हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेंद्र कपुर माझा आवडता नाहीय पण ची गुमराह मधली सगळीच्या सगळी गाणी मला खुप खुप आवडतात (माझा शब्द - भयानक आवडतात)...

हे हवा ये हवा है उदास जैसे मेरा दिल...., चलो एकबार फिरसे अजनबी बन जाये, आप आये तो खयाले-दिले नाशाद आया, इन हवाओंमे इन फिजाओंमे...

चलो एकबार तर मास्टरपिस आहे त्याचे.

सगळी एकसोएक आहेत...

मराठीतील 'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी.....'सुर तेच छेडिता, गीत उमटले नवे....' मस्त गायलीत त्याने.. पण मी त्याला नेहमीच दुसरा नंबर दिला. पहिला अर्थातच रफिचा.

रवी, ओपी सारख्या संगीतकारांनीदेखील रफीला पर्याय शोधायचा म्हणून महेंद्र कपूरला पुढे आणण्याचा प्रयत्न केला.
आप आये तो खयाले-दिले नाशाद आया, कितने भूले हूए जख्मों का पता याद आया, एकदम सुंदर,काय शब्द आहेत व्वा!! काही जुनी गाणी त्यांचं चित्रीकरण कसही असलं तरी केवळ शब्द-स्वरांच्या जोरावर जबरदस्त प्रभाव टाकतात उदा. 'आपने याद दिलाया तो मुझे याद आया,के मेरे दिल पे पडा था कोई गम का साया' (आरती); नेहमीप्रमाणे झोपाळलेला प्रदिपकुमार आणि डिसइंटरेस्टेड मीनाकुमारी; तरी पण काय झकास गाणं आहे!

शारदा ची कथा, बरीच वेगळी होती. राज कपूरचे जिच्यावर मन बसते, म्हणजे मीनाकुमारी, ती त्याची सावत्र आई म्हणून घरी येते. त्याचे लग्न श्यामाशी होते. हे गाणे सिनेमात वेगवेगळ्या ठिकाणी त्या गातात, पण शेवटच्या शॉटमधे त्या एकत्र दाखवल्यात.
मुकेशचे, जप जप जप रे, हे गाणे पण त्यातलेच.
चंदन सा बदन मधले शब्द सुंदर आहेतच, पण हो जाऊ अगर मै दिवाना, आणि हो जाये अगर दिल दिवाना, असे रुपांतर पण छान आहे.

महेंद्र्कपूर ने, ना मुह छुपाके जियो (पडद्यावर गोपीकृष्ण ) आणि, नीले गगन के तले,(पदद्यावर सुनिल दत्त आणि विम्मि) पण छान गायलेय. चित्रीकरणही छान आहे.
त्याचे, संगम मधले, हर दिल जो प्यार करेगा, (सोबत लता आणि मुकेश) पण चांगले जमलेय.

साधना दिनेशदा अनुमोदन. चलो एक बार फिरसे अजनबी बन जाय हम दोनो काय आहे. त्या जाय वरून मन घसरगुंडी करत हलकेच उतरते. नव्या पॉसिबिलीटीज धुंडाळते.

शारदा दूरदर्शन वर पाहिला होता शाळेत असताना. जप जप खूप क्युट् आहे ना? मला राज आवड्तो. देव व दिलीप पण.
जुन्या अंदाजातील गाणी ऐकलीत का? सर्व अल्बम सुन्दर आहे. वर्थ अ पोस्ट.

आपण मला हसू नका पण ते चंदन का बदन लताचे ऐकताना माझे मानसचित्र होते गौतम बुद्धाचे. अतिशय शांत डोळे, ती म्हणते ना सरहाना तेरा जो मिल जाये अगदी गौतमच अभिप्रेत होता मला. आता गाण्यात श्रुन्गारिक रेफरन्सेस शोधता सापड्त नाहीत. इतके मन मोकळे झाले आहे. विचार करा डोंगरावर भव्य कातीव मूर्ती आहे व एक सेविका गाणे गात आहे. मागे नीतळ निळे आकाश. अशाच वेळी आत्मा निसटून जावा उदबत्त्तीच्या सुगंधी धुरासारखा. आज परत ऐकणार. लते लते अगदी ग्रेट ग तू.

बीफोर यु म्युझिक वर पहाटे पाच वाजता ब्लॅक अँड व्हाईट सुंदर एक सो एक गाणी लागतात. गरजूनी (रसिकानी) लाभ घ्यावा Proud

आजच्या दिवसाची सुरूवात किशोर कुमार आणि मधुबाला... पांच रूपय्या बारा आना... Happy

दिलीप, राज, देव या तिघांची एकाच काळात चलती होती. दिलीप आणि राज दोघानीही, भारतातील खेडुताचे, शेतकर्‍यांचे रोल केले आहेत. देवानंद ने कधी असला रोल केला होता का ? (मला आठवत नाही !)

राज चे असे भाबडे रुप, तिसरी कसम मधे छान वठले होते. त्याचे सारखे सारखे, ईस बोलणे पण गोड वाटायचे. आणि या रुपातली, मुकेशची गाणी, अगदी साधी असून गोड वाटायची (उदा दुनिया बनानेवाले, सजन रे झूठ मत बोलो ) या गाण्यात फारसे काहि घडतच नाही, निव्वळ बैलगाडिचा प्रवास, तरी पण यातला साधेपणा मनाला भावतो.

हम दिल दे चुके सनम मधल्या आंखों की गुस्ताखिया आणि मनमोहिनी गाण्यांचा उल्लेख झालाय का इथे ? मला ही दोन्ही गाणी ऐकायला आणि बघायला फार आवडतात.

बसंत बहार सिनेमात, मै पिया तेरी, तू माने या ना माने, हे लताचे एक सुंदर गाणे आहे.
पडद्यावर निम्मी आहे. तिचे भावपुर्ण डोळे या गाण्यात मस्तच चमकलेत. हे गाणे अनेक दृष्टिने अविस्मरणीय आहे. याची चाल सुंदर तर आहेच, पण या गाण्यात पन्नालाल घोष यांनी बासुरी वाजवलीय. अप्रतिम तानबाजी आहे (पहिल्यांदाच लताला (आशाव्यतिरिक्त) कुणी जबरद्स्त आव्हान दिले आहे ) पडद्यावर भा भू आहे, पण त्या ऐवजी एखादा पुतळा असला, तरी चालला असता.
आणखी एक विशेष म्हणजे, लताचे मराठी गाणे, गजानना श्री गणराया, आधी वंदू तूज मोरया, हे सही सही, याच चालीवर आहे. पण त्या गाण्यातली बासरिची जादू इथे नाही.

याच सिनेमात, रफिचे, बडी देर भई, बडी देर भई, कब लोगे खबर मोरी राम, असे एक भजन आहे. बाकिच्या गाण्यांची भाभूसाहेबांनी वाट लावली असली, तरी हे गाणे त्यांच्या तोंडी नाही. एका भिकार्‍याचा तोंडी आहे, पण यावेळी एका मिणमिणणार्‍या पणती शेजारी बसलेल्या, निम्मिने, उत्तम अभिनय केलाय.

आजच्या पिढीला, सुचित्रा सेन आठवत असेल, ती फक्त आँधी सारख्या सिनेमातली. तिने तरुणपणी काहि मोजकेच हिंदी चित्रपट केले. त्यापैकी देवानंद बरोबरचा, बंबई का बाबू, मधली गाणी मला आवडतात.
आशा चे, देखने मे भोला है, दिल का सलोना (आशाचा उच्चार सलौना ) असे एक छान आहे आहे. एस्डि ने या गाण्यात मस्तच ताल दिलाय, आणि ते सुचित्राने पडद्यावर छान अवखळपणे सादर केलेय.
याच सिनेमात,(चुभुद्याघ्या) रफि आशाचे, म रे गा, म रे गा, प म ग म, दिवाना मस्ताना हुआ दिल, जाने कहा होके बहार आयी, असे खुपच सुंदर गाणे आहे. हे गाणे ऐकताना, आशाने ते मधुबाला साठीच गायले असावे, असे वाटत राहते, पण मला यातल्या चित्रीकरणातले खास काहि आठवत नाहि.

याच सिनेमात, मुकेशचे, चलरी सजनी अब का सोचे, कजरा ना बह जाये रोते रोते ( हेच गाणे लताने पुढे श्रद्धांजली मधे गायले आहे ) असे छान गाणे आहे. मी सिनेमा बघितला नाही, त्यामुळे नीट माहित नाही (गाणी छायागीत मधे बघितली होती ) पण सुचित्राला देव लग्नासाठी घेऊन जात आहे असा प्रसंग आहे. (लग्न दुसर्‍याच कुणाशीतरी होतेय ) यात एक अँगल असा आहे, कि देव खुप पुढे झुकलाय, तिला ओढत नेतोय आणि तीची मान खुप मागे झुकलेली. असा अँगल, परत कधी बघितल्याचे आठवत नाही.

यात एक अँगल असा आहे, कि देव खुप पुढे झुकलाय, तिला ओढत नेतोय आणि तीची मान खुप मागे झुकलेली. असा अँगल, परत कधी बघितल्याचे आठवत नाही.>> फुल्टू अनुमोदन. Happy
सजन रे झूठ मत बोलो. - वहिदाचे सौंदर्य काळ्या पांढर्‍या रंगात खुलून येते. हनुवटी व हास्य.
दीवाना मस्ताना - आहे माझ्याकडे, त्यात वेडावून पमग मरेम पमगम म्हणायचे. लै ग्वाड.
पान खाये सैया हमारो.- सुन्दर गाणे.
मै पिया तेरी पण बासरी बद्दल अनुमोदन. अगदी स्वराबरोबर झुळझुळते नाही का?

रफीचे बा होशो हवास में दीवाना गाणे कोणत्या सिनेमात आहे? फारच सुन्दर आहे.

दीवाना मस्ताना हुआ दिल- प्रत्येक कडव्याचा शेवटचा शब्द एको इफेक्टमधे, कसला सही प्रयोग केलाय एसडीने!
बा होशो हवास में दीवाना - सिनेमा नाईट इन लंडन,संगीत लक्ष्मी-प्यारे; या सिनेमातलं 'नजर ना लग जाए किसी की राहों में' मला जास्त आवडतं.

ते लक्ष्मी-प्यारे चं संगीत आहे? मला नेहमी शंकर जयकिशन वाटायचं. पण ते 'नजर ना लग जाये...' मला अजिबात आवडत नाही Happy ते 'बा होशो हवास..' आठवत नाही. मला आधी वाटले मामींना 'जाग दिले दीवाना' म्हणायचे आहे Happy

'जाग दिले दीवाना'

वाव काय आठवण आली.... यातली सगळी गाणी मस्त आहेत. मला ह्यातले 'आजारे मेरे प्यार के राही, राह निहारु बडी देर से' हे तर खुपच आवडते. या चित्रपटात स्त्रीव्यक्तीरेखा बहुतेक नाहीये, फक्त फिरोजखानची एक हिरोईन असते असे उल्लेख आहेत. आजारे गाण्यातही त्याच्याबरोबर गाणारणीचे फक्त पाठून शॉट्स आहेत. एकदाही तिचा चेहरा दिसत नाही.

आगाउ, फारेन्ड, धन्यवाद.

जाग दिले दीवाना माहीत आहे. मला रफड्या रोम्यांटिक मूड मध्येच जास्त भावतो. पण तो भजने ही तितकीच सुन्दर गातो. मी घरनं एक मेगा प्रॉजेक्ट चालू केला आहे. मूड वाइज सिन्गर वाइज डीवीडी बनविणे. सुपर ऑर्गनाइज्ड अल्टिमेट कलेक्षन. म्हातारपणी शिदोरी होइल. सर्व गाणी वहीत लिहिणार पण. डीवीडी व लिरिक्स असे बनविणार. त्याला ह्या बीबीचा उपयोग होणारच.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवड्ते संगीत+ आवड्ते पुस्तक+ साबुदाणा खिचडी विथ दही= अ वेरी हॅपी ओल्ड वुमन. Happy

मामी वेळ वाचवायचा असेल तर सांगतो त्या फंदात पडू नका. शेवटी आपल्याला एका वेळेस काही श्रवणीय गाणी ऐकायला हवी असतात. किंबहुना त्यात थोडी व्हरायटी असेल तर बरेच. मी अशा काही कॅसेट्स (आणि काही लिस्ट) केल्या होत्या. पण विविध भारतीच्या एखाद्या चांगल्या सिलेक्शन ची सर त्याला येत नाही Happy

साधना - मला जाग दिले दीवाना ही आवडत नाही Happy ते दुसरे तर माहीतच नाही.

रफी नक्की कसा आवडतो आणि कसा नाही ते सांगणे कठीण आहे. फार तर न आवडणारी काही उदाहरणे देता येतील - शंकर जयकिशन च्या संगीतातील (माझ्या मते) माधुर्य संपून नुसता ऑर्केस्ट्रा शिल्लक राहिला तेव्हाची गाणी - म्हणजे बहुधा शम्मी ची उत्तरार्धातील, 'थोडा रूक जायेगी तो तेरा क्या जायेगा' छाप गाणी, आवाजात जरा जास्तच गुलछबूपणा आणत म्हंटलेली गाणी ई.ई.

आवड्ते संगीत+ आवड्ते पुस्तक+ साबुदाणा खिचडी विथ दही= अ वेरी हॅपी ओल्ड वुमन.

ते साबुदाणा खिचडी काढून टाका.. मला बाकीचे चालेल... साखि is unhealthy option

साधना - मला जाग दिले दीवाना ही आवडत नाही ते दुसरे तर माहीतच नाही.

चच्च्च... एकदा प्लिज ऐका, निदान ते दुसरे तरी... जरासे आवडेल नक्कीच..

मला रफीचे सगळ्यात सगळ्यात जास्त आवडते ते म्हणजे - पुकारता चला हु मै, गली गली बहारकी.... हाय, काय आवाज लागलाय रफीचा.. मी आतापर्यंत हजारदा तरी नक्कीच ऐकले असेन...
चित्रिकरणही मस्त आहे. उघड्या गाडीत विश्वजीत आणि सायकलवर आशा (आता विश्वजीत की जॉय आठवत नाही, दोघेही रामदास पाध्येच्या अर्धवटरावासारखे दिसायचे)

ते कलेक्शनच्या बाबतीत फारेंडशी सहमत. सिडी बनवुन ती काही दिवस ऐकली की मग अंदाज येत जातो पुढचे गाणे कुठले वाजणार ते, आणि मग सगळी मजा निघुन जाते. खुप आधी जेव्हा कॅसेटवर गाणी रेकॉर्ड करुन मिळायची , तेव्हा मी अशाच कॅसेटी भरुन आणायचे. त्यांच्यावरचा गाण्यांचा क्रम इतका डोक्यात बसलाय की आता विविधभारतीवर त्यातले एखादे गाणे लागले की मला लगेच पुढचे आठवते, आणि तेच वाजणार असे वाटते.

मी हल्ली मोबाइलवर शफल करुन गाणी ऐकते, त्यामुळे पुढच्या गाण्याची उत्सुकता टिकुन राहते.

रफी नक्की कसा आवडतो आणि कसा नाही ते सांगणे कठीण आहे. फार तर न आवडणारी काही उदाहरणे देता येतील - शंकर जयकिशन च्या संगीतातील (माझ्या मते) माधुर्य संपून नुसता ऑर्केस्ट्रा शिल्लक राहिला तेव्हाची गाणी - म्हणजे बहुधा शम्मी ची उत्तरार्धातील, 'थोडा रूक जायेगी तो तेरा क्या जायेगा' छाप गाणी, आवाजात जरा जास्तच गुलछबूपणा आणत म्हंटलेली गाणी ई.ई.>> अनुमोदन. मन चाहे गीत ला अशीच गाणी जास्त लागत. आपले नशीब दुसरे काय. पहिले तशीच ऐकलेली मग हळू हळू चांगली गाणी कानावर पड्ली. मग मास्टर पीसेस.

तसे मुकेश लता किशोर चे पण आहे. वैताग गाणी ते लोक कदाचित गाउन टाकत असतील. मला काय वाट्ते - अजून २० वरषांनी कधी दीवाना मुझसा नही वगैरे ऐकायची अगदी खूप इच्छा झाली तर काय करायचे? आपल्याकडे निदान वहीत तरी ती गाणी राहतील. तशी एक वही आहेच माझ्याकडे.

साधना> अरे बुढीया एक कटोरी सा.खी. खायेगी तो क्या पाकिस्तान अटॅक करेगा क्या? Proud

विषयांतरा बद्दल क्षमस्व.

मि. नट्वरलाल मधील परदेसिया कोणाला आवड्ले का? रे व अमि अगदी दिलखुलास नाचलेत. जी व्रुत्ती जयाला कधीच जमणार नाही. रे दिसते किती हट्टी कट्टी व सुन्दर. त्या नंतर ते प्रेमात पड्तात व एक भेड बकरी वाला ड्वाय्लॉक आहे लै भारी.

साधना> अरे बुढीया एक कटोरी सा.खी. खायेगी तो क्या पाकिस्तान अटॅक करेगा क्या?
मै पाकिस्तान के अ‍ॅटॅक को जराभी डरती नही, लेकीन सुब्बु सुब्बु वेईंग स्केल पे खडी होने के बाद वो काटा जब जोरसे दौडने लगता है तो भागनेका मन होता है...

परदेसिया ला तोड नाही. बच्चन आणि रेखा ची केमिस्ट्री अनेक गाण्यांत जबरी दिसते. हे ही एक बघा, राम बलराम मधले. मला थोडेफार लक्षात आहे - रेखाच्या घरी चोरी होते आणि सोन्याची बांगडी का काहीतरी हरवते. मग तिच्याशी बोलायला मिळावे म्हणून पो.ई. अमिताभ स्वतः एक बांगडी विकत घेउन ती सापडली असे सांगत तिच्याकडे जातो. त्यानंतर ती चोरीला गेलेली बांगडी खरेच मिळते त्यानंतर बहुधा हे गाणे आहे. बघायला पाहिजे पुन्हा राम बलराम. अमिताभ चा स्वतःला फासावर चढवायचा सीन धमाल आहे.

http://www.youtube.com/watch?v=vwTXtFmyAlA

अतिशय शांत डोळे, ती म्हणते ना सरहाना तेरा जो मिल जाये अगदी गौतमच अभिप्रेत होता मला. आता गाण्यात श्रुन्गारिक रेफरन्सेस शोधता सापड्त नाहीत. इतके मन मोकळे झाले आहे. विचार करा डोंगरावर भव्य कातीव मूर्ती आहे व एक सेविका गाणे गात आहे. मागे नीतळ निळे आकाश

आता हे विजुलाइज करुन एकदा गाणे ऐकेन....

साधना बहुतेक उंचे लोग सिनेमा तो. राज कुमार, अशोक कुमार आणि फिरोझ खान होते. नायिका विजया चौधरी होती, पण शेवटपर्यंत तिचा चेहरा दिसत नाही (तरी ती चित्रपटातील महत्वाची व्यक्तिरेखा होती. असाच प्रकार खामोशी मधल्या धर्मेंद्र च्या बाबतीत केला होता )

मामी, रफी नंतर जरा कर्कश होऊ लागला होता. पण त्याच्या स्वभावाला ती गाणी सुट होत नसत. तिसरी मंझिल मधे, मै इनपे मरता हू हे अचाट गाणे होते तसेच, जानेमन जानेजा, तूमने मुझे देखा, असे हळुवार गाणे पण होतेच की.

आणि सरस्वतीचंद्र मधे, तसे डोंगराच्या पार्श्वभूमीवर गायलेले गाणे आहेच कि,
छोड दे सारी दुनिया किसीके लिये
ये मुनासीब नही आदमी के लिये

मला ते बुढीया वरुन एक लताचे गाणे आठवले

रोज अकेली आये, रोज अकेली जाये
सांझ कटोरा ले भिखारन रात

शब्द गुलजारचे आहेत हे नक्की, पण सिनेमा आणि चित्रीकरण ? मेरे अपने का ?

रफी नक्की कसा आवडतो आणि कसा नाही ते सांगणे कठीण आहे.>>नौशादने रुजवलेला रफी ऐकल्यावर रफी कसाही असला तरी आवडून घ्यावा लागतो. तेव्हढे देणे लागतो आपण त्याचे (त्यांचे) !!!

मला ते बुढीया वरुन एक लताचे गाणे आठवले

रोज अकेली आये, रोज अकेली जाये
सांझ कटोरा ले भिखारन रात>> हे असले शब्द गुलजारच लिहू जाणे. एक किताब नावाच्या मास्टर राजू च्या सिनेमात धन्नो चे गाणे होते ते हि सुन्दर व चित्रिकरणही. मुलगा घरातून पळून जातो व आगगाडीतून प्रवास करतो तेव्हाचे गाणे आहे. तो उबेसाठी प्लॅट फॉर्म वर एका म्हातारीजवळ झोपतो व नंतर सकाळी ती मेलेली आहे असे कळते. ते ही सिनेमात आहे. सिनेमा मजेशीर आहे. त्यात एक लहान मुलांचे वर्गातील गाणे आहे
व एक मुलगा मध्ये व्हीआय पी अंडर वेअर बनियान म्हणतो. ( ती तेव्हा दूर दर्शन वर जाहिरात लागत असे)
लै ह्ह्पुवा.

खट्टा मीठा असाच एक नर्म विनोदी सिनेमा. त्यातील गाणी सिच्युएशनल असतील पण सुन्दर आहेत.
चार गाण्यांची तबकडी होती आमच्याकडे. व लाल झाकणाचा रेकॉर्ड प्लेयर. मम्मी ओ मम्मी. तू कब सांस
बनेगी व इतर तीन गाणी एक नवर्‍याची वरात बायकोकडे जाते व गाडी पंक्चर होते तेव्हाचे आहे. हा एकटे
पालक सिच्युएशन वरील अतिशय मस्त सिनेमा. अशोक कुमार च्या घरी सगळा मर्दाना कारभार व पर्ल ला
मुले संभाळताना अवघड जाते कारण घरात पुरुष नाही. प्रीतीगांगुलीचे स्वप्न अमिताभशी लग्न करायचे.
कधी कधी दूध कसे सरफेस खाली उकळत राहते तसे ह्यासिनेमातील विनोदाचे आहे. डेविड चे काम मस्त.
कधीही लागला तर सिनेमा व गाणी जरूर बघा.

मामी मेरे मूंह की बात छिन ली...
खट्टामिठा मला पण खूप आवडतो... प्रचंड गोड सिनेमा
पर्ल पदमसी, अशोक.... इन फॅक्ट राकेश रोशन आणि त्याची हिरॉईन सोडल्यास सगळे मस्त.. Proud

मै इनपे मरता हू हे अचाट गाणे होते तसेच

माझे प्रचंड आवडते गाणे आहे हे.. चित्रिकरण काय भन्नाट आहे. पण मी हल्ली तिसरी मंझील ची सिडी घेतली त्यात चित्रपट बराच कापलाय आणि हे गाणे तर मध्येच सुरू केलेय. त्यामुळे गाण्याचा अर्थ काय वगैरे सगळ्याच गोष्टी कापल्या गेल्या Sad

(तरीही एक गोष्ट सांगावीशी वाटते की, हा चित्रपट मी मुलीला मुद्दाम दाखवला, तसा तिला शम्मी आवडतोच, पण हा चित्रपट पाहुन तिने शाळेत सगळ्याना थर्ड फ्लोअर बघाच म्हणुन सांगितले. शाळेत भेंड्या खेळतात तेव्हा जुनीच गाणी पटकन आठवतात हे तर ती नेहमीच सांगते. काय जादु होती त्या वेळच्या संगितात आणि चित्रपटांत देवाला ठाऊक, पण आजही खिळवतात मला)

खट्टा मिठा माझा all time favourite आहे. आणि पर्ल तर गोडच... अलेक पदमसीसे तिला सोडुन शेरॉन शी घरोबा केला तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणींनी त्याला शक्य तेवढ्या सगळ्या शिव्या घातल्या होत्या...

Pages