मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्ट्र डे साठी Brokerage,Service
Tax,Transaction & SEBI
Turnover Charges,Stamp Duty,STT
कसे calculte करायचे???
आणि या खेरीज अजुन कही चार्जेस आहेत का???

ब्रोकरेज प्रत्येक ब्रोकर वेगवेगळे चार्ज करतो. बाकी चार्जेसची माहिती SEBI किंवा BSE/NSE च्या वेबसाईटवर असेल.

AXIS bank - long term ? नक्किच चांगला आहे.
शॉर्ट टर्म १०००/१०५० चे टार्गेट ९१० चा स्टॉप लॉस. हे कालच्या डे एन्ड चार्ट वरुन , आजचा भाव ९३३.
मी लाँग टर्म साठी इन्व्हेस्टेड आहे.
axis.JPG

पहिले टार्गेट १४०० आणि दुसरे १५५० च्या आसपास. शिखा शर्मांचा इन्श्युरन्स बॅगराऊन्ड बघता इन्शुरन्स ब्रोकिंग आर्म आणि बाकिचे इनिशिएटिव्ह या लेव्हल्स दाखवतील असे वाटते. स्तॉप लॉस असा नाहि लावला पण ८५० लेव्हल ला लाच तर अ‍ॅव्हरेज करेन

पाटिलः धन्यवाद, मुद्दाम इतके प्रश्न विचारले. प्रत्येकाने असेच detail मधे त्याच्या stock pick बद्दल लिहिले तर बाकिच्यांना समझण्यास सोप्पे जाईल...

आज शक्यतो गुंतवणूक टाळा. इन्फोसिसचे निकाल जाहीर झालेत आणि तो शेअर जवळपास ८ टक्क्यांनी पडलेला आहे आणि आपल्याबरोबर बर्‍याच जणांना त्या शेअरने झोपवले आहे. या महिन्यात बर्‍याच कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. तेव्हा आज आणि पुढील काही दिवस जरा सावध रहा.

दोन्हीपासून सावध रहा. मार्केटची दिशा कळेपर्यंत (आपटणार की चढणार) हे काही दिवसातच स्पष्ट होईल. तो पर्यंत थांबा.

मर्गिन मधले बाय केल्यावर EOD ला सेल नाही केले तर काय होते??<<
EOD ला ३.१५ ते ३.२५ दरम्यान पोझीशन सिस्टिम द्वारे स्क्वेअर ऑफ केली जाते.

इन्ट्रा डे मधे मी आत्ता कमिन्स ३९९.४० ला सेल केलाय
टार्गेट ३९४
स्टॉप लॉस - ४०२
आज मार्केट चा काय मुव्ह राहील ??

>>> आज मार्केट चा काय मुव्ह राहील ??

प्रॉफिट बुकिंग मुळे आज मार्केट थोडे खाली जाण्याची शक्यता आहे. ट्रेडिंगच्या शेवटच्या एक किंवा अर्ध्या तासात परत थोडेसे वर जाऊ शकते.

ट्रेडिंगच्या शेवटच्या एक किंवा अर्ध्या तासात परत थोडेसे वर जाऊ शकते.<< धन्यवाद मास्तुरे

कमिन्स ३९०.५५ ला स्क्वेअर ऑफ केला पण त्यानंतर तो लगेचच ३८६ पर्यंत खाली उतरला

इथून पुढे मार्केट कुठे जाईल?खाली गेले तर शॉर्ट करण्यासाठी कुठल्या आईडिया असतील.किंवा वर गेले तर कुठल्या.बजट जवळ येत आहे बजटला अनुसरून कुठल्या स्क्रिप्ट चांगल्या वाटतात. रेलवे बजट पण जवळ येत आहे.कालिंदी रेल,टीटागढ़ वँगन,कर्नेक्स मायक्रो कसे वाटतात ?

untitled.JPG

Nifty weekly Charts मधे EMA (4,12) ( मी ४ वीक म्हणजे एक महिना आणि १२ विक म्हणजे येक बिझनेस क्वार्टर या हिशेबाने EMA साठी ४, १२ निवडलाय) अप मुव्ह कन्टीन्यु राहिल असे दाखवतेय, RSI , MACD सुद्धा तेच कन्फर्म करतेय.
शुक्रवारी निफ्टीने २०० डे SMA ला स्पर्श केलाय , तो ओलांडला तर ब्रेकाऔट सिग्नल मिळेल.
मागची काही वर्‍श पाहिली तर फेब- मार्च दरम्यान मार्केट वर गेलय त्यामुळे अप मुव्ह काय्म राहील अशी आशा करयला हरकत नाही.

Pages