सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
ही काय भानगड आहे..?
ही काय भानगड आहे..? http://www.t3bindia.com/
इनट्रा डे साठी ब्रोकरेज कसे
इनट्रा डे साठी ब्रोकरेज कसे calculate करावे ?
ब्रोकरच्या रेटवर अवलंबून
ब्रोकरच्या रेटवर अवलंबून आहे.. तुमचा ब्रोकर आणि त्याचा रेट काय आहे?
इंट्रा डे वर टॅक्स आणि एस टी टी सुद्धा असतो.. हाच ब्रोकरेजपेक्षा जास्त होतो.
मी मागच्या आठवड्यात १ LnT
मी मागच्या आठवड्यात १ LnT घेतलाय तो मला [१२७६.१५+३७brkrg]=१३११ मधे पडलाय
आता हा 1316.05 आहे तर तो आता विकणे योग्य आहे का [नफ्या साठी] की अजुन वाट पाहवी
माझ्या मते जर हा १३५०ला मी विकला तरच मला अगदी कमी म्हणजे ५ - १० रु नफा मिळेल ,
>>> १२७६.१५+३७brkrg १२७६ वर
>>> १२७६.१५+३७brkrg
१२७६ वर ३७ रूपये ब्रोकरेज म्हणजे किंमतीच्या जवळपास ३ टक्के ब्रोकरेज होते. या हिशेबाने तुम्हाला हा शेअर १३५० विकला तर अंदाजे ३ टक्के ब्रोकरेज म्हणजे ३९ रूपये ब्रोकरेज जाऊन अंदाजे १३१० रूपये हातात पडतील. त्यामुळे नफ्यासाठी हा शेअर किमान १३५१ ला विकावा.
फक्त १ शेअर घेऊन तुम्हाला काय मिळणार? किमान ५०-६० हजार गुंतवले तर ४-५ हजार नफा होऊ शकतो.
ब्रोकरेज चा ३ टक्के हा दर खूप जास्त आहे. बहुतेक ब्रोकर ०.४० टक्के ते १ टक्का इतके ब्रोकरेज आकारतात. ब्रोकरेज या टक्केवारीनुसार २५ रू. पेक्षा कमी असेल (म्हणजे तुमचा व्यवहार अंदाजे ५००० रूपयांच्या आतला असेल) तर टक्केवारीनुसार ब्रोकरेज न आकारता फ्लॅट २५ रूपये ब्रोकरेज आकारले जाते.
त्यामुळे योग्य तो ब्रोकर निवडावा.
एल अॅण्ड टी चा शेअर १४०० च्या पुढे नक्की जाईल. त्यामुळे घाई करू नये. शक्य असल्यास १३०० चा आसपास अजून शेअर्स घेऊन ठेवावेत.
३७ रूपये ब्रोकरेज म्हणजे
३७ रूपये ब्रोकरेज म्हणजे किंमतीच्या जवळपास ३ टक्के ब्रोकरेज >>>>>>>>>>
Brokerage Service Tax Transaction & SEBI Stam duty STT
31.8375 3.2793 0.0446 0.1274 2
हे असे होते ते
म्हणुन
मी सध्या नवीन आहे म्हणुन १ घेतला पुधच्या वेळी जस्त घेईन
धन्स मास्तुरे
मी icicidirect मधुन online
मी icicidirect मधुन online trading
स्वस्त ब्रोकर सुचवावा
ब्रोकरेज फार आहे.. डिलिवरीला
ब्रोकरेज फार आहे.. डिलिवरीला हल्ली ०.५ % किंवा अगदी खेड्यातला सब सब ब्रोकर असेल तर १ % ब्रोकरेज असते.
१३०० च्या शेअरवर या हिशोबाने ६.५ ते १३ रु ब्रोकरेज ( टेक्सेस वगळता) असायला हवे. ब्रोकर मेन ब्रोकर आहे की सब ब्रोकर? त्याला ब्रोकरेज कमी करायला सांगून बघा.
ICICI Direct अंदाजे ०.८५
ICICI Direct अंदाजे ०.८५ टक्के ब्रोकरेज घेतात. त्यात STT व इतर टॅक्सेस अॅड केले की एकूण ब्रोकरेज अंदाजे ०.९७ टक्के इतके होते.\
HDFC Securities ०.६५ टक्के ब्रोकरेज घेतात व सर्व इतर टॅक्सेस धरून एकूण ब्रोकरेज अंदाजे ०.७० टक्के इतके होते.
शेरखान व इतर ऑनलाईन ब्रोकर्स साधारण याच रेंजमध्ये ब्रोकरेज घेतात.
मी icicidirect मधुन online
मी icicidirect मधुन online trading
आय सी आय सी आय ला इतके ब्रोकरेज नाही. http://www.icicidirect.com/brokerage.asp
स्वस्तात ब्रोकरेज आर के ग्लोबल चे आहे. आणखी असतीलही.
मी या केस मधे कंप्लेट करायला
मी या केस मधे कंप्लेट करायला पाहीजे का ?
@ प्रितीभूषण तुम्ही तुमच्या
@ प्रितीभूषण
तुम्ही तुमच्या ब्रोकर कडून कमिशन शीट मागवुन घ्या. त्यात डिलिव्हरीचे कमिशन / इंन्ट्रा डेचे कमिशन किती होते ते तुम्हाला कळेल. त्यानुसार तुम्हाला कितीला शेअर विकला कि फायदा होते ते पण कळेल.
१ शेअर घेतल्यामुळे तुम्हाला कमिशन जास्त लागेल असेल.
१ शेअर घेतल्यामुळे तुम्हाला
१ शेअर घेतल्यामुळे तुम्हाला कमिशन जास्त लागेल असेल. असेच वाटते. कंप्लेंट करण्यापेक्षा किमान ५००० चा एक व्यवहार करुन बघा आणि त्याची ब्रोकरेज शीट बघा.
कस्टमर केअरला फोन करुन बघा.
कस्टमर केअरला फोन करुन बघा.
कंप्लेंट करून फायदा होणार
कंप्लेंट करून फायदा होणार नाही. प्रत्येक ब्रोकर एका कमीतकमी विशिष्ट रकमेच्या पुढचा व्यवहार असेल तर (उदा. कमीतकमी ५ हजार रूपय), तरच दिलेले ब्रोकरेज चार्ज करतो. त्यापेक्षा कमी रकमेचा व्यवहार असेल तर एक फ्लॅट रक्कम चार्ज केली जाते (उदा. २५ रूपये).
प्रत्येक ब्रोकरसाठी ही व्यवहाराची कमीतकमी रक्कम व त्याखालच्या व्यवहारावरील फ्लॅट ब्रोकरेजची रक्कम ही निरनिराळी असू शकते.
त्यामुळे,
(१) कमी ब्रोकरेज घेणारा ब्रोकर निवडा (ब्रोकरेज अर्ध्या-पाऊण टक्क्यांपेक्षा कमी हवे) आणि
(२) कमीतकमी आठ-दहा हजार रूपयांचे व्यवहार करा.
@ प्रितीभूषण मी या केस मधे
@ प्रितीभूषण
मी या केस मधे कंप्लेट करायला पाहीजे का ?
कंप्लेट करुन काही फायदा होईल असे वाटत नाही, तुम्ही अग्रीमेंट सही करुन दिले असेल त्यात स्पष्ट शब्दात कमिशन बद्दल लिहिले असेल पण तुम्ही वाचले नसेल तर नीट वाचा.
आधी कमिशन बद्दल नीट वाचा आणि जर त्यात काही चूक असेल तर नक्कि कंप्लेट करा.
मागच्या आठवड्यात २ SBI
मागच्या आठवड्यात २ SBI घेतलेले 1687.7 ला
total 1687.7 *२=3375.40
Brokerage=35.000 [हे Brokerage direct calculate केले आहे icicidirect ने
Service Tax=3.6050
Transaction & SEBI
Turnover Charges=0.1181
Stamp Duty=0.3375
STT=४
total =3375.4+ वरील सगळे =3418.4606 झाले
हे मला आलेल्या email मधुन ही माहिति
@ प्रितीभूषण आताही तुमचा
@ प्रितीभूषण
आताही तुमचा व्यवहार ५०००/- च्या खाली आहे.
माझ्या मते तुम्ही कमिशन शीट मागवून घ्या. मगच तुम्हाला सर्व अंदाज येतील.
ICICI लहान रकमेच्या
ICICI लहान रकमेच्या व्यवहारांवर ३५ रूपयांच्या आसपास ब्रोकरेज लावतंय असं दिसतंय. तुम्ही आता एक १०००० च्या पेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करून बघा आणि बघा किती ब्रोकरेज लावलंय ते.
हे जरा त्यातल्या त्यात
हे जरा त्यातल्या त्यात स्वस्त वाटते.. आता किमान ५००० चा सौदा करुन बघा........ तुम्ही किती अमाउम्ट गुंतवताय माहीत नाही.. पण एकून रकमेत ५-१० कंपन्या बसवा . या पध्हतीने गुंतवा.. जेंव्हा १० % फायदा होईल, तेंव्हा विकणे. चांगला अभ्यास असेल तर सायक्लिकली दर आठ पंधरा दिवसाला थोडे थोडे प्रॉफिट मिळत जाते.
असे एक दोन शेअरवर खेळून काही मिळत नाही.
@जागोमोहनप्यारे आम्हाला काही
@जागोमोहनप्यारे
आम्हाला काही आपले उपयुक्त मार्गदर्शन करीत जा. आम्ही सुध्दा या खेळात नविन आहोत.
हा खेळ आधी समजून घ्या.. १.
हा खेळ आधी समजून घ्या..
१. शॉर्ट टर्म डिलिवरी.... शेअर घेणे, ३ महिन्यात १० % मिळाले की बाहेर पडणे.
२. लाँग टर्म.... शेअर घेणे,वर्ष दोन वर्षात किमान ५० % मिळवणे, विकणे.
३. कॅपिटल गेन्साठी घेणे.. शेअर घेणे, कधीच न विकणे... कित्येक पट नफा मिळतो... अगदीच म्हातारपणी लागले तर विकणे नाही तर मग नातीला/नातवाला देऊन मरणे!
४. इंट्राडे.. रोजच घेणे विकणे. मोठी क्वांटीटी .. रुपाया दोन रुपाया प्रॉफिटने किंवा लॉसने रोजचा हिशोब करणे.
५. फ्युचर ऑप्शन... हे आताच न बोललेले बरे.
यापैकी काय हे आधी ठरवा. प्रत्येकाला वेगळे निकष असतात
@जागोमोहनप्यारे आपण दिलेल्या
@जागोमोहनप्यारे
आपण दिलेल्या महिती बद्दल धन्यवाद,
मी सध्या आपण दिलेल्या माहिती मधील पहिल्या व दुसरा भागात खेळत आहे.
मला ४ भागाबद्दल नीट समजवुन सांगा ही विंनती.
इंट्रा डेसाठी बेसिक
इंट्रा डेसाठी बेसिक गोष्टी..
१. पूर्ण वेळ करा. कधीतरी वेळ मिळाला की २ तास करायचे, असे न्नको
२. कमी ब्रोकरेज व चांगले सॉफ्टवेअर देणारा बोकर हवा.
३. चांगले चार्टिंग सॉफ्टवेअर व ईंट्रा डे डे लाइव डेटा हवा.
४. टेक्निकल शिकून घ्या
इथे काही आहे.. http://www.maayboli.com/node/30579 यात काही सुधारणा असतील तर सांगा
13-Oct-11 मि 5k च्या वर
13-Oct-11
मि 5k च्या वर ट्रेडींग केलेले तेव्हा मला बाईंग कॉस्ट एकुण 9485.35 पडली
या वर एकुण ब्रोकरेज 70.82 पडले
या पेजच्या वर जा. उजव्या
या पेजच्या वर जा. उजव्या कोपर्यात निळ्या अक्षरात गुंतवणूक असे दिसेल त्याला क्लिक करा.. या विषयातले सगळे धागे मिळतील.
बरोबर.. म्हणजे ब्रोकरेज
बरोबर.. म्हणजे ब्रोकरेज अंदाजे ०.७५ % आहे
एक प्रश्नः डे ट्रेडींग मधे
एक प्रश्नः डे ट्रेडींग मधे सेल नाहि केले तर eod ला आपोआप सेल होते का?
तुम्ही शेअर घेताना डे
तुम्ही शेअर घेताना डे ट्रेडींग केले असेल तर, सव्वातीन च्या सुमारास ऑटो सेल होते. इथे कसला दंड बसत नाही.
डे ट्रे. मध्ये जर शॉर्ट केले असेल आणि पोझिशन कवर नाही केली तर ऑक्शन होते आणि दंड बसतो.
साडेतीन नंतर तुमच्या ओपन पोझिशन बघा. त्यात सगळे डिटेल्स मिळतील.
@जागोमोहनप्यारे ऑक्शन मध्ये
@जागोमोहनप्यारे
ऑक्शन मध्ये आपण शेअर घेऊ शकतो का व कसे? कारण माझ्या एकिव माहिती प्रमाणे ऑक्शन
बाय-सेल मध्ये जास्त फायदा होतो.
Pages