Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37
"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिल बोले हडिप्पा - एकदम सिली
दिल बोले हडिप्पा - एकदम सिली मूव्ही! (शूटींग चालू असताना कुणालाच कशी कल्पना आली नाही की आपला सिनेमा भंकस असणार, पडणार म्हणून ... )
ता रा रम पम - नेहमीप्रमाणे यशराज फिल्म्सची उच्च निर्मितीमूल्यं वगैरे! ती काय चाटायचीयेत??
शूटींग चालू असताना कुणालाच
शूटींग चालू असताना कुणालाच कशी कल्पना आली नाही की आपला सिनेमा भंकस असणार, पडणार म्हणून ...
>>
याच्या मेकिंग मधे रानी मुखर्जी चा इंटर्व्ह्यू दाखवला होता...
ती म्हणे हा डायरेक्टर कित्त्त्त्ती क्यूट आहे... याच्या फाईल मधे पहिल्या पानावर साईबाबा आणि मातारानी चे फोटो असायचे... जर एखादा सीन चांगला जमला तर तो म्हणायचा 'माता की कृपा से' आणि एखादा सीन जर नीट नाही झाला तर म्हणायचा 'अगले टेक मे बाबा देख लेंगे'...
जर हा असा डायरेक्शन करणार असेल तर सिनेमाचं कंदाळ नाही होणार तर काय होणार...
अँकी
अँकी
रुपाली, मी तर गेल्या ३ वर्षात
रुपाली,
मी तर गेल्या ३ वर्षात (लग्न झाल्यानंतर) एकच सिनेमा पाहिलाय..तो म्हणजे "विवाह" !
खुपच आवडला ! गाणे तर खासच !
थेटरात जाउन माझे पैसे वाया
थेटरात जाउन माझे पैसे वाया गेलेले सिनेमे
१. गायब (रागोव+तुक+अंमा)
२. जीना सिर्फ मेरे लिये (तुक+कक)
३. वादा (अमिशा +अर्जुन+ संजय खान सुपुत्र-नाव आठवत नाहि)
४.हाउस्फुल (अक्शय+रीतेश्+अर्जुन्+कमी कपड्यातल्या नट्या)
कमी कपड्यातल्या नट्या>>>
कमी कपड्यातल्या नट्या>>> नन्ना, आजकाल फक्त "नट्या" लिहीले तरी बास आहे
आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया
आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया
मला सांगायची अतिशय लाज वाटते
मला सांगायची अतिशय लाज वाटते आहे, असा भिकार सिनेमा थेटरमधे पाहिला होता मी.
मेरा पती सिर्फ मेरा है अत्यंत भयंकर अत्याचार होता तो. मी इतकी वर्ष झाली तरी त्याचे आघात विसरु शकले नाहीए. मिथुन आणि कोण ती पाकिस्तानी जाड आवाजाची गायिका-कम- अभिनेत्री. अगदी उग्र दिसायची ती.
मनिमाऊ
मनिमाऊ
मनिमाऊ, 'मेरा पती सिर्फ मेरा
मनिमाऊ, 'मेरा पती सिर्फ मेरा है' हा सिनेमा जीतेंद्राचा आहे. मिथुन सलमा आगाचे 'कसम पैदा करनेवाले की' वगैरे नावांचे महान सिनेमे होते.
नाही नाही, नाव चुकत असेल मग.
नाही नाही, नाव चुकत असेल मग. त्यात मिथुन आणि सलमा आगा होते. फरहा त्याची बायको आणि सलमा आगा त्याचं प्रेम, असा त्रिकोण होता.
मग तो 'पती, पत्नी और तवायफ'!
मग तो 'पती, पत्नी और तवायफ'! (कसलं भीषण नाव आहे ना? :फिदी:)
फुंक २
फुंक २
कोणे एके काळी एक शिणुमा आला
कोणे एके काळी एक शिणुमा आला होता........शक्यता आहे कोणाला तो माहित नसेल्....पिक्चरचं नाव होतं "पेन्टर बाबू"......असेल हिम्मत तर सान्गा .......मी तो शिणुमामा पाहुन अजून जीवन्त आहे म्हणजे खरंच माझा मला अभिमान वाटतो......का लाज वाटली पाहिजे माहित नाही.....!!
१. साडेसात फेरे २. मनोरमा-
१. साडेसात फेरे
२. मनोरमा- सिक्स फीट अंडर..(की असंच काहीतरी)
३. अग्ली पगली (होपलेस, पांचटपणाची लिमिट, अर्धाच पाहिला)
४. मैने प्यार क्यु किया (हाय राम्..मैने ये पिच्चर क्यु देखा?)
५. मेरे ब्रदर की दुल्हन (याविषयी चिकवा वर सविस्तर लिहिलेय)
६. जिंदा (यानंतर असं वाटतं की मी कशाला मरायला पाहिला हा पिच्चर!)
७. स.खान अन करीना चा कुठलातरी..ज्यात कुणीतरी वेडा/डी असतं..भयंकर सिनेमा
८. बॉडीगार्ड (अर्धाच झेलु शकले)
९. नो स्मोकिंग (हा पण अर्धाच झेलु शकले)
१०. मालामाल वीकली (यात हसायला कमी येतं, इरिटेट जास्त होतं).
हे सगळे तिकिटं विकत घेऊन झेललेले आहेत..मोस्ट्ली भैताड ग्रुपमुळे..
अजून बरेच आहेत पण हे अगदी टॉप टेन वगैरे आहेत..
नताशा, यातील 'मालामाल वीकली'
नताशा, यातील 'मालामाल वीकली' हा मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा माझे असेच मत झाले होते. पण नंतर पुन्हा पाहिला आणि आवडला. ओम पुरी, परेश रावळ, अरबाज खान, असरानी, सुधा चंद्रन, राजपाल यादव ई.ची कामे मस्त झाली आहेत.
मालामाल वीकली हा चित्रपट मला
मालामाल वीकली हा चित्रपट मला आवडला बुवा
हो. बर्याच जणाना आवडतो तो.
हो. बर्याच जणाना आवडतो तो. शिवाय वरच्या लिस्टमधल्या सल्लुपटांचेही फॅन आहेतच.
पण मला अनेकदा तर असं वाटतं की तिकीट काढून तर जाऊच दे पण हे चित्रपट बघण्याबद्द्ल बक्षीस म्हणून मलाच पैसे मिळावेत. फुकट दाखवले तरी नाही बघणार. पैसे मिळणार अस्तील तरी "विचार करीन."
मी तो टीव्हीवर पाहिला व
मी तो टीव्हीवर पाहिला व टीव्हीवरच पाहण्यासारखा वाटला
फार पूर्वी रामसेंचा एक
फार पूर्वी रामसेंचा एक 'टेलिफोन' नावाचा चित्रपट आला होता तो नीलायम थेटरला पाहिला व तरीही घरी सुखरूप पोचलो.
बाकी काही लिहीत नाही.
मग तो 'पती, पत्नी और तवायफ'!
मग तो 'पती, पत्नी और तवायफ'! (कसलं भीषण नाव आहे ना? ) >>> अगं मी तपासलं गुगलवर. हेच नाव आहे. नाव जेवढं भीषण, तेवढाच सिनेमा आणि ती सलामा बेगम तर त्याहुन भीषण दिसते.
अगागागागागा सलमा आगा
अगागागागागा सलमा आगा
मेरा पती सिर्फ मेरा है मधे
मेरा पती सिर्फ मेरा है मधे राधिका नामक नटी होती. तिची भयानक हेअर-स्टाइल बघून मी चक्रावूनच गेलो होतो. तिच्या वेणीची टोके जमिनीला समांतर रहायची आणि स्प्रिंग सारखी वेणी हलायची. त्या आधी सन्यासी/फकीर वगैरे लोक आपल्या जटा वडाचा चीक लाऊन वळतात हे माहित होते पण हा मात्र त्याहून भयानक प्रकार होता. अशी हेअर-स्टाइल असल्यावर 'पती तेरा होना तो दूर की बात है, तेरेको पती मिलाहीच कैसे?" असाच प्रश्न पडायचा.
सगळ्यांत कहर म्हणजे मी
सगळ्यांत कहर म्हणजे मी "रामगोपाल वर्मा की आग" पाहीला.
तिच्या वेणीची टोके जमिनीला
तिच्या वेणीची टोके जमिनीला समांतर रहायची आणि स्प्रिंग सारखी वेणी हलायची.>>>
ही राधिका म्हणजे "मुखडा चाँद का टुकडा, मेरे नैन शराब के प्याले" वालीच ना? या गाण्यात तिच्या वेणीचे वर्णन असेल तर शोधायला पाहिजे
माधव, राधिकेची भन्नाट
माधव, राधिकेची भन्नाट हेअरस्टाईल असलेला सिनेमा म्हणजे 'मेरा पती..' नोहे, तो 'नसीब अपना अपना'... त्यात ऋषी कपूर आणि फरहा होते.
त्याच सिनेम्यातले हे महान गाणे. आपापल्या जबाबदारीवर पाहणे.
श्रध्दा असे आहे का? बरं! पण
श्रध्दा असे आहे का? बरं!
पण मला आठवतय ते गाणे एकदम रडके होते. त्यात ती बाई साडीत वगैरे होती आणि वर ती फ्येमस वेणी.
हे गणे पण जबरी आहे. गायरोस्फीअर च्या जनाकाला त्याची कल्पना हे गाणे बघूनच सुचली असणार.
माय नेम इज खान (अॅन्ड आय
माय नेम इज खान (अॅन्ड आय अॅम नॉट अॅन अॅक्टर)
श्रद्धा -
श्रद्धा -
माझ्याकडून अमीरखान, जूही,
माझ्याकडून अमीरखान, जूही, काजोल व अजय देवगण चा इश्क, अतिशय भंकस
Pages