फ्रेंड्स !
'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!
त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!
मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!
नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!
असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते!
अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends
ही सिरीयल खूप मस्त
ही सिरीयल खूप मस्त आहे.............मला जेव्हा जाम वैताग येतो किंवा काही गोष्टी जमत नाहीत अस वाट्त तेव्हा मी सिरियल बघते.....मग वाट्त .....आपण जसे आहोत तसे युनिक आहोत आणि आपल्याला परफेक्ट व्हायची गरज नाहीये................... मला त्यातल फिबी हे व्यक्तिमत्व जाम आवडत....
मी परवा रेचल आणि जोइ
मी परवा रेचल आणि जोइ पुस्तकांची अदलाबदल करतात तो एपिसोड बघितला. बेथ आजारी पडते ते वाचून जोइ रडायला लागतो
आम्ही आता जोई रेचेलच्या सिझन
आम्ही आता जोई रेचेलच्या सिझन तीनमधल्या ब्रेकअप पर्यंत आलो आहोत.. ते स्किईंगला जातात ते पण भारी आहे..
ते PLEH त्या स्कीइंङ वाल्याच
ते PLEH त्या स्कीइंङ वाल्याच एपिसोड मध्ये आहे ना?
सगळ्यात बेस्ट म्हणजे लंडन ला जाताना रेचल च्या बाजूचा तिला सांगतो ते "It does sound like you were on a break"
ते PLEH त्या स्कीइंङ वाल्याच
ते PLEH त्या स्कीइंङ वाल्याच एपिसोड मध्ये आहे ना?>>> हो त्यातच आहे.
काल एकच एपिसोड बघायला वेळ
काल एकच एपिसोड बघायला वेळ होता तेव्हा चँड्लर, जोईला टिव्हीवर फ्री पॉर्न बघायला मिळतं तो एपिसोड बघितला. सीझन लक्षात नाही.
ती अक्षरे रॉस च्या गाडी ने
ती अक्षरे रॉस च्या गाडी ने पुसली गेल्यावर जोई वैतागतो, तेव्हा चॅण्डलरचा डॉयलॉग भन्नाट आहे
Oh now it's not going to make any sense!
मी पण कालच बघितला तो
मी पण कालच बघितला तो हेल्पवाला एपिसोड. आता कितव्यांदा तरी बघताना मला चँडलर जास्त आवडतो आहे.
एलिझाबेथ चे वडिल आणि रॉस ची
एलिझाबेथ चे वडिल आणि रॉस ची पहिली भेटः
"आय वाँट यु ऑल टु से गुड थिन्ग्स अबाउट मी टु एलिझाबेथ'स डॅड."
चँडलरः "व्हॉट!! यु आर नॉट एलिझाबेथ'स डॅड?? "
ट्रीगर रेचेलला रडवतो आणि मग जोईला त्याला बॉलडान्स शिकवावा लागतो तो भाग पण भारी.
चँडलरला स्मोकिंग सोडण्यासाठी
चँडलरला स्मोकिंग सोडण्यासाठी मदत म्हणून रेचल एक हिप्नोटिजमवाली कॅसेट आणून देते तो एपिसोड पाहिला.. फुलटू हहपुवा ! ती टेप 'वुमन स्पेसिफीक' असते... त्यामुळे चँडलर गर्ली वागायला लागतो.. ते भारी होतं एकदम..
हो, मजा आहे तो एपिसोड. मला
हो, मजा आहे तो एपिसोड.
मला तिशय बोअर होणारे एपिसोड्स म्हणजे जोई वेगासला जातो आणि मग सगळे तिथे जातात ते एक दोन. मी कायम फॉर्वर्ड मारते.
रॉस मुलाच्या हट्टासाठी
रॉस मुलाच्या हट्टासाठी सॅन्टाचा ड्रेस शोधायला फॅन्सी ड्रेसच्या दुकानात जातो आणि तिथला काउंटरवरचा माणूस 'हाय - आर यू हिअर टु रिटर्न दीज पॅन्ट्स?' म्हणून अशक्य टायमिंगने विचारतो. हहपुवा.
जोई एन्टरटेनमेन्ट सेन्टर तयार करायला घेतो आणि चॅन्डलरच्या बेडरूमचं दार चुकून कापून ठेवतो. त्यानंतर बेडरूममध्ये शिरताना चॅन्डलर अर्धंच दार उघडल्याचं लक्षात न येऊन त्यावरून पडतो तो माझा भयंकर फेव्हरिट हहपुवा सीन
फुलटू हहपुवा ! ती टेप 'वुमन
फुलटू हहपुवा ! ती टेप 'वुमन स्पेसिफीक' असते >>>>
जोइ त्या कॅसेटवर स्वतःच्या आवाजात टेप करून जोइसाठी रोज ग्रिल्ड चीज सँडविच बनवायला सांगतो
चॅन्डलर अर्धंच दार उघडल्याचं
चॅन्डलर अर्धंच दार उघडल्याचं लक्षात न येऊन त्यावरून पडतो तो दुसरा हहपुवा सीन >>> हो हो आणि नंतर त्याच्या अगदी डोळ्यांशेजारी ड्रिल
हो, तो ही टिपी आहे. चँडलर आणि
हो, तो ही टिपी आहे. चँडलर आणि जोईची केमिस्ट्री भारी दाखवली आहे आणि त्यांचं टायमिंगही.
मी काल लिहिलेला तो एपिसोडही- फिबीला चँडालर आणि मोनिकाबद्दल कळतं पण ती माहित असल्याचं न दाखवता चँडलरबरोबर फ्लर्ट करते तो एपिसोडही हहपुवा आहे.
हो तो सगळाच भाग भारी आहे.
हो तो सगळाच भाग भारी आहे. चँडलर ऑफिसला निघताना मोनिकाला किस करतो या दोघींदेखत आणि मग संशय येउ नये म्हणून त्यांना पण
ते लंडन स्पेशल असतं ना ..
ते लंडन स्पेशल असतं ना ..
काल रेचेल ला थांबवण्यासाठी
काल रेचेल ला थांबवण्यासाठी रॉस राल्फ लॉरेन बॉस झेल्नर ला तिला बळंच डबल ऑफर द्यायला सांगतो तो भाग परत आहिला. सर्व भागच धमाल. रॉस शेवटी स्वतःच रेचेल ला 'तुझं स्वप्न आहे पॅरिस आणि तू जायला पाहिजेस ' असे सांगतो आणी ती 'आता राल्फ लॉरेन वाले कसे ऐकतील ' म्हटल्यावर परत एक वस्तू (झेल्नर ला लाच म्हणून देण्यासाठी) पिशवीत टाकतो आणि दे विल अंडर्स्टँड म्हणतो ते भारी.
मिस्टर झेल्नर अगदी जे काही
मिस्टर झेल्नर अगदी जे काही दोन चार भाग आणि काही मिनीट काम असेल त्यात भारी अभिनय केलाय. बिचार्याला रेचेल ला कामावर घेतल्यापासून काय काय सहन करावं लागतं. पहिले रेचेल त्याच्यावर कीस मागितल्याचा आरोप, नंतर जोई त्याच्यावर रेचेलचं बाळ विकत घेण्याचा आरोप, एक एक मजा आहे.
रेचेल ची मॅटर्निटी लीव्ह रिप्लेसमेंट 'सुपर गॅव्हिन' पण भारी आहे.
मला आवडलेला सीनः जोई हट्टाने
मला आवडलेला सीनः जोई हट्टाने चेन्डलरकडुन त्याचे कार्ड ( ब्युटी ट्रीटमेन्ट फ्री असते ) घेऊन जातो. ती मुलगी त्याला सगळे विचारते, पण जोई तिला आय ब्रो करायला सान्गतो. पण तिचे प्लकरने भुवईचा एकेक केस उपटणे त्याला सहन होत नाही, तो पळुन येतो. आधी चेन्डलर पासुन तोन्ड लपवतो. पण चेन्डलर त्याला सोडतच नाही. शेवटी जोई वैतागुन त्याला सगळे सान्गतो. चेन्डलर हसुन म्हणतो की असे वाटतय की पिल्लु कॅटरपिलर, मम्मा कॅटरपिलरचा पाठलाग करतय.:हाहा:
https://www.youtube.com/watch?v=tcQyuf2NUc4
https://www.youtube.com/watch?v=wmXyndF-Dpc
"व्हॉट मारियो इझन्ट टेलिंग
"व्हॉट मारियो इझन्ट टेलिंग यु" पहिल्या सीझन मध्य, जोई गुप्तरोगाची जाहिरात करतो आणि त्याचा फोटो सर्वत्र असतो ती.
आणि रॉसेस टिथः हा पूर्ण भागच धमाल आहे. आणी उनागी वाला पण.
रॉस आणि चँडलर महाग हॉटेल चे
रॉस आणि चँडलर महाग हॉटेल चे बुकिंग वसूल करायला फुकट असलेल्या वस्तू घेऊन जातात तो भाग पण भारी.
अगदी सॉल्ट शेकर मधले मीठ, बल्ब, टँपोन्स सुद्धा.
जोईचा पोर्शा वाला भाग पण भारी. त्यात तो "हाऊ आर द गेलर्स " म्हणतो आणि रॉस रेचेल कोर्टातून अयशस्वी अॅनलमेंट करुन येत असतात आणि रेचेल एकदम भयाण एक्स्प्रेशन देऊन "डोन्ट ..कॉल.. अस ..दॅट.." म्हणते. या भागात सर्वांचेच संवाद आणी टायमिंग भारी आहेत.
रॉस आणि चँडलर महाग हॉटेल चे
रॉस आणि चँडलर महाग हॉटेल चे बुकिंग वसूल करायला फुकट असलेल्या वस्तू घेऊन जातात तो भाग पण भारी >>>
तो बल्बवाला पार्ट भारी आहे. शेवटी बॅग उघडते ना हॉटेल स्टाफसमोर?
हो:) रॉसच्या चिकटपणाचा संदर्भ
हो:)
रॉसच्या चिकटपणाचा संदर्भ मोनिका चँडलर च्या लग्नानंतरच्या भागात पण आहे. चेक ऑट टाईम ला तीन मिनीट आहेत म्हणून रॉस खोलीत बसून असतो. आणि चँडलर बोलवायला गेल्यावर रेस्टरुम वापरतो तेव्हा तिथले टॉयलेट पेपर पण रॉसच्या पिशवीत असतात
तू रँडमली भाग बघतेस का? मी
तू रँडमली भाग बघतेस का? मी सी१ए१ पासून सुरू केलंय आणि आता सी३ए२० वगैरे सुरू आहेत. त्यामुळे या पुढच्या भागांतले डिटेल्स एवढे तपशीलवार आठवत नाही.
रॉस-रेचलच्या पहिल्या ब्रेक अप पर्यंत आलेय.
रच्याकने, मध्येच एका एपिसोडमध्ये जोइ नवीनच मुव्ह होतो तो भाग दाखवलाय. खाली कसिनो असतो तो बंद होउन कॉफी शॉप होणार अशी न्युज पण त्याच एपिसोडमध्ये आहे.
मी सी१ए१ पासून सुरू केलंय
मी सी१ए१ पासून सुरू केलंय >>>> सेम..
आम्ही सी४ए१० वगैरे वर आहोत..
एका एपिसोडमध्ये जोइ नवीनच मुव्ह होतो तो भाग दाखवलाय. >>>> हो.. जॅनिस त्यांना 'अवघड' प्रश्न विचारते तेव्हा तो फ्लॅशबॅक आहे.. तो मि.हकल्स कसला गेम करतो त्यात..
माझ्याकडे चिनी ब्लु रे मध्ये
माझ्याकडे चिनी ब्लु रे मध्ये सीझन १-१० आहेत आणि मी वेळ मिळेल तेव्हा कोणताही भाग बघत असते. (सर्व भाग बघून झाले आहेत ३ वर्षात.)
फ्रेंडस ला लिंक असणे गरजेचे नाही पण असली तर आधीची पार्श्वभूमी समजून विनोद आणि मजेदार होतात.
सगळ्यात बेस्ट म्हणजे लंडन ला
सगळ्यात बेस्ट म्हणजे लंडन ला जाताना रेचल च्या बाजूचा तिला सांगतो ते "It does sound like you were on a break" हाहा
या काही मिनीटात माझा आवडता हाऊस एम डी ह्यु लॅरी आहे असे नेटवरुन कळले, मग तो भाग परत पाहिला. ह्यु लॅरी खूप तरुण दिसतो.
लंडनला जाताना फ्लाईटमध्ये
लंडनला जाताना फ्लाईटमध्ये रेचल लवस्टोरी सांगून शेजार्याला पकवायला सुरू करते आणि तो हेडफोन्स लावतो. मग ती शेजारच्या आयलमधल्या माणसाला सांगत बसते ते ही भारी आहे.
http://www.buzzfeed.com/regaj
http://www.buzzfeed.com/regajha/the-one-that-is-still-buffering
मायबोलीवरच्या खास 'फ्रेंड्स' बाफचा अनुल्लेख करून फक्त फेसबुकवर लिंक देणं अजिबात शो ना हो
Pages