हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दि बर्निंग ट्रेन, मधली कव्वाली "पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने है " पण मला खुप आवडते. सिनेमात एकेकाळी खूप छान कव्वाल्या असत. मग त्या एकदम गायब झाल्या. किशोर कुमार कितीही आवडता असला, तरी त्याच्या गळ्याला हा गानप्रकार सुट होत नव्हता. त्यामूळे त्याच्या काहि कव्वाल्या, मला अजिबात आवडत नाहीत.
हि वरची कव्वाली मात्र पुर्वीचा अस्सल बाज घेऊन आली होती रफी आशा होते त्यामुळे अर्धी लढाई जिंकलीच होती. याचे सादरीकरण पण नेहमीपेक्षा वेगळे होते. जितेंद्र, नितू सिंग, आशा सचदेव वगैरे मंडळी होती (तसे या सिनेमात, धर्मेंद्र, हेमामालिनी, विनोद खन्ना, परवीन बाबी, विनोद मेहरा, डॅनी असे बरेच कलाकार होते. त्या काळी त्याना मल्टी स्टारर म्हणत )
हि कव्वाली स्टेजवर नाही तर चक्क चालत्या ट्रेन मधे आहे. तसेच ट्रेनमधे गडबड (म्हणजे चालक मेला आहे) झालेली आहे. त्या प्रसंगात हि छान कव्वाली योग्य तो रिलिफ देते. चाल सुंदर आहेच.
याच सिनेमात, आशाने दोन आवाजात, मेरी नजर है तूझपे, असे गाणे गायलेय, आणि ते हेमा आणि परवीन वर चित्रीत झालेय.
याच सिनेमात शेवटची प्रार्थना, "तेरी है जमीन" पण छान आहे. चाल खूप सुंदर आहे. पदद्यावर सिम्मी वगैरे आहेत. आणि बहुतेक या गाण्यात, पद्मिनी कोल्हापुरे चा आवाज आहे (ती या सिनेमात नाही.)

दि बर्निंग ट्रेन, मधली कव्वाली "पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने है " >>>> मस्त आहे ती कव्वाली.. जितेन्द्रपेक्शाही त्या "गाणार्‍या" बाईने मस्त acting केलेय.. याच चित्रपटातले "जानु मेरी जान" पण मस्तच..

ह्या लिस्ट मधे अजून फिजा चा उल्लेख नाहि ? Happy

आजा माहिया हा संतोश सिवनचा मास्टरपीस आहे. गाण्याचे चाल ठिकठाक आहे (कदाचित उचलली असल्याचा संशय आहे), lyrics गुलजारच्या मानाने कमी वाटतात. पण सादरीकरण, ह्रितिक-नेहा नि संतोश सिवन त्याला "beyond concept" नेऊन ठेवतात. खर तर त्याचे चित्रीकरण ज्या जागांवर झालय त्या जागा नुसत्या बघितल्या तर इथे चक्क कोणी चित्रीकरण करतय ह्याचे आश्चर्य वाटावे अशा आहेत. पण संतोश सिवनच्या camera मधून जे बाहेर निघतेय ते वेगळेच काही आहे. slow motion, रंगांचा किंवा silhouette चा एव्हढा perfect वापर मी तरी क्वचितच पाहिलाय. त्यांचे कपडे एकदम day to day wear मधले आहेत पण त्यांची combinations and color co-ordination एकदम pleasant.

इथे नेहाचा उल्लेख करायला हवा. ह्रितिक सारख्या ताला सूराला अंगात घेऊन नाचणार्‍या माणसासमोर त्याच ताकदीने उभे राहणे is an achievement. नेहा दिसायला एकदम सुंदर मार डाला category मधे जात नाही पण चेहर्‍यावर एक निरागस गोडवा आहे and she uses it to perfection to stand up (कधी तरी थोडा अतीही होतो). सुरूवातीला तो तिला 'आजा माहिया " सांगतो तेंव्हा तीचे अवखळपणे"नाही सांगणे", मग एकटीच नाचताना त्याने पाहिले हे कळल्यावरचे तिचे expressions, मधे लहान मुलांच्या कोंडाळ्यात ती जे काही उत्स्फुर्तपणे expressions देते (नीट बघितला तर ठेका देताना डबेवाला दाखवलाय), ह्रितिककडे बघून चेहरा हातात खुपसून लाजणे किंवा एकमेकांच्या steps follow करत केलेला नाच, कोलगेटच्या बोलबोर्डसमोर केलेला नाच.

त्याच्या कपाळावर, मग डोळ्यावर किस करत खाली सरकणे मग थांबणे पाठी होणे नि परत त्याच्या मिठीत जाणे. कोलगेटच्या बोलबोर्डसमोर केलेला उत्स्फुर्त नाच जो एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दोघे जणच करू शकतात. प्रेमात पडलेल्या कोवळ्या तरुणाईचा उत्स्फुर्तपणा एकदम प्रसन्न करून टाकतो. गाणे संपताना ते दोघे जण silhouette मधे एकमेकांमधे गुंतून जसे नाचतात that is best climax I have ever seen for the love song.

आजपासून सुरू केलेला नवा छंद...
यूट्यूब एचडी वरून सुंदर चित्रीकरण असलेली गाणी डाऊनलोड करून संग्रह करणे...
पहिलं गाणं-
आजा माहिया...
आसामी धन्यवाद...!!!
पोस्ट वाचल्यावर गाणं पहावसं वाटलं म्हणून यूट्यूब वर गेलो, गाणं एचडी मधे शोधलं आणि मनात विचार आला की हे डाऊनलोड करावं... आणि सुरू झाला नवा छंद...
दुसरं गाणं-
दिल से रे...

ह्रुतिक माझा अत्यंत आवडता कलाकार आहे. त्याच्याबद्दल अजून लिहायचे आहे.
चिंगी, त्या लाल साडीतल्या नटीचे नाव आशा सचदेव. (तिची बहीण रेश्मा, टिव्हीवरच्या, कमलेश्वरच्या,
परिक्रमा, कार्यक्रमात असायची ) पण या दोघी मग विस्मरणात गेल्या.

आशा सचदेव कायम हिरॉइनची मैत्रीण. प्रियतमा मध्ये ती नीतू ची मैत्रीण आहे चष्मेवाली. त्यातच कोइ रोको ना मन मचल रहा है हे चांगले गाणे आहे. परिक्रमा पण चान्गला कार्यक्रम होता. तेव्हा एकच च्यानेल होते त्यामुळे सगळे कार्यक्रम बघत असु.

फिजा मध्येच सुश्मिताचे पण एक दणकेबाज गाणे आहे. महबुब मेरे. त्याचे चित्रिकरण ही तेव्हा नाविन्यपुर्ण
होते. ओम पुरी नवीन असताना त्याचा एक आक्रोश सिनेमा आला होता त्यात एक पहाटेचे गाणे आहे कान्हा रे पीड सही ना जाये. ते मला खूप वर्शांनी इन. कॉम वर मिळाले. अप्रतिम गाणे आहे. वंदना खांडेकर ने गायले आहे. ओफिसात ऐकु नका कारण नंतरचे गाणे तू ऐसा कैसा मरद बाय माधुरी पुरंदरे. ( मोस्ट एम्बरासिन्ग सॉन्ग) लगेच सुरू होते.

दिनेश, ती आशा सचदेव अजूनपण अधून मधून पिक्चरमधे दिसते. वर उल्लेखलेल्या फिजामधे पण तिने जया बच्च्ननच्या मैत्रीणीचा रोल केलाय..

वंदना खांडेकर म्हणजे जोत्स्ना भोळे यांच्या कन्या.
सुश्मिता सेनचे, सिर्फ तूम (प्रिया गिल आणि संजय कपुर चा) मधे पण एक छान गाणे होते. तिची या सिनेमातली, पराभूत नायिकेची भुमिका पण छानच वठली होती. एका प्रसंगात ती हिरव्या साडीत आहे, खुपच गोड दिसलीय ती.

अमिर खान आणि ममता कुलकर्णीचा बाजी (चुभु ?) सिनेमा आला होता, त्यात अमिर खानने, पुर्ण गाणे, मुलीच्या रुपात सादर केलेय. गोड दिसला होता तो. (चक्क कोण ही नवी नटी, असे वाटले होते. )
सरफरोश मधले त्याचे आणि सोनाली बेंद्रेचे गाणे पण छान चित्रीत झालेय. आणि गझनि मधल्या गाण्याचे टेकींग पण छान आहे.
तो, फैझल खान आणि ट्वींकल खन्ना चा मेला नावाचा सिनेमा आला होता (त्यात अ‍ॅश पण पाहुणी कलाकार होती ) त्यातली सगळीच गाणी, भयानक घाण होती.

मच गया शोर मधे, परवीन बाबी कोळणीच्या वेशात फारच गोड दिसलीय. मला ते गाणे फक्त तिच्यासाठी आवडते. शबाना आझमी, झीनत अमान आणि परवीन बाबी चा अशांति नावाचा सिनेमा आला होता. (हिरो बहुतेक काका ) त्यात या तिघीनी, नऊवारी साड्या नेसून, लवंगी मिरची मै कोल्हापूरकी, म्हणत नाच केलाय. या तिघींची नाचाची स्टाईल, त्या साड्या, मजेशीर होता तो प्रकार.

एखाद्या जिवलग मित्र वा मैत्रीणी बरोबर, एखाद्या निसर्ग रम्य ठिकाणी निवांत बसून काही गुणगुणावे, यातले सुख किती और असते नाही. असे मोजके प्रसंग आपल्या आयूष्यात नक्कीच आलेले असतात.
असे एक गाणे, सचिन आणि रजनी शर्माच्या, बालिका वधू मधे आहे, बडे अच्छे लगते है, असे शब्द आहेत.
मधेच तिचा और ? असा प्रश्ण आहे आणि त्याचे, और तूम असे उत्तर आहे. ओ माजी रे, अशी हाक आहे.
आणि आहे एक निवांतपणा !!!

दोस्ताना (...नही तो क्या मंदीरकी घंटी बजेगी? वाला) मध्ये बर्याच सीन्स मध्ये झीनत अमान साडी नेसलीय व अप्रतीम दिसलीय... हे एक त्या सिनेमातलं गाणं...

दिल्लगी ने दी हवा...

चित्रपट : दोस्ताना
गीत : आनंद बक्षी
संगीत : लक्ष्मीकांत-प्यारेलाल
गायक : आशा भोसले आणि किशोर कुमार

http://www.youtube.com/watch?v=En7o-VdQ9-Q&feature=related

विरासत या चित्रपटातील ह्या गाण्यात पुजा बात्रा खुपच सुरेख दिसलीय. गाण्याचं टेकिंगही छान आहे.

तारे है बाराती.....

चित्रपट : विरासत

या गाण्याची जादु काही औरच आहे. कैफी आझमींची शब्दरचना, मदन मोहन यांचं अप्रतीम संगीत आणि जोडीला लताबाईंचा स्वर्गीय आवाज, या काँबीनेशमुळे प्रिया राजवंशचा mediocre अभिनयसुद्धा अगदी खुलुन आला...

जरा सी आहट होती है तो दिल...

चित्रपट : हकीकत
गीत : कैफी आझमी
संगीत : मदन मोहन
गायीका : लता मंगेशकर

http://www.youtube.com/watch?v=B_Iq5T---oQ&feature=related

छु गयी जीस्म मेरा, किसकी दामन की हवा...
व्वाह, क्या बात है!

हे गाणं एन्जॉय करायला त्याची पार्श्वभूमी माहीत असणे आवश्यक आहे. हा किंवा मुळ मराठी चित्रपट "पाठलाग" पाहीला असेल तर थोडी कल्पना येइल. या गाण्यात सतारीची अत्यंत सुंदर prelude आहे. It sets the tone of entire song.

नैनो मे बदरा छाए...

चित्रपट : मेरा साया
गीत : राजा मेहदी अलि खान
संगीत : मदन मोहन
गायीका : लता मंगेशकर

http://www.youtube.com/watch?v=QZlVH51Wmts

ह्यातली सगळीच गाणी सर्वांगसुंदर आहेत.. नैनोवालींने हाय मेरा दिल लुटा... हेही अतिशय सुंदर आहे.

मस्त बीबी दिनेशदा ! Happy

यहां चित्रपटातलं "नांम अदा लिखना " चं चित्रीकरण सुरेख आहे. जिमी आणि मनिस्सा छान दिसले आहेत. त्यातलं दुसरं गाणं " छन से बोले" ही मस्त आहे. या पुर्ण चित्रपटात ब्लू टींट प्रॊमीनंट आहे..तो इफ़ेक्ट आवडला मला!

पाप चित्रपटातलं "लगन लागी तुमसे मन की लगन" खूप सुरेख चित्रीकरण आहे. हॆंडसम जानराव आणि उदिता(फ़क्त या सिनेमात ...रादर गाण्यात ती स्वीट दिसली आहे!) आणि फ़ोटोग्राफ़ीही सुंदर आहे!

पाप चित्रपटातलं "लगन लागी तुमसे मन की लगन >> प्रकाश.. खूप अनूमोदन या बाबतीत..
गाण्याचे शूटिंग बहूतेक.. लडाख चे आहे..

अरे व्वा, दिनेशदा ...मस्त बिबि!
माझे आवडते गाणे,"अजिब दास्तां है ये.." चित्रपटःदिल अपना और प्रित पराई"

होडीतुन जाणारे राजकुमार,नादिरा, मीनाकुमारी अन इतर....मीनाकुमारीची अदाकारी जबरदस्त!
नजर खाली वळलेली...अगदी थोडेसे ओठ उघडुन बोलण्याची स्टाईल.... अन
"किसीका प्यार लेके तुम
नया जहा बसाओगे
ये शाम जब भी आएगी
तुम हमको याद आओगे"
या लाईनच्या वेळेस्... नादिराचे जाणिवपूर्वक ओठ मुडपून तिच्या चेह-याकडे पहाणे...लाजवाब!

काही अप्रतीम silhouette effects

लगान : ओ री छोरी
lagaan.jpg

पुकार : सुनता है मेरा खुदा
pukaar.jpg

फिजा : आजा माहिया
fiza.jpg

अँकीदादा, मस्त आहेत प्रकाशचित्रे व आपलं निरीक्षण. या धाग्यामुळे अनेक चांगली गाणी कळाली व पहावीशी वाटतायत.

अँकी, या फोटोना स्थिरचित्र का म्हणायचे, किती सुंदर लय आहे या पोझेसमधेच !!!

अरे लदाख वरुन आठवले, ते आरजू मधले, बेदर्दी बालमा तूझको, मेरा मन याद करता है.
गाण्याची चाल सुंदर आहेच, पण त्यात एका ओळीत कॅमेरा एकदम, साधना पासून लांब जातो, आणि वाटते, अरे एवढ्या मोठ्या वाळवंटात हि एकटीच !! याच गाण्यात जो छुआ था तूने, वो आँचल याद करता है, यावेळी तिची ओढणी एका झुडुपात अडकलेली, आह !
याच सिनेमात लताचे, अजि रुठकर अब कहाँ जाईयेगा, हे पण सुंदर रित्या चित्रीत झालेले गाणे आहे.
यातच, आशा आणि मुबारक बेगम ने गायलेली कव्वाली आहे
जब ईष्क कही हो जाता है, दिलकी ये हालत होती है
मेहफिलसे दिल घबराता है, तनहाई कि आदत होती है

या कव्वालीत, गिटारचा सुरेख वापर आहे

बिमलदांचा मास्टरपीस असलेले अजून एक गाणे म्हणजे बंदिनी मधले 'अबके बरस भेजो भैय्या को बाबुल' सिनेमाची सुरुवातच या गाण्याने होते. जेलचे वातावरण, स्त्री कैदी आपआपली कामे करता करता हे गाणं म्हणतायत, केवळ जिनियसच करु शकेल असा लाईटचा वापर आणि कॅमेरा अँगल, त्यासर्व प्रसंगातली हताशा, दु:ख उघडं करणारा आशाचा आवाज, त्या दैनंदिन कामातून होणारे आवाज हेच संगीत आणि त्या गाण्यातल्या शब्दातली आणि त्या बायकांच्या परिस्थितिमधली अब्सर्डीटी; एका झटक्यात तुम्हाला त्या सिनेमाच्या मूडमधे घेऊन जाते हे गाणे.अद्वितिय.

सिनेमाची सुरुवातच या गाण्याने होते>> हे गाणं अगदी सुरुवातीला नाहिये. पण गाण्याचे शब्द, आणि आशाचा आवाज ऐकला की डोळ्यामधे अर्धा थेंब का होइना पाणी तरळतंच.

आशाही ह्या गाण्याबद्दल खुप वेळा बोललीय.. ती स्वतः त्यावेळी मंगेशकर कुटूंबापासुन दुरावलेली, त्यामुळे गाताना तिलाही गाण्यात स्वतःचेच प्रतिबींब पडल्यासारखे वाटलेले.

Pages