फ्रेंड्स !

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!

त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्‍या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!

मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!

नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!

असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अ‍ॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते! Happy

अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends

प्रकार: 

हो.. ते त्यांचं सगळं सामान मोनिका आणि रेचलला मिळावं असं विलमध्ये टाकतात.
आणि तो लॉयर 'Noisy girl 1' आणि 'Noisy girl 2' असं लिहून त्या दोघींचा सह्या घेतो.. Happy

हो तोपण तसाच होणार पुढे नि एकटाच मरणार असा ..... >>>> हो, पण तो टिपी होता.. अगदी शेवटी त्यांच्या घरातून बाहेर पडताना तो एकदम सिरीयस होतो..

पण चँडलर खूप अपसेट होतो तेव्हा. त्याच्या अडगळीत काय काय सापडते. जुने इयर बूक, लॅम्प, टीव्ही चे भिंग.

<हो, पण तो टिपी होता.. अगदी शेवटी त्यांच्या घरातून बाहेर पडताना तो एकदम सिरीयस होतो..>

हां..मला तोच त्यांच्या घरातला moment आठवत होता. लहानसाच सीन आहे पण मॅथ्यू पेरीने जबरी केलाय.

मॅथ्यू पेरीवर क्रश असण्याच्या काळात केवळ त्याच्यासाठी म्हणून फूल्स रश इन नावाचा मुव्ही बघितला होता त्यातही तो खूप आवडला होता.

अरे वा पुन्हा.... यातले सर्वच भाग मस्त आहेत. कितीवेळा पाहिलेत तरी तितकेच हसु येते. तिन्ही मुलं आवडतात, मुली आवडत नाहीत. त्यांच्या संवादावर कधी हसुच आले नाही. जेमतेम १-२ दा हसु आले. अभिनय वाईट नाही त्यांचा पण त्यांची कॉमेडी बोर झाली. अ‍ॅनिसन मात्र तेव्हा फारच म्हणजे फारच सुंदर दिसायची. मुलीना नावे ठेवली म्हणुन मला हाणु नका.

हो.

सुनिधी हे वाचून आश्चर्य वाटले Happy फ्रेण्ड्स आवडणार्‍यांना सहसा ते सरसकट आवडते. मोनिका चा हाय मेन्टेनन्स, रेचेल चा "चॅप्टर" पणा, फीबी चा टोटल वियर्डनेस सगळे धमाल आहे. मला चॅण्डलरने सर्वात जास्त व त्यानंतर बाकीच्यांनी साधारण एकसारखे हसवले आहे.

वेदिका - मग होल नाईन यार्ड्स बघितलाय का? Happy

फ्रेण्डस मधले माझे आवडते तीन अत्यंत रोमॅण्टिक सीन्सः
१. रेचेल चा जॉब जातो तेव्हा रॉस मुद्दाम पोकरचा डाव हरतो व नंतर ती किती खुश आहे हे चॅण्डलर व जोईला दाखवतो (मात्र यानंतर त्याचे पत्ते पाहायला दोघे झडप घालतात तो सीन धमाल आहे. तसेच याच एपिसोड मधे शेवटी Dumb Charades खेळताना मोनिकाचे "Bye Bye Birdie" कोणी ओळखत नाहीत पण रेचेल चे "The Unbearable Lightness of Being" जोइ सुद्धा ओळखतो, तो ही).
२. रेचेल व रॉस भांडतात व नंतर ती रेस्टॉ बंद करत असताना रॉस परत येतो तो
३. प्रॉम व्हिडीओ पाहताना, रॉस रेचेल बरोबर जायला तयार झाला होता ते तिला कळते तो.

मला तो प्रॉमचा व सेंट्रल पर्क बंद असताना दारं लॉक झाली असताना रॉस बाहेर रेचल आत तो सीन खूप आवडतो.
हा रोमँटीक नाही, परंतू पहिल्या ब्रेकअपनंतर रेचल खिडकीत बसलेली असते व रॉसचे फोन उचलत नसते तोही खूप आवडतो..

मला एक सीन अजूनही आठवला तरी जाम हसू येते. रॉस, जोईला सान्गतो की मला एका डेट वर जायचेय, पण मला त्या मुलीशी पाचकळ पण रोमॅन्टीक असे बोलता येते नाही, तिला आवडते. मला शिकव ना. जोई खुश. तो रॉसला अनेक प्रकार सान्गतो. शेवटी रॉसला म्हणतो तू माझ्या बाहुपाशात ये. मग ते दोघे तसे असताना मागुन चेन्डलर हळूच येतो. आधी थोडा अचम्बीत होतो. पण मागे उभा रहातो. या दोघाना काहीच कल्पना नसते. रॉस जोईच्या मिठीत काहीतरी पाचकळ बोलत असतो. त्या वेळी चेन्डलरच्या चेहेर्‍यावर जे मजेशीर एक्सप्रेशन्स आहेत, ते जबरी आहेत. नन्तर दोघे त्याला पाहुन जे गडबडतात ते पण भारी.:फिदी:

माझी नम्बर २ आवडती सिरीयल, पहिली असम्भव.

काय आठ्वनी ताज्या झाल्या. रॉस आणि रेचल ची प्रेम कहाणी सग्ळ्यात भारि. ओर्कुट वर सुरुवातिला मी रॉस चा फोटो
डिपि म्हणुन टक्लेला. सध्या रोमेडी नौ या वर ही मालिका चालु आहे. रोज रात्रि ८ वाजता. अजुनहि रोज पाहतो

कालच तो " द वन व्हेन नो वन इज रेडी" पाहिला Lol फार धम्माल आहे! मोनिका टिपिकल - ऑब्सेस्ड विथ रिचर्ड, जोई- चँडलर ची सोफ्यावरून भांडणे आणि चँडलर ने जोईचे कपडे लपवणे अन त्याच्या "ऑपोझिट" म्हणून जोईने चँडलर चे सगळे कपडे एकाअवर एक घालणे Lol

मी कालपासून नेफ्लिवर बघायला सुरूवात केली आहे. बरेचसे एपिसोड्स विस्मरणात गेले आहेत. त्यामुळे बरंचसं आठवत नाहीये. नेफ्लिवर टायटल साँग लिरिक्सही येतंय.

त्या वेळी चेन्डलरच्या चेहेर्‍यावर जे मजेशीर एक्सप्रेशन्स आहेत, ते जबरी आहेत. नन्तर दोघे त्याला पाहुन जे गडबडतात ते पण भारी >> I want to lick you all over वर, जबरदस्त expressions आहेत चँडलरची.

त्या वेळी चेन्डलरच्या चेहेर्‍यावर जे मजेशीर एक्सप्रेशन्स आहेत, ते जबरी आहेत. नन्तर दोघे त्याला पाहुन जे गडबडतात ते पण भारी >> I want to lick you all over वर, जबरदस्त expressions आहेत चँडलरची. >>>> हो ते भन्नाट आहे एकदम.. फुलटू हहपुवा !

पहिल्या ब्रेकअपनंतर रेचल खिडकीत बसलेली असते व रॉसचे फोन उचलत नसते तोही खूप आवडतो.. >>>> हो.. रॉस तेव्हा एकदम गरिब बिच्चारा वाटतो. Happy बायदवे नंतर पुढे तो Russ दाखवलाय तो किती विचित्र आहे !

मस्त आठवणी, माझे आवडते कॅरेक्टर फिबी आणि जोइ. दोघांचंही कॉमेडी टायमिंग अफलातून आहे.

जेनिफर सुरूवातीच्या सीझनमध्ये कसली मस्त दिसते. मोनिका फारशी कधी आवडली नाही. चॅंडलर आणि रॉस ठिकठाक.. चँडलरचे संवाद भारी असतात कायम.

होल नाईन यार्ड्स बघायचा राहिलाय Happy

'फ्रेन्ड्स इंडियन असते तर' असं एक फॉरवर्ड पूर्वी आलं होतं. त्यात असं होतं की सहाही जण सॉफ्टवेअरमध्येच कामाला असते, सिंगल असेपर्यंत रुममेट्सबरोबर न राहता आपल्या पेरेन्ट्सबरोबर राहिले असते, डेट्सवर न जाता कांदेपोहे कार्यक्रमांना गेले असते, कॉफीऐवजी चहा पीत असते इत्यादी Wink

फ्रेण्ड्स! Happy

मी इतके वेळा इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी बघत असते की कुठला एपिसोड लेटेस्ट बघितलाय हे कदाचित आठवणार नाही ..

सध्या फक्त तो काहितरी " it's been quite long since anyone took care of my monkey" हा चॅण्डलर चा डायलॉग आठवत आहे ..

मी आत्ता तो तो न्यूयॉर्क ब्लॅकआउट वाला एपिसोड पाहीला. किती अमेझिंग फनी डायलॉग्ज आहेत त्यात..
'शी इज राईट, इट्स जील..'
'इज इट अ वेस्टीब्युअल ऑर इज इट अ‍ॅन एट्रिअम? याह गुड, दॅट इज द पार्ट टू फोकस ऑन, यु इडीयट!"
चँडलर आणि जॉईचं अंअंईंईं संवाद.. Lol
गम वुड बी पर्फेक्शन.. Proud
रॉस अन रेचलच्या पॅशनबद्दलच्या गप्पांनंतर रेचल रॉसच्या केसातून हात फिरवून जाते मग रॉस हवेत तरंगत जात असताना ज्योई त्याच्याकडे न बघता मेणबत्तीतून मेण टाकत बोलतो : नॉट गॉन्ना हॅपन! Happy तिथून पुढचा त्या दोघांचा संवाद.. युआर द मेयर ऑफ द झोन..
फीबीचे मिल्क इज गेटींग सावर गाणे.. :))
पाओलोला मोनिकाच ३-३दा हाय म्हणाते.. रॉसची चिडचिड..

भारी आहे हा एपिसोड! Lol

त्यातच तो चँडलरचा डायलॉग आहे द वर्ल्ड इज माय लेस्बियन वेडिंग > > त्यातलाच "and there is no point me coming up with an awkward pickup line now. " चँडलरचे डायलॉग लिहिणारे महान आहेत.

" it's been quite long since anyone took care of my monkey" >> त्याच्याच पुढे "and you never look down while taking shower ?" हे रॉसला विचारणे. महानच.

काल सगळे मिळून थँकगिविंगच्या दिवशी फुटबॉल खेळतात तो एपिसोड बघितला. तो सगळा गेम इतका प्रचंड धमाल आहे. त्यात ती डच मुलगी येते. आठवून पण हसायला येतंय.

अर्र फारेंड, आत्ता वाचला तुझा प्रतिसाद. बराच जुना झाला आता.
हो, असं झालं खरं. आधी काही भागात फिबीचा विक्षिप्तपणा वगैरे सर्व ठिक वाटले पण नंतर हळुहळु मुलींचा पगडा उतरला खरे. विक्षिप्त भुमिका वर्षानुवर्षे ताकदीने निभावु नेण्याइतका सशक्तपणा मला त्यात जाणवला नाही म्हणुन. त्या साठी 'बेकर' मधला डॉ. बेकर खुप आवडायचा.

विनोदी मालिका खुप पाहिल्या नाहीत तरी बर्‍याच पाहिल्या गेल्या, त्यात २ बाया सर्वात आवडल्या. साईनफिल्डची एलेन व सर्वात आवडते ती गोल्डन गर्ल्स ची ब्लँच.

वरचे भाग आता विसरायला होऊ घातलय. पुन्हा पहायला हवेत.

(चला, फ्रेंड्स च्या चर्चेत हळुच बाकीची पिल्ले सोडायचे पाप आता बंद).

फ्रेंड खूप मस्त प्रकार आहे. कोणताही भाग कधीही बघायला मजा येते. मला विशेष आवडलेले: फिबीचे लग्न ठरते तो 'ग्लॅडिस' वाला, रॉसचे दात अतिशुभ्र झाले तो भाग, रॉस टॅन, एमिलीचं लग्न, वन विथ ग्रँट आणि इतर बर्‍याच भागातले बरेच प्रसंग. सगळेच जबरदस्त अभिनय करतात, पण सीझन १ मधे त्यांची केमिस्ट्री जास्त नाही वाटत, २ पासून त्यांची व्यक्तीमत्वं खुलत गेली.
ग्लॅडिसवाल्या भागात रेचेल आणी मोनिका दोघींची एक्मेकांवार ग्लॅडिस घेण्याची जवाबदारी टाकतानाची अ‍ॅक्टिंग भारी आहे.
आणि माईक जास्त भागात नसला तरी जितका दिसला त्यात तो भारी अभिनय करतो.
मला ट्रीगर आणि जेनिस आणी रेचेलचा राल्फ लॉरेनचा पुरुष बॉस पण अभिनयात आवडतो.
अजूनही कोणी वेळ दिला तर आणि टिव्हीवर कार्टून लागले नसले तर फ्रेंड डिव्हीडी लावून चहा पीत टिपॉयवर पाय ठेवून बसायला प्रचंड आवडतं.

Pages