अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येऊकामी, मी ते विधान सरसकट केलं नव्हतं. माझ्या अनुभवाबाबत लिहिलं होतं. दिवसाउजेडी काही ठिकाणी भयाण वाटू शकतं हे कबूल.

मामी __/\__ Proud

सध्या मी जयपूरच्या माजी महाराणी गायत्रीदेवी ह्यांच्या आत्मकथनाचा अनुवाद वाचत आहे. त्यात एके ठिकाणी त्यांच्या आईच्या वडिलांच्या कलकत्त्यातल्या घराविषयी उल्लेख आहे. त्याचं नाव वूडलॅन्डस. टिपू सुलतानने ब्रिटीशांविरुध्द बंड पुकारलं तेव्हा त्याच्या मुलांना ह्या घरात कैद करून ठेवलं होतं. त्यांच्या आत्म्यांनी घर पछाडलं आहे अशी समजूत तेव्हा होती. गायत्रीदेवीनी लिहिलं आहे की एका उन्हाळ्यात त्यांनी गच्चीवर विचित्र आवाज ऐकले. नोकरांनाही ते आवाज कुठून आणि का येतात ते कळलं नाही. शेवटी मांत्रिकाला बोलावण्यात आलं आणि त्याने काहीतरी केलं. तेव्हापासून ते आवाज बंद झाले म्हणे. हा मराठी अनुवाद असल्याने 'विचित्र' च्या ऐवजी मूळ इंग्लीश शब्द काय होता देव जाणे.

युकेमधील लून्चॅस्टर कॅसल हे ठिकाण संपुर्ण युकेत भुतांसाठी कुप्रसिद्ध आहे .या कॅसलवर एक डॉक्युमेंट्री बघितली होती चार पाच वर्षांपुर्वी.

स्टार प्रवाहवर अनोळखी दिशा नावाची serial लागते आहे नवीन. अमानवीय कथा आहेत त्यात नारायण धारपांच्या.

माझ्या लहानपणाचा एक किस्सा...
मी मामा कडे गेलो होतो, घाटकोपर. मामाची मुले आणि त्यांचे मित्र असे आम्ही तिथे खेलत असु. ग्राउन्ड च्या शेजारी एक नवीन इमारतीचं काम अर्धवट स्थितित तसचं पडुन होतं कित्येक वर्ष. एकदा खेळुन झाल्यावर आम्ही तिथे जवळंच बसुन गप्पा मारतं होतो आणि विषय अमानवीय गोष्टिंवर सरकला. एक-दोन मुले त्या इमारती बाबत सान्गु लागले की एका बाइने तिथून उडी मारुन जीव दिलाय म्हनून काम बन्दं आहे. आणि मगं पेज लागली की जो कोण वर terrace वर जाइल आणि तिथून हाक मारेल त्याला काही रुपये......
मामे भावाचा एक मित्र तयार झाला....सध्याकाळी ८ ची वेळ होती जवळपास....इमारत ५ मजल्यान्ची होती....
तो मुलगा वर जायला निघाला आणि आम्ही सर्व खाली येवून उभे राहिलो....
तो जसा एक-एक मजला चढायचा तसा आम्हाला आवाज दयायचा.....घाभरला होता तो.....terrace वर पोहचला , आम्हाला आवाज देवुन हाथ दाखवला, आणि परत उतरू लागला......परत सर्व मजल्या वरून आवाज सुरु....दुसर्‍या मजल्या नन्तर आवाज बन्दं.......

..............................................................................................................................

क्रमशः (office मधुन निघतोय, नन्तर टायपतो)
>>>>>>>>>>

मंगेशा Proud Rofl एपिसोड लिहायला घे तू आता. काय बरोबर ब्रेक घेतलाय.

Biggrin

>>>क्रमशः (office मधुन निघतोय, नन्तर टायपतो) >>> अरेच्चा, मग हे एवढंतरी कशाला टायपलं म्हंते मी! कायतरी अमानवीय असल्याचा सौंशेव येतोय. Proud

अरे काय लोकहो, office मधुन गेलतो तर लगेच अमानवीय काय, आधुनीक भुतं काय....कॅच्याकॅ....
पुढीलं घटना खाली update केलीयं......

पुढीलं घटना................................................................................................
................................................................................................................
दुसर्‍या मजल्यापर्यन्त त्याने बरोबर आवाज दिला, पण नन्तर काही त्याचा आवाज आला नाही. एक १० मिनीटं आम्ही त्याची वाट पाहीली....सर्वान्चीं जाम टरकली होती. माझ्या मामेभावाने आपण सर्व मिळून वर जाऊया असा प्रस्ताव मांडला. पण कुणीही तयार नाही झालं. घाबरून सर्व घरी निघून गेलो....

दुसर्‍या दिवशी आम्ही २-३ मुले त्याची घरी जाऊन सर्व सान्गुया असा विचार करुन जायला निघालो.....त्याच्या घरी जेव्हा पोहचलो तेव्हा पाहीलं तर हा २-३ गोधड्या अगांवर घेवुन झोपलाय. त्याची आईने सांगितल कि हा काल रात्री कुठुन तरी घाबरून आला आणि रात्रभर भरपुर तापं आलाय.....आम्ही काही न बोलता परत फिरलो...

जवळ्पास ३ दिवसांनी तो ठिक होवुन परत जेव्हा भेट्ला तेव्हा त्याला आम्ही नक्की काय झालं ते विचारलं...
तो म्हटंला कि , तो फार घाबरलेला होता. दुसर्‍या मजल्यावरून जेव्हा आवाज दिला आणि खाली येवु लागला तसं त्याला पाठी कुनी आहे असा भास होयला लागला......त्या इमारतीला पहील्या मजल्यावर काही जाळी नव्हती आणि त्या खाली बरोबर रेतीचा ढिंग होता......
अखेरच्याक्षणी हा इतका घाबरला की तिथून त्याने रेतीवरं उडी टाकली आणि घरी पळून गेला. आम्ही इमारतीच्या पुढ्च्या भागात असल्यामुळे हा काही आम्हाला दिसला नाही.....
एकदम धीट मुलगा होता तो , आता फार घाबरटं झालायं......
बरीचं लोकं दिवसा उजेडी त्या इमारतीतं जाऊन आली पण रात्री कुणी कधी गेलं नाही.....४-५ वर्ष इमारतं तशीच पडुन होती....आणि बर्‍याचं अफवा पसरल्या होत्या इमारती बाबत....
त्यानन्तरं मालकानी ती इमारतं तोडुन छोट्या जागेत मन्दिरं बान्धलयं आणि उरलेल्या मोठ्या जागेवर एक tower बान्धला.....सर्व flat विकले गेलेतं....

..

गोष्ट एका रात्रीची आहे. एका भयाण, अंधार्‍या रात्री मी, संज्या (संजय) आणि रम्या (रमेश), माझ्या घरी, चिंतन बैठकीसाठी जमलो होतो. चिंतनाचा मूड व्हावा म्हणून आम्ही दिवे न लावता मेणबत्त्या पेटवल्या होत्या (वि.सू. - ह्याच मेणबत्त्या सिगारेट पेटवायच्या कामी पण येतात)

विषय होता आजकाल सर्वत्र सहजसंचार करणारी भुतं. तिघेही कॉटला रेलून जगातून दारूचा शेवटचा थेंब नष्ट केल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यासारखे ढकलत होतो. चेहर्‍यावरचा करारीपणा उतू जात होता, इतका की कुणी नुसतं हसण्यासाठी जरी गाल हलवले तरी काच फुटल्यासारखा 'खळ्ळ्ळ्ळ्' आवाज येत होता.

इतक्यात ते घडलं. मी पुढचा घोट घेण्यासाठी माझा ग्लास उचलला तर तो रिकामा होता. मी डावीकडे बसलेल्या संज्या (संजय) कडे पाहिलं, तर त्यावेळी तो त्याच्या डावीकडे रम्या (रमेश),च्या ग्लासातली गुपचूप संपवत होता. रम्या आकाशात बघून प्रदुषण करत होता. होतं असं कधी, संपवला असेल मीच अशी माझिया मनाची समजूत घालून देऊन मी पुन्हा ग्लास भरला. तितक्यात संज्या ओरडला "काय बे आद्या, माझी दारू काऊन संपवून र्‍हायला बे?" मला कळलंच नाही एक मिनीट "अबे मी काऊन तुझी पिऊ, माझा ग्लासातूनच पितोय मी... तूच रम्याची पिताना पाह्यलं मी..." त्यावर मला गप्प बस अशी खूण करून त्याने स्वतःचा ग्लास उचलला. तितक्यात रम्या ओरडला "का बे साल्यान्नो... तुम्ही दोघे प्लॅन करून माझी दारू काऊन संपवून र्‍हायलात लेकांनो?" आम्ही दोघेही त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो की हे हि&हि कॄत्य आमचे नाही... तरी त्याचा विश्वास बसेना.

पण हळू हळू हे प्रकार वाढू लागले. तिघांचेही ग्लास आपोआप संपू लागले. ग्लास खाली ठेऊन दुसर्‍या सेकंदाला जरी परत उचलला तरी संपलेला असे. तीच गत सिगारेटची. अ‍ॅश ट्रे वर ठेवली की अर्धी आपोआप संपत असे. आमची जाम तंतरली. भूत असेल ह्या भावनेने नाही.तर ह्या स्पीडने दारू लवकर संपेल ह्या भीतीने.

शेवटी आम्हा तिघांचीही इथे भूत आहे ह्याची खात्री पटली आणि त्याने आपली संपवण्यापेक्षा आपण आता थोडावेळ झोपू. लवकरच पहाट होईल, पहाटे उजेडाच्या भितीने भूत आपल्या घरी गेलं की मग निश्चींतपणे पुन्हा बसू असा विचार करून आम्ही थांबलो.

आम्ही तिघेही पैलवान असल्याने एकाच कॉटवर झोपलो. सगळ्यात डावीकडे भिंतीच्या बाजूला संज्या, मधे रम्या आणि मग मी असे झोपलो. डोळे जड झाले होते. झोपेमुळे की दारूमुळे माहिती नाही. इतक्यात कसलासा आवाज झाला. माझी पाचावर धारण बसली. घामाने डबडबलो. जीभ जड झाली. मी संज्या नी रम्याला हाका मारायचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द फुटेना. कसे बसे मी डोळे किलकिले करून बघण्याच्या प्रयत्न केला तर मला जे दिसले त्याने मी पार स्तिमीत झालो - कॉट खालून आमचा चवथा मित्र देवा हळूच बाहेर येऊन आपली झुल्फं सावरत सावरत गुपचूप घराबाहेर पडत होता...

....:हहगलो:

सॅम रायमीच्या the grudge मधील वाक्य"when someone dies in a grip of powerful rage a curse left behind" त्यामुळे जुनाट वास्तुत अशी अमानवीय तत्वे असु शकतात .

हल्लिच अनुभवलेला प्रसन्ग .....मी विचार करत होते कि येथे पोस्ट करू कि नको ......पण विचार केला की या वर माबोकरांचे reply पाहुया... १५ दिवसा पूर्वि माझे काका वारले . त्यांना bedroom मधे ठेवले होते. चुलत बहिणी खुप रड्त होत्या. एकुण खूप च वाईट वाट्त होते. बाजुला दीवा लावला होता आणि वर tube light on होती. काकांना जेव्हा उचलले तेव्हा एकदम दीवा विझला आणि tubelight off झाली. room मधे हवा न्हवती and tube light was alright. button off करुन on केले तेव्हा पुन्हा सुरु झाली.
everyone was surprised. ही गोष्ट नंतर लक्शात आली.

बॉडी उचलताच दिवा आणि ट्युबलाईट एकदम विझणे ह्याला योगायोग म्हणणे मला तरी जड जात आहे.काहितरी नक्कीच होते तिथे.असो मी तुमच्या परीवाराच्या दुखात सहभागी आहे सामी.

साधा माणूस...
मिपावर तुम्हीच आदीजोशी नावाने हा अनुभव टाकला असेल तर ठिक आहे नाहीतर ही चक्क उचलेगिरी आहे. त्यामुळे अडमिनला सांगून तुमची पोस्ट उडवायला सांगण्यापूर्वी तुमची तुम्हीच उडवावी हे उत्तम....
आणि नसतील तुमच्याकडे काही किस्से सांगण्यासारखे तरी हरकत नाही..दुसर्यांचे आपले म्हणून खपवण्यापेक्षा ते नक्कीच बरे...

मी आत्ता नगर मध्ये कानिफनाथ मंदिरात जाऊन आलोय. इथे भूत बाधा झालेली अनेक माणसे येतात, आणली जातात. जे पाहिलंय ते अविश्वसनीय आहे. अधिक सोमवार पर्यंत लिहोतो..

Pages