मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग @ झकासराव.
इतर फोन वर करून पाहतो. मला वाटले होते की बूटींग इन्टू रिकवरी ला तुम्ही सेफ मोड म्हणत आहात की काय.

ढॅण्टॅढॅण..... 'हात लावीन त्याचा डब्बा करीन' ह्या व्रताने २ मोबाईलचा सत्यानास केलाय. ६-७ हजारात वापराला बेश्ट, वय वर्ष २ च्याही हाती( हा मुद्दा म्हत्वाचा :फिदी:) देता येईल असा चांगला मोबाईल सांगा.. ऑनलाईन ईएमआय सुविधा वापरुन घेईन म्हणतेय. कुणाचा काय अनुभव ह्या सुविधेचा?? आजच्या आजच सांगा म्हणजे जायच्या आधी बुक करुन जाता येईल मला..

तिचा एक महत्वाचा निकष हा लेकीच्याही हाती देता येईल हा आहे Wink लेनोवोचे फोन भलतेच नाजूक वाटतात हाताळायला. त्यापेक्षा नोकिया ल्युमिया जास्त भक्कम आहे.

पॅनासोनिक चा ELUGA L 4G कसा आहे.
स्पेक्स मध्ये विडीयो कॉलिंग बद्दल काहीच लिहले नाही, नेटवर्क ऑपरेटर द्वारे डायरेक्ट विडीयो कॉलिंग करु शकतो का, कि थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाऊन लोड करुनच विडीयो कॉलिंग शक्य आहे

मध्यंतरी मला मामॅचा वाययू युरेका माझ्या मुलीकडून भेट म्हणून मिळाला....मस्त चालतोय.
मागचा १३मेपि आणि पुढचा ५मेपि कॅमेरा आहे...छाचि चांगली येताहेत.
बाकी सर्व सोयी अन्य अँड्राईड फोनप्रमाणेच आहेत.
इथे सर्व स्पेसिफिकेशन्स पाहता येतील.
http://gadgets.ndtv.com/yu-yureka-2224

मोटो जि ३ जनरेशन बेस्ट बाय दिसत आहे

१२९९९/-

१६ जी बी रोम
२ जी बी रॅम
१३ मे पि कॅमेरा
५ मे पि दुसरा कॅमेरा

मला माझ्या वडिलांसाठी (वय वर्ष ७२) नविन फोन घ्यायचा आहे.
कृपया सुचवा
*स्क्रीन मोठे हवे. जेणेकरून त्यावर उमटणारं नाव आणि नंबर नीट दिसेल.
* आवाज खणखणीत असावा.
* वापरायला सोपा असावा
* कॅमेरा नसला तरिही चालेल.
* की पॅड वाला हवा, त्यांना टचस्क्रिन नाही वापरता येणार. (थोडक्यात स्मार्ट फोन नको आहे.)
* भरपूर गाणी साठवून ठेवण्याची सोय हवी, त्याचा आवाज सुद्धा खणखणीत असु दे.

दक्षे, दुकानात जा सरळ. आयबॉल, इन्टेक्स या कंपन्यांचे ज्येनांकरता वेगळे फोन्स आहेत. फार किंमतही नाहीये. मोठे बटणं, दणदणीत आवाज, एसोएस फंक्शन वगैरे फिचर्स आहेत.

एसो एस फंक्शन म्हणजे नक्की काय
<<
एस. ओ. एस.

सेव्ह अवर सोल्स. असा डिस्ट्रेस मेसेज जो बुडत्या बोटींकडून कट्ट-कडकट्ट करीत ट्रान्समिट केला जाई.

फोनवर एकच बटन दाबल्यास डिस्ट्रेस एसेमेस आधी फीड केलेल्या नंबरवर जाणे वै सोय असेल, त्यास SOS म्हणतात.

मुळात लेकीला मोबाईल हे खेळणं नव्हे, तिने हाताळायची गोष्ट नव्हे हेच शिकवायचा प्रयत्न कर की!
>>> हे आधी आईलाही शिकवावे लागेल. क्वॉय? ह्या: ह्या: ह्या:

10 ते 12 हजारामध्ये बसेल असा मोबाइल सुचवा . याहून जास्त खर्च करणार नाही. दोन वर्षापूर्वी घेतलेला सोनीच्या 18 हजारांची किंमत आता दोन हजार येतेय . ते असो

मी नेटवर सर्च केले तर वर निलुदा यांनी सुचवलेला मोटो दिसला . बजेट मध्ये बसतोय . सँमसंग ग्रैंड मॅक्स 2 ही बघितला. तो ही चांगला वाटतोयं .

अजून काही सुचवता येऊ शकेल का ?

Red MI Note 2 Prime .. आज लाँच आहे.
Lenovo K3 . 9999
Moto 3rd Gen
HTC मधे पण एक मॉडेल आहे. आता लक्षात येत नाहिये

मोटो जी चे लेटेस्ट व्हर्शन घ्या सगळ्याचनंओडेल्सच्या किमती साडे बारा ह. च्या दरम्यान आहे. ब्येष्ट फोण !

इथे भ्रमरने सांगितल्यानुसार लेनोवो A6000+ घेतला. मस्त फोन आहे एकदम. २ स्पीकर्स, १६ जीबी इन्टर्नल मेमरी, २ जीबी रॅम. फक्त ह्यासोबत हॅन्ड्सफ्री नाहीयत. ते वेगळे घेतले. ७८०० + २५० चे हॅन्ड्सफ्री असं ८०५० ल पडला फोन.

/दोन वर्षापूर्वी घेतलेला सोनीच्या 18 हजारांची किंमत आता दोन हजार येतेय . ते असो./

बापरे! इथे जनरली सगळे आपले फोन्स किती महिन्यांनी बदलतात? आणि जुन्या फोनचं काय करता? विकला तर किती पैसे मिळतात?

मला याच वर्षी घेतलेला फोन जुना वाटू लागलाय पण इतक्या लवकर नवीन फोन घेणं अती होईल!!!

जाई माझ्या एका मित्राने मोटो जी थ्री घेतलाय आणि तो सध्या तरी खुश आहे.

cnw, ईथे दोन दोन महिन्यात फोन्स बदलणारी लोक आहेत. ।:)

एक्चुअली सहज मी दुकानात जाऊन आता असलेल्ल्या सोनी मोबाइलची रीसेल value चेक केली. दूकानदाराने कधी घेतला वगैरे विचारुन ही किंमत सांगितली. अजून थोड़ी चौकशी केली तर हेच उत्तर मिळाल .

या मोबाइलात तसा काही प्रॉब्लम नाही.पण फ्रंट कॅमेरा ब्लॅक and white आहे.तसेच डिस्प्ले क्वालिटी चांगली नाही. त्यामुळे तळ्यात मळयात चालू आहे .

रच्याकने, काल परवा samsung galaxy J5 लॉन्च झालाय . 11999 किंमत आहे . फीचर जवळपास मोटो जी थ्री सारखे आहे फक्त ram 1.5 जीबी आहे.मोटो मध्ये 2 जीबी आहे

सॅमसंग J7 कसा आहे?
बुक करायच्या विचारात आहे

माझा असुस६ ६ महीन्यात गंडला...... घेतल्यानंतर सुरुवातीला ३ महीने मस्का चालला..... नंतर एकदा पॉवर बॅन्कला कनेक्टेड असताना त्याची स्क्रीन गंडली..... सर्वीस सेंटरवाल्यांनी नेहमीप्रमाणे फिजीकल डॅमेज म्हणून वाटेला लावले...... ओरिजनल स्क्रीन ७ हजाराला घेण्यापेक्षा मी एकाकडून ३.५ हजारात नवीन स्क्रीन बसवुन घेतली.... दोनचार दिवसात चार्जिन्गला (ओरिजनल चार्जरला) लावलेले असताना त्या नवीन स्क्रीनला पण तडा गेला!
माझ्याकडून तो एकदा हलकाच पडला तर स्क्रीन एका कोपर्‍यातुन उचकटली..... तिला फेव्हीस्टीकने चिकटवले तरी काही दिवसाने परत तीच गत.... आणि आताश्या बॅटरीनेही प्रॉब्लेम द्यायला चालू केला होता.... १५-२०% बॅटरी असताना अचानक फोन बंद व्हायला लागला

काही दिवसापुर्वी याच फोरमवर मी असुसचे कौतुक करत होतो,पण अर्थातच तोपर्यंत फोन अगदी मस्त चालत होता.... पण एंकंदरीत गेल्या काही महीन्यातला अनुभव काही चांगला नव्हता..... माझे इतके फोन इतक्या वेळेला पडले आहेत पण त्यातला इतका डेलीकेट कुठलाच नव्हता.... ६ महीन्यात बॅटरीचे प्रॉब्लेम म्हणजे पण अतीच झाले....सर्विस सेंटरचा रिसपॉन्स पण फारसा बरा नव्हता!
थोडक्यात काय तर नवीन ब्रॅन्डवर दाखवलेला विश्वास १५ हजाराला पडला!

म्हणून परत एकदा tried & trusted अश्या सॅमसंगकडे यायचा विचार आहे

स्वरुप, सॅमसंग S III, S IV नंतरचे जरा बघुनच घ्या.स्पर्धेत टिकण्यासाठी काहीतरी चालूगिरी केलेली आहे.

नेक्सस का नाही पाहात? सध्या बर्‍यापैकी स्वस्त आहे. एकदम फ्लॉलेस फोन आहे. अ‍ॅनड्रॉईड लॉलीपॉप चं लेटेस्ट वर्जन आहेच पण अ‍ॅन्ड्रॉईड मार्श्मेलोपण अपग्रेड मिळणार आहे. तीही प्रारोरीटीवर मिळेल कारण स्टॉक अ‍ॅन्ड्रॉईड आहे.

स्वरुप
माझ्या मते मोटो' g३ किवा मोटो x२ घ्यावा ,
nexus series पण उत्तमच आहे
battery बँक मुळे माझे पण २ mobile उडालेले आहेत
मागच्याच आठवडयात मित्रानी lenovo A ६००० plus घेतला , काही खास वाटला नाही .
बिल्ड average आहे , फक्त २ gb ram हा plus point . सगळी apps टाकून जवळपास ६५०mb ram उरते विचार करण्यात हरकत नाही .

तुम्हाला कोणते कोणते apps वापरायचे आहेत ते जर सांगितले तर अजून पर्याय सुचवता येतिल.

धन्यवाद!
माझा सॅमसंग J७ आला Happy

फ्लिपकार्टवर एका दिवसात मिळाला..... थोडे दिवस वापरुन इथे टाकतो रिव्ह्यू!

असूस या कंपनि चे प्रोडक्टस मी गेले १५ वर्षे वपरतोय पन त्यांचे मोबाइल कधी वापरले नाहीत. कंप्यूटर चे प्रोडक्ट्स चांगले असतात.
जवळपास सगळ्या असूस pc प्रोडक्ट्स ला ३ वर्षे वररंटी मिळते.

नवीन मोबाईल्स घेतल्यावर जुने मोबाईल पडून राहतात. या मोबाईल्स ची पर्यावरण पूरक विल्हेवाट कशी लावायची? इवेस्ट गोळा करणारर्‍या काही संस्था आहेत का?

इथे भ्रमरने सांगितल्यानुसार लेनोवो A6000+ घेतला. मस्त फोन आहे एकदम. २ स्पीकर्स, १६ जीबी इन्टर्नल मेमरी, २ जीबी रॅम. फक्त ह्यासोबत हॅन्ड्सफ्री नाहीयत. ते वेगळे घेतले. ७८०० + २५० चे हॅन्ड्सफ्री असं ८०५० ल पडला फोन.>>>>योडी तुम्ही वर उल्लेख केलेले फोनचा अनुभव कसा आहे? अमेझोन इंडिया वरून ऑर्डर करण्याचा विचार आहे.

जुने मोबाइल
१)चालू असणारे परंतू स्मार्ट नसल्याने वापरत नसाल तर गाणी साठवायला उपयोगी.प्रवासात वरती ठेवायला,अलार्मसाठी.
२)बॅटरी लवकर उतरत असेल तरीही फक्त गाणी साठवायला.काही जुने लेखही ओफलाइन वाचण्यासाठी.ओपरा मिनी ८/४ हे ब्राउजरने करता येते.
३)काहींचे कॅमरे बरे होते.
४)टॅार्च असेल तर रिचार्जेबल टॅार्च म्हणून गावी.
५)अगदी बाद असेल तर नोकियाच्या गॅलरीत एक डब्बा ठेवलेला असतो त्यात टाका.

Pages