मराठीमधली कोडी

Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54

लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी बरोबर... Happy
दोन बैल, नांगर आणि एक माणूस (शेत नांगरणारा).. म्हणून तीन डोकी आणि दहा पाय...
जोत (असा मालवणी शब्द आहे.. मराठीत काय म्हणतात?

अरे हे अत्ताच वाचले. हे अजुन एक कोडे तसे सोपे आहे -
घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा

घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा

केवडा का?

दिनेश, मोट बरोबर.

सगळी उत्तरं अशी आहेत -
१. लसूण
२. नारळ
३. गायीच्या गळ्यातली घंटा
४. फणस
५. ज्वारीचे कणीस
६. मोट
७. केरसुणी
८. वांगे (झाडाला असलेले)
९. मका
१०. तोंड (दात आणि जीभ)
११. कागद
१२. गाजर
१३. वहाण

गजा भारी कोडी होती. Happy
मला आजीने घातलेलं एकच हुमाण आठवतेय. बरीच इसरलो ! Sad

" एवढी एवढी पेटी चुन्नुकसया आत उघडुन बघता अगं बया"

माझी आजी हा एक घोर हुमण सांगायची Proud

आकाशातून पडली घार
तिला मारून केलं ठार
रक्त प्यायलं घटाघटा
मांस खाल्लं मटामटा (किंवा चटाचटा)!

उत्तर आहे : नारळ!

एवढीशी बीबी कोपर्‍यात उभी!

(उत्तर : केरसुणी)

एवढंस्सं कार्टं घर कसं राखतं?!

(उत्तर-कुलूप)

अत्तर अत्तर झाड त्याचे कत्तर कत्तर पान
हिंदू मुस्सलमान त्यांची पगडी दाणादाण!

(उत्तर - गुलाबाचे फूल व त्याचे पान, दुसरी ओळ केवळ यमक जुळवायला!)

सूपभर लाह्या, लाह्यांमध्ये एक रुपया
(आकाशातील चांदणे व पौर्णिमेचा चंद्र)

तिपेरी कांडं, माथा मुंडं
हे बघ, ते बघ

(तर्जनी)

घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा

केवडा का?
--- चुक गुब्बी

उत्तर : फणस

अजुन एक कोड...
आधी असते साधीभोळी
मग नेसते साडीचोळी
मग येते र.ंगाला
हात लावू देत नाही अ.ंगाला

ओळखा कोण?

Pages