उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या मूलद्रव्याचा 'अणू' घेतल्यास... त्यातील धन, ॠण आणि उदासिन असणारे घटक घेतल्यास.. हा अणू त्याच मूलद्रव्याच्या अजून एखाद्या 'अणू' पेक्षा वेगळा असतो काय? अणूभारांक..अण्वांक यात फरक पडतो काय? >>

अणूभारांक..अण्वांक सारखेच असतात एकाच मूलद्रव्याच्या सर्व अणूंचे.

पण तरीही एक अणू दुसर्‍यापेक्षा वेगळा असतो कारण त्यांना वेगळे अस्तित्व असते (हे काहिसे जुळ्या भावंडांसारखे झाले). दोन प्राणवायुचे अणूंचे गुणधर्म तंतोतंत सारखे असतात पण तरीही ते वेगळे असतात कारण ते वेगवेगळ्या स्थानांवर (अतिसूक्ष्म फरकाने का होइना) असतात. म्हणजे आकाश (पंचमहाभुतातले आद्य) हे मायेचे आयुध त्यांना वेगळे अस्तित्व देते.

'अणू' मध्ये जरी धन, ॠण आणि उदासिन घटक असले तरीही 'अणू' चा 'विद्यूतभार' काय असतो.? >> अणूला विद्युतभार नसतो पण तो पूर्णपणे स्थीर नसतो. बाह्य घटक तो बदलू शकतात कारण अणू अविभाज्य नाही. त्यामुळे अणूच्या अंतरंगातले घटक जसे कमी जास्त होतात तसेतसे त्याचे गुणधर्म बदलत जातात. म्हणजेच जोपर्यंत कण अविभाज्य नाही तोपर्यंत त्याला गुणधर्म असणारच.

माधव,

>>>अणूला विद्युतभार नसतो पण तो पूर्णपणे स्थीर नसतो. बाह्य घटक तो बदलू शकतात कारण अणू अविभाज्य नाही. त्यामुळे अणूच्या अंतरंगातले घटक जसे कमी जास्त होतात तसेतसे त्याचे गुणधर्म बदलत जातात. म्हणजेच जोपर्यंत कण अविभाज्य नाही तोपर्यंत त्याला गुणधर्म असणारच.

बाह्य घटक म्हणजे काय? या बाह्य घटकामूळे बदलेल्या गुणधर्माचा अणू.. हा पहील्यापेक्षा स्थिर असतो का अस्थिर.

धन्यवाद!

श्रीमद्भगवतगीतेत... श्रीभगवंतानी श्री अर्जुनांना कोणता 'योग' सांगितला? >>> कर्मयोग

अश्विनी,

>>> प्राणी योनी ही भोग योनी आहे. ते जसे वाईट कर्म करत नाहीत तसं चांगलंही करत नाहीत. त्यांना कर्मस्वातंत्र्य नसते. जे काही असते तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव असतो. त्यांना त्यांच्या वागण्याचं ना पाप लागतं ना पुण्य. एका प्राणी योनीतून दुसर्‍या प्राणी योनीत, असे जन्म घेत घेत उत्क्रांत होत होत एका स्टेजला मनुष्य जन्म घेण्या इतपत तो जीव शुद्ध झाल्यावर नरदेह देवून त्याला सत्कर्म करण्याची संधी देण्यात येते.

एका योनीतून.. दुसर्‍या योनीत जाताना जर जीव.. पाप ही करत नसेल आणि पुण्यही नाही.. तर तो जीव शुद्ध कसा होतो?... आणि जर अशी शुद्धता होत असेल..तर त्या अगोदरच शुद्ध झालेल्या जीवाला परत मनुष्य जन्माची गरजच काय ? Happy

धन्यवाद!

अश्विनी,

>>>अंतःकरण शुद्ध करण्यासाठी,वासना,मोह ह्यातुन सुटण्यासाठी कोणती साधना करतात?
- मला वाटतं अशी कुठली पर्टिक्युलर साधना नसते. कुठलीही भगवंताची उपासना आपोआप अंतःकरण शुद्ध करत जाते. आपण परत परत ते अशुद्ध करत रहातो पण शुद्धतेचं पारडं हळू हळू जड होत जातं.

कोणतीही उपासना अतःकरण शुद्ध करते.. म्हणजे नेमके काय होते? मग श्रीसद्गुरुंची गरजच काय? शुद्धतेच पारड जड झाल्यावर काय होते? Happy

धन्यवाद!

एका योनीतून.. दुसर्‍या योनीत जाताना जर जीव.. पाप ही करत नसेल आणि पुण्यही नाही.. तर तो जीव शुद्ध कसा होतो?... आणि जर अशी शुद्धता होत असेल..तर त्या अगोदरच शुद्ध झालेल्या जीवाला परत मनुष्य जन्माची गरजच काय ? >>>

सगळ्यात श्रेष्ठ योनी मनुष्य योनी. कर्मांमुळे खात्यावर जमा झालेले प्रारब्ध जर प्राणी योनी देत असेल तर केवळ आणि केवळ भोगण्यासाठीच ती असते. बुद्धीची संपत्ती मिळालेली नसते. एकूण जमा प्रारब्धातील भोगून झालेलं प्रारब्ध वजा झालं की पुढच्या जन्मात शिल्लक प्रारब्धा नुसार जन्म. या योनीत पुण्य नसल्याने प्रारब्धाच्या खात्यात जास्तीची वजाबाकी नसली तरी पापही नसल्याने भरही पडत नाही. जो प्राणी जन्म मिळत असेल त्यात असलेले भोग भोगले की वरच्या श्रेणीचा जन्म.

मी पूर्ण शुद्धता म्हटलं नाहिये. मनुष्य जन्म (कर्मयोनी) मिळण्याएवढी शुद्धता असेल तर पुढची शुद्धता स्पीड अप करुन (कर्मस्वातंत्र्याच्या वापराने) मोक्षाची शक्यता असते. कर्मयोनीतूनच हे घडू शकते.
----

कोणतीही उपासना अतःकरण शुद्ध करते.. म्हणजे नेमके काय होते? मग श्रीसद्गुरुंची गरजच काय? शुद्धतेच पारड जड झाल्यावर काय होते? >>>

मुळात भगवंताची उपासना करण्याची इच्छा होणं ही त्याची कृपा असल्याचे लक्षण आहे. उपासना ह्या वावर, वापर आणि संवाद या माध्यमातून भगवंताच्या कार्यरत सानिद्ध्याचा लाभ होण्याची सुरुवात ठरु शकतात. अंतःकरणात उठणार्‍या लहरी, चंचलता कमी होते. षडरिपुंचा प्रादुर्भाव कमी होत जातो.
श्रीसद्गुरुंची काय करतात ह्याबद्दल मी आधी थोडक्यात लिहिलं होतं. सद्गुरुंच्या आश्रयाखाली असू तर आपल्या पडत धडपडत केलेल्या उपासनांना योग्य अधिष्ठान मिळतं. सद्गुरु आपला ऑरा सबल राखण्यासाठी सतत कार्यरत असतात. आपले बाह्यमन व सबकॉन्शस माईंड या मधलं इंटरसेक्शन म्हणजेच संक्षिप्त मन हे सद्गुरुंशी जोडलं गेलं तर आपल्या लिंगदेहापेक्षा आपल्या सहस्रार चक्रातील श्रीगुरुकेंद्र मोठं होतं आणि भोगयोनीमध्ये जायची शक्यता कमी होते. सद्गुरु त्याचा बेडा पार करतात.

शुद्धतेचं पारडं जड होत गेलं की सद्गुरु/भगवंत आणि आपल्यातील अंतर कमी होतं. जितकी शुद्धता जास्त तितकं अंतर कमी.

----
जसं जमेल तसं मोडकं तोडकं लिहिलंय Uhoh Happy

अश्विनी,
धन्यवाद!

श्रीगुरुचरित्रामध्ये...सांगितल्यानुसार श्रीमद भगवन श्रीनृसिंहसरस्वतीमहाराजांनी (बोला.. अवधूत चितन श्रीगुरुदेव दत्त!).... श्रीक्षेत्र गाणगापुराहून..कर्दळी वनामध्ये जायचा निर्णय का घेतला?

धन्यवाद!

माधव,

प.पू.श्री गजानन महाराजांनी... प.प.श्रीटेंब्येस्वामी महाराज अनुसरत असलेल्या कर्ममार्गाची...
सोवळे-ओवळे..संध्यास्नान..व्रत-उपोषणे आणि अनुष्ठान.. अशी अंगे सांगितली..

पण... श्रीभगवंतानी... श्रीअर्जुनांना 'कर्मयोग' आचरण्यासाठी.. युद्ध करायला सांगितले.. असे का बरे?

धन्यवाद!

सावट, मी माझ्या सद्गुरुंनी सांगितल्यानुसार फक्त अध्याय १४ आणि १८ वा अध्याय वाचते. त्यामध्ये श्रीनृसिंहसरस्वतीमहाराजांनी गाणगापुराहून कर्दळीवनात जायचा निर्णय का घेतला याचे सविस्तर वर्णन नाही. दुसर्‍या कुठल्या अध्यायात ते विस्ताराने आले असल्यास तो अध्याय सांगावा. मी तो अध्याय वाचून बघेन Happy

श्रीनृसिंहसरस्वतीमहाराज कर्दळीवनात गुप्त झाले आणि कालांतराने श्री स्वामी समर्थ कर्दळीवनातूनच प्रगटले.

श्रीमद्भगवतगीतेत... श्रीभगवंतानी श्री अर्जुनांना कोणता 'योग' सांगितला? >> भगवद्गीता ही अर्जुनाला युध्दप्रेरीत करण्याकरता सांगितली म्हणजे कर्मयोग मुख्य! पण त्यात श्रीभगवंतानी भक्तीयोग, राजयोग अशा इतरही योगांची ओळख करून दिली आहे.

बाह्य घटक म्हणजे काय? >> strong force आणि weak force!

बदलेल्या गुणधर्माचा अणू.. हा पहील्यापेक्षा स्थिर असतो का अस्थिर >> बहुतेक वेळेला आणू दुसर्‍या अणूशी संयोग पाऊन रेणू बनतो जो तुलनेने अणूपेक्षा स्थीर असतो.

पण... श्रीभगवंतानी... श्रीअर्जुनांना 'कर्मयोग' आचरण्यासाठी.. युद्ध करायला सांगितले >>
अध्यात्माच्या प्रत्येक मार्गाचे अंतिम फल हे ज्ञान असते. कॉणत्याही मार्गाने गेले तरी देहाला कर्म चुकत नाही. सोवळे-ओवळे..संध्यास्नान..व्रत-उपोषणे आणि अनुष्ठान हे सगळे देह सुदृढ आणि मन शांत करण्याकरता आहेत. (प्रत्येक मार्ग देहाला महत्व देतोच कारण तो वापरूनच मुक्ती मिळवायची आहे. तो सुदृढ नसेल तर मुक्तीची वाट अधिकच बिकट बनते.)

पण शेवटी युध्द अटळ असते तेही आपले आपल्याशीच! अर्जुनाला श्रीभगवंत तेच करायला सांगत आहेत.

माधव,

>>>अध्यात्माच्या प्रत्येक मार्गाचे अंतिम फल हे ज्ञान असते. कॉणत्याही मार्गाने गेले तरी देहाला कर्म चुकत नाही.

हे 'सत्य' च आहे .. प्रश्न असा होता की कर्माचे स्थूल स्वरुप या दोन वरच्या उदाहरणात वेगवेगळे का आहे.?:)

धन्यवाद!

>>>आपण आधी सांगितल्याप्रमाणे मुक्तीकरता साध्य आणि साधन दोन्ही गरजेचे असते. जर मला साध्यच माहिती नसेल तर कोणताही जप किंवा दुसरे कोणतेही साधन करून काय फायदा होइल?

आता सांगा हसरींना... 'साध्य' काय आहे, हे माहित झाले आहे का नाही?

हे सांगा सावट. Happy

श्रीगुरुचरित्रामध्ये...सांगितल्यानुसार श्रीमद भगवन श्रीनृसिंहसरस्वतीमहाराजांनी (बोला.. अवधूत चितन श्रीगुरुदेव दत्त!).... श्रीक्षेत्र गाणगापुराहून..कर्दळी वनामध्ये जायचा निर्णय का घेतला?

सावट हे पण सांगा तुम्ही इथे जे प्रश्न विचाराल त्याची उत्तर नाही आली किंवा दिली तर प्लिज तुम्हीच द्या अशी नम्र विनंती. Happy

धन्यवाद. Happy

हसरी,

तुम्ही आतापर्यंत विचारलेले प्रश्न खाली आले आहेत...

१)उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

२)मला गणपतीची उपासना करायची आहे ? ती कशी करायची सांगाल का?

३)मि असं ऐकले आहे कि कोणती हि उपासना किंवा मंत्र गुरुकडुन घ्यावा मग ती पुर्ण होते? जाणकरांनी माहिती द्यावी
ईतर देवतांची कोणी उपासना करत असल्यास ती द्यावी

४)मला भक्तीमाग विषयी सांगा ना?

५)आपल्याला गुरु मिळेपर्यत आपला मार्ग बरोबर आहे हे कसं समजायचं आपला गुरु कसा ओळखायचा?

६)आपल्यातला देव कसा शोधायचा?

७)उपासना कशासाठी करतात माहित नाही (मला भक्तीसाठी आणि मोक्षसाठी करायची आहे)

८)मन ताब्यात ठेवण्यासाठी काय केल पाहिजे?
मि पण सोडन्यासाठीही?

९)तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही>>>>>>
हे निट पटवुन सांगा ना? मला नाही कळलं
संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास.>>>
ह्यासाठी आपण काय करु शकतो.

१०)कर्म आपण करतो कि परमेश्वर आपल्याकडुन करुन घेतो?

११) अंतःकरण शुद्ध करण्यासाठी,वासना,मोह ह्यातुन सुटण्यासाठी कोणती साधना करतात?

अहो.. साध्य काय आहे.. हे कळणे.. म्हणजेच साधना कशाकरीता करायची हे कळणे...!

आता.. 'उपासना' कोणती... कोणत्या देवतेची करायची... इथून सुरुवात करून... आपलेच अंतःकरण शुद्ध करण्याकरीता 'साधना' करायची असते हे कळणे म्हणजेच... 'साध्य' काय आहे ते कळणे..! अनेकांना संपुर्ण आयुष्य सरले तरी याचा पत्ता लागत नाही... ! अनेक लोक बोलताना बोलतात.. पण तसे वागायची वेळ आली की.. सगळे गाडे बदलते... आणि आपण असे वागतो आहे याचाच पत्ता नसतो.. सुधारणा करायची.. गोष्ट बाजुलाच! आपल्याला वाटते.. देव कृपाळू आहे... आपण काहीहि चुका कराव्यात.. कसेही वागावे ... आणि त्याने हे सगळ न कुरकुर करता पदरात घ्याव्यात! का.. तर त्याला सगळे कळते... असे वाटणे वेगळे.. आणि प्रत्यक्षात देवाने तसे वागणे वेगळे. आपल्याला तिमिर रोग झाला आहे..चंद्र एकच असून आपल्याला दोन-दोन दिसत आहेत.. मग उपचार आपल्या डोळ्यावरच करायला पाहीजे ना... आपण काय म्हणतो.. चंद्र दोन्-दोनच आहेत.. ज्याला एक दिसतोय त्याच्या डोळ्यात 'दोष' आहे... किंवा म्हणताना एकच आहे म्हणतो... वागताना.. दोन-दोन आहेत हे ..असेच वागतो.

प.पू श्रीपरमहंस रामकृष्ण म्हणायचे... डोक्याला 'व्रण' झालेला कुत्रा जसा तळमळतो ना.. तशी तळमळ देवा करीता वाटली पाहीजे... पाण्या बाहेर काढलेला मासा जसा तडफडतोना.. तशी तडफड परमेश्वराकरीता झाली पाहीजे. अनेक श्रीसंताचे चरीत्र काळजीपुर्वक वाचले की हे कळते... आपण फक्त.. शेवट बघतो.. आणि आपण तसेच आहोत असे अगोदरच ठरवून टाकतो... खरे तर आपली अजून सुरुवातच झालेली नसते. साधी गोष्ट आहे .. आपण अजूनही जन्म.. मरण चक्रात आहोत.. याचाच अर्थ .... आपण अजूनही पात्र नाही आहोत...! म्हणूनच श्रीसंत कबीरमहाराज म्हणतात...

बुरा ढुंढने मै चला,बुरा न मिलीया कोई।
अपने अंदर झांकता,मुझसे बुरा न कोई॥

असो....!

आता आपल्याला अशी 'साधना' पाहीजे आहे की जी आपलेच अंतःकरण साफ करेल! Happy म्हणजे 'बोध' झाला.. आता 'योग' पाहीजे... 'काय करायचे' आहे कळाले... 'कसे करायचे' हा प्रश्न शिल्लक आहे. Happy

धन्यवाद!

सावट, माझी एक शंका. Happy कोणाही साधक वा उपासकाने, स्वतःचा मार्ग वा मान्यता वगळता इतर साधकांचा मार्ग चुकीचा आहे, बरोबर नाही वा अशा मान्यता वा मार्ग दुय्यम प्रतीचे आहेत, त्याला स्वतःला -साधकाला - सोडून, इतर लोकांना काही समजत नाही, अशी टीका करणे अद्ध्यात्मामध्ये चालते का? अशी मुभा आहे का? Happy

सावट, ___/\____ Happy

तुम्ही खरचं ग्रेट आहात. खुपच छान सांगितले आता जो प्रश्न शिल्लक आहे त्याचे पण उत्तर द्या. Happy

अजुन एक प्रश्न मनुष्य त्याच्या कर्मामुळे प्राणी किंवा पशुच्या योनीत जातो. तसं झाडाच्या नाही का जात?
तसं पाहिलं तर झाड सजीव आहेत म्हणजे त्यांना ही हवा,पाणी आणि अन्नाचे गरज असते. दुसर्‍या बाजुने पाहिले ही निर्जिव कारण ते एकाच ठिकाणी असतात. मग फक्त मनुष्य्,प्राणी, पशु, पक्षी ह्यांनाच कर्मानुसार जन्म प्राप्त होतो का? कि झाडांना सुध्दा?

जर आंब्याची कोय लावली तर आंब्याच झाड येणार. मग मनुष्याचा आत्मा मनुष्यातच का नाही जाणार ?
कर्मामुळे त्याला तसं जीवन ही प्राप्त होउ शकेल ना? म्हणजे ह्या जन्मी खुप वाईट कर्म केलेत मग त्याच्या कर्मानुसार त्याला पुढचा जन्म रोग्याचा किंवा दारिद्र्याचा असं नाही का होत?

"प्रकाशाच्या वाटेवर"हे सौ मंजिरी जोशी अनुवादित पुस्तक वाचन सुरु आहे. हे पुस्तक वाचत असताना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळली किंवा उत्तरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे असे माझे मत आहे.

या पुस्तकाचा इंटरनेटवरचा परिचय खालिल प्रमाणे.

श्री योगानंदांच्या "ऑटोबायोग्रफी ऑफ ए योगी" पुस्तकानंतरचे या विषयावरचे पहिलेच महत्वाचे पुस्तक. या पुस्तकात स्वामी कृष्णानंद स्वत:च्या अध्यात्मिक प्रवासाची माहिती देत आहेत. त्यांचे गुरु महर्षी अमर यांनी आपले सर्व जीवन जगाच्या कल्याणासाठी उपयोगी आणले. या कामासाठी त्यांनी योगिक पातळीवर वावरणार्‍या ऋषींची मदत घेतली होती त्याचे सर्व वर्णन या पुस्तकात आहे. या पुस्तकात अध्यात्मिक सत्य, गुरु, आश्रम, संन्यास, वैराग्य, ध्यान, सूक्ष्म जीवाचा अंतरिक्ष प्रवास, समाधी, ऊर्जा, प्रलय इत्यादि आणि अनेक विलक्षण, अज्ञात गोष्टीची माहिती करून दिली आहे. अध्यात्म साधकांनी जरूर वाचण्याजोगे हे पुस्तक आहे.
अनुवादक : मंजिरी जोशी

प्रकाशाच्या वाटेवर मराठी अनुवाद सौ मंजिरी जोशी.
Author: कृष्णानंद
Publisher: प्रसाद प्रकाशन ( मराठी )
Price: $16.23*
Reaches you in 4 to 5 weeks (More options)

* Price is inclusive of "Standard" shipping charges. Additional charges will apply for "Express" shipping.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.

शैलजा,
>>> माझी एक शंका.
शंका उत्तम आहे.. धन्यवाद... आपला जो विषय चालला आहे.. तोच विषय ही शंका अधोरेखित करते... आहे. Happy

कोणाही साधक वा उपासकाने, स्वतःचा मार्ग वा मान्यता वगळता इतर साधकांचा मार्ग चुकीचा आहे, बरोबर नाही वा अशा मान्यता वा मार्ग दुय्यम प्रतीचे आहेत, त्याला स्वतःला -साधकाला - सोडून, इतर लोकांना काही समजत नाही, अशी टीका करणे अद्ध्यात्मामध्ये चालते का? अशी मुभा आहे का?

ज्या उपासकाला 'साधू' भेट झाली आहे.. आणि त्या साधूंनी करूणेने 'साधना' ही दिली आहे... आणि तो उपासक त्याचे पालन ही करतो आहे..त्यालाच शास्त्रात 'साधक' म्हणतात.

'साधू' याचा अर्थच शास्त्रात .. आपल्या अंगी असलेले 'सहा' रिपू.. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर... अर्थात दोष.. म्हणजेच अंतःकरणातील वासना.. पुर्णतः ज्याने धूऊन टाकल्या आहेत.. तो 'साधू'.
जो साधू आहे... अशा साधूने दिलेली साधनाच ही साधकाचे 'षडरिपू' धूऊन टाकू शकते.. अन्य काहीही नाही.. असे शास्त्र सांगते.

'उपासकाला किंवा साधकाला' 'मार्ग' वेगवेगळे दिसतात कारण.. अजून अंतःकरण रिपूग्रस्त असते..तर 'साधूला' सर्व मार्ग एकच आहेत हे स्पष्ट दिसत असते.. तसा त्याला अनुभव आलेला असतो.

'अध्यात्म' याचाच अर्थ आहे... 'आत्मतत्त्व' जाणणे..! ज्याने हे तत्व जाणले तो साधू... ज्याला 'साधू' कडून हे तत्त्व जाणण्यासाठी 'साधना' मिळाली.. तो 'साधक'.. आणि जो 'साधू' भेट व्हावी म्हणून 'उपासना' करतो तो 'उपासक'.

हे एकदा कळाले की आपल्याला ल़क्षात येते...आपला जी 'शंका' आहे .. ती.. वर सांगितल्या प्रमाणे स्थिती-सापेक्ष आहे. म्हणजेच... 'साधू' सोडून राहीलेल्या दोघा जणांना मार्ग.. एक न दिसता.. दोन-दोन.. अनेक दिसत असतात. 'साधक आणि उपासक' यात फरक एवढाच आहे की.. एकाला रिपू धुण्यासाठी 'साबंण'(साधन) मिळालेले असते..तर दुसर्‍याला अजून मिळालेले नसते.. ते मिळावे म्हणून तो प्रयत्न करत असतो.. म्हणजेच आपल्याला 'साबण' पाहीजे हे तर त्याला कळालेले असते.. पण अजून मिळालेले नसते.

धन्यवाद!

नितीनचंद्रजी,

'प्रकाशाच्या वाटेवर' हा अनुवाद छान आहे. मूळ इंग्रजी पुस्तक आहे.. Door - ways to light. बंगलोर पासून साधारणत ४० कि.मी. अंतरावर चिक्कगुबी नावाचे गाव आहे..पुस्तकातले 'तपोनगर' तेथेच आहे.

धन्यवाद!

शैलजा,

>>>मुळात सर्व एकच आहेत, पण अज्ञानामुळेच तर भेद उत्पन्न होतो. माझे - तुझे हे वाद होतात. परमात्मा तरी वेगळा कोठे? तो आपल्यातच आहे ना?
मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में,
न मैं मंदिर न मैं मस्जिद, न काबे कैलाश में।

पण हेच तर समजत नाही. ते समजावे, म्हणून तर ही धडपड.

मुळात सर्व एकच आहेत, पण अज्ञानामुळेच तर भेद उत्पन्न होतो. माझे - तुझे हे वाद होतात.... हे आपण सांगितलेले अगदी बरोबर आहे. माझा मार्ग- तुझा मार्ग असा वाद अज्ञानामुळेच होतो.

मुळात सर्व एकच...असे असताना आजुबाजुला पाहील्यावर तसे दिसत नाही... सर्वात जवळ असलेल्या परमेश्वराचा अनुभव येत नाही. मग आपले काय चुकते... ? याचे कारण 'अज्ञान' हे कळते. हे अज्ञान कोणाला आहे... असे पाहीले की.. ते आपल्याच.. स्वतःलाच असते, हेही आपल्या लक्षात येते. जर या अज्ञानाचे कारण... म्हणजे कारणाचे कारण.. आपण जर स्वतःला सोडून इतरत्र पाहू लागलो.. तर आपली पुर्ण फसगत होते.. आणि आपल्या मनातला गोंधळ अजूनच वाढतो. ( यात चूक, बरोबर असे काही नाही आहे.. हे असेच होते...सर्वाना या परिस्थितीतून जावेच लागते.. यात मुभा नसते.) महत्त्वाचे काय आहे.. 'हे असेच होते' याचे आपल्याला 'ज्ञान' झाले पाहिजे. त्याने काय होते आपले लक्ष आपल्यावरच केंद्रित होते.. आणि मग 'मी' म्हणजे कोण? याचा शोध सुरू होतो... धडपड सुरु होते.

ही 'धडपड' योग्य दिशेने होणे महत्वाचे असते... म्हणूनच.. अज्ञानाचे कारण काय आहे... हे पहाणे जरूरी ठरते.

नित्यशुद्ध-बुद्ध असणारा 'आत्मा' हा स्वतःला शरीर समजून.. माझे शरीर, असे म्हणताना म्हणतो... म्हणजेच 'मी' वेगळा आणि 'शरीर' वेगळे असे म्हणतो.. पण शरीराला काही लागले तर मात्र.. 'शरीराला लागले'.. असे न म्हणता ..'मलाच लागले' असे म्हणतो. म्हणजेच म्हणताना म्हणतो एक .. पण वागताना विरुद्ध वागतो... हेच ते 'अज्ञान'... !

हा आत्मा.. स्वतःला शरीरसमजून प्रत्यक्षात..व्यवहारात का कार्य करतो हे जर आपल्या लक्षात आले तर्..अज्ञानाचे 'कारण' ही आपल्याला समजू शकते... आणि एकदा का हे 'कारण' कळाले.. आणि आपली धडपड या कारणाच्या विरुद्ध सुरु झाली की.. ते 'कारण', त्याच्या 'अज्ञान' या 'कार्या'सहित जावू शकते.

धन्यवाद!

सांगताना 'अज्ञानाने' काही चूक झाल्यास... क्षमा असावी.. ही विनम्र विनंती.

माधव,अश्विनी,शैलजा,
एक महत्त्वाचा प्रश्न आहे.. त्याविषयी थोडे पाहुयात...

>>>>>>मुळात सर्व एकच आहेत, पण अज्ञानामुळेच तर भेद उत्पन्न होतो. माझे - तुझे हे वाद होतात. परमात्मा तरी वेगळा कोठे? तो आपल्यातच आहे ना?
मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में,
न मैं मंदिर न मैं मस्जिद, न काबे कैलाश में।
पण हेच तर समजत नाही. ते समजावे, म्हणून तर ही धडपड.

ठळक गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास ...
शैलजा म्हणतात त्या नुसार.. 'परमात्मा वेगळा नाही.. आपल्यातच आहे'...

तर श्रीसंतकबीर म्हणतात... मैं (परमात्मा).. तो तेरे(आपल्या)पास में .. म्हणजेच आपल्या जवळ परमात्मा आहे... आपल्यात नाही...

तर शास्त्र सांगते, 'अहं ब्रह्मास्मी'.. मीच 'ब्रह्म' आहे.. ना जवळ.. ना आत.. मीच परमात्मा आहे.....!

आणि श्रीसंत वचन 'नित्यसत्य' असते मग.. या सर्वांची संगती कशी लावायची? Happy

धन्यवाद!

सावट, थोडं स्पष्ट सांगू का? रागवू नका. जसं भगवंताची हजारो नावे, पण तो एकच. तसंच वरील विधानांचं आहे. सार्‍यांतून एकच अर्थ प्रतीत आहे. सारे काही सुसंगतच आहे. असो.

आपला उगाच शब्दच्छल चालला आहे असं मला वाटत आहे.

अरे व्वा! शैलजा, धन्यवाद!

>>>तसंच वरील विधानांचं आहे. सार्‍यांतून एकच अर्थ प्रतीत आहे. सारे काही सुसंगतच आहे.

जे 'सुसंगत' आहे... ते 'आपल्याला' कळले आहे काय? जर असेल तर तसे कृपया पटवून सांगावे.. म्हणजे आम्हा सगळ्यानाही कळेल ..म्हणजे हा उगाच चाललेला शब्द-खेळ.. शब्दच्छल आपोआप थांबेल.. दुसरे काही करायची गरज नाही. Happy

>>>आपला उगाच शब्दच्छल चालला आहे असं मला वाटत आहे.

'मला किंवा आपल्याला वाटते आहे म्हणून नाही', तर कृपया शास्त्राधारे पटवून सांगावे.. म्हणजे रागवायचा प्रश्नच येणार नाही.

आणि तुम्हीही कृपया रागवू नये.

धन्यवाद!

Happy

नाही सावट, मी रागावलेले नाही. Happy मला शास्त्र वगैरे समजत नाही. मला जसे जमते तसे मी भक्ती करते. मनापासून करते - अथवा असे निदान मला वाटते तरी. Happy कधी कधी जे काही चालले आहे ते ठीकच अहे असे वाटायला लावणारे अनुभव येतात, म्हणून हुरुप येत राहतो. थोडेफार वाचन करते. माझ्या मनात प्रश्न उपस्थित होतात. यथावकाश वाचतानाच, किंवा मनन, चिंतन करतानाच त्याची उत्तरेही उलगडतात, किंवा भगवंत कृपावंत होऊन ती उलगडतो, असे म्हणू हवे तर. निदान माझी अशी श्रद्धा आहे. Happy तीच मला पुढे पुढे नेते. कधी ना कधी "सुसंगत" कसे सुसंगत आहे, हेही मला उलगडेल.

अद्ध्यात्मामध्ये प्रश्न विचारणे चूक आहे का? तर माझ्या मते नाही. पण आपण वर जी आव्हानाची भाषा केली आहेत ना, ती योग्य आहे का? सूक्ष्म रुपातला का होईना, अहंकार प्रगतीला मारक ठरेल ना? सात्विकतेचा अहंकारही योग्य नव्हे. हो ना? Happy

आपल्याला माझे इथे लिहिणे आवडत नसेल, तर मी केवळ वाचनमात्र भूमिकेत राहीन. राग नसावा. Happy

आपले मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व. Happy

आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच येत्या शनिवारी, एका उपासनेच्या ठिकाणी जाण्याचा ध्यानी मनी नसताना संकेत आला आहे. Happy खूप छान वाटते आहे!! खूपच छान. Happy

शैलजा,
अरे बापरे.. 'मी' ही रागावलो नाही.

>>>अद्ध्यात्मामध्ये प्रश्न विचारणे चूक आहे का? तर माझ्या मते नाही. पण आपण वर जी आव्हानाची भाषा केली आहेत ना, ती योग्य आहे का?

प्रश्न विचारणे अजिवात चूक नाही... आपल्या किंवा माझ्या मते नाही.. तर शास्त्राच्या मते. म्हणूनच सर्व उपनिषदे... श्रीमद्भगवत.. श्रीगीता... श्री दासबोध वैगरे सगळे ग्रंथ प्रश्न - उत्तराच्या पद्धतीनेच विस्तारले आहेत. जर मनात जिज्ञासाच उत्पन्न झाली नाही.. तर 'प्रश्न' कसे येणार? त्याकरीताच हा प्रयत्न होता.
आव्हानाची भाषा नाही करत हो.. तुम्ही जे सांगत आहात त्याच्याच आधारे काही प्रश्न विचारत आहे..

>>> सूक्ष्म रुपातला का होईना, अहंकार प्रगतीला मारक ठरेल ना? सात्विकतेचा अहंकारही योग्य नव्हे. हो ना?

आता तुम्हीच सांगितले की अहंकार सूक्ष्म रूपात असतो म्हणून.. मग मनात येणे साहजिकच आहे की, 'स्थूल आणि सूक्ष्म' रुपातल्या अहंकारात काय फरक आहे? प्रगती म्हणजे काय? अहंकाराचा आणि प्रगतीचा संबंध काय? सात्विक-राजस-तामस.. अहंकारात फरक काय?

आपण आताच वर पाहीले.. अद्ध्यात्मामध्ये प्रश्न विचारणे चूक नाही आहे.. मग आताच हा सात्विक अहंकार कुठुन आला..?

धन्यवाद!

थोडेफार उत्तर द्यायचा ढोबळ स्वरुपात प्रयत्न करते. जसे येते तसे आणि पुन्हा लिहिण्याचा कंटाळा, अजून काय.. Happy

स्थूल अहंकार तर सार्‍या जगावर आज विद्यमान स्वरुपात आहे. भांडणे, बेबनाव, झगडे व्यक्त्तींमध्ये, कुटुंबांमध्ये, प्रांतांत, देशात, देशांमध्ये वगैरे जे काही सुरु आहे, हे त्याचमुळे तर आहे. स्वतःचा स्वतःशी झगडा होण्याचे कारणही तेच तर आहे, अहंकार. अरे का कारे, हे त्याचे ढोबळ रुप. 'मी' सांगितलेले 'त्यांना' पटत नाही, म्हंजे काय? Happy 'माझे' ऐकत नाहीत म्हणजे काय? वगैरे वगैरे. त्य अनुषंगाने रागाच्या भरात होणारे उद्रेक वगैरे.

सूक्ष्म अहंकाराचे उदाहरण, व्यक्ती बाह्यकरणी शांत वाटली वा इतरांशी हसून खेळून बोलत असली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तरी मनातल्या मनात मानेल की 'मला' समजले आहे, इतरांना नाही. किंवा 'मी' सगळ्यावर विजय मिळवला आहे, जसे ठाकूरांना वाटले होते की त्यांनी कामवासना जिंकली. पटकन आठवले म्हणून केवळ हे उदाहरण दिले आहे Happy

>>आपल्या किंवा माझ्या मते नाही.. तर शास्त्राच्या मते >> असे शास्त्रात कोठे सांगितले आहे? मला समजले नाही. क्रुपया उलगडाल का :)सांगितले आहे असे धरुन चालते, तर मग माणसासाठी शास्त्र की शास्त्रासाठी माणूस? ज्ञानेश्वरी का लिहिली गेली? Happy

शैलजा,
व्वा, धन्यवाद.. छान सांगितले आहे.

आता पुढच्याही प्रश्नाचे उत्तर कृपया द्यावे...

प्रश्न...प्रगती म्हणजे काय? अहंकाराचा आणि प्रगतीचा संबंध काय? सात्विक-राजस-तामस.. अहंकारात फरक काय?

>>आपल्या किंवा माझ्या मते नाही.. तर शास्त्राच्या मते >> असे शास्त्रात कोठे सांगितले आहे? मला समजले नाही. क्रुपया उलगडाल का :)सांगितले आहे असे धरुन चालते, तर मग माणसासाठी शास्त्र की शास्त्रासाठी माणूस? ज्ञानेश्वरी का लिहिली गेली?

शास्त्रात... आर्त, अर्थार्ती, जिज्ञासू, मुमुक्षू आणि ज्ञानी असे भक्तांचे प्रकार सांगितले आहेत. त्यातला जिज्ञासू म्हणजे .. परमेश्वराविषयी प्रश्न विचारणारा.. म्हणूनच सर्व शास्त्रे ही जिज्ञासूच्या जिज्ञासेतूनच निर्माण झाली. म्हणूनच जिज्ञासू माणसासाठीच शास्त्र आहे. श्री भगवंतानी सांगितल्यानुसार 'ज्ञान आणि प्रेम' यांनी युक्त असणारा भक्तच त्यांना सर्वात जास्त आवडतो.... हे कळण्यासाठीच श्रीमाऊलींनी.. श्रीज्ञानेश्वरी लिहीली.

धन्यवाद!

Pages