मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेस च्या कोर बॉन्ड ,OBOCX ह्या म्युचुअल फंड बद्दल जाणकारांचे काय मत आहे?ह्यात केलेली गुंतवणूक सध्या ठेवावी की काढून टाकावी?ह्याचा दर कमी होईल असे सांगण्यात आले आहे...
धन्यवाद!

.

अरेच्चा !! आता तर खर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची वेळ , अन तुम्हाला अकाउंट बंद करावस वाटतय ?

icici direct मधुन शेअरस motilal मधे कसे ट्रान्सफर करायचे?

ONLINE IDEA NAAHI . TUMHI DEMAT AC.OPEN KELYAVAR JE KIT AALE HOTE ICICI CHE TYAT
DEMAT SHARE TRANSFER CHE SLEEP ASEL. TI BHARUN MOTILAL OSWAL CHYA TUMCHYA DEMAT AC. MADHE TRF . KARU SHAKTA.

केदार: wockhardth pharma चा पुढील प्रवासाचा काही अंदाज सांगू शकाल का. USFDA चा बेन उठण्याची शक्यता असू शकते का?

मंकी पोर्ट्फोलीओचे दिवस परत आलेत. मी अ‍ॅव्हरेज्/अ‍ॅक्युम्युलेट केलेले शेअर्स आता अगदी १००% + रीटर्न दाखवतायेत . प्रॉफीत बुकिंग सुरु केलेय आणि सध्या काहीही विकत घेत नाही. बजेट पर्यंत अंदाज घेऊन बजेट्च्या आधी शॉर्ट टर्म साठी खरेदी करेन.तुमची स्ट्रॅटेजी काय?

Untitled.jpg

सेम पिंच... मी गेल्या ३ वर्षात काहिच विकले नाहोत. अजुनही विकायची इछा नाही. IDFC, Maruti, L&T, BHEL, RIL, IDBI, SAIL etc. मारुती वगैरे १००० च्या आसपास घेतले होते. यात ट्रेड करायची इच्छाच गेलीय. घ्या आणि विसरुन जा , हेच बेस्ट वाटतेय. जेंव्हा दुसर्‍या कामासाठी पैसे लागतील त्यावेळी विकावे असा प्लॅन आहे. Happy

कारण वेळ. या ३ वर्षात फक्त लॉगिन करुन बॅल्न्स चेक करण्यपुरता वेळ जातो. त्या अगोदर तास् न तास / दिवसेंनदिवस वेळ ट्रेडिंग , अ‍ॅनॅलिसिस, चर्चा यात जायचा. इतका वेळ जातो हे पाहुन, आपण पैसे मिळवण्यासाठी आपल्याकडे असलेल्या स्किलचाच वापर करुन आपल्या क्षेत्रातच मस्त काम करावे आणि या पोर्टफोलिओ कडे लॉग टर्म (५ वर्षे, १० वर्षे, १५ वर्षे) सेविंग म्हणुनच बघावे असा विचार केला. आणि विशेष म्हणजे इट वर्क्स... या तीन वर्षात पोर्टफोलिओत वार्षिक २५ % ग्रोथ झालिय.

श्रीकांत - मार्केट अजून वर जाण्याचे चान्सेस वाटत आहेत का? तसे असेल तर इन्वेस्ट करायला मजा आहे नाहीतर झालेला प्रॉफिट काढून घेण्यास योग्य वेळ. मग मार्केट पुन्हा उतरलं की पुन्हा इन्व्हेस्ट करायला हरकत नाही.
(मी लो रिस्कवर डिल करते म्हणून.)

मीपण रिस्क घेतली होती साधारण ६ लाख १० मेला मिडकॅप आणि लार्ज कॅप स्क्रीप्टसमध्ये गुंतविलेले होते.. परतावा सरासरी ४०% मिळाला...

अब अछ्छे दिन "आ" आगे है... का.... "आ कर" गए है... ते पुढच्या ६-१८ महिन्यात कळेलच....

२००३/२००४-२००७: Nifty moved from 2000 to 6000 (growth of 200%) & everybody made money irrespective of where you put your money

Can we see same repeated for 2014-2017!!! a growth of 200%!!! and if you invest wisely with good risk/reward structure along with good entry/exit strategy then you can make good financially fortune and possibly even achieve financial freedom... Isn't it!

मे महिन्यात मोदी सरकार निवडून आल्यायानंतर शेअर बाजार चांगलाच वर गेला आहे. सेन्सेक्स २२३७५ वरून आज २७२२५ पर्यंत पोचला आहे. पण या धाग्यावर फारशी हलचल दिसत नाही. अजून ही वेळ गेलेली नाहीये. चांगल्या संधी खुणावत आहेत. गुंतवणूकीसाठी थोडा अभ्यास करून चांगले शेअर्स शोधून काढूया व एकमेकांना सांगूया. ( गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय अर्थात आपला आपणच घ्यावा लागणार )

मी सुरुवात करतो रिलायन्स ने. जून२०१४ पासून निफ्टी जवळ्जवळ ९% वाढला आहे.तर रिलायन्स चा शेअर जुलै मधे -१२% पर्यंत खाली जाउन आता -६.५% इतका रिकव्हर झाला आहे. रिलायन्स चा भाव न वाढण्याच मुख्य कारण नैसर्गिक वायू च्या किमतीचे धोरण अजून निश्चित न होण हे कळायला फार तज्ञ असण्याची गरज नाही. नुकतच जामनगरच्या प्रकल्पाचा विस्तार करण्याची घोषणा मुकेश अंबानी नी केली आहे ज्यांना दीर्घ मुदतीची गुंतवणूक करायची आहे त्यांनी १००० रू. च्या आसपास रिलायन्स चे शेअर घ्यायला हरकत नाही अस मला वाटत. आणखी खाली घेता आलातर फारच चांगल. खालच्या बातमीत शेवटचे तीन परिच्छेद जरूर वाचा. http://www.telegraphindia.com/1140901/jsp/business/story_18786367.jsp#.V...

मला वाटत आयपीओ वर ही चर्चे laa हरकत नसावी. जेव्हा शेअर बाजार वर जातो तेव्हा नवीन आयपीओ च जणू पीकच येउ लागत. अनेक नवख्या लोकांचे नुकसान होत. अशावेळी चांगले कोणते व कोणापासून दूर रहाव याची चर्चा झाली तर चांगलच की.

प्रितीभुषण, जर तुम्हाला आय. पी. ओ. मधुन शेयर अ‍ॅलोकेट झाला असेल तर तो लिस्टींगच्या दिवशीच तुमच्या डीमॅट अकांउटमध्ये दिसायला हवा अन्यथा लिस्टींगच्या दिवशी त्याचे खरेदी-विक्री व्यवहार कसे होतील?

3 mahinya purvi coal india ghetale hote @Rs.393 aani aata to ghasarala aahe Rs.343 la. Hold karava ki vikava?

vikava

Thanks.. Pritibhushan,

Mi maayboli var navin aahe. android mobile varun devanagari made lase lihitat koni Saangal ka?

कधी आयपीओसाठी ऑनलाइन अ‍ॅप्लाय केलेले नाही. पण माझ्याकडे जिचे शेअर्स होते अशा एका कंपनीने बोनस शेअर्स अलॉट केले होते. ते एक्स-बोनस प्राइसच्याच काय त्यानंतर २-३ दिवस तरी माझ्या डिमॅट अकाउंटला जमा झाले नव्हते.

बाय द वे रिलायन्स २०० डीएमएच्या खाली गेलाय.

Pages