फ्रेंड्स !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!

त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्‍या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!

मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!

नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!

असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अ‍ॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते! Happy

अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends

प्रकार: 

सुझी म्हणजे रॉसची ती ब्रिटिश गर्लफ्रेंड ना? त्यांच्या लग्नाचा एपिसोड पण धमाल आहे. मोनिका-चॅंडलर जोडी जमते आणि मग नंतरची लपवालपवी कहर आहे.

हो, एकमेकांच्या गफ्रे/बॉफ्रेची नक्कल, त्यांची टिंगल पण भारी घेतली आहे.

रेचलच्या इटालियन बॉफ्रेला परत आलेला बघून रॉस विचारतो when did rigatoni get back from rome? Biggrin

हो एमिली. तिच्याबद्दलची चॅण्डलरची कॉमेण्ट महान आहे. ते लग्न फिस्कटून ते सगळे परत येतात, नंतर रॉस म्हणतो की तो आता अपॉलॉजी म्हणून एमिलीला गुलाब पाठवेल. तेव्हा हा म्हणतो, when you send those, make sure to make it out to E-M-I-L-Y Happy (लग्नाचा एपिसोड पाहून मग हे पाहा Happy )

त्या She is not Rachel - ने तर पुढचा प्रचंड गोंधळ निर्माण होतो ना? ती यादी आधी कागदावर करावी का म्हणून रॉस विचारतो. पण तेव्हा चॅण्डलरने तो नवीन कॉम्प्युटर की प्रिंटर घेतलेला असतो, त्यामुळे (येथेही चॅण्डलरच्या कॉमेण्टचे संदर्भ कळायला थोडी त्याबद्दल माहिती असेल तर जास्त अ‍ॅप्रेशिएट होतील - उदा: कागदावर लिहू का विचारल्यावर - "No, Amish boy"!), त्यावर टाईप करताना रेचेल च्या ऐवजी रेचम केले जाते. त्यामुळे नंतर वाचताना त्या कॉमेण्टचे महत्त्व तिच्यापर्यंत पोहोचत नाही आणि ब्रेक अप चालू होतो. तो we were on a break वाला ब्रेक अप हाच का ते लक्षात नाही Happy

चॅण्डलर व रेचेल माझेही आवडते. रेचेल ने इतरांइतकेच जबरी काम केलेले आहे असे मला तरी वाटते. तसे सहाही जण तोडीस तोड आहेत.

we were on a break >>> Biggrin तो एपिसोड पण भारी आहे. ती खूप मोठं पत्र लिहीते ना?

नाही फा.. बहुतेक वी वेअर ऑन ब्रेक वाला ब्रेक म्हणजे ती ब्लुमिंगडेलमध्ये जॉबला असताना रॉस मला वेळ देत नाहीस म्हणून ऑफीसमध्ये पिकनिक घेऊन जातो त्यावरुन. रेचल म्हणते माझं स्वतःचं एक जग निर्माण होतंय ज्यात तू नाहीयेस, आणि मला ते आवडते. वगैरे..

चँड्लर त्या नवीन लॅपटॉप कन्फिगरेशन इतकं प्राउडली सांगतो तेव्हा इतकं हसू येते.. २८ एम्बीपीस मोडेम वगैरे.. Lol

आणखी एक एपिसोड आहे जो फार दाखवत नाहीत रिपीट टेलिकास्टमध्ये पण टिपी आहे.
मला वाटतं फिबी(?) अशीच कुणा पंटरबरोबर डेट करत असते आणि त्याला सेंट्रल पर्कमध्ये घेऊन येते सगळे असताना. त्याने एकदम शॉर्ट शॉर्ट घातलेली असते आणि कॉफी टेबलवर पाय वर करून बसतो. आठवतोय का कुणला?

परफेक्ट! हो तोच बस्के.

यावरून आठवले एकदा आम्ही रॉस व रेचेल चे किती वेळा फाटले व प्रत्येक वेळेस एकत्र आले तो एपिसोड व सीन काय होता हे आठवत बसलो होतो Happy

फीबीची पर्सनॅलिटी दाखवणारा संवाद पहिल्या २-३ एपिसोड्स मधेच आहे, रॉस चे फर्निचर आवरायला मदत करणार का विचारल्यावर: "Oh I wish I could, but I don't want to"

हो तो ब्लूमिंग्डेल वालाच ब्रेक चा आहे. कालच पाहिला Lol

तो लॅप्टॉप पाहून २ मिन हसत होतो. काय पण सांगतो २८ एम्बीपीस मोडेम. त्यावेळेस भारी वाटत असेल पण

विशेष सूचना: जेनिफर अ‍ॅनिस्टन (तेव्हाची) मला इतकी आवडते की वरती चंपकच्या जाम मधल्या "आ" पेक्षा माझा एक आ अधिक धरावा Happy

सायो - हो तो माहीत आहे. कॅलिफोर्नियातून आलेला असतो तो Happy

त्यावरून आठवले, फ्रेण्ड्स च्या अनेक एपिसोड्स मधे हे दाखवलेले आहे, विशेषतः ते त्या कोचावर व भोवती बसलेले असताना - एखाद्या विनोदी सिच्युएशनवर सगळेजण काहीतरी फाको करायला बघतात. त्या बहुतांश कॉमेण्ट्स धमाल आहेत. हा चड्डीवाला बॉफ्रे, रॉसची ती विद्यार्थिनी-गफ्रे असे अनेक सीन्स आहेत.

मला मोनिका अन रिचर्ड जोडी पण आवडली होती.. ब्रेकअपनंतर डोळ्यात आइस गेल्यावर रिचर्ड नाहीये व त्याची रिप्लेसमेंट आहे ते बघून जाते. नंतर त्या नवीन डॉक्टतवर लाईन मारते अन तो रिचर्डचा मुलगा निघतो.. Lol

जेनिफर अ‍ॅनिस्टनची हेअरस्टाईल खूप फेमस होती म्हणे तेव्हा. मला तिच्या हेअरकट्सपेक्षा तिचा वॉर्डरोब प्रचंड आवडतो. अ‍ॅक्सेसरीजपण. फॅशन इंडस्ट्री प्रोफेशनल शोभते एकदम.
तो राल्फ लॉरेन-फिबी-रेचेल-तिची बॉस-केनी द कॉपी गाय वाला एपिसोडपण धमाल आहे.

जोयी नि फिबीची characters ह्या संवादामधे एकदम चपखल उतरली आहेत.

रॉस च्या फिलिंग्स रेचेल ला कळल्यावर किंवा तो ज्युली बरोबर आहे हे कळल्यावर (नक्की वेळ आठवत नाही)

फिबी मोनिकाच्या घरात डायनिंग टेबलभोवती गोल गोल फिरताना
This is huge, this is huuuge
No, this is bigger than huge, way bigggeeeer than huge. What is it Joe ?
ज्योयी एकदम confused look देतो नि पुटपुटतो "yeah" नि नेहमीचा लाईटबल्ब लागल्यासारखा चेहरा उजळतो
"'This"
लगेच फिबी वर "yeah, this is bigger that huge"

असले अफलातून टायमिंग आहे दोघांचे त्यात जमलेले.

फ्रेंडसचं शूटिंग सुरू व्हायच्या आधी सगळ्या कास्टला कुठे तरी व्हेकेशनवर नेलं होतं-त्यांच्यात मैत्री होण्यासाठी- असं मी मायबोलीवरच वाचलं होतं कधी तरी.

Mr. Heckles आजोबा आठवतात का कोणाला? You are disturbing my cats - You don't have any cats- I could have cats

ते गेल्यावर चँडलरचा एक टचिंग सोलो सीन होता.

Pages