हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यातलेच 'मस्त बहारोंका मै आशिक'' त्यात तर तो जेम्स बाँड मधुन मधुन फाईटही करुन उरलेल्या वेळात गाणे गातो....

सपने मधले

चंदा रे चंदा रे
कभी तो जमींपर आ
बैठेंगे बाते करेंगे
तुझ्को आने इधर
लाज आये अगर
ओढके आजा तु बादल घने....

हे काजोल आणि प्रभुदेवाचे गाणे अतितितिशय सुंदर आहे- ऐकायला आणि पाहायला.
साधना सरगम आणि मला वाटते एसपी या दोघांनी प्राण ओतुन गाणे गायलेय आणि पडद्यावर तितक्याच तरलपणे काजोल व प्रभुदेवाने साकारलेय....

>>>साधना सरगम आणि मला वाटते एसपी या दोघांनी प्राण ओतुन गाणे गायलेय

साधना,
हे गाणे साधना सरगम आणि हरिहरन ने गायले आहे Happy

ओके. मी ब-याच वर्षांपुर्वी ऐकलेय त्यामुळॅ पुरूषाचा आवाज लक्षात नाही. पण साधनाच्या सुंदर गाण्यांपैकी एक त्यामुळॅ तिचे नाव लक्षात राहिले.

आज पाहते युटुबवर Happy

'जंगली' सिनेमातील 'जा जा जा मेरे बचपन' गातांना शेलाट्या 'सायरा'चा फ्रेश लूक! गाणं पण मस्त चित्रीत झालय! अशी निरागस 'सायरा' नंतर कुठल्याच सिनेमात दिसली नाही!! Sad

नाही म्हणायला, 'दिल बिल प्यार व्यार' हे 'शागिर्द' मधील सायराचे गाणे , जॉय मुखर्जी सारखा ठोकळा समोर असुनही छान चित्रीत झालेय!

असाच दुसरा ठोकळा म्हन्जे बॉबी देवल! त्याचा पहिला सिनेमा ( 'करीब'च ना??)गाण्यांमुळे तरुन गेला! .... 'चुरालो ना दिल मेरा, सनम; बनाओ ना अपना सनम' या गाण्यात नेहाचा फ्रेश चेहरा! गाण्याच्या चित्रीकरणाची थिमही वेगळीच आहे!

१९४२ - ए लव्ह स्टोरी मधील 'कुछ ना कहो कुछ भी ना कहो' हे कुमार सानु ने गायलेल्या गाण्याचं टेकींग छान आहे. विधु विनोद चोप्राचा खास टच ईथे जाणवतो.

पडद्यावर अनिल कपूर आणि मनीषा कोईराला विजोड वाटत नाहीत.

कुमार सानुने जी काही गाणी गायली आहेत्,त्या सगळ्यांमधलं हे गाणं म्हणजे मास्टर पीस.:स्मित:

'जंगली' सिनेमातील 'जा जा जा मेरे बचपन' गातांना शेलाट्या 'सायरा'चा फ्रेश लूक! गाणं पण मस्त चित्रीत झालय! अशी निरागस 'सायरा' नंतर कुठल्याच सिनेमात दिसली नाही!!
>>
अगदी अगदी, परवा यु ट्युबवर 'जंगली' तलेच 'मेरे यार शब्बा खैर गाणे पाहत असताना सायरा काय कोवळी दिसलीय्.शम्म्याचे तर सर्वांग बोलत असते. त्या काळी शम्मी कपूर अभिनयासाठी प्रसिद्ध नव्हता .उटपटांगगिरीसाठीच होता. आता ते सुद्धा लोभस वाटू लागले आहे.

बघाच एकदा ते गाणे.....
http://www.youtube.com/watch?v=OiggiiL_4do

खरेच सायरा अतिशय गोड दिसायची तेव्हा.. आयी मिलन की बेला मध्ये राजेंद्रकुमार तिला

तुम कमसिन हो, नादान हो,
नाजुक हो, भोली हो
सोचता हूं मै के तुम्हे प्यार ना करु.....

म्हणतो ते अगदी पटते.....
http://www.youtube.com/watch?v=1Od6dI2_VcE

http://www.youtube.com/watch?v=0jImp2zYNZw

शेलाट्या 'सायरा'चा फ्रेश लूक <<< अगदी अगदी. इव्हन, एहसान तेरा होगा शम्मीच्या तोंडी आहे तेव्हा तिचं धारदार नाक आणि एकदम कोवळा चेहरा लक्षात राहतो.

जंगली (१९६१)सायराचा पहिलाच चित्रपट होता आणि ती होतीही टीन एजर तेव्हा . १५-१६ वर्षाचीच .(२३-०८-१९४४). त्यामुळे तेवढे नाजूकपण असणारच्,नन्तर नात्र ती फारच असह्य झाली. अभिनयातही आणि दिसण्यातही. प्रौढ वयात अंगप्रदर्शन सुरू केल्याने हास्यास्पदही.७४-७५ मध्ये तर तिचे एकामागोमाग नऊ दहा चित्रपट आले.

नन्तर नात्र ती फारच असह्य झाली. >> पुरब और पश्चिम मधला सोनेरी केसांचा टोप? अशक्य.

प्रेम रोग मधील भंवरे ने खिलाया फूल गाणे सुन्दर आहे. कंपोजरने वाद्यमेळ उत्तम वापरला आहे. लताची ओपनिन्ग तान म्हणजे एका बॉल मध्ये सेंच्युरी. सुरेशची केपेबल साथ. चित्रीकरण ही सुखद आहे. विषेश त:
अतोनात रंगीबेरंगी फुलांच्या ताट्व्यातून पळ्त जाणारी शुभ्रवस्त्रा नायिका जणू जीवनालाच नाही म्हणत आहे.
एका मानसिक धक्क्याने तिची जीवनेच्छा गोठ्लेली आहे. व नायक तिला परत जीवनात आणण्यासाठी विनवणी करत आहे. मानवी आवाज, सतार व इतर वाद्ये, तालवाद्ये यांचा मेळ एकदम सही आहे. व हे काम भारतीय कलाकारच करु शकतात. पूर्ण सिनेमात नायिका अल्लड व नायक विचारी, तिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर समजवून सांगणारा, आपल्या भावना न व्यक्त करणारा सोल मेट आहे. ते नाते इथे प्रतीत होते.
राज कपूर बद्दल पूर्वग्रह न धरता ऐका व बघावे.

राज कपुर हे एक वेगळंच रसायन होतं. त्याच्या अनेक चित्रपटांपैकी "संगम" हा माझा आवडता. बरेच चित्रपट या कथानकावर (प्रेमाचा त्रिकोण) आलेत पण राज कपुरने ज्या पद्धतीने मांडणी केली आहे... लाजवाब! त्याचा अभिनयही मला आवडला...

हे त्याच चित्रपटातलं, एक सदाबहार गाणं;

ओ मेहबुबा, ओ मेहबुबा...

http://www.youtube.com/watch?v=n7UK00sTF0c

असाच दुसरा ठोकळा म्हन्जे बॉबी देवल! त्याचा पहिला सिनेमा ( 'करीब'च ना??)

बॉबीचा पहिला चित्रपट बरसात.

बरसात म्हटलं की लोकाना ताक धिना धिन आठवते. पण बॉबी म्हटले तर बरसात कुणालाच आठवत नाही! Happy

बरसातचं ताक धिना धिन हे गाणं अल्मोस्ट रोज ऐकतो/पहातो. रोज नवीन वाटतं. निम्मीनं पूर्ण गाणं छान खाऊन टाकलंय. शंकर जय. ची भैरवी मनातून जात नाही. 'ये समा है जा रहे हो कैसे मनाऊ' च्या आधीचं निम्मीचं कळवळणं अगदी लाजवाब.

दिल तो पागल है मधलं "अरेरे अरे ये क्या हुआ" च चित्रीकरण सुंदर आहे, गाण्याइतकच गोड..
पड्द्यावर शाहरुख अन माधुरीच्या दोन जोड्या आहेत.. त्यातले एकत्र काहीतरी काम करणारे दोघे तर फारच cute!

तशी माधुरी फार काही छान नाही दिसलेय DTPH मध्ये.. वाढत्या वयाचा परिणाम असावा.. पण या गाण्यात नाही जाणवत फारसे..

तशी माधुरी फार काही छान नाही दिसलेय DTPH मध्ये.. वाढत्या वयाचा परिणाम असावा.. पण या गाण्यात नाही जाणवत फारसे..
- नहि चिंगी नहि. ये मै नहि सुन सकती. तिच्या मधाळ हसण्यापुढे मला काहिच दिसत नाहि ग. आणि नाचताना तिच्या चेहर्‍यावरचे भाव केवळ अविस्मरणीय. Happy

सायराचा विषय निघालाच आहे तर....
पडोसन मधलं मैं चली, मैं चली, आणि भईबत्तुर भईबत्तुर.... ही दोन गाणी विशेष उल्लेखनिय...
सायकल चालवणारी सायरा, आणि भई बत्तुर मध्ये एक क्षण ही न थांबणारी अल्लड सायरा...
मस्त रंगवली आहे...

अख्खा चित्रपटंच माझ्या अतिशय आवडीचा... Happy

पडोसन.... माझ्याकडे सीडी आहे त्याची.. खुप वेळा बघते तो पिक्चर... Happy

सायराने दिलिपबरोबर जे चित्रपट केलेत त्यात ते दोघेही अगदी असह्य आहेत.

त्याच्या अनेक चित्रपटांपैकी "संगम" हा माझा आवडता.
मला नाही बघवत हा चित्रपट. शेवटी शेवटी तर असह्य होते सगळे....

त्यातल्या राज कपुरला मला गोळ्या घालाव्याशा वाटतात. त्याला स्वतःच्या जीवलग मित्राच्या मनात काय चाललेय ह्याचाही पत्ता लागत नाही आणि बालमैत्रिणीच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहेत तेही कधी कळत नाही. त्या दोघांना एकमेकांबद्दल काय वाटते ते कळणे मग दुरच राहिले. आणि वर स्वभाव इतका उथळ की आधी मैत्रिण त्याला नाकारत असते तेव्हा ते त्याला प्रेम वाटते आणि लग्नानंतर ती मागचे सगळे निग्रहाने विसरुन त्याला आपला पती मानुन प्रेम करते तेव्हा त्याला ती दुस-यामध्ये जीव जडवुन बसलीय असे वाटते....

त्यात वैजयंती आणि राजेंद्र ब-याच काळाने मोठे झाल्यावर भेटतात तो प्रसंग अतिशय सुंदर रंगवलाय. त्या पार्टीत 'हर दिल जो प्यार करेगा' गाणे आहे...

प्रेमरोग मला खुप आवडलाय.. मामींशी सहमत. ते गाणे अतिशय सुंदर आहे.... त्यातली सगळीच गाणी सुंदर आहेत. पद्मिनीने खुप छान काम केलेय..

प्रतिभा..भापो! Happy

प्रेमरोग मधील "ये गलियां ये चौबारे" पण मस्त.. त्यात पद्मिनीचा तो गुलाबी ड्रेस ,तिचं उत्साहात नाचणे आणि ॠशी कपूरचा दु:खी चेहर्‍याने वावरणे.. छान effect आलाय..

बाकी संगम साठी साधनाला अनुमोदन.. राज कपूर खुपच iritate करतो त्यात...

संगम साठी खूप मोदक. राज कपूर सरळ सरळ म्हातारा दिसतो. आणि तो ठोकळा राजेंद्रकुमार. मला एक समजत नाही, मित्राला गिफ्ट करायला प्रेयसी म्हणजे पाळीव कुत्रं आहे का ? दुसरं म्हणजे, ज्याच्यावर प्रेम आहे त्याने नाकारल्यावर आलम दुनियेत एकटा स्टुपिड राजकपूरच शिल्लक राहिला होता का?

मला एक समजत नाही, मित्राला गिफ्ट करायला प्रेयसी म्हणजे पाळीव कुत्रं आहे का ?

त्या प्रसंगात ...जेव्हा तो राजेंद्रला सांगतो, तुझी हिरोइन राधा असती तर मी माझा हक्क सोडुन तिचा हात तुझ्या हातात दिला असता... त्याच्या कानाखाली दोन द्याव्याश्या वाटल्या.. राधाला विचार आधी तिला कोण हवाय ते...

नको ह्या चित्रपटाच्या आठवणी..मला खुप राग येतो..

मला मधुरिच देवदस मधल 'कहे छेड छेड मुझे' आणि 'किसने ये हमपे हरा रंग डाला' गाणि फार आवडतात. कय ते तिच न्रुत्य त्या बरोबरि सुंदर कोरिऑग्राफि, अप्रतिम सेट, आणि तिचे ते कपडे. मि चान्स मिळाला कि हि गाणि बघतेच. ति सुंदरता डोळ्यात साठ्वुन ठेवण्याचा प्रयत्न करते.

अगदी अगदी. माधुरी आली की सिनेमावरचा ऐश्वर्याचा प्रभाव निघून जातो. डोला रे डोला मध्ये पण दोघी सुन्दर नाचल्यात. एव्ढ्या त्रिपुर सुन्दरी शाह रुख वर मरतात हे काही कळत नाही.

'किसने ये हमपे हरा रंग डाला'

वाव माधुरी काय दिसलीय त्या गाण्यात....

डोला मध्ये ऐश्वर्या अजीबात आवडली नाही. माधुरीपुढे कचकड्याची बाहुली वाटते.. आणि वर ते प्लॅस्टिक हास्य....

एव्ढ्या त्रिपुर सुन्दरी शाह रुख वर मरतात हे काही कळत नाही.

million dollar question.....

>>नको ह्या चित्रपटाच्या आठवणी..मला खुप राग येतो.. <<
अरेरे राज कपुर विषयी एव्हढा द्वेश? वाईट वाटलं... Happy

मुळात संगम मधला राज कपुर (क्यारेक्टर) भाबडा, प्रेमात आंधळा झालेला असतो वै. वै. तुम्ही सगळ्यांनी मिळून तर त्याची पिसंच काढलीत... Happy असो, पसंद अपनी अपनी...

हे घ्या, तुमचा राग घालवायचा एक प्रामाणिक प्रयत्नः

इक दिन बीत जाएगा, माटी के मोल...

http://www.youtube.com/watch?v=sPykmcRGTfk

बाजारमधले ते फुलांचे गाणे (गझल?) ही मला खुप चांगले वाटते. त्याचे शब्द बहुतेक - फिर छिडी रात बात फुलोंकी -- फारुख शेख आणि सुप्रिया पाठक.

'नूतन' सारखीच आताची 'अवखळ' अभिनेत्री म्हणजे 'जुही चावला'!
पण नूतन ला अवखळ आणी सिरियस असे दोन्ही रोल शोभले! तसे जुहीचा चेहराच इतका बोलका त्यातल्या त्यात तिचे डोळे आणी तिचे ते खट्याळ हसू पाहता तिला सिरियस भूमिकेत पहाण्याचा विचार ही सहन होत नाही! 'हम है राही प्यार के' मधले तिचे गाणे " बब्म्बई से गई पुना, पुना से गई दिल्ली..." काहीही खास स्टेप्स नसतांना, तिचे खट्याळ हावभाव बघतांनाची मजा वेगळीच!

माय नेम इज खान मधील सजदा गाणे अप्रतिम आहे. राहत फते अलि खान व रिचा शर्मा, महादेवन.

शब्द सुन्दर. सूफी प्रकारची मांड्णी आहे. रिचाचा आवाज भारतीय, खालच्या पट्टीतील व अतिशय छान वाट्तो. श्रिया घोशाल नंतर एक चांगले फाइंड.

अब जान लुट जाये ये जहां छुट जाये संग प्यार रहे मैं रहूं ना रहू. ही भावना अतिशय मोलाची आहे व ती चांगल्या प्रकारे व्यक्त झाली आहे. वाद्यमेळ अंगावर येत नाही. कव्वाली बाजाचे गाणे आहे. प्रियकरा साठी रांझणा, माहिया, साजना असे शब्द आहेत. मी काल रात्रीच ऐकले. कोणा मनुष्यरूपी प्रियकराला उद्देशून असेल ( शाहरूख हेवन फॉरबिड) तरीही सर्व उत्तम हिन्दी गाण्यांप्रमाणेच हे ही त्या चित्रीकरणाचे संदर्भ सोडून केव्हाच आपल्या अंतर्मनात जावून बसते. मला गाणी विज्युलाइज करायची सवय आहे. त्यामुळे मी एक वेगळेच मानसिक चित्र हे गाणे ऐकताना उभे केले आहे.

सूर्यास्ताची वेळ आहे. एक उन्मनी अवस्थेतील स्त्री पूर्ण शुभ्र चुडीदार व घोळाचा कलीदार कुडता घालून पायात घुन्गरू बांधून न्रुत्य करत आहे, इथे एक तारामती बारादरी म्हणून मॉन्युमेन्ट आहे तिथे. व राहत जी/ महादेवन बसून गात आहेत. स्त्री व पुरुषांचा कोरस उत्तम साथ देत टाळ्या वाजवत आहे व कव्वाली मनुष्य मनाचा कॉस्मिक प्रियकर जो देव त्याच्या कौतिकात रंगत चालली आहे. ऊद व धूप यांच्या धुराने वातावरण सुवासिक झाले आहे. एक भक्तीचे मनोरम स्वरूप या गाण्यात व्यक्त होते आहे.

Pages