मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो... डिलिवरीला बर्‍याचदा मॅन्युअल स्टॉप्लॉस लावतात... म्हणजे समजा ४०० चा ३९० च्या खाली चालला की त्यानंतर मग सेल करुन विकायचे. आधीपासून स्टॉप्लॉस ऑर्डर टाकत नाहीत.. पण प्रत्येक ट्रेडला स्टॉप्लॉस ठरवणे चांगले.

म्हण्जे डिलिवरी असेल किंवा इंट्रा असेल, तर काहीही खरेदी केले की स्टोप्लॉस ठरवा... उदा. ८०० रु ला काही घेतले. आणि समजा वाढले नाही की साधारण ७८० चा स्टॉप्लॉस ठेवावा.. आणि त्याच्या खाली चालले की विकून लॉस बुक करुन ट्रेड संपवून मोकळे व्हावे.

हो.

ICICIDIRECT ???मधे???

afterlogin वरुन कुठे जायचे???

पुढे?

Equity -for intra day
कसे करता ?
intra day
म्हणजे BTST तर नाहीना?

margin buy or margin sell म्हणजे इन्ट्रा डे
BTST शेअर डिलिव्हरी मधे विकत घेतल्या नंतर हा पर्याय दोन दिवस उपलब्ध होतो.

icici चे ब्रोकरेज बरेच जास्त आहेत, काही वेळा १ % सुद्धा चार्ज करतात
तुम्ही किती Quantity घेता आणि त्या संपुर्ण व्यवहाराची ( (१८.८ x qty) खरेदी + (20 x qty ) विक्री ) वर brokerage आकारले जाते.

broker / client -

broker ओप्शन मधे तुमच्या वतीने icici ३.०५ वाजल्या नंतर तुमचे शेअर विक्रीस काढते तर ब्रोकर ओप्शन मधे तुम्ही ते शेअर ३.२०-३.२५ पर्यंत hold करू शकता पण तरीही तुम्ही तुमची पोझीशन क्लिअर केली नाही तर icici ते शेअर त्या वेळेच्या बाजारभावाला विकते.

आज पंढरपूरची बातमी आहे. शेअर घेतो म्हणून लोकांकडून ३ कोटी जमा केले आणि त्याना काहीच दिले नाही.. काही आरोपी सापडले, काही फरार झाले. सावध रहा.

स्केअर ऑफ करणे म्हणजे आपली पोझिशन क्लिअर करणे. म्हणजे बाय केले असल्यास इथून आता तुम्हाला सेल करता येईल. सेल केले असल्यास बाय करता येईल

अ‍ॅड मार्जिन ... समजा तुम्ही ४०० ला खरेदी केली आहे. त्याच्यासाठी काही मार्जिन ब्लॉक असते. पण समजा किंमत खाली गेली तर आणखी मार्जिन अ‍ॅड करावए लागते. ( हे इंट्रा डे मार्जिन साठी)

समजा तुम्ही मार्जिन वर काही घेतले. आणि विकण्याऐवजी ठरवले की आता सगळे पैसे भरुन त्याची डिलिवरी घ्यावी, तर सी टी डी. म्हणजे कंटीन्यु टु डिलिवरी.

धन्स

जागोमो-CTD -Convert to Delivery.
प्रितीभुषण - http://www.icicidirect.com/indexfaq.asp इथे बघा किंवा त्यांच्या Online Tutorials बघा. शक्य असेल तर तुमच्या रेलेशन्शिप मॅनेजर ला भेटा आणि शंकांचे निरसन करुन घ्या.

>>> मला ओर्डर बुक मधे ७७.६ दिस्तै आणी ट्रेड बुक मधे ७७.५५

ट्रेड बुक मध्ये ज्या किंमतीने व्यवहार झाला आहे तोच खरा. खरेदीची ऑर्डर ७७.६० ने दिली असली तरी ती कोणीतरी ७७.५५ ने विकत घेतली आहे असा याचा अर्थ.

तुमच्या माहितीसाठी. तुम्ही किती शेअर्सची (विक्रीची किंवा खरेदीची) व किती किंमतीने ऑर्डर दिली आहे हे इतरांना दिसू शकत नाही. तुम्ही खरेदीची दिलेली आपली किंमत म्हणजे ती किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला शेअर खरेदी करण्याची तुमची तयारी आहे. त्यामुळे तुम्ही दिलेल्या किंमतीला किंवा त्या किंमतीच्या थोडे कमी कोणी शेअर्स विकायला तयार असतील तर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होते.

समजा तुम्हाला १०० शेअर्स रू. ७७.६० प्रति शेअर या भावाने खरेदी करायचे आहेत. शेअर विक्रेत्यांना तुमची ऑर्डर दिसत नाही. पण त्यापैकी कोणाला ७७.७० या भावाने १०० शेअर्स विकायचे असतील, दुसर्‍याला ७७.५५ या भावाने व तिसर्‍याला ७७.५० या भावाने विकायचे असतील, तर तुमच्या खरेदी भावाएवढी किंवा तो भाव नसेल तर तुमच्या अपेक्षित भावापेक्षा कमी पण त्या भावाला सर्वात जवळ असणारी किंमत तुम्हाला मिळते. म्हणून वरील उदाहरणात तुमचा अपेक्षित भाव ७७.६० असून सुद्धा तुम्हाला ७७.५५ ने शेअर्स मिळाले.

शेअर्स विकताना याच्या बरोबर उलटे होते.

Pages