फ्रेंड्स !
'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!
त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!
मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!
नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!
असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते!
अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends
मंगेश, खाली दिलेल्या लिंकवर
मंगेश, खाली दिलेल्या लिंकवर अमेरिकेतल्या बर्याच सिरीयल्स दिसतात. बघा.
http://www.free-tv-video-online.info/internet
ईथे पण लागते असं ऐकुन आहे.
ईथे पण लागते असं ऐकुन आहे. खरं खोटं चंपकच जाणे! जोक्स अपार्ट पण हा बाफ वाचुन फ्रेंण्डस बघायचे ठरविले आहे!
इथे?...... मला कल्पना नाही
इथे?...... मला कल्पना नाही हो! पण लायब्ररीत जरुर मिळेल.
फ्रेंड्स माझीही सर्वात
फ्रेंड्स माझीही सर्वात फेव्हरेट सिरीयल आहे. माझी आतापर्यंत १ ते १० सिझन्स ची ४ पारायणे झालेली आहेत. ५ वे सुरु आहे. काही डायलॉग्ज तोंडपाठ आहेत.
आता "white collar" पहायला सुरुवात केली आहे. very fast moving story, very witty dialogues
फ्रेंड्सबद्दल नुकतंच लिहिलं
फ्रेंड्सबद्दल नुकतंच लिहिलं होतं माझ्या ब्लॉगवर. हा त्याचा दुवा
http://www.harkatnay.com/2010/06/blog-post_25.html आणि
http://www.harkatnay.com/2010/06/blog-post_27.html
काल चँड्लर व रॉस जिम सोडायचा
काल चँड्लर व रॉस जिम सोडायचा अयशस्वी प्रयत्न करतात, फीबी क्लाइंट्च्या प्रेमात पड्ते तो एपि पाहिला.
लै भारी. जोई सुपर बरोबर नाच करतो ते एक मस्त अॅक्टिंगचे उदाहरण आहे.
फ्रेंड्स चा बाफपण आहे हे
फ्रेंड्स चा बाफपण आहे हे विसरलोच होतो !
सध्या नेटफ्लिक्स स्ट्रिमिंगला आलय म्हणून रोज पाहिलं जात.. त्यामुळे उगीच वर काढतोय..
आम्हीही रोज पाहतोय. आता
आम्हीही रोज पाहतोय. आता पुन्हा एकदा सुरूवातीपासून. डीव्हीडी सेट असून्सुद्धा हा त्याहून आळशी पर्याय आहे
मला बघावं(च) लागणार पुन्हा.
मला बघावं(च) लागणार पुन्हा.
मी पण बघतोय. सलग बघायला मजा
मी पण बघतोय. सलग बघायला मजा येतेय नि विशेषतः चँडलरचा toungue-in-cheek sarcasm अधिकच आवडतोय
पहिल्या तीन सीजन्स मधले अशक्य आवडलेले म्हणजे जोयीचा टेलरवाला नि चँडलर नि जोयी ची रॉसच्या बाळाबरोबरचा.
That's how they do pants !!! Ross tell him
Yeah (pause) in prison
We need to assign which one is heads before we toss
(thinks) one wearing duckie, because duckies have heads.
What kind of scary ass clowns came for your birthday party Jo
आम्ही पण बघतोय हल्ली. मजा
आम्ही पण बघतोय हल्ली. मजा येते बघायला. काही दिव्सांपूर्वी ते चँडलर-मोनिकाच्या लग्नाच्या वेळचे ४-५ एपिसोड्स सलग बघितले . हहगलो आहेत अक्षरशः !!
मी इतक्या वेळा बघितलंय की आता
मी इतक्या वेळा बघितलंय की आता पुन्हा बघण्याइतपत विसरलेच नाहीये.
मला चँडलर आणि रेचेल सर्वात जास्त आवडतात. त्यांची कपल म्हणून जोडी जमायला हवी होती हे एक मी व माझ्या फ्रेन्ड्सचं आवडतं मत. तो एक केकवाला एपिसोड आहे ज्यात हे दोघं फुकट केक खात असतात तो खूप आवडतो.
माझेही चँडलर आणि रेचल सगळ्यात
माझेही चँडलर आणि रेचल सगळ्यात आवडते.
मला चँडलर अन जोई सगळ्यात
मला चँडलर अन जोई सगळ्यात जास्त आवडतात! (नाही कपल म्हणून नाही! :खोखो:)
बाकीचे सगळे सारखेच आवडतात..
सलग बघायला मजा येतेय >>>
सलग बघायला मजा येतेय >>> +१
फिबी, चँडलर आणि जोई सगळ्यात जास्त आवडते.
परत बघताना फिबीला इतके
परत बघताना फिबीला इतके अॅवॉर्ड्स का मिळाले ते लक्षात येतयं. खूप मनस्वी काम केलं आहे. फार अवघड आहे तसे भाव दाखवणं. रेचेल काय फक्त सुंदर दिसणारी पण थोडा भाव खाणारी वाटते!
अता नेफी वर ते पहायला लागल्यापासून बाकी सगळे बाजूला राहिले आहे
मला रेचलची गोंधळणारी
मला रेचलची गोंधळणारी अॅक्टींग आणि ऑफकोर्स तिची स्टाईल आवडते म्हणून तिचं कॅरेक्टरही आवडतं.
ऑलमोस्ट १० वर्ष एखाद्या शो मधला ह्युमर, ताजेपणा टिकवून ठेवणं हे काम सोपं नाही.
हो, रेचल सगळ्यात स्टायलिश
हो, रेचल सगळ्यात स्टायलिश आहे. सुरूवातीला वेट्रेसिंग करताना तिनं घातलेले घोळ पण भारी आहेत.
रेचल कानामागची सिनॅमन स्टिक काढून मोनिकाच्या कॉफीत टाकते तो एपिसोड बघितला असेलच
रेचल सुरुवातीला लाडावलेली,
रेचल सुरुवातीला लाडावलेली, सेल्फिश वाटते..तशी ती होतीच बडे बापकी बिगडी शहजादी. पण ती खूप छान ग्रो होते १० वर्षात. सिन्सियर फ्रेन्ड, करीयर वुमन, सिंगल मदर.
अॅक्टिंग तर मस्तच. रॉसला प्रेग्नन्सीबद्दल सांगून शांतपणे मॅगझिन वाचत बसते तेव्हाची तिची अॅक्टिंग सही आहे
हाहा.. कॉफीमध्ये पेन्सिल आणि
हाहा.. कॉफीमध्ये पेन्सिल आणि कानामागे सिनॅमन स्टीक..
मला फ्रेंड्समधील सगळंच आवडतं. प्रत्येक कॅरॅक्टरचे वेगवेगळे गुणविशेष इतक्या सगळ्या सीझन्स मधून कन्टिन्यू केले आहेत! मस्तच.
मात्र चँडलरमध्ये फारच बदल झाले आहेत नंतर ड्रग्जमुळे. अगदी बघवत नाही त्याला तसे.
मला जोई, रेचल आवडतात. गेले
मला जोई, रेचल आवडतात. गेले काही दिवस नेफि वर फ्रेंडसच चालु आहे
रेचल कानामागची सिनॅमन स्टिक
रेचल कानामागची सिनॅमन स्टिक काढून मोनिकाच्या कॉफीत टाकते तो एपिसोड बघितला असेलच >>>> हो भारी होतं ते !
मला त्या जॅनिसचा अॅक्सेंट आवडतो.. Oh..... my..... gawd !!!
जोयीचा टेलरवाला >>> हो ! हा पण भारी आह..
चँडलर नि जोयी ची रॉसच्या बाळाबरोबरचा >>>> रॉसचं बाळ होतं तो तर पूर्ण एपिसोडच भारी आहे. त्यात सगळ्यात शेवटी त्या बाळाच्या नजरेतून कॅमेरा घेतलाय.. सगळे बाळाकडे बघून बोलत असतात आणि चित्रविचित्र चेहेरे करत असतात ते सही घेतलय..
रेचलच्या हाय फाय मैत्रिणी तिला भेटायला कॅफेत येतात तेव्हा त्यांंचं हसणं अशक्य आहे !
दुसर्या सिझनमधले सगळ्यांचे हेअरकट भारी आहेत..
रेचलच्या हाय फाय मैत्रिणी
रेचलच्या हाय फाय मैत्रिणी तिला भेटायला कॅफेत येतात तेव्हा त्यांंचं हसणं अशक्य आहे ! >>> किंचाळणं
मोनिका आणि फिबी त्यांची नक्कल करतात ते पण सही आहे.
किंचाळणं >>> हा तेच.. ते धड
किंचाळणं >>> हा तेच.. ते धड लिहिताही येणार नाही शब्दांत..
ह्या तिघी वेडिंग ड्रेसेस
ह्या तिघी वेडिंग ड्रेसेस घालून मोनिकाच्या घरात बसलेल्या असतात तो एपिसोडही टिपी आहे.
रॉस मेला असं शाळेच्या
रॉस मेला असं शाळेच्या वेबसाईटवर टाकतात तो एपिसोडही भारी आहे. एक मुलगी येऊन मला रॉस आवडायचा असं सांगते मग रॉस 'मी जिवंत आहे' असं म्हणत बाहेर येतो ते सगळं अशक्य आहे. क्रेझी प्लेट लेडीवाला पण
रॉस मेला असं शाळेच्या
रॉस मेला असं शाळेच्या वेबसाईटवर टाकतात तो एपिसोडही भारी आहे. एक मुलगी येऊन मला रॉस आवडायचा असं सांगते मग रॉस 'मी जिवंत आहे' असं म्हणत बाहेर येतो ते सगळं अशक्य आहे. क्रेझी प्लेट लेडीवाला पण
मला त्या जॅनिसचा अॅक्सेंट
मला त्या जॅनिसचा अॅक्सेंट आवडतो.. Oh..... my..... gawd >> खूप मस्त आहे तो.
मीपण मीपण. बघते आहे, मजाही
मीपण मीपण.
बघते आहे, मजाही येते बघताना, पण म्याडनेस नाही वाटत त्याच्यासाठी. (कदाचित मी चुकीच्या वयात बघायला सुरुवात केली. :P)
पण मला रॉस सूझी(च ना?) आणि रेचलच्या प्रोज अॅन्ड कॉन्स लिस्ट्स तयार करतो आणि त्यात सूझी(च ना?)चा कॉन म्हणून 'शी इज नॉट रेचल' लिहितो ते भारीच क्यूट वाटलं आहे. (वाटतं तर याही वयात! :P)
हो, प्रॉब्लेम वयाचाच आहे.
हो, प्रॉब्लेम वयाचाच आहे.
मला आता सगळे बारके सारके डिटेल्स आठवत नाहीत. पुन्हा बघायला हवंय.
Pages