Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेश, नाही नाही ते गाणं
दिनेश,
नाही नाही ते गाणं वेगळं आहे.... तुम सैंय्या मध्ये फक्त संध्या आणि महीपाल आणि एक खेचर इतकेच
कलाकार आहेत...
झकास चित्रिकरण झालेले आणखी एक
झकास चित्रिकरण झालेले आणखी एक गाणे म्हणजे 'बोल राधा बोल' मधले 'तु तु तु तुतु तारा'!! डान्समधे फार प्राविण्य नसलेले दोन कलाकार केवळ अफलातून केमिस्ट्रि आणि एक्सप्रेशन्सच्या जोरावर काय धमाल करु शकतात याचे सॉलीड उदाहरण. नृत्यदिग्दर्शक बहुतेक चिन्नीप्रकाश.
ब्लॅक अँड व्हाईट च्या काळातली
ब्लॅक अँड व्हाईट च्या काळातली चित्रीकरण झालेली गाणी पहाणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे!
'गंगा जमुना' चे 'नैन लड जई है..." हे गावाच्या पार्श्वभूमीवरील गाणे मस्त आहे!
विशेषतः 'थैक थैक थैक था" या ठेक्याला 'गाव की गोरी' नाचतात ते ! कोरीयोग्राफी मस्तच!
तशीच मागे उल्लेख येउन गेलेली 'मधुमती' मधील सर्वच गाणी छान आहेत!
"बॉम्बे' चित्रपटातील असेच " कहना ही क्या" हे मनिषा कोईरालावर चित्रीत झालेले एकदम रिफ्रेशिंग गाणे! बावरलेली , लाजरी मनिशा अन तिला शोधणारा अरविंद ! क्या बात है!
थोड विषयांतर होईल ...कारण हा बीबी चित्रपटातील गाण्यांसाठी आहे!
'ले जा, ले, जा.." हे उस्ताद सुलतान आणि श्रेया घोषालच्या आवाजातील अल्बम साँग, अतिशय सुंदर थिम मुळे एक वेगळीच उंची गाठते ! कलाकार माहीत नाहीत पण जे आहेत त्यांचही काम चांगल झालय! बारमधे डान्सर असणारी मुलगी ...रोज पाण्यात भिजणारी! बसस्टॉपवरचा मुलगा...एक चित्र काढतात ...सोबतीला श्रेयाचा भिजलेला आवाज! त्या चित्रातुन इतका पॉजिटीव मेसेज दिला जातो की सम्पूर्ण चित्रीकरण रात्रीच असुनही गाण अफलातुन झालय! गाण्याचा शेवटही लाजवाब!
नैन लड गयी है, वरून मला
नैन लड गयी है, वरून मला संघर्ष सिनेमातले रफीचे असेच एक गाणे आठवले.
मेरे पैरोमे घुंगरू बंधा दे
तो फिर मेरी चाल देखले
मोहे बाली उमरिया दिला दे
तो फिर मेरी ...
सगळे गंगा जमुनाचेच घटक आहेत. म्हणजे दिलीप कुमार, वैजयंतिमाला आणि नौशाद. या सिनेमात संजीव कुमार पण होता.
याच सिनेमात, आशाचा एक मुजरा आहे.
तस्वीर ए मुहोब्बत थी जिसमे
हमने वो शीशा तोड दिया
या खुदही मुहोब्बत टुट गयी
या दिलने प्यार छोड दिया
वैजयंतीमालाने छान सादर केलाय तो.
मस्ती, सिनेमा तसा फारसा आवडला
मस्ती, सिनेमा तसा फारसा आवडला नव्हता. पण त्या सिनेमातले, ऑन द रुफ, इन द रेन, मात्र आवडते.
लारा दत्ता आणि विवेक ओबेरॉय मधली केमिष्ट्री चांगलीच जाणवते. एक म्हणजे गाणे ऐकून जे डोळ्यासमोर उभे राहिल तेच पडद्यावर आहे.
आजा आई बहार दिल है बेकरार ओ
आजा आई बहार
दिल है बेकरार
ओ मेरे राजकुमार
तेरे बिन रहा न जाय.
आजही गाणे फ्रेश वाटते..... शम्मी... नटी कोण? साधना काय?
राजकुमारची सगळी गाणी चांगली आहेत.. इस रंग बदलती दुनिया मे, तुमने किसी की जान को जाते हुए देखा है........ सगळीच अप्रतिम आहेत..
जामोप्या, ती साधनाच आहे.
जामोप्या, ती साधनाच आहे.
दो दिवाने शहर मे रात या दोपहर
दो दिवाने शहर मे
रात या दोपहर मे
आबुदाना ढूंढते है
ईक आशियाना ढूंढते है
चित्रपट : घरोंदा
गीत : गुलजार
संगीत : जयदेव
गायक : भुपेंद्र्,रुना लैला
पडद्यावर :अमोल पालेकर , झरीना वहाब
अमोल पालेकर आणि झरीना वहाब मुंबईत बांधल्या जाणार्या नव्या ईमारतीमधुन फिरत गातात.गाण्याचे शब्द त्यांच्या मनातील सुप्त ईच्छाच व्यक्त करतात. जयदेव आणि गुलजार प्रथमच या चित्रपटात एकत्र आले. त्यानंतर ही जोडी कधीच दिसली नाही. जयदेव यांनी या चित्रपटात झरीना वहाब साठी बांगला देशच्या रुना लैलाचा आवाज वापरला होता.
न झटको झुल्फसे
न झटको झुल्फसे पानी...
चित्रपट : शेहनाई
गीत : राजिन्दर क्रिशन
संगीत : रवि
गायक : मोहम्मद रफी
http://www.youtube.com/watch?v=xTX_RYfYk8k
हमारी जान ले लेगा, यह नीची आँख का जादू
चलो अच्छा हुआ मर कर, जहाँ से छूट जायेंगे...
क्या बात है! Brought back some fond memories...
क्यु आगे पीछे डोलते हो भवरो
क्यु आगे पीछे डोलते हो भवरो की तरह
और देखते हो मुझको यु बेसब्रो की तरह..
पिक्चर कुठला? परेश रावल आहे.. नटी कोण?
रंगीत जमाना रंगीत वाटतोच... पण ब्लॅक & व्हाईटही रंगात कमी नसतो, हे ठळकपणे दाखवणारे गाणे..... असले एखादे जुन्या स्टाईलचे गाणे असल्याशिवाय पिक्चरला सेंसॉर देऊच नये.....
पिक्चर कुठला? परेश रावल आहे..
पिक्चर कुठला? परेश रावल आहे.. नटी कोण?
>>
सिनेमा गोलमाल (नविन) - अजय देवगण, अर्शद वारसी, शरमन जोशी.. सह्ही मूव्ही होता तो..
नटी कोण? > सुश्मिता मुखर्जी - खूप सिनेमा- सिरियल्स मधे असते.
गुलजार एवढा ग्रेट लेखक,
गुलजार एवढा ग्रेट लेखक, दिग्दर्शक पण त्याच्या सिनेमातल्या गाण्यांचे चित्रीकरण मात्र तसे खास नसते, का माझी आठवण मला दगा देतेय ?
मला जुन्या साजन मधले 'रेशम की
मला जुन्या साजन मधले 'रेशम की डोरी' हे गाणे खुप आवडते. लता आणि रफि ने गायलेले गाणे पडद्यावर आशा पारेख आणि मनोजकुमार आहे.
गाणे ऐकायला चांगले आहे. पहायलाही तितकेसे वाईट नाहीय.
http://www.youtube.com/watch?v=Te3dVo_wU1g
माझ्या आवडीचे अजुन एक गाणे आहे कही दीप जले कही दिल.. खरे तर ह्या गाण्यावर भुताचे गाणे म्हणुन शिक्का बसलाय. रात्रीच्या वेळी भुताच्या गोष्टी निघाल्या की कोणीतरी ओ ओ ओ.. करत तान सोडुन देतो आणि मग आधीच टरकलेले लोक त्याच्या पाठीत धपाटे घालुन 'गप बस रे' अशी प्रेमळ सुचनाही करतात.
http://www.youtube.com/watch?v=9igDD2G9nbk
मी हे गाणे ऐकते तेव्हा पहिली दोन कडवी ऐकुन भुताबिताचा अजिबात भास होत नाही, उलट एक सुंदर प्रेमगीत चाललेय असेच वाटते.
मेरा गीत मेरे दिल की पुकार है
जहां मैं हु वही तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी मेहेफिल... जरा देखले आकर परवाने....
ना मै सपना हूँ ना कोई राज हूँ
एक दर्दभरी आवाज हूँ
पिया देर न कर आ मिल.....जरा देखले आकर परवाने....
ही कडवी ऐकताना कोणी प्रेयसी युगानुयुगे आपल्या प्रियतमाची वाट पाहात उभी आहे असेच वाटते.
'पिया देर न कर आ मिल...' ही ओळ लताने अशी काय गायलीय की दुर गेलेला प्रियकर पण धावत येईल.
ही सगळी धुंदी तिस-या कडव्यात मात्र पुर्णपणे उतरते. तिथे सरळ जीव वाचवायचा सल्ला आहे
दुश्मन है हजारो यहां जानके
जरा मिलना नजर पहचानके
कई रुप मै है कातिल...
पण पडद्यावर हे गाणे पाहताना मात्र गाण्याकडे लक्षच जात नाही. पहिली दोन कडवी कधी जातात ते कळतही नाही. डायरेक्ट 'दुश्मन है हजारो यहां जानके' सुरू झाले की गाण्याकडे लक्ष जाते. आपण तोपर्यंत पुर्णपणे भितीच्या अधिन झालेलो असतो. कधी कुठुन भुत येतेय इकडेच लक्ष लागलेले असते सगळे.
आत्ताच १० मि. हे गाण पाहिले.
आत्ताच १० मि. हे गाण पाहिले. सिनेमात अंतरा अंतरा ने असाव.
पण ते ओ ओ ओ मात्र थरकाप उडवत. ती भुतीण फशिवत्ये का हिरोला.. बघायला पाहिजे हा सिनेमा
हिंदी सिनेमा संगीतावर
हिंदी सिनेमा संगीतावर पाश्चात्य संगीतात ज्या लाटा आल्या त्या सर्वांचा प्रभाव पडत गेला. आशा त्या सर्व लाटांना सामोरी गेली इतकेच नव्हे तर त्या लाटांवर स्वार झालीच आणि परत नव्या आव्हानासाठी तयार राहिली. अशी एक लाट होती डिस्को ची. मिथून सारखे कलाकार तर डिस्को डान्सर सारख्या सिनेमातून गाजले.
हथकडी नावाचा एक सुमार सिनेमा आला होता. त्यात रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा होते. त्यात एक गाणे होते. डिस्को स्टेशन असे शब्द होते. आशाने ते उत्तम गायलेय आणि रिना ने ते पडद्यावर छान सादर केलेय. तिचा ड्रेस पण वेगळाच होता.
या गाण्याच एक भ्रष्ट नक्कल आली होती, शब्द होते नो पार्किंग. परवीन त्यावर नाचलीय.
स्टार नावाचा एक सिनेमा आला होता. त्या कुमार गौरव आणि रति अग्निहोत्री होते. नाझिया आणि झोहेब हसन ची त्यात गाणी होती. हि गाणी बर्याच वर्षानी, अगदी अलिकडे नव्याने बाजारात आली होती. हि नाझिया कधीच विस्मरणात गेली. आशा अजून पाय रोवून उभी आहे.
भूलभुलैया या शेवटच्या
भूलभुलैया या शेवटच्या गाण्याच्या च्या तमीळ मल्याळी, तेलुगु आणि हिन्दी व्हर्शन्स यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. विद्याबरोबर नाचणार्या दाक्षिणात्य नटाचे नाव विनीत. कुठले तरी एक व्हर्शन वगळता विनीत सगळ्यात आहे. एकात शायनीच्या जागी राजा म्हणून चक्क रजनीकान्त आहे आणि तो काही सरगमचे बोलही म्हणतो. इतरत्र अभिनेत्रीचा डान्स विद्यापेक्षा सरस आहे पण हिन्दी गाणे चांगले आहे. विद्या कॉन्शस वाटते इतकेच.
दक्षे , तुम सैय्या गुलाबके फूल या गाण्याची लिंक मी 'वाईट चित्रीत झालेल्या गाण्याच्या' लिंक मध्ये दिली आहे.(गाणे वाईट चित्रीत नाही . संध्याच्या समर्थनार्थ ती लिंक दिली आहे...)इथेही देत आहे..
http://www.youtube.com/watch?v=RYYQXpy1SQk
दिनेश, ते गाणे होते डिस्को स्टेशन डिस्को, छोडो छोडो मेरी बाहे, मेरी बाहें मेरी राहे, लग गयी प्यारकी हथकडी...
नाझिया हसन पाकिस्तानी होती. तरुण वयातच तिला कॅन्सर झाला आणि ती वारली.
आभार रॉबीन, नाझिया गेल्याचे
आभार रॉबीन, नाझिया गेल्याचे मला माहितच नव्हते.
एक दाक्षिणात्य मुलगी म्हणून विद्याने नृत्याचे प्रशिक्षण लहानपणीच घेतले आहे. पुढे बहुदा तिचा सराव गेला असावा.
थोडेसे विषयान्तर. कोठे
थोडेसे विषयान्तर. कोठे विचारावे ते कळेना. म्हणून पौडाच्या पावण्यागत हतंच इच्यारतुया. यान्नी या ग्रीक कम्पोजरची लाईव्ह फ्रोम अक्रोपोलिस आणि लाईव्ह अॅट अक्रोपोलिस असे दोन वेगळे व्हिडीओ आल्बम आहेत काय? यान्नीचे इथे कोणी फॅन्स आहेत का? मायकेल जॅक्सन नन्तर रेकॉर्दच्या बाबतीत त्याचा नम्बर लागतो हे खरे आहे का? माझ्याकडे जो व्हिडीओ आहे त्यात तो केस कापलेला आणि काळे कपडे घातलेला आहे.
मी यानी फॅन आहे ना. उगीच
मी यानी फॅन आहे ना. उगीच लिहीत नाही. माझ्याकडे ती सीडी होती. अक्रोपोलिस वाली. त्याकाळात ४०० रु. ला घेतलेली. ती फेमस ट्युन ब्रीटिश एअरवेज च्या जाहिरातीसाठी वापरली होती.
http://www.youtube.com/watch?v=Ecm-RFL8nNM
ऐका गुमान. केसा शिवाय यानी म्हण्जे लसणाशिवाय झिन्गे.
व्हिडीओ आल्बमची कल्पना नाही,
व्हिडीओ आल्बमची कल्पना नाही, यानीचा अल्बम (audio CD) आहे लाईव्ह अॅट अक्रोपोलिस, पण लाईव्ह फ्रोम अक्रोपोलिस नावाचा नाही. यानीने काही वर्षांपुर्वी ताजमहाल येथे (चांदण्या रात्री) सुद्धा एक पर्फोर्मंस दिला होता. "न्यु एज" ऑर्केश्ट्रा मध्ये त्याची बरोबरी करणारा सध्या तरी कोणीही नाही.
माझ्याकडे यानीचे हे अल्बम्स आहेतः
Dare to Dream
In My Time
Live At the Acropolis
Reflections of Passion
I think that qualifies me as his fan.
>>ऐका गुमान. केसा शिवाय यानी म्हण्जे लसणाशिवाय झिन्गे. <<
कर्रेक्ट. यानीने आता त्याचे (सिग्नेचर) लांब केस आणि जाडजुड मिशा, दोन्हीही उडवले आहेत.
छ्या छ्या , यानीचे ते मान
छ्या छ्या , यानीचे ते मान उडवून केस झटकणे आणि त्याची एकूणच बॉडी लँग्वेज पाहण्यात तर निम्मे यश आहे त्याचे. आणि काय सुरेख हसतो. ऑर्केस्ट्रा कन्डक्ट करताना एखाद्या भारतीय योग्याप्रमाणे वाटतो तो.
त्याचे स्वेप्ट अवे तर कसले खतरनाक आहे.... ५ स्टार रेटिंग.!
http://www.youtube.com/watch?v=I_B7MgsYObA&feature=related.
ऑर्केस्ट्रा कन्डक्ट करताना
ऑर्केस्ट्रा कन्डक्ट करताना एखाद्या भारतीय योग्याप्रमाणे वाटतो तो.
एकदम... मागे टीवीवर पाहिला तेव्हा कोणी भारतीयच आहे असे मला वाटलेले. आईच्या देवयानी नावातले यानी घेऊन स्वतःचे नाव बनवले असेच मला वाटलेले तेव्हा.....
त्याचे कपडे इतके पांढ्रे
त्याचे कपडे इतके पांढ्रे पांढ्रे कसे राहतात बाइ?
"हिंदी चित्रपटातील उत्तम
"हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी" असा बाफ आहे ना हा?
मधुमती - आजा रे परदेसी
सलील चौधरींच्या संगीत पोतडीतील एक अनमोल रत्न. एकदा आशाला विचारले होते की अशी कोणती गाणी आहेत की जी गायला न मिळाल्यामुळे तुम्हाला हळहळ वाटते. तेंव्हा तिने या गाण्याचा उल्लेख केला होता.
लताचा आवाज या गाण्यात असा काही लागला आहे की सुरुवातीचे आजा रे ऐकतानाच मनातले सगळे विचार नाहीसे होतात, मनात उरते ते फक्त हे गाणं. डोळे तर केंव्हाच मिटलेले असतात मग पहाणार काय? तरीही एकदा डोळे उघडे ठेऊन हे गाणे पाहिले आणि बिमलदांना मनोमन मुजरा केला.
आजच्या ग्लॉसी चित्रपटांच्या जमान्यात चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर असण्याचे तितकेसे अप्रूप उरलेले नाही. प्रगत तंत्रज्ञानाने ते अगदी सोपे करून ठेवले आहे. पण त्या काळात निसर्गाचे सुंदर रंग देखील कॅमेर्यात पकडता येत नसत म्हणजे लढाईला जाताना जवळ आयुधे नसल्यासारखाच काहिसा प्रकार. पण तरीही निव्वळ काळ्या आणि पांढर्या रंगातूनच निसर्गातील श्रीमंती बिमलदांनी ज्या पध्द्तीने मांड्ली आहे ह्या गाण्यात त्याला तोड नाही. त्या झर्याचा खळाळ, उडणारे तुषार इतके जिवंत वाटतात की अगदी मनही न्हाऊन निघते त्यात.
वैजयंतीमालाला या गाण्यात तिचे नृत्यकौशल्य दाखवायची संधी नाहिये पण रोमारोमात नृत्य असणे म्हणजे काय याचा प्रत्यय ती या गाण्यात देते. तिची प्रत्येक हालचाल इतकी ग्रेसफूल आहे की बाजूलाच वाहणार्या झर्याचा अवखळ तिच्यात दिसतो. गाण्याचा प्रत्येक शब्द तिने जिवंत केला आहे.
त्याचे कपडे इतके पांढ्रे
त्याचे कपडे इतके पांढ्रे पांढ्रे कसे राहतात बाइ?
ये सर्फ एक्सेलव का कमाल है मामी.....
"हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी" असा बाफ आहे ना हा?
अशीच थोडी गंमत...
तुम्ही टाकाना एखादे सुमधुर गाणे जे तुमच्या कानांना आणि डोळ्यांनाही आवडले.
मला हेमा संजीव चे सीता और गीता मधले ते स्केट्स वाले गाणे भारी आवडते.
हवा के साथ साथ
घटा के संग संग
ओ साथी चल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल
"हिंदी चित्रपटातील उत्तम
"हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी" असा बाफ आहे ना हा?

>>
होय. म्हणूनच यापूर्वी विषयान्तर करण्याची परवानगी घेतली होती
तसेही लोकांची वर्दळ असलेला आणि यानीच्या गाण्याबद्दल माहिती मिळू शकेल असा दुसरा बीबी आठवेना म्हणून टाकले होते. आणि उत्तम रित्या चित्रीत झालेले एवढ्या बाबी करता तरी ते असंबद्ध नाही आहे
त्याचे कपडे इतके पांढ्रे
त्याचे कपडे इतके पांढ्रे पांढ्रे कसे राहतात बाइ?
>>
पांढरे कपडे वापरणार्यांचा मला तर हेवा वाटतो आणि मी त्यांचा लकडी पुलावर मुका घ्यायला तयार आहे. (महिला असल्यास ओटी भरून देण्यास...)
.
.
.
.
.
.
.
.
हा विनोद पु लंचा आहे.
आता टण्या बेडेकर सोडून सगळे खदखदा हसायला सुरू करतील. टण्या हिमालयात जाईल. दुनियावालोंसे दूर पुलंवालोसे दूर....
कर्रेक्ट. यानीने आता त्याचे
कर्रेक्ट. यानीने आता त्याचे (सिग्नेचर) लांब केस आणि जाडजुड मिशा, दोन्हीही उडवले आहेत.
अन तो कपडेही काळे घालतो आता
अन तो कपडेही काळे घालतो आता
अन तो कपडेही काळे घालतो आता
चचच... लग्न झाले काय त्याचे???
>>त्याचे कपडे इतके पांढ्रे
>>त्याचे कपडे इतके पांढ्रे पांढ्रे कसे राहतात बाइ? <<
>>"हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी" असा बाफ आहे ना हा? <<
ओके, ओके हे घ्या एक सफेद कपड्यांतील जीतुभाईचं गाणं. थोड्क्यात विषयांतर न करता आपली गाडी परत रुळावर आणली...
राजकुमार नंतर जीतुभाईने ऑल व्हाईट (टॉप टू बॉटम) चा ट्रेंड आणला. हे गाणे फर्झ चित्रपटातील, टिपिकल जीतु स्टाईल...
तुमसे ओ हसीना...
http://www.youtube.com/watch?v=Oy-yNiBJWRA
Pages