग्ज आहेत. आलेल्या कॉल्सचे नंबर्स डिरेक्टरीमध्ये असलेल्या पहिल्या नावाने सेव्ह होतात. मी कितीतरी वेळेला 'आई' ला फोन लावल्यावर भलत्या लोकांनीच फोन उचललेले आहेत. प्रोसेसर प्रचंड स्लो असल्यामुळे गुई अशक्य स्लगीश आहे. अँण्ड्रॉइडचे अ‍ॅप्स स्मूथली रन होत नाहीत. एकच ब्याक असं बटन आहे त्यामुळे लोच्या होतो. दोन महिन्यापुर्वी साडे सात हजाराचा मोबाईल मी पाच हजारा विकायला तयार आहे तरीही दुकानदार घेत नाहीत. अरेरे
>>

>> मोटोचा एक मोबाईल लाँच झाल्यावर लगेच लॉलिपॉप आली आणि अपडॅट मारल्यावर तो फोन प्रचंड स्लो होतो कारण लॉलिपॉप साठी ते हार्डवेअर ऑप्टिमाईझ्ड नाही

माझी बायको मोटो-जी फर्स्ट जनरेशन (२०१३) वापरतेय. या १.५ वर्ष जुन्या फोन वर मी त्याच्यावर सध्याची लेटेस्ट रीसरेक्सशन रिमिक्स (सायनोजेन मॉड १२.१ वर आधारित जे लॉलिपॉप ५.१.१ आधारित आहे) कस्टम रॉम टाकली आहे. मस्त चालू आहे. No visible performance lag.

रच्याकने मी कालच माझ्या युरेकावर ब्लिस-पॉप रॉम टाकली. (सायनोजेन मॉड १२.१ वर आधारित जे लॉलिपॉप ५.१.१ आधारित आहे) Amazed by the customisations possible.

२ वर्षांपुर्वी घेतलेला Micromax Canvas 110..
पोराने १०-१२ वेळा फेकुनही अजुनही छान चालतोय.

म्हनुन,
Micromax Spark घेतला ऑनलाईन... मस्त Slim piece आहे.

अजुन तरी Fully Satisfied Happy

tagya tumhi vinjineer aahaat ka ho? bhaarich mahiti distey tumhaalaa

पोराने १०-१२ वेळा फेकुनही अजुनही छान चालतोय > आबासाहेब मानले बुवा. १-२ वेळा फेकल्यावर देखील १०-२० वेळा परत हातात मोबाईल देणे म्हणजे ...:दिवा: Happy

फेब्रुवारी मध्ये कार्बनच्या सर्विस सेंटर मध्ये दिलेला फोन तब्बल तीन महिन्याने मिळाला. नेमका फॉल्ट काय हे अडिच महिने झाले तरी सांगत नव्हते शेवटी सर्विस सेंटर मध्ये जाउन आरडाओरडा करावा लागला.. आता जर फोन मिळाला नाही तर ग्राहक पंचायतीकडे जाणार असे धमकावल्यावर त्यांनी नवीन रिप्लेसमेंट देण्यासाठी आधीच्या फोनचा बॉक्स, बॅटरी जमा करुन घेतली. नवीन रिप्लेसमेंट त्यानंतर अजून १५ दिवसाने मिळाली. एकूणात गेल्या आठवड्यात फोन हातात आला... हुश्श्... पुन्हा कधी फोन घेताना कार्बनच्या वाटेला जाणे नाही.

@मंदार: मी विन्जीनेर आहे खरा पण त्याचा माझ्या माहितीशी काही संबंध नाही. मी ओळखत असलेल्या खूप इंजिनीअर ना यात काहीही इंटरेस्ट नाही. उलट इब्लिस सारख्या इंजिनीअर नसलेल्या लोकांनाही बरीच माहिती असते. हा एक छंद आहे.

Pages