मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहेस. सिल्वर बद्दल काहि आयदिया असेल तर प्लिज लिहित जा. आनि हो तेक्निकल बद्दल महिति दिलि त र बरे होइल. बसिक माहितिये ....

उजव्या कोपर्‍यात मोठ्या निळ्या अक्षरात गुंतवणूक शब्द आहे, त्याला क्लिक करा. त्यात शोधा.

सर्विस टॅक्स २ टक्के वाढणार.

जी एम आर इन्फ्रा बद्दल लॉन्ग टर्म ( किमान दोन वर्ष ) काय मत आहे? मी ४३.४० ला घेतलेत सध्या २९-३० सुरु आहे, अजून घेउन अ‍ॅवरेज करावेत का?

जी एम आर इन्फ्रा बद्दल लॉन्ग टर्म ( किमान दोन वर्ष ) काय मत आहे? मी ४३.४० ला घेतलेत सध्या २९-३० सुरु आहे, अजून घेउन अ‍ॅवरेज करावेत का?>>>>

चार्ट वरुन हा बेअरीश आहे. ३३ व ३९ पार केले तर मग वरची टारगेट दाखवेल. निफ्टीने ५६२९ दाखवला तेंव्हा ह्याने
३३.५ दाखवला होता. १४/३ चा हाय ३४.५

ह्याने गेल्या ५ वर्षात डिव्हिडंड दिलेला नाही. गेले २ ते ३ quarter काही तरी प्रॉब्लेम आहे.

जर रोजचे बघणे नसेल तर इन्फ्रा स्टॉक पासून शक्यतो लांब रहावे असे तज्ञ सांगतात.

केदार,
शेअर्स बद्दल माझे काही प्रश्न.
१) पुढिल वर्ष भरात गुन्तवणुकीसाठी कुठले सेक्टर्स चान्गले राहतिल?
२) बलरामपुर चीनी सध्याच्या किमतीला कसा राहिल?
३) माझे खालील स्टॉक्स बर्‍याच महिण्या पासुन लॉस मध्ये आहेत.
स्टर्लाइट(खरेदी १३६,१०० शेअर्स), युनिटेक(खरेदी ८८,५० शेअर्स), NHPC(खरेदी ३६,३५० शेअर्स)
पुढिल सहा महिण्यात वा़ढीची काही शक्यता राहील का?

धन्यवाद
क्षितिज

स्टरलाइट आणि NHPC ठेवुन द्या, NHPC चे dividend returns चांगले आहेत. Sterlite नक्की च वाढेल.
Unitech बद्दल काही सांगता येत नाही. जर बांधकाम क्षेत्रातच राहयचे असेल तर Unitech विकुन HDIL घ्या.

NHPC चे share capital 12300 cr. आहे. तेंव्हा बोनसची शक्यता कमी वाटते. गेल्या वर्षि त्याने ७% डिव्हिडंड दिला आहे. त्या आधी ६%. Div yield 3.01% आहे. ५२विक हाय २३.८. सध्या २३.२५. टेक्निकलि २६ च्या आसपास स्ट्राँग रेझिस्टंट आहे. तो पार केल्यावर वरचा प्रवास सुरु होइल.

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद, प्रसाद१९७३ ,सुरेश१ .
मार्केटचा अपट्रेन्ड बघुन सध्या काही विकायचा निर्णय लांबणीवर टाकलाय.

. . .

सई१
>>>> तुमचे काय मत आहे सुन्दरम फास्टनर बद्द्ल ?
घेण्यामागचा उद्देश कळला असता तर बरे झाले असते. म्हणजे ट्रेडींग, इनव्हेसटमेंट वगैरे.
योगी ने सांगितले आहेच. मी थोडे add करतो. सध्यातरी चार्ट बेअरिश आहे. ५० च्यावर जायला त्याला मेहनत करावी लागणार आहे. ५२ विकचा लो ४२ आहे. तेथे रेंगाळून बॉटम आउट झाला तरच विचार करावा.

सई१: Sorry, earlier I posted wrong chart, this is the right one here. As Suresh suggested, for now the stock is in bearish mode and could find support near 42-43 area.

Time to learn from your mistakes, now that you have already invested may be wait for stock to find support and bounce back, have a STOP LIMIT LOSS at 38-39.

>>> सई
>>>मी investment साठी ५२ ने घेतला होता , पण आता काय करावे ते कळ्त नाहिये. १ वीक झाला. काय करावे?
हातात शेअर असताना कुठल्याही लेव्हलला जरी तो घेतला असला तरी पैसे कमावणे शक्य असते. उदाहणार्थ: सुन्दरम फास्टनर्स बंद भाव ४४.९०. हा पुढच्याविकला कदाचीत ४६.७ ते ४७ दाखवेल.
हे परत निफ्टीवर अवलंबुन. त्याच्या वर ५० पर्यंत बरेच रेझिस्टंट आहेत. तेंव्हा ह्या लेव्हलसना विकणे व बेअरीश असल्याने परत खालच्या लेव्हल्स ला विकत घेणे. मार्केट अशा संध्या शेअर सतत पडत असताना वेळोवेळी देते.
हा माझा सल्ला नाही. हे मी फक्त example घेतले आहे. ह्यासाठी चार्टचे knowledge असणे आवश्यक आहे.
हा शेअर तू इनव्हेस्टमेंट साठी घेतला आहेस व त्या बाबत योगी ने लिहीलेच आहे. कंपनी चांगली आहे. खूप mutual funds कडे ह्याचे शेअर आहेत.

श्यामरावः नक्की काय माहीती हवी आहे? खाली Gold ETFs ची list देत आहे....

BSLGOLDETF
GOLDBEES
GOLDSHARE
QGOLDHALF
HDFCMFGETF
AXISGOLD
RELGOLD
RELIGAREGO
IDBIGOLD
KOTAKGOLD
IPGETF
SBIGETS
MGOLD
CRMFGETF

सचिन
>>यूबी होल्डिंग शेयर सध्या घ्यावा का.
स्टॉक लाँग टर्म बेअरिश आहे. क्लोझ ५४.१५. परंतु शॉर्टटर्म बुलिश झाला आहे.
पुल ब्याक आला तर वेगवेगळ्या रेझीस्टंटस लेव्हल्स दाखवतो. त्या ६३, ६६, ७४ व ७९ आहेत. बेअरीश स्टॉक ह्या दाखवेल हे नक्की सांगणे कठीण असते. ४२.४० ५२ विक लो आहे. काही कारणाने घेतला तर स्टॉप लॉस लावणे चांगले.

Pages