फ्रेंड्स !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!

त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्‍या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!

मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!

नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!

असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अ‍ॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते! Happy

अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends

प्रकार: 

ईथे पण लागते असं ऐकुन आहे. खरं खोटं चंपकच जाणे! Biggrin जोक्स अपार्ट पण हा बाफ वाचुन फ्रेंण्डस बघायचे ठरविले आहे!

फ्रेंड्स माझीही सर्वात फेव्हरेट सिरीयल आहे. माझी आतापर्यंत १ ते १० सिझन्स ची ४ पारायणे झालेली आहेत. ५ वे सुरु आहे. काही डायलॉग्ज तोंडपाठ आहेत.
आता "white collar" पहायला सुरुवात केली आहे. very fast moving story, very witty dialogues

काल चँड्लर व रॉस जिम सोडायचा अयशस्वी प्रयत्न करतात, फीबी क्लाइंट्च्या प्रेमात पड्ते तो एपि पाहिला.
लै भारी. जोई सुपर बरोबर नाच करतो ते एक मस्त अ‍ॅक्टिंगचे उदाहरण आहे.

फ्रेंड्स चा बाफपण आहे हे विसरलोच होतो !

सध्या नेटफ्लिक्स स्ट्रिमिंगला आलय म्हणून रोज पाहिलं जात.. त्यामुळे उगीच वर काढतोय..

आम्हीही रोज पाहतोय. आता पुन्हा एकदा सुरूवातीपासून. डीव्हीडी सेट असून्सुद्धा हा त्याहून आळशी पर्याय आहे Happy

मी पण बघतोय. सलग बघायला मजा येतेय नि विशेषतः चँडलरचा toungue-in-cheek sarcasm अधिकच आवडतोय Happy

पहिल्या तीन सीजन्स मधले अशक्य आवडलेले म्हणजे जोयीचा टेलरवाला नि चँडलर नि जोयी ची रॉसच्या बाळाबरोबरचा.

That's how they do pants !!! Ross tell him
Yeah (pause) in prison Lol

We need to assign which one is heads before we toss
(thinks) one wearing duckie, because duckies have heads.
What kind of scary ass clowns came for your birthday party Jo Lol

आम्ही पण बघतोय हल्ली. मजा येते बघायला. काही दिव्सांपूर्वी ते चँडलर-मोनिकाच्या लग्नाच्या वेळचे ४-५ एपिसोड्स सलग बघितले . हहगलो आहेत अक्षरशः !! Happy

मी इतक्या वेळा बघितलंय की आता पुन्हा बघण्याइतपत विसरलेच नाहीये.
मला चँडलर आणि रेचेल सर्वात जास्त आवडतात. त्यांची कपल म्हणून जोडी जमायला हवी होती हे एक मी व माझ्या फ्रेन्ड्सचं आवडतं मत. तो एक केकवाला एपिसोड आहे ज्यात हे दोघं फुकट केक खात असतात तो खूप आवडतो.

मला चँडलर अन जोई सगळ्यात जास्त आवडतात! (नाही कपल म्हणून नाही! :खोखो:)
बाकीचे सगळे सारखेच आवडतात..

परत बघताना फिबीला इतके अ‍ॅवॉर्ड्स का मिळाले ते लक्षात येतयं. खूप मनस्वी काम केलं आहे. फार अवघड आहे तसे भाव दाखवणं. रेचेल काय फक्त सुंदर दिसणारी पण थोडा भाव खाणारी वाटते!

अता नेफी वर ते पहायला लागल्यापासून बाकी सगळे बाजूला राहिले आहे

मला रेचलची गोंधळणारी अ‍ॅक्टींग आणि ऑफकोर्स तिची स्टाईल आवडते म्हणून तिचं कॅरेक्टरही आवडतं.
ऑलमोस्ट १० वर्ष एखाद्या शो मधला ह्युमर, ताजेपणा टिकवून ठेवणं हे काम सोपं नाही.

हो, रेचल सगळ्यात स्टायलिश आहे. सुरूवातीला वेट्रेसिंग करताना तिनं घातलेले घोळ पण भारी आहेत.

रेचल कानामागची सिनॅमन स्टिक काढून मोनिकाच्या कॉफीत टाकते तो एपिसोड बघितला असेलच Biggrin

रेचल सुरुवातीला लाडावलेली, सेल्फिश वाटते..तशी ती होतीच बडे बापकी बिगडी शहजादी. पण ती खूप छान ग्रो होते १० वर्षात. सिन्सियर फ्रेन्ड, करीयर वुमन, सिंगल मदर.
अ‍ॅक्टिंग तर मस्तच. रॉसला प्रेग्नन्सीबद्दल सांगून शांतपणे मॅगझिन वाचत बसते तेव्हाची तिची अ‍ॅक्टिंग सही आहे Biggrin

हाहा.. कॉफीमध्ये पेन्सिल आणि कानामागे सिनॅमन स्टीक.. Proud
मला फ्रेंड्समधील सगळंच आवडतं. प्रत्येक कॅरॅक्टरचे वेगवेगळे गुणविशेष इतक्या सगळ्या सीझन्स मधून कन्टिन्यू केले आहेत! मस्तच.
मात्र चँडलरमध्ये फारच बदल झाले आहेत नंतर ड्रग्जमुळे. अगदी बघवत नाही त्याला तसे. Sad

रेचल कानामागची सिनॅमन स्टिक काढून मोनिकाच्या कॉफीत टाकते तो एपिसोड बघितला असेलच >>>> हो भारी होतं ते ! Lol

मला त्या जॅनिसचा अ‍ॅक्सेंट आवडतो.. Oh..... my..... gawd !!! Proud

जोयीचा टेलरवाला >>> हो ! हा पण भारी आह..

चँडलर नि जोयी ची रॉसच्या बाळाबरोबरचा >>>> रॉसचं बाळ होतं तो तर पूर्ण एपिसोडच भारी आहे. त्यात सगळ्यात शेवटी त्या बाळाच्या नजरेतून कॅमेरा घेतलाय.. सगळे बाळाकडे बघून बोलत असतात आणि चित्रविचित्र चेहेरे करत असतात ते सही घेतलय.. Happy

रेचलच्या हाय फाय मैत्रिणी तिला भेटायला कॅफेत येतात तेव्हा त्यांंचं हसणं अशक्य आहे !

दुसर्‍या सिझनमधले सगळ्यांचे हेअरकट भारी आहेत..

रेचलच्या हाय फाय मैत्रिणी तिला भेटायला कॅफेत येतात तेव्हा त्यांंचं हसणं अशक्य आहे ! >>> किंचाळणं Proud

मोनिका आणि फिबी त्यांची नक्कल करतात ते पण सही आहे.

रॉस मेला असं शाळेच्या वेबसाईटवर टाकतात तो एपिसोडही भारी आहे. एक मुलगी येऊन मला रॉस आवडायचा असं सांगते मग रॉस 'मी जिवंत आहे' असं म्हणत बाहेर येतो ते सगळं अशक्य आहे. क्रेझी प्लेट लेडीवाला पण Rofl

रॉस मेला असं शाळेच्या वेबसाईटवर टाकतात तो एपिसोडही भारी आहे. एक मुलगी येऊन मला रॉस आवडायचा असं सांगते मग रॉस 'मी जिवंत आहे' असं म्हणत बाहेर येतो ते सगळं अशक्य आहे. क्रेझी प्लेट लेडीवाला पण Rofl

मीपण मीपण.
बघते आहे, मजाही येते बघताना, पण म्याडनेस नाही वाटत त्याच्यासाठी. (कदाचित मी चुकीच्या वयात बघायला सुरुवात केली. :P)

पण मला रॉस सूझी(च ना?) आणि रेचलच्या प्रोज अ‍ॅन्ड कॉन्स लिस्ट्स तयार करतो आणि त्यात सूझी(च ना?)चा कॉन म्हणून 'शी इज नॉट रेचल' लिहितो ते भारीच क्यूट वाटलं आहे. (वाटतं तर याही वयात! :P)

Pages