कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोर्डच्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीचं इंजिन १००० CC आहे.. एसयुव्हीच्या मानाने हे इंजिन छोटे वाटत नाही का??
>>>
१००० सीसीचं इंजिन हे पेट्रोल इकोस्पोर्ट(फोर्डच्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीचं नाव)ला आहे. (असं असलं तरी ही गाडी १५०० सीसीच्या इंजिनाची पॉवर डिलीव्हर करेल, असा त्यांचा दावा आहे. डिझेल इकोस्पोर्टला फिएस्टाचंच १६०० सीसीचं इंजिन असणार आहे. चार मीटरपेक्षा कमी लांबी ठेवल्याने त्यांना तिची किंमत कमी ठेवता येणार आहे. यातली पेट्रोल गाडी (८ ते १० लाख) २०१२च्या पहिल्या तर डिझेल गाडी (९ ते ११ लाख) दुसर्‍या तिमाहीत येणार आहे.
2012-Ford-EcoSport-India-2.jpg

व्हर्ना फ्लॉप गेली का हो?
>>>
नाही. या गाडीला (फ्ल्युइडिक वरना) खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ४-६ महिने वेटिंग असूनही लोक बुकिंग करत आहेत. आधीच्या वरनातले जवळजवळ सारे प्रॉब्लेम्स सोडवलेले दिसत आहेत. डिझाईन अजून स्लीक आणि इंजिन अजून रिफाइन केलं आहे. डायनॅमिक लूक्स, बेटर राईड क्वालिटी, बेटर स्टेबिलिटी.
hyundai_fluidic_verna_1.jpg

केदारला एक्सयुव्ही बद्दल अनुमोदन. ही गाडी व्हॅल्यु फॉर मनी आहे. 'आरिया'पेक्षा तर खूपच चांगली.
(आणि लोगान (किंवा आताची व्हेरिटो) चालली नाही, असं नाही म्हणता येणार. कमी किंमत आणि चांगलं मायलेज यामुळे विशिष्ठ सेगमेंटमध्ये ती गाडी चांगली चालली. आणि ती चालल्याचं श्रेय महिंद्राच्या नेटवर्कला आहे.)

डिझेल इकोस्पोर्टला फिएस्टाचंच १६०० सीसीचं इंजिन असणार आहे. >> छोटे करेक्शन. १.५ चे (नवीन फिएस्टाचे इंजिन असणार आहे.)
पेट्रोल १००० सिसि टर्बो असणार आहे पण केवळ ३ सिलेंडर (ह्या ३/४ - ६ सिलेंडर विषयी मी मागे लिहिले होते). त्यातून पावर जरी १.६ ची मिळत असली असा दावा केला असला तरी SUV म्हणले की ती कुठेही चालायला शिवाय FWW, AWD हे हवेत. त्यामुळे डिझाईन जरी टिपीकल SUV असली तरी इकोस्पोर्ट ही रुढार्थाने टीपिकल SUV नाही कारण तिच्या ऑफरोड कॅपेबिलिटी किती आहेत हे सध्या सांगता येत नाही. ही गाडी खास ज्यांना हॅचबक नको पण सेडान साठी १२ /१३ + लाख घालायचे नाहीत अश्या नवीन फर्स्ट टाईम SUV बायर साठी असणार आहे. गाडी उत्कृष्ट असणार ह्यात वादच नाही.

फेब मध्ये लाँच होते आहे अशी अनॉफिशियल न्युज आहे. ज्यांचे १० लाखापर्यंतचे बजेट आहे त्यांनी नक्कीच विचार करावा.

हो, १.५ केदार. बरोबर.

नवीन फिएस्टा मात्र नवीन वरनाच्या तुलनेत मागे पडते आहे. चांगली गाडी असूनही.

इथे टू व्हीलरबद्दल विचारतेय... चालेल का??

टू व्हीलर घेताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्या??
बेस्ट कंपनी कोणती??
साधारण ३० किमी रोजचा प्रवास असेल तर खालीलपैकी कोणती बाईक घ्यावी.??

१.अ‍ॅक्टिव्हा
२.प्लेझर
३.स्कूटी पेप(ही खूपच पांगी गाडी वाटते मला)
४.अ‍ॅक्सेस
५.ऱोडियो
६. ड्युरो

"नवीन फिएस्टा मात्र नवीन वरनाच्या तुलनेत मागे पडते आहे. चांगली गाडी असूनही."

याला फोर्डवालेच जबाबदार आहेत. नव्या फिएस्टाची किंमत अनरिअलिस्टिक आहे. शिवाय ते काळे-निळे (सावरिया ? Wink ) इंटिरीअरही मला आवडले नव्हते. अर्थात, कोणाला आवडूही शकते म्हणा- ते सापेक्ष आहे शेवटी.
त्यांनी जुनी फिएस्टा (बहुधा) अजून पूर्ण बंद केलेली नाही. बंद केल्यास हिचा खप वाढेल असे वाटते.
लुक्स मात्र किलर आहेत नव्या फिएस्टाचे !

@टोकुरिका-

पहिल्या तीनही गाड्या टाईम टेस्टेड आहेत. पैकी स्कूटी आणि प्लेजर यांचा जीव तसा नाजूक वाटतो मला.
माझ्या मते 'सुझुकी अ‍ॅक्सेस' हा बेस्ट ऑप्शन आहे. उंच, दणकट, मायलेजही उत्तम देते. पांढर्‍या रंगात छान दिसते.
महिन्दाच्या स्कूटर्स मी चालवलेल्या नाहीत, त्यामुळे त्याबद्दल सांगू शकत नाही.

--------------------------------------------------------------------------

'ईऑन' वाले आहे का कोणी इथे? माझ्या मित्राला घ्यायची आहे.
केदार आणि साजिरा- तुम्ही काय सुचवाल? चेव्ही स्पार्क / ईऑन / आल्टो के टेन असा डायलेमा आहे.

टोकुरिका,

अ‍ॅक्सेस आणि अ‍ॅक्टिवा मधे माझी पसंती अ‍ॅक्टिवा...

कारण ट्राईड अँड टेस्टेड गाडी, स्पेअर्स बाहेरही मिळतात. अ‍ॅक्सेस चे स्पेअर्स फक्त ऑथोराइज्ड डीलर्स कडे ते देतील त्या किमतीला मिळतात. (मित्राला स्पीडो केबल बदलायलाही बराच चुना मारला होता...) अ‍ॅक्टिवा मार्केटमधे बराच काळ असल्यानी कोन्या-कोपर्‍यावरचा मेकॅनिकही हात लावायला घाबरत नाही (होंडा गाडी असून...)

- तुम्ही काय सुचवाल? चेव्ही स्पार्क / ईऑन / आल्टो के टेन असा डायलेमा आहे. >>

ज्ञानेश आपली व्हेरी ओन हम्बल आल्टो के टेन माझ्या मते ह्या तिन्हीत बेस्ट चॉईस आहे. (किंमत आणि इंजिन हा क्रायटेरिया घेतला तर)

१. किंमत कमी. (तुलना इऑन स्पोर्टस आणि LT स्पार्क)
२. नेटवर्क
३. पार्टस तुलनेने स्वस्त

पण फिचर्स हा क्रायटेरिया घेतला तर इऑन कारण अल्टो पेक्षा जास्त फिचर्स आहेत.

अल्टो पेक्षा ईऑनचा डॅश चांगला आहे पण इंजिन मध्ये के १० जास्त चांगले. आता अल्टोचा शेपही अगदी जुना नाही राहिला. नवीन अल्टो चांगली दिसते. त्यात लिमिटेड एडिशन नावाचे एक व्हर्जन डिसेंबर मध्ये होते ते आहे हे पाहायला सांगा. ते आवडले तर अल्टो नाही तर मग विविध फिचर्स असणारी इऑन

याला फोर्डवालेच जबाबदार आहेत. नव्या फिएस्टाची किंमत अनरिअलिस्टिक आहे >>> अनुमोदन. ती गाडी ७ ते ८ लाखा दरम्यान हवी. मग तिला लोक घेतील. Happy

त्यांनी नेमके हेच त्या एको स्पोर्ट मध्ये पण केले आहे. सध्या ९ लाख किंमत दाखवत आहेत. मला सांगा जो ९ लाख देऊन इको स्पोर्ट घ्यायचा विचार करेन, तो आणि सव्वा लाख देऊन XUV चे बेसीक मॉडेल नाही का घेणार. फोर्ड अनरियलिस्टीक दुनीयेत जगत आहे.
ब्रॅन्ड बिल्डींग साठी इको स्पोर्टची किंमत मी ७ लाख बेसीक आणि ८ पर्यंत टॉप ठेवली असती. ह्यात नफा कमी होईल पण व्हॉल्युम वाढेल. फोर्ड आणि रेनॉला अजून एक कोडे उलगडले नाही ते म्हणजे व्हॅल्यु व्हर्सेस व्हॉल्युम.

इऑन (डि-ओ व्हर्जन), अल्टो (एलएक्साआय) आणि नॅनो( एलएक्स) यात चॉइस करायचा आहे, प्लीज मदत करा!
नॅनोबद्दल इतकी विरोधी मतं ऐकली आहेत की जाम कन्फ्युजन होतेय.

नॅनो केवळ शहरात चालवायला खूप चांगली कार आहे. उगाच एक्सप्रेसवे वर चालवतना दुसरी एखादी SUV भरधाव गेली तर केवळ तिच्या ड्राफ्ट ने नॅनो हलेल!
खरी कॉम्पीटिशन माझ्यामते इऑन व अल्टो मध्येच आहे. LXI मध्ये व इऑन डी मध्ये मी इऑन डी प्रिफर करेन. पण अल्टो के टेन असेल तर के टेन. इऑन डी मध्ये बहुदा पावर स्टेअरिंग नाही तो अल्टो मध्ये आहे. बजेट थोडे वाढवून पावर स्टिअरिंग आले (इरा) तर इऑन बेस्ट. (ह्या दोघीत)

फियाट पुन्टो डिझेल 2012,,हुंडाई i20 यामधली एक घायचीय कोनती चांगली राहील??
थँक्स येऊकामी तुम्ही खरच कामी आलात Happy

चंपी, 'कामी येणे' हा शब्दप्रयोग 'युध्दात कामी येणे' अशा अर्थी वापरतात. तुला 'उपयोगी पडलात' म्हणायचंय पण अर्थ भलताच होतोय. Happy

येउकामी यांचे दोन्ही सजेशन उत्तम आहेत.चंपी ,मी तुमच्याजागी असतो तर पुन्टो प्रेफर केली असती, I20पण चांगली आहे.<< येऊकामी 'कामी 'आले>>,हा हा हा.सुपर्ब.

ए-स्टार ( ऑटो ट्रान्समिशन ) वापरलेले/वापरत असलेले कुणी आहे काय ?

मुख्यत्वे शहरात वापरण्यासाठी ६ लाखांच्या आतील उत्तम गाडी वाटते, पण ऑटो ट्रान्समिशन म्हटल्यावर डीलर पासून सगळे 'वेडा आहे काय ?' अशाच नजरेने पाहतात.

कारमध्ये ऑटो ट्रान्समिशन ही गोष्ट आपल्याकडे अजून सर्वमान्य का नाही ? Sad

<< कारमध्ये ऑटो ट्रान्समिशन ही गोष्ट आपल्याकडे अजून सर्वमान्य का नाही ? >>

१. कमी मायलेज
२. कमी रिसेल व्हॅल्यू

लक्झरी कार्समधे मला ठरवता येत नव्हतं. शेवटी मी टोयोटा इनोव्हा घेतली आणि या निर्णयावर मी अत्यंत समाधानी आहे. फीचर्सचं इतकं अप्रूप नव्हतं.. पण जे काही दिलेत ते जबरदस्तच आहेत.

प्रवास अत्यंत कंफर्टेबल होतो आणि ड्रायव्हिंग नेहमीपेक्षा दुप्पट करू शकतो.

शेवटी मी टोयोटा इनोव्हा घेतली >>> अभिनंदन इनोव्हा चांगलीच गाडी आहे. २०१२ चे मॉडेल घेतले का? न्यु इनोव्हा. त्यात डॅश मध्ये बदल आहेत असे ऐकले. मित्राला पण घ्यायची आहे. बहुदा टेस्ट ड्राईव्हला जाईन.

कारमध्ये ऑटो ट्रान्समिशन ही गोष्ट आपल्याकडे अजून सर्वमान्य का नाही >> हो समहाऊ नाही इथे मान्य. १०-११ वर्षे अ‍ॅटोमॅटिक चालवल्यावर मी मॅन्युअल घेतली आहे. आणि एन्जॉय करत आहे. आधी वाटले होते पण आता काहीच फरक वाटत नाहीये. Happy

अ‍ॅटो असण्याचे जसे काही(च) तोटे आहेत तसेच खूप जास्त फायदे आहे. भारतातील बंपर टू बंपर मध्ये अ‍ॅटो रॉक्स! स्ट्रेस खूप कमी होतो अन थोडे रिलॅक्स राहन्याचा आनंद मिळतो. अ‍ॅटो घेणारे पब्लीक वाढत आहे आता. आणि दिवसेंदिवस वाढणारच.

दोनच दिवसांपूर्वी घेतली . मला सोमवारी डिलिव्हरी घ्यायची नव्हती ( अमावस्या :फिदी:). पण भाऊ बघायला गेला नि घेऊनच आला (फोनवरून बरेच वाद घालून) . ब्ल्यूटूथला पाच मोबाईल फोन्स जोडता येतात, एलसीडी स्क्रीन (टच स्क्रीन) वर सगळे कंट्रोल आहेत. स्टियरिंगवर गाणं फॉर्वर्ड करायची सुविधा आहे, एसी जबरदस्त आहे आणि रिअर पॅसेंजरला तितकीच हवा मिळते जितकी पुढच्याला. व्हेंटिलेशन अप्रतिम. सस्पेंशन पूर्वीपेक्षा इम्प्रूव्हड आहेत म्हणे ( पूर्वीचे माहीत नाहीत ).

किरण अभिनंदन.. इनोव्हा मस्तच गाडी आहे..

टोकुरिका.. टू व्हीलरनी रोज ३० किमी जायचे असेल तर मोपेड पेक्षा बाईक घेण योग्य राहिल.. कारण मोपेडचे शॉक अ‍ॅबसॉर्व्हर्स... लांब पल्ल्यासाठी ह्या गाड्या तितक्या कंफर्टेबल नाहीत.. आणि रोजचे ड्रायव्हिंग असेल तर नक्कीच नाहीत... बाईकवरुन सुद्धा रोजचा ३० किमीचा प्रवास सुरुवातीला चांगला वाटतो पण एका ठराविक काळाने त्याचाही कंटाळा येतो.. दिवसभर काम करुन परत येताना जाम वैताग येतो...

चंपी, येऊकामीच्या सल्ल्याने आपण पुन्टो आणि i20कडे वळलात का?, तसे असेल तर ह्या धाग्याचा खरच चांगला फायदा होतोय.

साधारण पणे ६ लाखापर्यंत डिझेल गाङीला काय काय चॉईस आहेत? रोजचे १५० किमी प्रवासासाठी. (पॉवर स्टीअरींग, पॉवर ब्रेक आणि पॉवर विंडोज अस्सायलाच पाहिजेत.)

सध्या फोर्ड फिगो ZXI वर गाडी येउन थांबली आहे. पण मायलेज १७ आहे असा रीपोर्ट कळाल्यामुळे परत क्न्फ्युजन Happy

Pages