मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके केपी. बघते मी.
ब्लॅकबेरीचा ८८२० पण आहे म्हणे. पण नेटवर नीट माहिती मिळत नाहीये.
नोकिआचे नाहीत का?

धन्यवाद. Happy

प्राची प्रत्यक्ष दुकानात जाऊन चेक केल्यास बरे पडेल. कॅमेरा नसलेलाच हवा असेल तर ब्लॅकबेरी, नोकीया, सॅमसंगचे कुठलेही मॉडेल घे.

मी गेल्या १.५ महिन्यांपासून युरेका वापरतोय. थोडा गरम होतो खरा पण बाकी काहीच त्रास नाही. खूपच छान फोन आहे. तुम्हाला नको असल्यास मला सांगा. बाबांसाठी दुसरा युरेका घ्यायच्या विचारात आहे मी.पण मिळत नाही.

मी सध्या गेम खेळतच नाही. पण वेळ मिळेल तेव्हा काही ना काही वाचत असतो. अगदी २-३ मिनिटे मिळाली तरी टेक-क्रंच सारख्या एखाद्या साईट वरच्या बातम्या बघत असतो. त्यामुळे स्क्रीन ब्राईटनेस जास्त बॅटरी खातो.
बॅटरी चार्ज करताना मुख्य गरम होते. किंवा अर्धा अर्धा तास बोलून झाल्यावर गरम होते.
माझे ३G किंवा wifi २४ तास चालू असते. बऱ्याचदा GPS आणि ब्लू टूथ देखील चालूच असते. मला बॅटरी एक दिवस सहज पुरते. पण मी शक्य तेव्हा चार्ज करत असतो. विशेषतः सकाळ संध्याकाळच्या १-१ तासाच्या प्रवासामध्ये मी कारमध्ये चार्ज करतोच.

कमी उजेडामध्ये फोटो काही चांगले येत नाहीत. उलट माझ्या मोटो-जी मध्ये कितीतरी चांगले फोटो येतात.

Cyanogen चे Privacy Guard खूपच आवश्यक आहे. शिवाय रूट करणे सोपे असल्यामुळे फायरवॉल, ad-block इत्यादी महत्वाची apps सहज वापरू शकतो.

टग्या बॅटरी लाईफ नंबर ऑफ चार्जिंग सायकल्सवर अवलंबून असते.
विनाकारण रोज २ चार्जिंग सायकल्स देऊन तुम्ही तुमच्या बॅटरीचा जीव घेत आहात, असे वाटते.

@इब्लिस: तांत्रिक दृष्ट्या तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण साधारण चार वर्षापूर्वी बॅटरी चार्ज्ड नसल्याने मी चांगलाच अडचणीत आलेलो. तेव्हापासून ५०% च्या खाली चार्ज गेलेला मला बघवत नाही. या चार वर्षात वापरलेले तीन फोन (युरेका तिसरा) आणि त्यांच्या बॅटरी अजूनही शाबूत आहेत. एक बाबा वापरतात आणि एक मुले खेळायला वापरतात. घरात सगळ्यांना "जमेल तेव्हा जमेल तेव्हढा चार्ज करा आणि हवा तेव्हा वापरा" अशीच सवय आहे.

आला २ दिवसात युरेका. मस्त फोन आहे. सध्या तरी छान वाटतो आहे.

फोटो मस्त येत आहेत. थोडा उजेड कमी असेल तर सेटिंग बघुन फोटो काढल्यास काही अडचण नाही. गेम फारश्या खेळत नाही पण मुलं खेळतात तेव्हा जरा गरम झाल्यासारखा वाटला. तो कुठलाही अँड्रॉइड फोन होतो. बाकी डिस्प्ले, कॅमेरा, स्पिड, फिचर्स सगळे उत्तम वाटले. आवाज जाणवण्या इतका कमी आहे. ८९९९ रु मधे नक्कीच खूपच उत्तम फोन. १ महिनाभर वापरुन परत लिहीनच.

वाघाचे पंजे.
अहो 'युरेका' आहे तो. आंघोळ करताना तुम्ही पळत सुटला नव्हता ना, रस्त्याने युरेका युरेका करत? असं ते विचारताहेत.

नुकताच Lenovo A6000 घेतलाय. फोन छान आहे, पण नेटसाठी डेटा फार खर्च होत आहे असे लक्षात आलंय, तर Data usage reduce करण्यासाठी काही उपाय आहे का? Uhoh

सेटिंग्स मध्ये अ‍ॅप मॅनेजर मधे जा, तिथे जे अ‍ॅप्स तुम्ही वापरत नाहीत अजिबातच जसं की गूगल प्लस, प्लेबुक्स, वगैरे अनिन्स्टाल करा किंवा डिसेबल करा. बॅट्रीलाईफवरही याचा परिणाम दिसेल. Happy

बॅकग्राउंड डाटा रेस्ट्रिक्शन असे एक सेटिंग आहे.

सेटिंग्ज → वायरलेस & नेटवर्क्स → डाटा यूसेज → इथे आल्यावर फोनचे मेन्यू बटन दाबावे.

scap.jpg

योकु धन्यवाद. ही फार उपयुक्त माहिती आहे. Happy

मी सध्या सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड वापरतेय. दोन वर्ष होतील घेऊन. गेलेल्या सप्टेंबर मध्ये एकदा सर्व्हिस सेंटर मधून धुवून आणला आहे. आता पुन्हा नाटक सुरु. स्लो होतो, मध्येच ऑफ होतो, कळत नाही कधी झाला ते. गेम खेळताना तर तव्यासारखा तापतो. मला कंटाळा आला आहे.

नविन फोन चे बजेट १५००० आहे, कृपया चांगला सुचवा. माझ्या एका कडे असुस चा फोन आहे. तो घ्यावा विचार आहे, पण त्याचं नेक्स्ट व्हर्जन लवकरच येतय ना? त्या फोन बद्दल सांगा.

ग्रॅन्ड मध्ये फक्त काय आवडलं असेल तर कॅमेरा क्वालिटी. ८ मेगा पिक्सेल आहे.

नविन फोन मध्ये काय असावे
* स्लो व्हायला नको, त्यामुळे रॅम जोरदार हवा.
* मेमरी अपग्रेडेशन बळकट हवे.
* गाणी ऐकणार त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली हवी.
* कॅमेरा चांगला हवा
* बाकी नेट फक्त मी व्हॉट्सप आणि गेम साठी. फेबु पण फार नाही पाहत.

मोटो जी २
आयफोन ५सी
एचटीसी डिझायर
सॅमसंग मध्ये एक मेटल सिरीज आलीय नवीन. मस्त आहेत ते फोन्सही १५०००/- मध्ये सहज मिळेल. काहीतरी A Series असं नाव आहे.

हॅपी शॉपिंग!

अ‍ॅसस, लाव्हा, मामॅ, कार्बन यांचे फोन्स जरी चांगले असले तरी सर्वीसची फारच बोंब आहे हे वरच्या बर्‍याच पोस्टींतून वाचलं आहेच. सर्वीस सेंटर असेलही तरी फोन दोन-दोन महिने ठेवून घेणे वगैरे प्रकार आहेतच की, त्यापेक्षा व्यवस्थित ब्रँड पाहूनच मग फोन घ्यावा. थोडा महाग पडला तरी ओके. What you pay extra is for 'that' peace of mind Happy

इब्लिस धन्यवाद. मी जस्ट हे सेटींग केलंय. याने नक्की काय होईल सांगाल का?
व्हॉट्सप वगैरे चालेल ना?

नाही, डिझायर मध्ये आहेत काही फोन्स त्या रेन्जमध्ये. आणि हो, आयफोनही बसेल एखाद्वेळेला एक्स्चेंज ऑफरमध्ये. Happy

ते सेटिंग उगच बॅकग्राउंडला डेटा वापरणार्‍या अननोन प्रोग्राम्सना उदा. गेम्स, आवर घालण्यासाठी आहे. त्यांनी डेटा फार जातो अशी तक्रार केली होती.

व्हॉट्सॅप चालायला हरकत नसावी, फक्त स्क्रीन बंद असताना आपोआप मेसेज येणार नाहीत बहुतेक. मला डेटा रेस्ट्रिक्शन नसल्याने माझ्याकडे ते सेटिंग चेक्ड नाहिये हे स्क्रीनशॉटमधे दिसतेच आहे.

ता. क. वायफाय असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही.

अधिक डेटा वाचविण्यासाठी :
व्हॉट्सॅप टेलेग्राम इ. साठी मेडिया ऑटोडाऊनलोड बंद करुन ठेवावे. म्हणजे विनाकारण येणारी गुडमॉर्निंग गुडीविनिंग चित्रं, कोलांटउड्या मारणार्‍या कुत्र्यांचे व्हिडू अन आरत्या वगैरे फुकट डालो होत नाहीत.

बॅकग्राउंड डेटा रिस्ट्रिक्ट केला असेल अन स्क्रीन बंद असेल तर व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेजेस येत नाहीत, फेबु मेसेंजरचे ही नाहीत. इनफॅक्ट कुठलेच पुश नोटिफिकेशन्स नाही येत.

दक्षिणा, मोटो जी २ बघा...१२,९९९ ला फ्लिपकार्टवर आहे. बजेटपेक्षा २००० कमीच लागतील!

इब्लिस व इतर techies, प्लीज मला सांगू शकता का Android मध्ये अ‍ॅप्सचे ऑटो अपडेट कसे बंद करावे. वाय-फायमध्ये ठीक असतं पण बाहेर डेटाप्लॅनला फार महाग पडतंय. मला बाहेर डेटा मेनली व्हॉट्सअ‍ॅप व लागल्यास नेटसर्फिंगसाठी हवा असतो.

अ‍ॅपस्टोर ला जा. तिथे मेन्यू मधे जा (लेफ्ट अप्पर कॉर्नर च्या तीन आडव्या रेषा) त्यात सेटिंग्ज सिलेक्ट करा. आता ऑटोअपडेट ओवर सेल्यूलर हा पर्याय बंद करा. (बहुधा हेच सेटिंग असावं... :अओ:)

खूप धन्यवाद योकू! It worked Happy
मी ऑटो अपडेट ओव्हर वाय-फाय ओन्ली असं आता सिलेक्ट केलं आहे.

आयफोन ५सी बसायला हवा बहुधा. लीस्ट एक्सपेन्सिव आयफोन ४एस तर बसेलच या बजेटमध्ये.
(तुमचा जुना फोन, वर्किंग कंडिशनमध्ये + चार्जर असेल तर अ‍ॅपल कडून फ्लॅट ७०००/- ऑफ होतील; फक्त ही ऑफर आयफोन ५सी, ४एस करता आहे का हे चेक करायला हवे...)

आयफोन फाइव सी असेल तरीही चालेल की आयफोनचा टॅग असल्याशी मतलब . जूना सोनीचा फोन देऊन करता येईल

आयफोन ५सी वुड बी अ सॉलीड डील विदिन २०के Wink वर दिलेली ऑफर असेल तर मग पाहायलाच नको! रिलायन्स डिजिटल ला चेक कर.

मला आयफोन आवडत नाही Sad
हे वरचं सेटिंग केल्यावर स्क्रिन ऑफ असताना मेसेजेस येत नाहीत.
व्हॉटसप ला इमेजेस ऑटो डालो ऑफ्फ करते आता.
मला डेटा यूसेजचा इश्श्यू नाही. बॅटरी चा आहे. फार पटापट डाऊन होते.

माझ्या बायकोच्या मायक्रोमॅक्स A११४ मॉडेलचा डिस्प्ले १० महीन्यात गेला...... वॉरंटीत असल्याने सर्विस सेंटरला जमा केला.... ४५ दिवस ठेवुन घेतल्यावर मदरबोर्ड गेलाय आणि तो मिळत नाही असे कारण सांगुन त्याच मॉडेलचा दुसरा unused (नो पेटीपॅक..... so I doubt) किंवा ८००रु जास्त भरुन A१२० अशी ऑफर दिली ..... तो पण म्हणे unused आहे..... सो आम्ही तो A१२० घेउन आलो कारण त्याला त्याने अजुन १ वर्षाची वॉरंटी दिलीय..... आता बघु कसा चालतोय..... पण micromax चा एकूण दर्जा यथातथाच आहे !

माझाही सेम मॉडेलचा फोन पाणी जाऊन डॅमेज झाला. मदरबोर्ड गेलाय, साडेतीन हजारात दुसरा फोन देतो अशी ऑफर आहे. साडेतीन हजारात सेकंड हॅण्ड घेण्यापेक्षा नवा ४५०० पर्यंत इतर कंपनीचा का घेऊ नये ?

रेड मी - ४ चा विचार चालू आहे, पण जर लकी ड्रॉ असेल तर ड्रॉप. फालतू पद्धत आहे ही विक्रीची.

हा micromax A 120 2 colours आहे का? मी हा फोन १५ दिवसा पुर्वी घेतला होता. बॅटरी चा खुप प्रॉब्लेम झाला, ३ दिवसामध्ये मी परत केला.

मामॅचा युरेका घ्यावा का असा विचार होता/आहे. पण एकंदरीत सर्विसच्या अनुषंगाने विचार करावा लागेल

रेडमी-४ ला लकी ड्रॉ नाही, रेडमी-२ ला आहे

व्हॉट्सॅप चालायला हरकत नसावी, फक्त स्क्रीन बंद असताना आपोआप मेसेज येणार नाहीत बहुतेक>>
येस..
त्यासाठी सरसकत डाटा रेस्ट्रिक्शन ठेवण्यापेक्षा ठराविक अ‍ॅप्लिकेशनला देखील करता येइल.

इब्लिसरावांनी दिलेल्या सेटिन्ग मध्ये बॅकग्राउन्द डाटा रिस्ट्रिक्ट करणे लिहिलय, त्याच स्क्रीन वर खाली डाटा वापरणारे अ‍ॅप्लिकेशन दिसतील. त्या त्या अ‍ॅप वर क्लिक करुन रिस्ट्रिक्ट बॅकग्राउन्ड डाटा ऑप्शन क्लिक करा.

झकासराव बरोबर.

पण अनेकदा नवे गेम्स, अ‍ॅप्स इ. डालो होत रहातात, अन आपण विसरत राहतो.

दुसरे, दोन्ही सिमकार्ड डेटासाठी वापरत असाल, तर दोन्हीना ही सेटिंग करावी लागते.

जास्त गेम्स खेळत नसाल, अन लिमिटेड नं ऑफ अ‍ॅप्स वापरत असाल तर विंडोज ओएस घ्यायला अगदी का ही ही हरकत नाही. मस्त बॅट्री पुरते, टू जी वरही छानच चालतो. कुठेही लॅग येत नाही वापरताना. ८/९ हजारात अगदी बेस्ट पर्याय.

Pages