Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या गाण्यातले शेवटचे दोन आलाप
या गाण्यातले शेवटचे दोन आलाप आशाचेच आहेत का, याची मला जरा शंका
आहे.
>>> वैशाली सामंतचे आहेत ते आलाप. सीडीवर तिचे नाव सुद्धा आहे!
राम लखन मधलं "तेरे लखन ने बडा
राम लखन मधलं "तेरे लखन ने बडा दूख दिना'. प्रसंगाला इतके अनुरुप शब्द क्वचितच आढळतात.
व्हिलनच्या कंपूने जॅकीला आपल्या हवेलीत बोलावले आहे आणि त्याच्यासमोर अमरीष पुरी माधुरीला नाचायला लावतो. जॅकी प्रचंड तणावाखाली आहे त्याला त्या अप्रिय प्रसगातून माधुरीला वाचवता पण येत नाहिये. तो अगदी अवघडून बसलाय. सगळ्या व्हिलनच्या चेहर्यावर जिंकल्याचे भाव आहेत.
माधुरी गाणे सुरु करते - 'ओ रामजी' जेकी चमकून तिच्याकडे बघतो. (जेकिचे चित्रपटातील नाव राम असते).
ती पुढे म्हणते 'तेरे लखन ने बडा दूख दिना'. त्याच्या चेहर्यावरचे भाव क्षणार्धात बदलतात. तो अपराधीपणा जाउन त्याजागी मिस्किल हसू येते. तो सगळ्या व्हिलनच्या कंपूवरुन एक नजर फिरवतो, त्यात जिंकल्याचे भाव असतात. मस्त relax होउन तो लोडाला टेकून बसतो आणि माधुरीची गाण्यातली लखन (अनिल कपुर) विषयीची तक्रार कौतुकाने ऐकू लागतो. जॅकीने इतकी perfect facial expressions अजून कुठे दिली नसतिल.
माधुरीने चेहर्यावर प्रेमात हरवल्याचे भाव अप्रतिम दाखवले आहेत. नंतरचा तिचा नाच शिट्ट्या घेणारा नसला तरी त्यातली तिची अदाकारी -- बस 'मार डाला' अशीच आहे.
दिनेश, दिल अपना प्रीत पराई ची
दिनेश,
दिल अपना प्रीत पराई ची अख्खि पोष्ट वाह! सुरेख शब्दात वर्णिली आहे तुम्ही..
'लगान' मधलं 'ओ पालनहारे' आणि
'लगान' मधलं 'ओ पालनहारे' आणि 'स्वदेस' चं 'पल पल है भारी' पण फारच गोड आहेत.
'जब वी मेट' :- 'आओगे जब तुम ओ साजना' चं चित्रिकरण मला फार आवडतं. शाहिद आणि करीना (शहीद जरा जास्तच!) काहीच्या काहीच गोड दिसतात आणि ती रेलिंगला हात लावत जाते मग तो पण तिच्या मागे मागे. या गाण्यानंतरचा प्रसंग पण मस्त आहे.
आज सकाळी रेडिओवर लागलेले
आज सकाळी रेडिओवर लागलेले गाणे... मी नेमका तेंव्हा स्व्यंपाक करत होतो....
वो मेरी नींद मेरा चैन मुझे लौटा दो...
( हम है राही प्यार के.... )
जुही, आमीर, नदीम श्रवणची धुन.... साधे सोपे शब्द.... पिलू रागाचा हळवेपणा..... गाण्याच्या आधीचा म्युजिक पीस आणि मधले पीसेस खास न-श्र स्टाईलचे. माझ्या आवडत्या गाण्यांच्या यादीत हे गाणे आहे.
आपल्यासारख्या शहरी माणसांना,
आपल्यासारख्या शहरी माणसांना, पहाटेचे झुंजूमूंजू, सडासंमार्जन करणार्या बायका,
वगैरे नजरेस पडतच नाही. पण कधीतरी, एखाद्या खेड्यात अशी पहाट अनुभवलेली
असते. त्याच्या आठवणी मनात कुठेतरी रेंगाळत असतात.
अगदी हेच फ़िलिंग मला, भाभी की चूडीया, मधल्या लताच्या, ज्योति कलश झलके
हे गाणे बघताना येते. हा सिनेमा मराठी वहिनीच्या बांगड्या वर बेतलेला होता.
(त्यातली सुलोचनाबाईंची भूमिका आपण कशी साकार करायची, याचे टेंशन मीनाकुमारीला
आले होते, असे तिनेच कबूल केले होते. )
तर या गाण्यात मीनाकुमारी अशीच सकाळची कामं करताना दिसते. आणि तिचा छोटा
दीर, गाल फ़ूगवून दारात उभा आहे. आजोळची, मावशीकडची सकाळ हमखास आठवते.
या गाण्यात हरे, गुलाबी, लाल सुनहरे, रंग बादलके, अशा ओळी आहेत. आणि सिनेमा
काळापांढरा असूनही, मला हे रंग दिसतात. संगीत आपल्या सुधीर फ़डक्यांचे होते.
या सिनेमात, आशाची पण छान गाणी होती (कहा उड चले मनप्राण मेरे, घोडा नचावे
मेरा लाडला, संबंधी के द्वारे )
अशीच एक सकाळ, आहे, तूफ़ान और दिया, मधल्या, चाकर राखो, या लताच्या गाण्यात
पडद्यावर. पडद्यावर नंदा आहे. संगीत वसंत देसाईंचे. या सिनेमात लताने मीरेची काही
भजने छानच गायली आहेत. वरचे गाणे आसावरी रागात आहे, त्याशिवाय, मुरलीया बाजेगी
जमुना के तीर हे पण गाणे आहे. आणि मला नीट आठवत असेल, तर पिया ते कहा, हे पण
आहे.
या सिनेमात, डेझी इराणी, तिच्या छोट्या भावाच्या भुमिकेत आहे. आणि लता आणि गीता
दत्तने गायलेले एक मस्त खेळकर गाणे यात आहे
मेरी छोटिसी बहन, देखो गहने पहन
ससुराल चली रे बनठनके
मेरा भैया है दुलारा, इसके बातोंमे न आना
इनके पुर्जे है ढिले बचपनके
या गाण्यात नंदा आणि डेझी, मस्त बागडले आहेत. संन्याश्याच्या भुमिकेतले, केशवराव दाते
पण, डोळ्यात कौतुकाचे भाव आणल्याशिवाय रहात नाहीत. या सिनेमातले, मन्ना डे चे शीर्षक
गीत जास्त ऐकण्यातले आहे. पण बाकिची गाणी पण सुंदरच आहेत.
वसंत देसाईची आठवण, गूंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे, दो आखे बारह हाथ
या सिनेमाशिवाय कशी पुरी होणार.
गूंज उठी शहनाई मधले, टूट गया, दिल का खिलौना हाये टूट गया, जास्त ऐकण्यातले आहे.
पण त्यातच आणखी काही सुंदर गाणी आहेत.
लता रफ़ीचे, जीवन मे पिया तेरा साथ रहे. असेच. या गाण्याच्या सुरवातीला दोघांचे आलाप
आहेत. आणि त्या आलापाच्या तालावर, नायिका अमिता, पायर्या उतरत येते. लताच्या आलापाचे
हे दृष्य रूप मनात ठसलेय.
असेच, लता रफ़ीचे, हौले हौले, घुंघट पट खोले, बलमवा बेदर्दी हे गाणे. या गाण्यात पार्श्वभागी
काही लोकनृत्य कलाकार, हातातल्या काठीने ताल देताना दिसतात. गाणे छान चित्रीत झालेय,
पण गाणे संपल्यावर, या कलाकारांचे जोरकस नृत्य आहे. (मला नीट आठवत असेल, तर गीता
दत्तचे, अखिया भूल गयी है सोना, दिलपे हुवा है जादू टोना, हे पण यातलेच. पडद्यावर बहुदा
शुभा खोटे आहे )
झनक झनक, फ़ार गाजलेला सिनेमा. त्यातले राधा क्रुष्णाचे गाणे मला फ़ार आवडते. गोपीकृष्णाने
या गाण्यात शास्त्रीय नृत्यापासून थोडी फ़ारकत घेत. मस्त उछलकूद केलीय. त्यातले त्याचे शेवटचे
तांडवनृत्य पण छान आहे. त्यात संध्याची साथ पण तितक्याच तोलामोलाची आहे.
दो आखे बारह हाथ, आठवला कि त्यातले, ए मालिक तेरे बंदे हम, हेच हमखास आठवते.
रेकॉर्ड पेक्षा सिनेमातली चाल वेगळी आहे. एकदा ते जवळजवळ गद्य स्वरुपात आहे, तर एकदा
लताच्या आवाजात. पण सिनेमातला प्रसंग आणि चाल करुण आहे. सईया झुंठोंका बडा, सरताज
निकला, हे लताचे अप्रतिम गाणे, पडद्यावर फ़ाऱच बटबटीतपणे सादर झालेय. पण मला आवडते
ते लता आणि मन्ना डे चे, घुमड घुमड कर आयी रे घटा, या गाण्याचे शब्द पण नादमधुर आहेत.
(नन्ही नन्ही बूंदनीयोंकी खनन खनन खन खंजिरी बजाती आयी, देखो भाई बरखा दुल्हनीया.
किंवा
धरतीने गठरी खोली, भरो भरो अपनी झोली)
पडद्यावर मस्त पाऊस पडतोय. सर्वजण बेभान होउन नाचताहेत. शेते डोलताहेत. शांताराम बापू
गळ्यात ढोलकी अडकवून मस्त ताल देताहेत. आणि संध्या तसल्या पावसात, खेळणी विकते
आहे. मस्तच.
या गाण्याबरोबर मला आठवते ते, दो बीघा जमीन, मधले, धिन तक तक तक ढोल बजाता आया,
हे लता मन्ना डेचे गाणे, (संगीत सलील चौधरी) पडद्यावर आहेत बलराज सहानी आणि निरुपा रॉय.
असेच बेभाम उस्फ़ुर्त नृत्य आहे. या सिनेमातला हा पहिलाच, प्रसंग, यानंतर सिनेमा फ़ार करुण
वळणं घेतो.
आणि असेच एक भिजलेले गाणे, एक लडकी भीगी भागीसी. अरे पाउस काय नंतर पडलाच
नाही का, नट्या काय भिजल्याच नाहीत का, पण या बाईचे गारूड कोणी उतरवू शकलेच नाही
(याची अगदी भ्रष्ट नक्कल, मी याच कथेवरच्या मराठी सिनेमात बघितली. काय मिळतं या लोकाना,
सैतान जाणे )
मधुबाला ती मधुबालाच. हल्ली देवानंद एकदा म्हणाला होता. तूम्हाला वाटते, तेवढी ती सुंदर
नव्हती. (मग काय कल्पना कार्तिक सुंदर होती का ? ) तिची स्किन चांगली नव्हती. त्या
काळच्या सुमार चित्रीकरणामूळे, ती पडद्यावर सुंदर दिसायची इतकेच. अरे सायबा, स्वप्न, स्वप्न
असतात, ती खरी होत नसतात, पण म्हणून ती खोटी नसतात रे.
दिनेशदा, तुमच्या नजरेतून ही
दिनेशदा,
तुमच्या नजरेतून ही सगळी गाणी "बघण" म्हणजे पर्वणी आहे ...सुरेख लिहताय ....
बाकी, मधुबाला बदद्ल करोडो मोदक...<<<स्वप्न, स्वप्न
असतात, ती खरी होत नसतात, पण म्हणून ती खोटी नसतात रे.<<< अगदी अगदी.....
दिनेश जियो, कालच ज्योति कलश
दिनेश जियो, कालच ज्योति कलश झलके टीवी वर दाखविले ते ही बातम्यात कुठे तरी. अजुन एक भोर अजरामर करणारे गाणे म्हण जे, राज कपुर नर्गिस चे. रात्र भर लोक त्याच्या मागे असतात शेवटी तो मंदिरात आश्रय घेतो. व त्याला पाणी प्यायचे असते. नर्गिस त्याला पाणी पाजते. मुर्तिमंत पावित्र्य नर्गिस म्हण्जे. व दोन माणसांतील माणुसकीचे नाते त्या गाण्यात व्यक्त होते. शब्द व सिनेमा आठ्वून लिहिते.
जागते रहो. जागो मोहन
जागते रहो. जागो मोहन प्यारे..
पण या बाईचे गारूड कोणी उतरवू
पण या बाईचे गारूड कोणी उतरवू शकलेच नाही >> अगदी अगदी...
काय राव; दिक्षितांच्या
काय राव; दिक्षितांच्या माधुरीला एव्हढ्या लवकर विसरलात?
हल्ली देवानंद एकदा म्हणाला
हल्ली देवानंद एकदा म्हणाला होता. तूम्हाला वाटते, तेवढी ती सुंदर
नव्हती.
जाउद्याहो त्याला...... त्याला बालपणापासुनच म्हातारचळ लागले होते...
वर संध्याचा विषय निघाला
वर संध्याचा विषय निघाला तेव्हा मला तिचे झनक झनक.... मधले 'हमे गोप ग्वाला कहते है...' हे गाणे आठवले. अतिशय सुंदर असे गाणे आणि त्यावर संध्या व गोपीकृष्णाचा तितकाच सुंदर नाच. नाचाची प्रॅक्टिस म्हणुन गोपीचे वडिल हे गाणे दोघांकडुन करुन घेतात.
कृष्ण यमुनेकाठी पहुडलाय आणि राधा पाणी भरायला येते. कृष्णाची मुरली ऐकुन ती भान हरपते. मग कृष्ण मुद्दाम तिचा हात पकडतो, ती झटकते आणि त्याला दुर लोटुन 'तु कोण' विचारते. गाणे तिथुन सुरू होते. गाणे सुरू होताना गोपीकॄष्ण इतक्या मस्त दुडक्या चालीने धावत येतो... मी रिवाईंड करुन तिनचारदा तरी पाहिले हे दृश्य
नाचाची प्रॅक्टिस करताना मध्येमध्ये नीला व गिरधर विसरतात की ते प्रॅक्टिस करताहेत, त्यांच्या मनातील एकमेकांबद्दलच्या भावनांचेच प्रतिबिंब गाण्यात पडते आणि त्यात गाण्याच्या स्टेप्स विसरतात. तेव्हा गिरधरचे वडील ओरडुन आठवण करुन देतात. तेही खुप छान जमलेय गाण्यात...
२६/११: मुंबईवरील भ्याड
२६/११: मुंबईवरील भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या शौर्य आणि बलिदानावर समर्पीत...
कर चले हम फिदा...
चित्रपट : हकीकत
गीत : कैफी आझमी
संगीत : मदन मोहन
गायक : मोहम्मद रफी
http://www.youtube.com/watch?v=nn0HPgss_QU
हो साधना, मला पण तेच गाणे
हो साधना, मला पण तेच गाणे अभिप्रेत होते.
त्याच सिनेमात, मन्ना डे आणि लताची रागमाला आहे. गुरुर ब्रम्हा या मन्ना डे च्या श्लोकाने सुरवात होते आणि लताच्या अबके सावन घर आजा, या ठुमरीने शेवट होतो. याचे चित्रीकरण पण छान झालेय ( गाणे संपता संपता भगवान चे थंडीत कुडकुडणे दाखवलेय, त्याने मात्र पुरा रसभंग झालाय )
लता मन्न डे ची याच प्रसंगावरची (म्हणजे राधा कृष्णाच्या ) दोन गाणी मला आठवताहेत. पण ती कधी पडद्यावर बघितली नाहीत. एक आहे हंसध्वनि रागातले.
जा तोसे नही बोलू कन्हैया
राह चलत पकडी मोरी बैंया
आणि दुसरे
कान्हा जारे, तेरी मुरली कि धुन सुन
सपनोमे गुमसुम, बैठी है राधा जिया हारे
आ गाण्यातल्या आणखी काही ओळी
लोग कहे तू तनका काला, मै जानू तू मनका काला
तेरी लगन मे होके मगन मैने, गिन लिये है अब सारे तारे,
कान्हा जा रे
गाणी खुप सुंदर आहेत. चित्रीकरण कसे आहे, कल्पना नाही.
आज रात्री शोधायला पाहिजे
आज रात्री शोधायला पाहिजे तुनळीवर
झनक.. मधले 'सैया जा, मोसे ना बोलो, अब ना मोहे सताओ...' हे गाणे पण अतिशय सुंदर आहे.
जा तोसे नही बोलू कन्हैया राह
जा तोसे नही बोलू कन्हैया
राह चलत पकडी मोरी बैंया>> राग हंसध्वनी.
दिनेश, 'कान्हा जा रे' चे
दिनेश,
'कान्हा जा रे' चे details (चित्रपट, संगितकार वगैरे) द्या ना माहित असतील तर. मला ते गाणे कधिचे हवे होते पण कुठे मिळत नव्हते details महित नसल्यामुळे नीट शोधता पण येत नव्हते.
माधव ते गाणे, तेल मालिश बूट
माधव ते गाणे, तेल मालिश बूट पॉलिश सिनेमातले. नट माहीत नाही, पण नर्तकी कुमकुम होती. मी बघितले नाही हे गाणे, पण कुमकुम असल्यावर दर्जेदार नृत्य असणारच. ( मधुबनमे राधिका वर पण तिच नाचलीय. )
आणि, साधना, सैंया जा, आहे देस
आणि, साधना, सैंया जा, आहे देस रागात. या सिनेमातले अगदी शेवटचे दृष्य म्हणजे, संध्या आणि गोपीकृष्णचे पाय एकत्र बांधले जातात. आणि तश्या बांधलेल्या पायानी त्या दोघानी, तत्कार केलाय. गाणे आहे अमीर खाँ साहेबानी गायलेले, आणि राग अडाणा, शब्द अर्थातच झनक झनक पायल बाजे.
माधुरीला विसरुन कसे चालेल ? माधुरीला तिच्या तोडिचा सहकलाकार मिळाला
तर बहार येते. जसे डोला रे डोला रे च्या वेळी झाले होते.
तिचा सुरवातीच्या काळातला एक सिनेमा होता, १०० डेज. हिरो होता, जॅकी श्रॉफ़.
यात तिचे जावेद जाफ़री बरोबर एक गाणे आहे. मला शब्द आठवत नाहीत, पण
दोघानी मस्तच नाच केला होता.
पुकार मधे, ती किंचीत खलनायिका होती. त्यात प्रभु देवा बरोबरचे तिचे गाणे,
के सेरा सेरा. (याच शब्दाचे एक जूने इंग्लीश गाणे आहे. पण हे शब्द फ़्रेंच आहेत.
त्याचा अर्थच व्हायचे ते होऊ दे असा आहे.) दाक्षिणात्य प्रभुदेवाच्या अप्रतिम कारागीरी
पुढे, आपली माधुरी, कुठेच कमी पडली नव्हती. यात लाल पडद्याच्या समोर काळ्या
वेषातले कलाकार नाचतानाचे दृष्य फार छान टिपले होते. असेच दृष्य मी पुढे, शिकागो
सिनेमात कॅथरीन जोन्स च्या एका गाण्यात बघितले होते (शब्द बहुदा अँड शी डिड इट
अगेन होते ) पण पुकार आधी आला होता.
माधुरी आणि अनिल कपूरचा, खेल नावाचा सिनेमा आला होता (त्यात माला सिन्हा पण
होती ) यात माधुरी ने एक कॅबरे केला आहे. इडली डू, असे काहितरी शब्द आहेत. उफ़,
मार डाला अश्या अदा आहेत. गाणे आशाचे आहे. (पुढे सिनेमात हेच शब्द आशा, भजना
च्या चालीवर म्हणते !!)
माधुरी आणि संजय दत्त चा, थानेदार नावाचा सिनेमा आला होता. ( त्यात जितेंद्र आणि
जयाप्रदा पण होते. पण त्या दोघींचे एकत्र गाणे नाहि) त्यात तम्मा तम्मा लोगे, असे एक
मस्त गाणे होते ( चुम्म चुम्मा दे दे असे पण त्याच चालीवरचे एक गाणे होते, ते अमिताभ
आणि बहुदा किमी चे होते ) या गाण्याच्या पुर्वी संजय दत्त नाचताना अवघडल्यासारखा
वाटायचा, पण या गाण्यात मात्र तो माधुरीच्या तोडीस तोड नाचलाय. खास करुन खुर्चीचा
वापर बघण्यासारखा. हे गाणे, आणि त्याचे शब्द, याला सिनेमातल्या त्या दोघांच्या भुमिकेशी
काही संबंधच नव्हता. पण गाणे मात्र मस्तच चित्रीत झाले आहे.
फक्त माधुरीच्या गाण्यांचा एक
फक्त माधुरीच्या गाण्यांचा एक वेगळा बीबी होउ शकतो...
हे एक तीचं अफलातुन गाणं. या गाण्यानंतर ती लोकप्रियतेच्या शिखरावर चढतच गेली...
चित्रपट : तेजाब
गीत : जावेद अख्तर
संगीत : लक्ष्मीकांत्-प्यारेलाल
गायीका : अलका याज्ञीक
एक दो तीन...
http://www.youtube.com/watch?v=X_mBlW5bqTo
यात माधुरी ने एक कॅबरे केला
यात माधुरी ने एक कॅबरे केला आहे. इडली डू, असे काहितरी शब्द आहेत
इक बात मान लो तुम,
जो कहूं मै वो करो तुम,
जो करो, तो मेरा वादा...
मै करुंगी जो कहो तुम..
मुझको चांद लाके दो... इड्ली डु.....
गॉड.. मला ह्या इडली डू चा अर्थ अजीबात कळाला नाही..
पण ह्या गाण्यात माधुरीने मधुबालाच्या 'आयीये मेहरबान...' सारखी अदा केलीय.... ड्रेस पण मला वाटते सारखाच आहे.
खेल पिक्चर म्हणुन सुद्दा भन्नाट आहे..
मला शब्द आठवत
मला शब्द आठवत नाहीत,>>>>>..
ते
"गब्बरसिंग ये केहकर गया,
जो डर गया वो मर गया होत"
काय??
नाही झकास, तिचं आणि जा.जाचं
नाही झकास, तिचं आणि जा.जाचं स्पर्धेतलं गाणं आहे- ले ले दिल, दे दे दिल, मौका है बडा हसीन.. "
मस्त नाच आहे. जा.जा ट्रेन्ड ब्रेक डान्सर आहे, माधुरी नाही- पण फरक कळत नाही
इधर देखो वो गाना- http://www.youtube.com/watch?v=JhfxJm8m2R4&feature=related
'त्रिदेव'मधला एक फोटो आला होता- सोनम, संगीताताई बिजलानी आणि माधुरी- गजरने किया है इशारा वर नाचत आहेत, त्याचा.. त्यात सोनम आणि बिजलानीचे चेहरे कोरे, हात कवायत पोझमध्ये. माधुरी इतकं गोड स्मितहास्य, पोझ तीच- पण असं वाटत होतं की ती तो नाच मनापासून एन्जॉय करत आहे. खाली कॅप्शन होती- '.. कळलं ती सूपरस्टार का आहे?'
'डोला रे डोला'मध्ये तर नजर ठरत नाही- अॅश आणि माधुरी अगदी तोडीसतोड. पण का कोण जाणे अॅश सहज वाटत नाही, मुद्दाम प्रयत्न करून नाचते असं वाटतं- टेक्निकली पर्फेक्ट आहे, पण माधुरीचा सहजपणा नाही तिच्यात.
माधुरीचं अतिशय सुंदर गाणं म्हणजे 'दिल तो पागल है' मधलं 'अरेरे अरे ये क्या हुआ..' त्या गाण्याचा अगदी आधीचा सीनही फार गोड. ते गाणं तर अतिशय रोमँटिक, अगदी वेगळं- यश चोप्रा अॅट हिज बेस्ट! खरंतर तो संपूर्ण सिनेमाच अगदी 'बघण्या'सारखा!
अरेरे अरे- http://www.youtube.com/watch?v=wCeK3pkJj-w
गब्बरसिंग यह कहकर गया जो डर
गब्बरसिंग यह कहकर गया
जो डर गया वो मर गया
नादान बच्चा हसीं खेल मे
कौडी गजब की दे कर गया..
पण असं वाटत होतं की ती तो नाच
पण असं वाटत होतं की ती तो नाच मनापासून एन्जॉय करत आहे>>>>>>>>>.
हम्म.
सेम असच मी हल्लीच फिर हेराफेरीच्या शेवटच्या गाण्यात नोटिस केल.
बिपिशा एकदम एन्जॉय करत डान्स करतेय.तिच्या पायाच्या मुव्हमेंट्स देखील एकदम जोशपुर्ण.
आणि त्या रिमी सेन (बरोबर ना?) मात्र पाट्या टाकत आहे.
<<<स्पर्धेतलं गाणं आहे- ले ले दिल, दे दे दिल, मौका है बडा हसीन.. ">>>१०० डेज बघुन फाआआआआआआआआआआआर वर्स। झाले.
मला फक्त गब्बरसिंगच आठवल.
'त्रिदेव'मधला एक फोटो आला
'त्रिदेव'मधला एक फोटो आला होता- सोनम, संगीताताई बिजलानी आणि माधुरी-
येस्स्स मीही पाहिलेला तो फोटो आणि त्यावरचे कमेंट...
मला माधुरीचे 'धकधक करने लगा' सगळ्यात जास्त आवडते. खुप छान दिसलीय आणि नाचलीय.
त्यात तिने नेसलेल्या साडी-ब्लाऊजचा नंतर लिलाव झाला. लिलावाच्या फोटोत ती साडी-ब्लाऊज इतकी सामान्य दिसत होती. तेच माधुरीने नेसल्यावर अगदी असामान्य दिसत होते गाण्यात.
माधुरीचे सर्वच गाणे एकसे
माधुरीचे सर्वच गाणे एकसे बढाकर एक्...अगदी फूल मधले कुमार गौरवसोबतचे गाणे सुध्धा..पण मला सर्वात जस्त आवडलेले गाणे म्हणजे 'तेजाब'मधील 'सो गय ये जहा' त्यात अल्काच्या आवाजात ओळी आहेत् 'क्यू प्यार का मौसम बीत गया, क्यू हमसे जमाना जीत गया" ..त्यात ती फक्त डोळ्यातुन बोलते आणी तीच्या भवना अगदी जश्याच्या तशा पोचतात्..याच गाण्यात अनिलसुध्ध्दा ग्रेट...
"अर्थ" मधलं तुम इतना जो
"अर्थ" मधलं तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो" पण अप्रतिम चित्रीत झालंय. त्यात "बन जायेंगे जहर पीते पीते, ये अश्क जो पीते जा रहे हो" वर शबाना चे भरून आलेले डोळे आणि तिने राजकिरण ला तिला कुलभुषण खरबंदा ने पाठवलेले तलाक चे पेपर्स दाखवल्या वर त्याचं "जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्युं उन्हे छेडे जा रहे हो" म्हण्टल्यावर चेहेर्यावर दाटून आलेली अगतिकता, वेदना... शब्दच नाहित त्याची तारिफ करायला. तिने नुसत्या डोळ्यांनी "जख्म" भरत चालला नसून त्याचा नासूर झालाय आणि तिला त्याचा अत्यंत त्रास होतोय साकार केलंय.
घुमड घुमड कर आयी रे घटा दो
घुमड घुमड कर आयी रे घटा
दो ऑखे मधले हे गाण्याची स्टाईल मला अगदी कोइ लडका है ( दिल तो पागल है) सारखी वाटते... मी हे गाणे एकदाच ऐकले आहे.... आता इतके आठवत नाही.... पण गाण्याचे म्युजिक ऐकताना कोइ लडका है च आठवत होते...... यु ट्युब वर आहे का हे गाणे.. २ ऑखे मधले..?
Pages